Skip to main content

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ४)

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 18/05/2021 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मोदींच्या प्रतिमाभंजनासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचा उल्लेख "मोदी विषाणू" असा करण्याची कॉंग्रेसची आपल्या कार्यकर्त्यांना सूचना. चीनचा उल्लेखही नाही. कसा करणार? कॉंग्रेसचा चिनी राज्यकर्त्यांबरोबर करार आहे ना. https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/call-it-modi-strai…

वाचने 84028
प्रतिक्रिया 219

प्रतिक्रिया

In reply to by आग्या१९९०

जे काही विशिष्ट सूचना करतात अशांचं ऐकतात. ज्यांचा पूर्वोतिहास काळाकुट्ट आहे, जे आचरटपणासाठी खोटेपणासाठी कुप्रसिद्ध आहेत, ज्यांना जग गांभीर्याने घेत नाही, जे कायम परदेशात जाऊन मौजमजा करण्यात धन्यता मानतात अशांचे वरवरचे लेखन ऐकण्याची गरज नाही.

In reply to by आग्या१९९०

राहुल गांधींनी सरकारने चेष्टा केली होती हे दाखवणारे काही रेफरन्स, बातमी, पत्रके इत्यादी काही आहे का?

In reply to by प्रदीप

धन्यवाद. मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स बंदच आहेत, आणि सिंगापूर सोबत भारताचा "एअर बबल" म्हणजे तात्पुरता करार सुद्धा नाही आहे, त्यामुळे केजरीवाल यांचा पूर्ण मुद्दा अर्थहीन झाला आहे. हे एव्हीएशन मिनिस्टरांनी सांगितले आहे. सिंगापूर मध्ये लहान मुलांना संसर्ग होत आहे हे पण तितकेच खरे आहे. हे कशामुळे होत आहे, म्युटेशन आहे की नाही, हे माहित नाही.

In reply to by कॉमी

सिंगापोर मधील बहुतांशी केसेस या बी १६१७ (ज्याला भारतीय variant समजलं जाते ) या प्रकारच्या आहेत. थोड्या केसेस UK आणि South आफ्रिका प्रकारच्या आहेत . त्यामुळे केजरीवाल यांचे म्हणणे हे तद्दन मुर्खपणाचे आहे. स्वतःला इतर राजकारण्यांपेक्षा वेगळं समजणाऱ्या केजरीवालांनी तरी थोडा फार अभ्यास करून बोलायला हरकत नव्हती.

In reply to by कॉमी

२ दिवस आधीच ह्यावर चर्चा झालिये. हा स्ट्रेन भारतातलाच बी १६१७२ आहे असं सिंगापुरच्या सरकारचं म्हणणे आहे. भारत सिंगापुर प्रवासबंदी अगोदरपासुनच आहे, अर्थात, तो असुनही हा स्ट्रेन तिकडे कसा पोचला हा संशोधनाचा विषय आहे. सिंगापुर सरकार फेक न्युज पसरवली म्हणुन केजरिवालांवर गुन्हा दाखल करायला निघाले होते, जयशंकर अन भारत सरकारला बरच वजन खर्ची घालुन वाचवायला लागलंय केजरिवालांना.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

सिंगापुर सरकार फेक न्युज पसरवली म्हणुन केजरिवालांवर गुन्हा दाखल करायला निघाले होते, जयशंकर अन भारत सरकारला बरच वजन खर्ची घालुन वाचवायला लागलंय केजरिवालांना.
या गृहस्थाची फेक न्यूज पसरवायची खोड फार जुनी आहे. अरूण जेटली आणि नितीन गडकरींनी खरं तर चांगलंच अब्रूनुकसानीच्या खटल्याच्या कात्रीत पकडले होते. पण दोघेही फारच भोळे सांब निघाले आणि नुसत्या माफीवर दोघांनीही केजरीवालांना सोडून दिले. एक गोष्ट समजत नाही. अरूण जेटली गेल्यावर या माणसाला तिथे अंत्यदर्शनाला जाताना काहीही लाज वाटली नसेल? खरं तर कार्यकर्त्यांनी चपलेने बडवून पळवून लावायला हवे होते.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

Air इंडिया ची विमाने सिंगापूरला आज सुद्धा येत आहेत. एप्रिल पर्यंत सिंगापूर नागरिक , PR आणि ep व wp असलेले येऊ शकत होते. फक्त tourist ना बंदी होती. सध्या फक्त सिंगपोर नागरिक आणि PR येऊ शकतात.

राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली वृक्षतोड; आता कधी होणार वृक्षलागवड ?.. https://www.esakal.com/nanded/tree-cuting-national-highway-when-will-th… --------- आरे बाबतीत वेगळा नियम आणि इतर ठिकाणी वेगळा नियम, असे काही आहे का?

“….तुम्हाला अजिबात गांभीर्य नाही,” मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावलं -------- https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-not-at-all-seriou… ----------

Narada Sting: सीबीआयच्या याचिकेत ममता बॅनर्जींचंही नाव, राज्याबाहेर खटला वर्ग करण्याची मागणी... ----------- https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/national/mamata-banerje… ---------- दोषींवर कारवाई व्हायलाच हवी ....

६० वर्ष एका घराण्याची सत्ता चालवुन आणि नको तितकी लोकसन्ख्या वाढु देउन. आता आकाशपाताळ एक करतायत परत सत्ता मिळवण्यासाठी आणि मुर्खासाऱ़खे राज्यान्मागे राज्य जातायत हातुन..

मुंबईतील काही भागात ज्यांचे वय 45 पेक्षा कमी आहे अशा लोकांचीही लसीकरण चालू आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे चालू असणार आहे. ग्रामीण भागात लसीचा तुटवडा असण्याचं हे एक कारण असावे. https://www.loksatta.com/mumbai-news/vaccination-special-guests-in-seve…

