Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीगुरुजी on Tue, 05/18/2021 - 15:02
मोदींच्या प्रतिमाभंजनासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचा उल्लेख "मोदी विषाणू" असा करण्याची कॉंग्रेसची आपल्या कार्यकर्त्यांना सूचना. चीनचा उल्लेखही नाही. कसा करणार? कॉंग्रेसचा चिनी राज्यकर्त्यांबरोबर करार आहे ना. https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/call-it-modi-strain-use-super-spreader-kumbh-bjp-congress-toolkit-destroy-pm-image-1803935-2021-05-18
  • Log in or register to post comments
  • 83648 views

प्रतिक्रिया

Submitted by मराठी_माणूस on Wed, 05/19/2021 - 12:28

Permalink

https://epaperdivyamarathi

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/19052021/0/1/ ह्या पानावरची एक चीड आणणारी सिंगापुर मधील बातमी. काही चीनी लोकांचा भारतीयांप्रती द्वेष. स्वतःच्या देशामुळे सगळे जग हवालदील झाले असताना, इतरांवर त्याचे खापर फोडण्याचा प्रकार. चोराच्या उलट्या ..... म्हणतात ते हेच.
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Wed, 05/19/2021 - 12:28

Permalink

पॉझिटिव्ह केसेस वाढल्या पाहिजेत; मोदींचा व्हिडिओ व्हायरल

जे डोक्यात असते तेच बोलण्यातून बाहेर पडतं, असा खरमरीत टोला काँग्रेसने मोदींना लगावला. https://www.esakal.com/desh/focus-on-increasing-covid-19-positive-cases-says-pm-modi-video-viral
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 05/19/2021 - 15:04

In reply to पॉझिटिव्ह केसेस वाढल्या पाहिजेत; मोदींचा व्हिडिओ व्हायरल by गॉडजिला

Permalink

म्हणून तर ते नेहमी

म्हणून तर ते नेहमी पत्रकारांना टाळतात. अभ्यासाची बोंब असल्याने आयत्यावेळी काय बोलायचे हा आत्मविश्वास त्यांना अजिबात नाही. कधी स्पेलिंग मिस्टेक,कधी भारतीय लोकसंख्येचा चुकीचा आकडा. आता तर लोकांच्या जीवावरच उदार झालेत. नौटंकीबाज भाषणाची सवय दुसरे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 05/19/2021 - 12:49

Permalink

युगपुरूष केजरीवालांचे ट्विट

काल म्हणजे १८ मे रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री युगपुरूष श्री.रा.रा. अरविंदजी केजरीवाल यांनी पुढील ट्विट केले-

सिंगापुर में आया कोरोना का नया रूप बच्चों के लिए बेहद ख़तरनाक बताया जा रहा है, भारत में ये तीसरी लहर के रूप में आ सकता है।

केंद्र सरकार से मेरी अपील:
1. सिंगापुर के साथ हवाई सेवाएं तत्काल प्रभाव से रद्द हों
2. बच्चों के लिए भी वैक्सीन के विकल्पों पर प्राथमिकता के आधार पर काम हो

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 18, 2021
त्यानंतर सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्रालयाने भारताच्या राजदूताला पाचारण करून केजरीवालांच्या या ट्विटबद्दल आक्षेप नोंदवला. त्यानंतर स्वतः परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सिंगापूरच्या सरकारला जे काही सांगायचे असेल ते सांगितले. त्याबरोबरच खालील ट्विट केले--

However, irresponsible comments from those who should know better can damage long-standing partnerships.

So, let me clarify- Delhi CM does not speak for India.

— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 19, 2021
केजरीवाल हा मनुष्य भयानक डोक्यात जातो आणि तो माझ्या मते भारतीय राजकारणातला भामटा नंबर १ आहे हे अशा प्रकरणांवरून समजून येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by यश राज on Wed, 05/19/2021 - 13:32

In reply to युगपुरूष केजरीवालांचे ट्विट by चंद्रसूर्यकुमार

Permalink

+१

केजरीवाल हा मनुष्य भयानक डोक्यात जातो
+१११११११११११११११११ या साठी. बाकी केजरीवाल यांच्याकडे बघुन कळुन येते की उच्चशिक्षित जरी असलात तरी तुम्ही सत्ता योग्य प्रकारे सांभाळु शकत नाहीत. ज्याना मोदींच्या शिक्षणाबद्दल तक्रारी आहेत त्यांनी एकवेळ उच्चशिक्षणाचे फेल्युअर प्रॉडक्ट असलेले हे उदाहरण जरुर पहावे.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 05/19/2021 - 14:44