बंगालमध्ये विधानपरिषद आणण्यात यावी हा प्रस्ताव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळाने मंजूर केला आहे. यामागचे कारण नक्की काय हा प्रश्न नक्कीच पडतो. ममतांचा नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारींनी पराभव केला तरीही ५ मे रोजी ममतांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत विधानसभेवर निवडून येणे भाग आहे. कोरोनाची दुसरी लाट थोडीथोडी ओसरायला लागली असली तरी परिस्थिती पूर्ण नियंत्रणात यायला आणखी काही महिने जातील असे दिसते. कोरोनाच्या काळातच विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान घेतल्यामुळे निवडणुक आयोगावर भरपूर टीका झाली होती. असे असताना नोव्हेंबर पर्यंत पोटनिवडणुक न झाल्यास ममतांपुढील अडचणी वाढतील. त्यामुळे राज्यात विधानपरिषद स्थापन करून त्यावर निवडून जायचा ममतांचा डाव आहे का? राज्यात विधानपरिषद स्थापन करणे म्हणजे राज्यात एखादी नवीन महापालिका स्थापन करून तिथे निवडणुका घेण्याइतके सोपे नाही. राज्यघटनेच्या कलम १६९(१) प्रमाणे- Parliament may by law provide for the abolition of the Legislative Council of a State having such a Council or for the creation of such a Council in a State having no such Council, if the Legislative Assembly of the State passes a resolution to that effect by a majority of the total membership of the Assembly and by a majority of not less than two thirds of the members of the Assembly present and voting. म्हणजेच हा प्रस्ताव बंगालच्या मंत्रीमंडळात मंजूर झाल्यानंतर विधानसभेत मतदान करणार्‍या सदस्यांपैकी दोन-तृतीयांश बहुमताने मंजूर करून घ्यावा लागेल. तो करून घ्यायला फारशी अडचण नसावी. त्यासाठी विधानसभेचे एखादे विशेष अधिवेशनही ममता बोलावू शकतील. तसे झाल्यानंतर चेंडू केंद्राच्या कोर्टात जाईल. मग केंद्रीय मंत्रीमंडळाने हा प्रस्ताव मान्य करून त्यासंबंधीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर करावे लागेल. त्याला मंजुरी मिळाल्यावर मग ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी जाईल. राष्ट्रपतींची सही झाल्यावर भारताच्या गॅझेटमध्ये ते विधेयक कायदा म्हणून प्रसिध्द होईल. त्यानंतर विधानपरिषदेची स्थापना होईल. आणि नुसती विधानपरिषदेची स्थापना झाली तरी त्याचा फारसा उपयोग नाही. त्या सभागृहात ममतांना निवडूनही जावे लागेल. आणि त्यासाठी निवडणुकांची घोषणा परत निवडणुक आयोगालाच करावी लागेल. मुख्य म्हणजे या सगळ्या पायर्‍या अमुक इतक्या दिवसात झाल्याच पाहिजेत असे कोणतेही बंधन नाही. केंद्रीय मंत्रीमंडळ या प्रस्तावावर बसून राहिले तर ममता आदळआपट सोडून काहीही करू शकणार नाहीत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सामान्यतः दरवर्षी जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात बोलावले जाते. पावसाळी अधिवेशन संपले की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनापर्यंत मधे कोणतेही अधिवेशन नसते. त्यामुळे हा प्रस्ताव संसदेत पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घ्यावा लागेल. तसेच त्यानंतर निवडणुक आयोग निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार. म्हणजे आयोगाने तशी घोषणा करावी ही नुसती अपेक्षाच. कारण कोरोनाचे कारण दाखवून सगळ्या निवडणुका आयोग बेमुदत पुढे ढकलायची शक्यता सगळ्यात जास्त. त्यातच आजच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी आपला अपमान केला, आपल्याला पुतळ्यासारखे बसून राहणे भाग झाले वगैरे गोष्टी ममतांनी बोलून ठेवल्या आहेत. मुळात मोदी आणि ममता यांच्यातून विस्तव जात नाही. त्यात हा आणखी संघर्ष ममतांनी करून ठेवला आहे. मागच्या वर्षी उध्दव ठाकरेंपुढे अशी अडचण आल्यावर मोदींनी मध्यस्थी केली आणि राज्यात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी मतदान घ्यावे अशी रदबदली मोदींनी निवडणुक आयोगापुढे केली होती. पण असे सततचे खटके ममतांकडून उडवले जाणार असतील तर मोदींनी असे काही ममतांसाठी का करावे हा प्रश्नही पडेलच. आता लिहित आहे ते बंगालमध्ये लागू पडेल. माझे हेच मत मागच्या वर्षी महाराष्ट्राविषयी पण होते. कोरोनाकाळात सगळ्या निवडणुका पुढे ढकलायचा निर्णय घेतला गेला असेल तर एका राज्यासाठी आणि त्यातही एका मुख्यमंत्र्यासाठी त्या नियमाला अपवाद करणे अयोग्य ठरेल. शेवटी दोन्ही राज्यांमध्ये निवडून गेलेली विधानसभा अस्तित्वात आहे आणि एका पक्षाला/आघाडीला बहुमतही आहे. अमुक एक मनुष्य मुख्यमंत्रीपदावर असावा यासाठी प्रयत्न करायचे कोणतेही कारण केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे नाही. तर केवळ राज्यात एक बहुमतातले सरकार असावे हेच ऑब्लिगेशन दोघांचेही आहे. तसे असेल तर मागच्या वर्षी ठाकरे किंवा यावर्षी ममतांना सहा महिन्यात विधीमंडळावर निवडून जाता येणे शक्य नसेल तर राजीनामा देऊन त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री नेमणे सहज शक्य होते/आहे. मग जेव्हाकेव्हा निवडणुका होतील तेव्हा त्यांना निवडून जाऊन परत मुख्यमंत्री बनणे शक्य आहे. त्यातून काही खूप मोठा चमत्कार झाला आणि कोरोनाची लाट अपेक्षेपेक्षा खूप जास्त वेगाने ओसरली आणि पोटनिवडणुक घेणे शक्य झाले तर सगळेच चित्र पालटेल. बघू काय होते ते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आजच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी आपला अपमान केला, आपल्याला पुतळ्यासारखे बसून राहणे भाग झाले वगैरे गोष्टी ममतांनी बोलून ठेवल्या आहेत. >>> ही ब्रेकिन्ग न्युज असल्याचे वाचले. ही मुख्यमंत्र्यांच्या बैठक कोरोनासाठी बोलावली असता ममतानी दुसराच विशय काढला म्हणुन मोदीनी त्याना गप्प बसवले. काहीतरी विशय काढून भाण्डण करायचे हा ममतान्चा स्वभाव आहे. जसे त्यानी जय श्रीराम म्हणणार्याशी केले होते. आज हेच फक्त परत सिद्ध झाले.

In reply to by दिगोचि

बंगाल मधली निडणुक मॉमता दीदींच्या पक्षानी जिंकली याचा आनंद आपल्या राज्यातील काही माठ नेते आणि काही इतर बोलबच्चन करत होते. मात्र स्वतः मॉमता दीदी यांचा व्यक्तीगत पराभव झाला हे मात्र जसे तो झालाच नाही असे सगळीकडे दर्शवण्यात येत होते, मिडिया देखील मोदी / बीजेपीचा पराभवच कसा झाला अन् कुठली लाट वगरै नसते अश्या आशयाच्या बातम्यांचा जणु काही पुर आणण्यात आला... बीजेपी जरी बहुमतात नसली तरी त्यांची संख्या मात्र वाढली यांचा मुद्दामुन विसर पाडण्यात आला तसाच दीदींच्या पक्षाला मुस्लिम एकगठ्ठा मतदानाचा सगळ्यात मोठा फायदा /आधार मिळाला या बद्धल मात्र सोयिस्कर रित्या मौन बाळगण्यात आले. आता जे काही मॉमता दीदींच्या राज्यात चालले आहे ते अत्यंत भयानक आहे, अनेक बीजेपी कार्यकर्त्यांना त्या राज्यातुन जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला, तर काहींचे मुडदे देखील पाडण्यात आले, याच बरोबर हिंदू स्त्रियांवर बलात्काराच्या घटना झाल्या असुन त्यात वाढ होत आहे. मुळात बंगाल राज्यात आता हिंदू जणु काही अल्पसंख्यकच झाले की काय असे वाटते. हा सर्व घटनाक्रम बघताना मला २०१७ मधील रुपा गांगुलींची एक छोटी बाईट आठवली :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene

In reply to by मदनबाण

ह्याचा ममता बॅनर्जींच्या निवडून येण्याशी काय संबंध ?
याच बरोबर हिंदू स्त्रियांवर बलात्काराच्या घटना झाल्या असुन त्यात वाढ होत आहे.

In reply to by कॉमी

ह्याचा ममता बॅनर्जींच्या निवडून येण्याशी काय संबंध ? हिंदू स्त्रियांवर बलात्कार करणारे तथाकथित शांतता प्रेमी धर्मांचे आहेत, ज्यांच्या बळावरच दीदी सत्तेत आल्या ना ? सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene

In reply to by मदनबाण

फार कुतर्क,आणि दिशाभूल करणारी वाक्ये.
हिंदू स्त्रियांवर बलात्कार करणारे तथाकथित शांतता प्रेमी धर्मांचे आहेत
काय आधारावर दावा आहे ? ज्या बलात्काराचा राजकीय आणि धार्मिक संबंध जोडला जात होता त्याला तसा कोणताही पैलू नव्हता. इथे वाचा. २.
ज्यांच्या बळावरच दीदी सत्तेत आल्या ना ? सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ?
प्रतिवाद करण्याच्या लायकीचे वाक्य नाही, त्यामुळे पास. शब्दाशब्दाला कुतर्क आहे.

In reply to by कॉमी

हे योग्य नाही, प्रतिवाद करतोच. ज्यांच्या बळावर कोणाच्या बळावर ? हिंदूच्या मतसंख्येमध्येसुद्धा TMC ने पूर्वीपेक्षा बाजीच मारली आहे. तुम्ही तुमचा द्वेषमूलक मुद्दा रेटायसाठी फक्त मुस्लिम मताकडे पाहात आहात. इथे वाचा- गटनिहाय मत कसे हलले आहेत ते- इथे वाचा. सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ? हिंदूनच्या बळावर भाजपा निवडून येते तर हिंदूनी केलेल्या गुन्हाच उत्तरदायित्व भाजपावर टाकण्यास तयारी आहे काय ?

In reply to by कॉमी

काय आधारावर दावा आहे ? ज्या बलात्काराचा राजकीय आणि धार्मिक संबंध जोडला जात होता त्याला तसा कोणताही पैलू नव्हता. तुम्ही जी बातमी दिली आहे तशीच बातमी त्याच मुली बद्धल इथे देखील वाचता येइल :- 21-year-old college student raped and murdered in Medinipur district in West Bengal, 3 including a woman arrested हिंदूनच्या बळावर भाजपा निवडून येते तर हिंदूनी केलेल्या गुन्हाच उत्तरदायित्व भाजपावर टाकण्यास तयारी आहे काय ? बलात्काराचा गुन्हा कोणत्याही धर्मीय व्यक्तीने कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने केल्यास त्याल शिक्षा ही झालीच पाहिजे. जसा शांतता प्रेमी समाजाकडुन लव्ह जिहाद गेला जातोय तसे हिंदू समाजातुन कुठला जिहाद केला जातोय ते नक्की सांगा. तुम्ही तुमचा द्वेषमूलक मुद्दा रेटायसाठी फक्त मुस्लिम मताकडे पाहात आहात. बरे झाले द्वेषमूलक हा शब्द तुम्ही वापरलात, मग जिहाद आणि काफिर हे हिंदूच्या मैत्रीसाठी आणि त्यांच्या गुणगाणासाठी वापरले जातात असे म्हणावे काय ? Consolidating Muslim, secular votes worked for TMC The TMC has always had strong following among Muslims in south Bengal, including Kolkata West Bengal assembly poll results: Muslims pressed button for TMC in Congress bastion Muslim belt completely switches over to Trinamool from Congress

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene

In reply to by मदनबाण

१. तीच बातमी आहे ओपिंडीयात, त्यात काय वेगळे मांडले आहे ? अहो, तो बलात्कार मुस्लिम व्यक्तीनी केलाच नाहीये. आणि लोकल पोलीस आणि त्या मुलीच्या परिवाराने सुद्धा ह्यात कम्युनल आणि राजकीय अँगल नाही असे स्पष्ट केले आहे. २.
बलात्काराचा गुन्हा कोणत्याही धर्मीय व्यक्तीने कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने केल्यास त्याल शिक्षा ही झालीच पाहिजे.
अर्थातच ! पण मुळात ह्या घटनेत मुसलमान इन्व्हॉल्व्हच नाहीयेत. तुम्ही काय आधारावर दावा केलाय ह्या प्रश्नल बगल दिली. OpIndia सुद्धा गुन्हेगार मुसलमान आहेत असे कुठेही म्हणताना दिसत नाही. म्हणून तुम्ही द्वेषमूलक आहात. समजले ? ३.
जसा शांतता प्रेमी समाजाकडुन लव्ह जिहाद गेला जातोय तसे हिंदू समाजातुन कुठला जिहाद केला जातोय ते नक्की सांगा.
नुसती इकडून तिकडे गोलपोस्ट बदलतंय. आधी ममता बॅनर्जींचे नाव काढलेत. आणि ह्या घटनेत मुसलमान आणि TMC दोघेही नाहीत तरी उगाच काहीही आरोप लावलेत. OpIndia मध्ये bjp आणि tmc चा संबंध सुद्धा ऐकीव माहितीवरच जोडला आहे.
some social media users claimed that the girl was a BJP supporter, and her rape and murder was part of ongoing TMC violence against BJP and other opposition parties
हे पोलिसांनी आणि मुलीच्या परिवाराने सुद्धा खोडून काढले आहे! सोशल मिडियावरचे वाचुन बातमी लिहिणारे OpIndia धन्यच. जिहाद चा प्रश्न कुठून उकरून काढलात मध्येच ? आधी ममता बद्दल बोला, मग इकडे तिकडे धावा. आणि तुम्हीच म्हणाला होता की मुस्लिम मत मिळल्यामुळे ममता मुस्लिम गुन्ह्यांना (जो झालाच नाही!) जबाबदार आहे. मग माझ्या सध्या प्रश्नचे उत्तर द्या. हिंदू मत मिळवल्यावर भाजपा हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ? ४.
मग जिहाद आणि काफिर हे हिंदूच्या मैत्रीसाठी आणि त्यांच्या गुणगाणासाठी वापरले जातात असे म्हणावे काय ?
कुठे कुठे धावताय हो! मी कधी म्हणलं असं काही ? तुम्हीच शांतताप्रेमी धर्मातील माणसाने बलात्कार केला आणि त्याचा ममता tmc विजयाशी संबंध आहे असा दावा केला. एकही आधार नाही एकाही assertion साठी. आणि उगाच भसभास व्हिडीओ देणार असाल तर माझा खरोखरीच पास. व्हिडिओतील मुद्दे टंकायचे कष्ट घेणार असाल तर ठीक, नाहीतर राहूदे.