In reply to +१ by यश राज

Permalink

केजरीवाल सरकार हे बहुमताने

केजरीवाल सरकार हे बहुमताने निवडून आलेले आहे. त्या राज्यातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास. आपण त्यांना कितीही नावं ठेवा, तिकडची जनताच ठरवेल त्यांची उपयुक्तता.
  • Log in or register to post comments

Submitted by यश राज on Wed, 05/19/2021 - 15:03

In reply to केजरीवाल सरकार हे बहुमताने by आग्या१९९०

Permalink

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

बहुमताचे महत्व निदान केजरीवाल यांच्या निमित्ताने मान्य केल्याबद्द्ल धन्यवाद. त्याच न्यायाने मोदी हे प्रचंड बहुमताने २ दा निवडुन आलेले पंतप्रधान आहेत, भारतातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहेच हे सुज्ञास सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 05/19/2021 - 15:11

In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद by यश राज

Permalink

बहुमताचे महत्त्व कधीच नाकारले

बहुमताचे महत्त्व कधीच नाकारले नाही. केजरीवाला पत्रकारांना टाळत नाहीत. कर नाही त्याला डर कशाला? केंद्रिय नेतृत्व लपून बसतं.
  • Log in or register to post comments

Submitted by यश राज on Wed, 05/19/2021 - 15:18

In reply to बहुमताचे महत्त्व कधीच नाकारले by आग्या१९९०

Permalink

केजरीवाल..

केजरीवाल हे पत्रकारांना टाळत नाहीत तर पत्रकारांचा उपयोग करुन धडाधाड खोटे नाटे पसरवण्यात वाकबदार आहेत.
कर नाही त्याला डर कशाला?
यासाठी सध्याची दिल्लीची परिस्थीती सगळं सांगुन जाते. मुळात हे वाक्य केजरीवाल यांच्यासाठी काही करतच नाही तर त्याला डर कशाला असं असावं
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 05/19/2021 - 15:26

In reply to केजरीवाल.. by यश राज

Permalink

दिल्लीतील जनता असं काही

दिल्लीतील जनता असं काही म्हणताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिनाक on Fri, 05/21/2021 - 00:35

In reply to बहुमताचे महत्त्व कधीच नाकारले by आग्या१९९०

Permalink

सरकार (केंद्र) रोज पत्रकार

सरकार (केंद्र) रोज पत्रकार परिषद घेतं. कोरोना वर हेल्थ मिनिस्टर किंवा त्यांचे सचिव, कोरोना टास्क ग्रुप चे प्रमुख किंवा इतर महत्वाच्या व्यक्ती बोलतात आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे ही देतात. अगदी महत्वाचं असेल तर प्रधानमंत्री बोलतात. प्रधानमंत्री राज्यांच्या मुख्यमंत्रांबरोबर मिटिंग्ज घेतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी महत्वाच्या राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ही संवाद साधला होता. तेव्हा हे वरील वाक्य नक्की काय उद्देशाने लिहिले हे सांगितले तर बरे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Fri, 05/21/2021 - 03:23

In reply to सरकार (केंद्र) रोज पत्रकार by पिनाक

Permalink

काही नाही

काहिही करुन भारतात सगळे त्रासात आहेत हे जगाला पटवुन द्यायचे बास. आणि मोदी कसे नाकाम आहेत ते जनतेला पटवुन द्यायचे. एवढ्या निवडणुक सभा आणि नन्तर दन्गली होउन बन्गाल मध्ये कसा काय कोरोना नियन्त्रणात आहे बर? काय गौड्बन्गाल आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Wed, 05/19/2021 - 15:14

In reply to युगपुरूष केजरीवालांचे ट्विट by चंद्रसूर्यकुमार

Permalink

.

सिंगापूर मध्ये खरेच अश्या स्ट्रेन चा प्रादुर्भाव आहे की नाही ? बाकी, जयशंकर ह्यांनी डिप्लोमाटीक बोलून समजूत घातली ते योग्य आहे. पण जर अशी स्त्रेन खर्च असल्यास प्रवासबंदी व्हायलाच पाहिजे की. हे गुप्त/कमी पब्लिक प्रकारे सांगता आले हे पटण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 05/19/2021 - 15:23