In reply to by कॉमी

तीच बातमी आहे ओपिंडीयात, त्यात काय वेगळे मांडले आहे ? अहो, तो बलात्कार मुस्लिम व्यक्तीनी केलाच नाहीये. आणि लोकल पोलीस आणि त्या मुलीच्या परिवाराने सुद्धा ह्यात कम्युनल आणि राजकीय अँगल नाही असे स्पष्ट केले आहे. होय, ते अजुन स्पष्ट झालेले नाही. पण मुळात ह्या घटनेत मुसलमान इन्व्हॉल्व्हच नाहीयेत. त्याच गोष्टीसाठी मी व्हिडियो देतो आणि ते न पाहता तुम्ही तुमचा मुद्दा मांडु पाहता. आधी ममता बॅनर्जींचे नाव काढलेत. आणि ह्या घटनेत मुसलमान आणि TMC दोघेही नाहीत तरी उगाच काहीही आरोप लावलेत. OpIndia मध्ये bjp आणि tmc चा संबंध सुद्धा ऐकीव माहितीवरच जोडला आहे. ममता दीदींच्या पक्षास मुस्लीम वर्गाचा पाठिंबा आहे त्या स्वरुपाच्या बातम्या मी वरती संदर्भ म्हणुन दिलेल्या आहेत. हिंदू मत मिळवल्यावर भाजपा हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ? त्यांच्या कार्यकर्त्यांनी जसा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस / मारहाण / खुन / बलात्कार केले तर तो दोष भाजपावर द्यावाच लागेल, काहीही कारण नसताना मोदींना दोष देणारे तर रोजच दिसतात. कुठे कुठे धावताय हो! मी कधी म्हणलं असं काही ? तुम्हीच शांतताप्रेमी धर्मातील माणसाने बलात्कार केला आणि त्याचा ममता tmc विजयाशी संबंध आहे असा दावा केला. एकही आधार नाही एकाही assertion साठी. आणि उगाच भसभास व्हिडीओ देणार असाल तर माझा खरोखरीच पास. मी फक्त ४ व्हिडियो दिले आहेत, त्यातील शेवटचे २ व्हिडियो पाहिले तरी बंगाल मधील अवस्था सहज कळुन येइल. शेवटचा व्हिडियो खरं तर मला द्यायचा नव्हता, कारण ५०+ वर्ष वय असलेल्या त्या स्त्रीवर शांतता प्रेमी समाजाच्या गुन्हेगाराने बलात्कार केला. ती महिला आधी सीपीएम नंतर टीएमसी आणि आता बीजेपी समर्थक झाली होती. ही जाळपोळ खून आणि बलात्कार करण्याचे जे सत्र बंगाल मध्ये सुरु झाले आहे त्याचा आणि टीएमसीच्या विजयाशी काडीमात्र संबंध नाही असे जर आपले मत असेल तर मी इथेच थाबतो.... व्हिडियो हे पाहिले जाण्यासाठीच दिले जातात... आता मी हिंदू राहिलेली नाही आणि माझ्या लोकांना मी माझे तोंड कसे दाखवु ? अशी ती वृद्ध महिला व्हिवळत सांगते आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Risk and time are opposite sides of the same coin. If there were no tomorrow, there would be no risk.”

In reply to by मदनबाण

१. आजिबात नाही. दोन्ही मुद्दे पूर्ण स्पष्ट झाले आहेत. त्या घटनेत tmc आणि मुसलमान दोघाचा संबंध नाही असे स्पष्ट झाले आहे. आरोपींना अटक झाली आहे आणि त्यांनी गुन्हा मान्य पण केला आहे. यापेक्षा काय स्पष्ट होणार आहे ? २. तुम्ही दिलेला व्हिडीओ- Ewoke TV १३५ view ५ like १ comment काय अहो ? असे कुठलेपण रँडम व्हिडिओ मी मुळात का पाहू, विश्वास ठेवणे फाsssss र लांब. विश्वसनीय सोर्स द्या, मग पुढे बोलू शकेन. ३.
त्यांच्या कार्यकर्त्यांनी जसा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस / मारहाण / खुन / बलात्कार केले तर तो दोष भाजपावर द्यावाच लागेल, काहीही कारण नसताना मोदींना दोष देणारे तर रोजच दिसतात.
मूळ प्रश्न टाळला. तुम्ही म्हणत होता मुस्लिम व्होट ममताला मिळाले म्हणून ममता मुस्लिम व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे. मग मी विचारले मग भाजप हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ? तुम्ही शिताफीने पुन्हा पुन्हा उत्तर द्यायचे टाळले आहे.पार्टी कार्यकर्त्यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी पार्टी जबाबदार बऱ्याचदा असते हे तर अत्यंत obvious आहे. तो प्रश्नच नव्हता माझा. ४. मुस्लिम लोकांचे समर्थन असणे तुम्ही काहीतरी आरोप केल्याच्या थाटात पुन्हा पुन्हा सांगत आहात ,हे दुर्लक्ष करून, कि TMC ला हिंदू मतं सुद्धा लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्तच मिळाली आहेत.. अर्थातच! जिथे तिथे कम्युनल ट्विस्ट देऊन मुस्लिम जनतेवर आरोप करणे ही भाजपाची/भाजप समर्थकांची (तुम्ही, उदा.) स्ट्रॅटेजी असेल तर का म्हणे मुस्लिम लोक त्यांना मत देतील ? मुस्लिम मतं इतक्या वाईट प्रकारे घालवणे हे भाजपचे अपयश आणि तृणमूलचे यशच आहे. त्यात तृणमूल वर आरोप करण्यासारखे काहीही नाही. तृणमूल ने स्वतःची हिंदू मतसंख्या सुद्धा लोकसभा इलेक्शन तुलनेत वाढवली आणि मुस्लिम मतसंख्या सुद्धा. ५.ही जाळपोळ खून आणि बलात्कार करण्याचे जे सत्र बंगाल मध्ये सुरु झाले आहे त्याचा आणि टीएमसीच्या विजयाशी काडीमात्र संबंध नाही असे जर आपले मत असेल तर मी इथेच थाबतो.... - बलात्काराशी नाहीच आहे. तुम्ही पुन्हा तेच का सांगताय माहित नाही. बाकी जाळपोळ आणि हत्या ह्याचा TMC विजयाशी संबंध आहेच, पण त्यात धार्मिक ट्विस्ट देणे हे पुन्हा खोटारडेपणाचे आहे. ६. व्हिडीओ द्यायचे असतील तर सोर्स म्हणून द्यायचे, तुमचा अख्खा प्रतिवाद म्हणून नाही. आणि विश्वसनीय सूत्राकडून असले पाहिजेत हेवेसांनल.

केर्न्स एनर्जीने एअर इंडियाविरुद्धचा म्हणजेच पर्यायाने भारत सरकारविरुद्धचा खटला जिंकला आहे. परदेशातल्या सरकारी संपत्तीवर जप्ती येऊ नये म्हणून पळापळ सुरु झाली आहे. देश की संपत्ती पे पंजा नही पडने दूंगा म्हणणारे गायब आहेत. https://www.ndtv.com/business/cairn-energy-government-asks-state-run-lenders-to-withdraw-cash-from-cairns-accounts-2436593

In reply to by नगरीनिरंजन

एकदा त्यांनी नक्की कुठे कुठे लक्ष घालायचं हे पण सांगून ठेवा. तुमचा सल्ला घेऊनच करतील ते कारभार या पुढे.

In reply to by नगरीनिरंजन

ह्याच तुम्ही दिलेल्या दुव्यामधील खालील भाग तुम्ही वाचलात काय? "The dispute began after a previous Indian government decided to impose capital gains tax retrospectively on some companies, such as Cairn and telecoms operator Vodafone Plc, which also took its case to arbitration and won. The cases scared off foreign investors and dealt a blow to the government of Manmohan Singh, who lost power in a 2014 election to Prime Minister Narendra Modi. The (Modi) government has said it would not make retrospective tax claims in future but it has defended outstanding cases."" ह्यांतले, बोल्डीकरण माझे. माझ्या आठवणीनुसार हा अतिशय मूर्ख रिट्रोअ‍ॅक्टिव्ह टॅक्स, चिदंबरन अर्थमंत्री असतांना, तत्कालिन सरकारने लावला होता. तेव्हा ही वखवख त्या सरकारची होती. सध्या भारत सरकारने अपिल केलेले आहे, तसेच बोलण्याचे गुर्‍हाळही सुरू आहे. त्यामुळे एक खबरदारी म्हणून, आपले नोस्ट्रो अकाउंट्समधे असलेले पैसे वाचवायची धडपड भारत सरकारतर्फे सुरू आहे, ही बातमी आहे. ह्यात "देश की संपत्ती पे पंजा नही पडने दूंगा म्हणणारे गायब झाले आहेत" असे कुठे दिसले तुम्हाला? त्यांनी ह्याविषयी जाहीर वाच्यता करत फिरावे, अशी अपेक्षा आहे काय? दुसरे, "देश की संपत्ती पे पंजा नही पडने दूंगा" हे एका वेगळ्या संदर्भांत मोदींनी म्हटले होते, त्याचा तुम्ही येथे उल्लेख करत आहांत. ते अगदी वेगळ्या संदर्भात म्हटले होते, हे तुम्हाला माहित नसावे, ह्याची शक्यता कमी आहे. तेव्हा तो संदर्भ माहित असूनही तुम्ही मुद्दाम येथे तो तिरकस उल्लेख करत असावेत, असे दिसते. असे आपले पैसे अडकले असतां, वेळप्रसंगी ते झटकन काढून घेण्याची वेळ अनेकांवर येते- अगदी सूट्स्वाल्या उविविंवरही. अलिकडचेच आर्चिगोसचे उदाहरण घ्या ना? तिथे दोन मोठ्या, उविवि सूट्सनी म्यॅनेज्ड ब्यांका सोडल्या तर इतर दोन- तीन मोठ्या (अर्थात, उविवि सूट्सनी म्यॅनेज्ड) ब्यांकांनी अगदी अशीच पळापळ सफलरीत्या केली. त्या दोन मोठ्या उविवि सूट्सनी म्यॅनेज्ड ब्यांकांचे नुकसान झाले. हे अगदी अलिकडेच झाले आहे. त्या उदाहरणांत व आता तुम्ही दिलेल्या बातमीच्या केसमध्ये फरक इतकाच, की एका ठिकाणी उविवि धावपळ करत होते, इथे भारतीय वेषांतले मंत्री व सफारीवाले बाबू ती धडपड करत आहेत. दोन्ही केसेसमधे समान दुवा, पैशाची अतिरेकी हाव.

In reply to by नगरीनिरंजन

अज्ञान आणि द्वेषी मळमळ याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद. मुळात हे प्रकरण २००६ मध्ये सुरू झाले जेव्हा सुसंस्कृत, मितभाषी, विद्वान, अर्थतज्ज्ञ वगैरे विशेषणांनी नटलेले मौनीबाबा पंतप्रधान होते व अजून एका नामवंत अर्थतज्ज्ञ चिदंबरम् अर्थमंत्री होते. केर्नच्या भारतातील उपकंपनीने वोडाफोनला आपले समभाग विकल्यानंतर २०११ मध्ये भारताने त्यावर मोठी कर आकारणी केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये ही कर आकारणी रद्द केल्यानंतर भारताने नवीन विधेयक आणून पूर्वलक्षी पद्धतीने केर्नला कर भरण्यास सांगितले व कराच्या किंमतीएवढी केर्नची मालमत्ता भारताने गोठवून ठेवली. शेवटी केर्न जागतिक न्यायालयात गेले व आता त्यांच्या बाजूने निकाल लागला आहे. मोदींना नेहरूंच्या गंभीर घोडचुका निस्तरताना आता मौनीबाबांंच्याही गंभीर घोडचुका निस्तराव्या लागत आहेत. परंतु काही बिनडोक यासाठी मोदींनाच दोष देत आहेत. https://www.google.com/amp/s/www.natlawreview.com/article/cairn-v-india…

In reply to by श्रीगुरुजी

काँग्रेसला कंटाळूनच लोकांनी दिले ना मोदींना निवडून? सात वर्षात खाजगीकरणही जमले नाही वाटते. ज्यांनी चुका केल्या त्यांची सत्ता गेली. काही बिनडोक मात्र अजून त्यांचेच नाव घेत बसलेत चुका दुरुस्त होताहेत की नाही ते पाहण्यापेक्षा.

In reply to by नगरीनिरंजन

काही बिनडोक मात्र अजून त्यांचेच नाव घेत बसलेत हे मात्र अगदी खरं बोललात आणि बोलताना आत्मताडनही केलंत. लगे रहो!

In reply to by श्रीगुरुजी

सात वर्षांत सगळे अधिकार असलेल्या निकम्म्या दैवताने काही केले असते तर असे बालीश शब्दच्छल करयची वेळ आली नसती. =))

In reply to by नगरीनिरंजन

निकम्म्याने केर्नवर पूर्वलक्षी प्रभावाने कर लावण्याचे भलते उद्योग न करता काही भरीव केले असते तर आज ही वेळ आली नसती आणि काही नंबरीनिर्बुद्धांना रोज मळमळ ओकावी लागली नसती.

काही लोकांना २०१४ पासून कावीळ,रक्तदाब, आम्ल पित्त आणि मूळव्याध हे चारही एकदम उपटलेले आहे. त्यामुळे तिखट, आंबट, क्षारयुक्त असं सर्व अन्न वर्ज्य आहे. आणि गोड सात्विक अन्न याना झेपत नाही. तेंव्हा फक्त कडू आणि तुरट असे अन्न खाऊन यांची जीभ कडू झालेली आहे. त्यामुळे त्यांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. त्यासाठी बारामती, नंदीग्राम, वायनाड, अमेठी अशा अनेक ठिकाणच्या निष्णात वैद्यांचे औषध आणवले गेले परंतु त्याचा अजिबात गुण आलेला नाही. आता यावर ऑक्न्त उपाय करावा याचे चर्वित चर्वण चालू आहे. कोणास रामबाण उपाय माहिती असेल तर कळवावा योग्य ते पारितोषिक दिले जाईल

करोनात जीव गमावलेल्या श्रद्धांजली वाहताना त्यांनी एक आवंढाही गिळला. सोबतच, योग आणि आयुषनं करोना विषाणूच्या या काळात लोकांची ताकद वाढवल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय https://maharashtratimes.com/india-news/pm-narendra-modi-gets-emotional…

In reply to by मराठी_माणूस

तुम्हाला नक्की कुठली अभिप्रेत आहे, ते समजले नाही. मात्र त्या पहिल्याच पानावर, उजवीकडे सरकारच्या आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या पाहणीची बातमी आहे. तीअवश्य पाहावी.