In reply to . by कॉमी

Permalink

खरोखरीच असा स्ट्रेन तेथे असला

खरोखरीच असा स्ट्रेन तेथे असला तरी काय फरक पडतोय आपल्या सरकारला? राहुल गांधींनी कोविडची दुसरी लाट येणार म्हणून सावध रहायला सांगितले होते. तेव्हा त्यांची चेष्टा केली होती. कोणाचे ऐकायचेच नाही, चूक झाली तर पांघरून घालायला अख्खी मीडिया विकत घेतली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Wed, 05/19/2021 - 15:34

In reply to खरोखरीच असा स्ट्रेन तेथे असला by आग्या१९९०

Permalink

राहुल गांधींचा सल्ला कमीत कमी

राहुल गांधींचा सल्ला कमीत कमी उद्धव ठाकरेंनी तरी ऐकायला पाहिजे होता, पण त्या वेळी ते वाझेंना वाचविण्यात busy होतें, तर अजित पवार पंढरपूर मध्ये. आजही कोविड मुळे मारणार्यामध्ये 25 टक्के हे महाराष्ट्रातील आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 05/19/2021 - 15:55

In reply to राहुल गांधींचा सल्ला कमीत कमी by रात्रीचे चांदणे

Permalink

का? पंतप्रधानांना काय अडचण

का? पंतप्रधानांना काय अडचण होती सल्ला ऐकायला?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 05/19/2021 - 16:45

In reply to का? पंतप्रधानांना काय अडचण by आग्या१९९०

Permalink

कसला सल्ला? त्यात काही

कसला सल्ला? त्यात काही स्पैसिफिक सूचना, मुद्दे वगैरे होते का? कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या टाळाव्या, नक्की काय करावे असे काही सांगितले होते का?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 05/19/2021 - 16:57

In reply to कसला सल्ला? त्यात काही by श्रीगुरुजी

Permalink

ती खूप पुढची गोष्ट. ऐकून

ती खूप पुढची गोष्ट. ऐकून घ्यायची इच्छा असावी लागते,आणि मुख्य म्हणजे समजून घ्यायची कुवत असावी लागते. इथे त्याबाबतीत तर सगळाच आनंदी आनंद.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 05/19/2021 - 17:17

In reply to ती खूप पुढची गोष्ट. ऐकून by आग्या१९९०

Permalink

म्हणजे काहीही स्पेसिफिक असं

म्हणजे काहीही स्पेसिफिक असं सांगितलं नव्हतं. मुळात ज्याला इतर जनता सोडाच पण स्वपक्षातील लोकसुद्धा गांभीर्याने घेत नाहीत, जो फक्त आचरटपणा करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे, जो संशयास्पदरित्या चीनच्या राजदूताला चोरून भेटतो, जो सर्वोच्च न्यायालयाचे अध्यक्ष, फ्रान्सचे अध्यक्ष यांच्या नावाने खोटे बोलतो आणि नंतर त्यासाठी माफी मागतो . . . अशाची वरवरची ट्विट्स कोण आणि का ऐकून घेईल?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 05/19/2021 - 17:26

In reply to म्हणजे काहीही स्पेसिफिक असं by श्रीगुरुजी

Permalink

कोणाचं ऐकतात? बोकीलचे?

कोणाचं ऐकतात? बोकीलचे?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 05/19/2021 - 17:34

In reply to कोणाचं ऐकतात? बोकीलचे? by आग्या१९९०

Permalink

जे काही विशिष्ट सूचना करतात

जे काही विशिष्ट सूचना करतात अशांचं ऐकतात. ज्यांचा पूर्वोतिहास काळाकुट्ट आहे, जे आचरटपणासाठी खोटेपणासाठी कुप्रसिद्ध आहेत, ज्यांना जग गांभीर्याने घेत नाही, जे कायम परदेशात जाऊन मौजमजा करण्यात धन्यता मानतात अशांचे वरवरचे लेखन ऐकण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 05/19/2021 - 15:34

In reply to खरोखरीच असा स्ट्रेन तेथे असला by आग्या१९९०

Permalink

राहुल गांधींनी टूलकिट पण तयार

राहुल गांधींनी टूलकिट पण तयार केलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by पिनाक on Fri, 05/21/2021 - 00:36

In reply to खरोखरीच असा स्ट्रेन तेथे असला by आग्या१९९०

Permalink

राहुल गांधींनी सरकारने चेष्टा

राहुल गांधींनी सरकारने चेष्टा केली होती हे दाखवणारे काही रेफरन्स, बातमी, पत्रके इत्यादी काही आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Wed, 05/19/2021 - 15:59