In reply to by मराठी_माणूस

तुम्हाला ही बातमी म्हणायची आहे का? कोरोना रुग्ण असलेल्या एका शिक्षकाच्या मृत्यूनंतर केवळ पैसे लाटण्यासाठी तीन दिवस त्यांच्या मृत्यूची बातमीच नातेवाइकांपासून लपवून ठेवली आणि उपचार सुरू असल्याचा अाभास निर्माण करण्यात आला... https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/nandurbar/ne…

उत्तर प्रदेश सरकारला १७ मे २०२१ या दिवशी आदेश देऊन १ महिन्याच्या आत राज्यातील सर्व ९७,००० खेड्यांमध्ये ICU सुविधा असलेल्या प्रत्येकी २ ऍम्ब्युलन्स पुरविण्याचा आदेश दिला होता. परंतु राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन अशी व्यवस्था १ महिन्याच्या आत करणे व्यावहारिक नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देताना सांगितले की उच्च न्यायालयाने असे अव्यावहारिक आदेश देऊ नये. https://m.timesofindia.com/india/hcs-must-not-pass-orders-that-are-impo…

In reply to by श्रीगुरुजी

खरं आहे. १ महिन्यात १,९४,००० ICU सुविधा असलेल्या ऍम्ब्युलन्स पुरवणे प्रामाणिक प्रयत्न केले तरी अशक्य आहे. त्यात कर्मचारी भरती पण करावी लागेल. असले आदेश न्यायालय का देते हे गुढ आहे. न्यायालयाचा अवमान करण्याचा हेतु नाही परंतु न्यायालयाने असले टार्गेट आपल्या केसेस कमी करायला स्वतः वर लावायला हवेत.

In reply to by सुक्या

न्यायालयाने असे अचाट आणि अफाट पण अंमल बजावणी करता येणार नाही असे निकाल देऊ नयेत हि वस्तुस्थिती. त्यावर स्पष्टपणे टीका झालीच पाहिजे. जनतेच्या क्षोभाचा धाक हा न्यायाधीशाना सुद्धा असला पाहिजे. बेदम मारहाण झाल्यावर के इ एम मधील निवासी डॉक्टर संपावर गेले असता न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती मंजुळा चेल्लुर यांनी तुम्हाला भीती वाटत असेल तर राजीनामा देऊन घरी बसा असे बेताल वक्तव्य केले होते. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आज याच निवृत्त न्यायमूर्तींना विचारले पाहिजे कि आज हेच डॉक्टर अंगावर पी पी ई किट घालून प्रत्यक्ष काम करत असताना देशातील सर्व न्यायालये मात्र घरून कामे करत आहेत. त्यांना(खालच्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना) आपण "तुम्हाला भीती वाटत असेल तर राजीनामा देऊन घरी बसा" असा सल्ला देण्याची हिंमत करणार का? १००० च्या वर डॉक्टर या महामारीत काम करत असताना हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना निदान काही सन्माननीय भरपाई दिली जाईल या बद्दल न्यायालये काही करतील का? NJAC च्या सुनावणीच्या वेळेस सत्य बोलल्याबद्दल श्री मुकुल रोहटगी यानि पूर्व न्यायाधीशांच्या अकार्यक्षमतेबद्दलची वस्तुस्थिती न्यायासना समोर आणली असता सरन्यायाधीश खेहर यांनी त्यांना पूर्व न्यायाधिशांवर टीका केल्या बद्दल न्यायालयीन अवमाननेचा इशारा दिला होता. तेंव्हा श्री मुकुल रोहटगी यांनी सरन्यायाधीश खेहर याना माझ्या विरुद्ध तुम्ही न्यायालयीन अवमान केल्याबद्दल कार्यवाही करून दाखवाच असे सरळ स्पष्ट आव्हान दिले होते. पुढे ते म्हणाले सूर्यप्रकाशाएवढे सत्य समोर आणण्याबद्दल तुम्ही माझ्या वर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कार्यवाही करू शकत नाही. सरन्यायाधीश खेहर यांची कार्यवाही करण्याची हिम्मत झाली नाही. न्यायालयाचा अवमान हि काही गल्लीतल्या गुंडावर पोलीसांनी केलेली प्रतिबंधात्मक कार्यवाही नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देताना सांगितले की उच्च न्यायालयाने असे अव्यावहारिक आदेश देऊ नये.
नक्कीच स्वागतार्ह निवाडा. कधीकधी न्यायालयाचे काही काही आदेश खरोखरच अनाकलनीय असतात. मागे मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने नॅशनल हायवे ऑथोरीटी ऑफ इंडियाला पूर्ण देशात टोल प्लाझांवर व्ही.आय.पी साठी एक स्वतंत्र लेन ठेवण्यात यावी आणि त्या लेनमध्ये न्यायाधीशांचाही समावेश असावा हा आदेश दिला होता. इतकेच नव्हे तर या न्यायाधीशांनी म्हटले होते-- It is embarrassing for VIPs and sitting judges to have to wait at toll plazas and display identity documents. इतकेच नव्हे तर या लेनमध्ये केवळ व्ही.आय.पींनाच प्रवेश द्यावा तसेच इतर लोक या लेनमध्ये आल्यास कारवाई करण्यात येईल अशीही तंबी या न्यायाधीशांनी दिली. कसली संस्कृती हे न्यायाधीश आणू पाहात होते? आणि ते पण स्वतःसाठी सगळ्या यंत्रणेला वाकवून? अशा ठिकाणी कोणी व्ही.आय.पी असेलच तर ते म्हणजे रूग्णवाहिका आणि अग्नीशमन दल वगैरेंची वाहने. त्यांना टोल प्लाझावर किंवा कुठेही अजिबात अडकायला लागले नाही पाहिजे. बाकी कोणी व्ही.आय.पी नाही/नसावा. या एका निर्णयाबद्दल संसदेने तातडीने त्या न्यायाधीशांविरूध्द महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे होते असे फार वाटले होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

CHENNAI: The Madras high court sent a blunt message to the National Highways Authority of India (NHAI) on Wednesday: Create exclusive lanes for VIPs, including sitting judges, at all toll plazas on national highways or face contempt of court proceedings. https://timesofindia.indiatimes.com/india/hc-wants-separate-toll-lanes-… अतिशय संतापजनक वक्तव्य आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

या एका निर्णयाबद्दल संसदेने तातडीने त्या न्यायाधीशांविरूध्द महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे होते असे फार वाटले होते. १९८० च्या दशकात हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रामस्वामी यांनी सरकारी खर्चाने ८० लाखांचे फर्निचर घेतले होते. त्यांच्याविरूद्ध महाभियोग चालविण्यासाठी १९९३ मध्ये संसदेत ठराव आला होता. त्यावेळी कॉंग्रेसच्या मणीशंकर अय्यरने रामस्वामी तामिळ आहेत व तामिळीविरूद्ध महाभियोग चालवू नये यासाठी दक्षिणेतील कॉंग्रेसच्या खासदारांना एकत्र आणून नरसिंहरावांवर दबाव आणला होता. त्यामुळे नरसिंहरावांनी कॉंग्रेसच्या खासदारांना मतदानात सहभागी न होण्याचा आदेश देऊन महाभियोगाचा ठराव मंजूर होऊन दिला नव्हता. हे करण्यासाठी त्यांनी रामस्वामीकडून राजीनामा देण्याचा शब्द घेतला होता. परंतु महाभियोगाचा ठराव अमान्य झाल्यानंतर रामस्वामीने राजीनामा न देता आपली उर्वरीत कारकीर्द पूर्ण करून नंतर निवृत्ती घेतली होती.

In reply to by श्रीगुरुजी

हो. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी वायकोंविरूध्द शिवकाशी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणुक पण लढवली होती. १९९३ चे हे व्ही.रामस्वामी महाभियोग प्रकरण मी रस घेऊन बघितले होते. त्यावेळी मी शाळेत होतो आणि महाभियोग असे काही असते हेच पहिल्यांदा कळले. महाभियोगात संबंधीत व्यक्तीला आपला बचाव संसदेत करता येतो आणि त्यासाठी आपला वकील नेमता येतो. तेव्हा कपिल सिब्बल रामास्वामींचे वकील होते. कपिल देव सोडून आणखी कोणी कपिल असतात हे पण तेव्हा पहिल्यांदाच कळले :) पुढे अण्णांचे २०११ मधील उपोषण चालू असताना संसदेने कलकत्ता उच्च न्यायालयाचे सौमित्र सेन यांच्यावर महाभियोग चालवून पदच्युत केले होते. महाभियोग चालवून संसदेने पदावरून हटविलेले ते पहिले न्यायाधीश होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मी सुद्धा तेव्हाच पहिल्यांदा कपिल सिब्बल हे नाव ऐकले. ते प्रकरण सिब्बलांच्या आयुष्यातील एक वळणाचा दगड ठरले. त्यानंतर अनेक मोठे खटले त्यांनी यशस्वीपणे हाताळले व राजकारणातही पाय रोवले. ते सलग २० वर्षे खासदार व केंद्रीय मंत्री होते. अलिकडे मात्र ते चालवित असलेले बहुतेक सर्व खटले हरत आहेत. श्रीरामजन्मभूमी खटल्यात ते बाबरी मशीद कृती समितीचे वकील होते व त्यासाठी त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नावाने खोटे बोलण्याच्या खटल्यात ते राहुल गांधींचे वकील होते. मराठा राखीव जागा खटल्यात ते महाराष्ट्र सरकारचे वकील होते. हे सर्व खटले ते हरले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाभियोग चालवून संसदेने पदावरून हटविलेले ते पहिले न्यायाधीश होते. हे बरोबर नाही. राज्यसभेत त्यांच्यावर महाभियोगाचा ठराव पस झाल्यावर लोकसभेत ठराव येण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे लोकसभेत असा ठराव आलाच नाही. आणि त्यांचा राजीनामा मंजूर करून घेतला Ahead of the impeachment motion against him in the Lok Sabha on 5 & 6 September 2011, he resigned on 1 September 2011 https://en.wikipedia.org/wiki/Soumitra_Sen इतर दोन्ही न्यायाधीश ज्यांच्या विरुद्ध असा महाभियोगाचा ठराव आला होता त्यात एक श्री दिनकरा यांनी राजीनामा दिला आणि श्री रामस्वामी यांच्या विरुद्ध ठराव पास झाला नाही. एकंदर स्वतंत्र भारताच्या इतिहासात एकाही न्यायाधीशाविरुद्ध महाभियोग होऊन त्यांना बडतर्फ केले गेलेले नाही.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद. हो सौमित्र सेन यांनी आधी राजीनामा दिला होता. पण तो राजीनामा मान्य न करता त्यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना हटविणार अशी चर्चा चालू होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. राज्यसभेने महाभियोग ठराव पास केल्यानंतर लोकसभेत तो ठराव येण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि तो मान्य केला गेला.

मोदी जनतेची नाडी अचूक ओळखतात व विरोधकांना आपल्याच मैदानात आपल्याच खेळपट्टीवर सामना खेळायला लावून लोळवितात हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर सुद्धा विरोधक मोदींनी लावलेल्या सापळ्यात अलगद अडकतात. मोदी अशा कृती करतात की ज्यामुळे महत्त्वाचे सर्व विषय बाजूला ठेवून विरोधक त्यांच्यावर व्यक्तीगत हल्ले सुरू करतात व त्यातून शेवटी बहुसंख्य जनतेची सहानुभूती मोदींनाच मिळते व विरोधक संधी हातची घालविल्याने हात चोळत बसतात. काल मोदी बोलताना भावुक झाल्याने लगेच त्यांच्यावर टीका सुरू झाली. ते टीव्हीवर येऊन रडणार असे भाकीत मी आधीच केले होते असे आपटार्ड संजय सिंहने सांगून नाटकी, ढोंगी अशा शब्दात मोदींची संभावना केली. इतर विरोधक शहाणे असतील या प्रकाराला फार महत्त्व न देता व व्यक्तीगत टीका न करता मुख्य विषय बाजूला पडून देणार नाहीत. अन्यथा पुन्हा एकदा ते तोंडावर आपटतील.

काही महत्त्वाच्या बातम्या - - ख्यातनाम पर्यावरण कार्यकर्ते व चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. - तहलका संपादक तरूण तेजपाल लैंगिक छळाच्या सर्व आरोपातून पुराव्याअभावी निर्दोष सुटले. - मागील आठवड्यात दैनिक नवीन कोरोना रूग्णांची संख्या ४ लाखांहून अधिक झाली होती. काल ही संख्या अडीच लाखांच्या आसपास आहे. हा आकडा सुद्धा खूप मोठा आहे, परंतु नवीन रूग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/sharad-pawars-policy-actually… ---------- शरद पवार, नेहमीच पलटी का मारतात? शेतकरी आंदोलनच्या नंतर, आता ही दुसरी पलटी ...

लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले. https://maharashtratimes.com/entertainment/wellknown-musician-hum-aapke…

विरोधक ब्लॅक फंगस आहेत असा घणाघात शिवसेनेचे नेते आणि सामनाचे सहसंपादक खासदार संजय राऊत यांनी केला आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/shiv-sena-mp-sanjay-…

There is news about Covaxine not considered for overseas travel and Covaxine is not approved - not yet on the World Health Organisation's (WHO) Emergency Use Listing (EUL). https://amp/s/www.news18.com/amp/news/auto/as-covaxin-is-not-on-who-lis… जागतिक आरोग्य संघटना चीनची गुलाम आहे. भारतीय लसीला मान्यता मिळू नये व चीनच्या लसीला मान्यता मिळावी यासाठी चीनच्या दबावाखालीच जागतिक आरोग्य संघटनेने मुद्दाम हा निर्णय घेतला असावा.

Axis बँकेवर झाली ठाकरे सरकारची कृपा; अमृता फडणवीसांवर सातत्याने करत होते टीका.... --------- "Axis बँकेवर झाली ठाकरे सरकारची कृपा; अमृता फडणवीसांवर सातत्याने करत होते टीका - Marathi News | Axis Bank favored by Thackeray government; Amrita Fadnavis was constantly criticizing by Leaders | Latest politics News at Lokmat.com" https://m-lokmat-com.cdn.ampproject.org/v/s/m.lokmat.com/politics/axis-… ------------- बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....

बाबा बिचारे एक व्हाट्सॅप मेसेज वाचुन दाखवत होते, त्यात अधुनिक मेडिकल सायन्स कसे इश्टुपिड आहे असे लिहिले होते. म्हणे- हाय्ड्रोक्सीक्लोरोक्वीन फेल झाले, फॅबीफ्ल्यु फेल झाले, प्लाज्मा थेरपी सुद्धा फेल आणि बॅन झाली म्हणे, आणि लाखो लोकं मेले ते औषधे खाउनच. हा मेसेज बाबांना मान्यच होता असे दिसते. आयएमए ही संस्था जाम भडकली, आणि रामदेव आपले "इल्लिगल औषध" खपवण्यासाठी थापा लाऊन भिती पसरवत आहे असा दावा केला आणि त्यांनी हर्षवर्धन ह्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. हर्षवर्धन ह्यांनी रामदेव बाबांना आपले विधान मागे घेण्याची मागणी केली, रामदेव बाबांनी ऐकली. पण ह्याच आयएमए ने डॉ. हर्ष वर्धन यांना त्यांनी आपण कोरोनीलचा प्रचार करत नाही आहे असे घोषित करावे असे सांगितले होते, तिथे माझ्या महितीप्रमाणे काहीही झाले नाही. कोरोनील सारख्या औषधाला कोव्हिडसाठी पुरक म्हणुन विक्रीची परवानगी देणे, ते सुद्धा रामदेव बाबा WHO ने कोरोनीलला मान्यता दिली असे धाधांत खोटे बोलत असताना.
“Being a Health Minister of the country, how justified is it to release such falsely fabricated unscientific product to people of the whole country and how ethical was it to promote the product in unethical, wrong and false ways,” the IMA statement said. The association also pointed out that as per the code of act of the Medical Council of India, no doctor can promote any drug, “whether for compensation or otherwise, any approval, recommendation, endorsement, certificate, report or statement” and said that it was “surprising that the Minister himself is promoting the drug (Coronil)”.
रामदेव बाबाला प्रॉफीट व्हावा म्हणुन सरकार सरळ सरळ शिलींग करत आहे. निषेध.

In reply to by कॉमी

HCC चा खरंच काही उपयोग झाला नाही. रेमदेसीविर बद्दल बोलायचं तर आपले अलोपॅथी चे डॉक्टर्स त्याला अक्षरशः दिसेल त्याला prescribe करत होते. म्हणून तर गुलेरिया सारख्याना सांगावं लागलं की ते फक्त मधल्या काळात द्यायचं औषध आहे. सुरवातीला देऊन उपयोग होत नाही आणि नंतर दिलं तर उपयोग तर होतंच नाही, शिवाय रोग्याला त्याचा त्रास होतो. प्लाझ्मा थेरपी बद्दल नक्की काय प्रकार आहे खरंच माहिती नाही. मध्ये त्याबद्दल खूप ऐकलं होतं पण आता त्याबद्दल काही ऐकू येत नाही.

1. भारताला प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स ची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मेडिकल च्या सीट्स खूप प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे. होऊ दे डॉक्टर्स चा अति पुरवठा, काहीही बिघडत नाही. 2. शिवाय जे विद्यार्थी सरकारी ग्रँट घेऊन शिकतील त्यांना आयुष्यभर सरकारी हॉस्पिटल्स मध्ये काम करायला भाग पाडणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतर करू दे त्यांना private मध्ये काम हवं तर. 3. जर कुणाला private हॉस्पिटल्स मध्ये काम करायची इच्छा असेल किंवा स्वतः ची private प्रॅक्टिस करायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःचे लाखो (की करोडो?) रुपये घालून शिक्षण घ्यावे. 4. सरकारने वैद्यकीय क्षेत्रावर खर्च होणारा निधी वाढवण्याची गरज आहे. या खर्चात सरकारी डॉक्टर्स च्या सॅलरी वर होणारा खर्च ही वाढवावा. 5. चांगल्या प्रतीचे वैद्यकीय इन्फ्रास्ट्रुक्चर तालुक्यापर्यंत आणि गावांपर्यंत नेण्याची गरज आहे. हे कसं करायचं हा प्रश्न असेल पण हे होण्यासाठी लागणारे डॉक्टर्स तरी मोठ्या प्रमाणावर तयार करावे लागणार. 6. सध्याच्या वैद्यकीय कट प्रॅक्टिस आणि मोठ्या हॉस्पिटल्स मधून होणाऱ्या प्रचंड बिल्स कडे लक्ष देऊन खरोखरच इतका खर्च होतो का, हॉस्पिटल्स चा revenue किती आणि income किती, तेवढा टॅक्स भरला जातो का, मेडिकल इन्शुरन्स चा हॉस्पिटल्स गैरवापर करतात का हे पहाण्याची गरज आहे.

In reply to by पिनाक

6. सध्याच्या वैद्यकीय कट प्रॅक्टिस आणि मोठ्या हॉस्पिटल्स मधून होणाऱ्या प्रचंड बिल्स कडे लक्ष देऊन खरोखरच इतका खर्च होतो का, हॉस्पिटल्स चा revenue किती आणि income किती, तेवढा टॅक्स भरला जातो का, मेडिकल इन्शुरन्स चा हॉस्पिटल्स गैरवापर करतात का हे पहाण्याची गरज आहे.
याबाबत विचार करुन डोके गरगरते... हॉस्पिटल चालवायला घेतली जातात (खाजगी असली तरी) इथेच कंत्राटी प्रकरण सुरु होत असल्याने आणखी काय बोलणार ?

हा व्हिडिओ पाहा: https://fb.watch/5HohAALpEC/ महान योगगुरु श्री रामदेव बाबा यांनी कोविडमुळे मेलेल्या डॉक्टरांची खिल्ली उडवली आहे. परंतु आता ब्रह्मर्षी त्यावर मूग गिळून बसतील. ज्या विद्येमुळे पोटापाण्याची व्यवस्थाच नव्हे तर मानसन्मानही मिळाला ती विद्या अडाणी व लुच्च्या लोकांच्या पायी वाहण्यासाठी नक्कीच काहीतरी प्रचंड अमिष असले पाहिजे. मुस्लिम धर्मवेड्यांना ७२ अप्सरांचे असते म्हणतात. ह्या लोकांना कसले असावे?

In reply to by नगरीनिरंजन

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. संपादक मंडळ आपले असभ्य प्रतिसाद वारंवार काढत टाकले असूनही पुन्हा पुन्हा तेच प्रतिसाद टाकण्याची खोड सुरूच आहे.