In reply to . by कॉमी

Permalink

माहिती

जालावर अगदी सहज उपलब्ध आहे हो! इथे पहा, व इथेही.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Wed, 05/19/2021 - 16:28

In reply to माहिती by प्रदीप

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद. मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स बंदच आहेत, आणि सिंगापूर सोबत भारताचा "एअर बबल" म्हणजे तात्पुरता करार सुद्धा नाही आहे, त्यामुळे केजरीवाल यांचा पूर्ण मुद्दा अर्थहीन झाला आहे. हे एव्हीएशन मिनिस्टरांनी सांगितले आहे. सिंगापूर मध्ये लहान मुलांना संसर्ग होत आहे हे पण तितकेच खरे आहे. हे कशामुळे होत आहे, म्युटेशन आहे की नाही, हे माहित नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 05/19/2021 - 17:47

In reply to धन्यवाद. by कॉमी

Permalink

संसर्ग की सिरीयस?

संसर्ग की सिरीयस?
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसामान्य on Wed, 05/19/2021 - 18:53

In reply to धन्यवाद. by कॉमी

Permalink

सिंगापोर मधील बहुतांशी केसेस

सिंगापोर मधील बहुतांशी केसेस या बी १६१७ (ज्याला भारतीय variant समजलं जाते ) या प्रकारच्या आहेत. थोड्या केसेस UK आणि South आफ्रिका प्रकारच्या आहेत . त्यामुळे केजरीवाल यांचे म्हणणे हे तद्दन मुर्खपणाचे आहे. स्वतःला इतर राजकारण्यांपेक्षा वेगळं समजणाऱ्या केजरीवालांनी तरी थोडा फार अभ्यास करून बोलायला हरकत नव्हती.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on गुरुवार, 05/20/2021 - 14:33

In reply to सिंगापोर मधील बहुतांशी केसेस by सर्वसामान्य

Permalink

भारतीय

नव्हे, भारतात आढळलेला.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on गुरुवार, 05/20/2021 - 14:31

In reply to . by कॉमी

Permalink

ट्विटरवर

२ दिवस आधीच ह्यावर चर्चा झालिये. हा स्ट्रेन भारतातलाच बी १६१७२ आहे असं सिंगापुरच्या सरकारचं म्हणणे आहे. भारत सिंगापुर प्रवासबंदी अगोदरपासुनच आहे, अर्थात, तो असुनही हा स्ट्रेन तिकडे कसा पोचला हा संशोधनाचा विषय आहे. सिंगापुर सरकार फेक न्युज पसरवली म्हणुन केजरिवालांवर गुन्हा दाखल करायला निघाले होते, जयशंकर अन भारत सरकारला बरच वजन खर्ची घालुन वाचवायला लागलंय केजरिवालांना.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on गुरुवार, 05/20/2021 - 14:38

In reply to ट्विटरवर by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

जुनी खोड

सिंगापुर सरकार फेक न्युज पसरवली म्हणुन केजरिवालांवर गुन्हा दाखल करायला निघाले होते, जयशंकर अन भारत सरकारला बरच वजन खर्ची घालुन वाचवायला लागलंय केजरिवालांना.
या गृहस्थाची फेक न्यूज पसरवायची खोड फार जुनी आहे. अरूण जेटली आणि नितीन गडकरींनी खरं तर चांगलंच अब्रूनुकसानीच्या खटल्याच्या कात्रीत पकडले होते. पण दोघेही फारच भोळे सांब निघाले आणि नुसत्या माफीवर दोघांनीही केजरीवालांना सोडून दिले. एक गोष्ट समजत नाही. अरूण जेटली गेल्यावर या माणसाला तिथे अंत्यदर्शनाला जाताना काहीही लाज वाटली नसेल? खरं तर कार्यकर्त्यांनी चपलेने बडवून पळवून लावायला हवे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसामान्य on गुरुवार, 05/20/2021 - 18:02

In reply to ट्विटरवर by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

Air इंडिया ची विमाने

Air इंडिया ची विमाने सिंगापूरला आज सुद्धा येत आहेत. एप्रिल पर्यंत सिंगापूर नागरिक , PR आणि ep व wp असलेले येऊ शकत होते. फक्त tourist ना बंदी होती. सध्या फक्त सिंगपोर नागरिक आणि PR येऊ शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/19/2021 - 18:56

Permalink

राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली वृक्षतोड;

राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली वृक्षतोड; आता कधी होणार वृक्षलागवड ?.. https://www.esakal.com/nanded/tree-cuting-national-highway-when-will-the-tree-planting-now --------- आरे बाबतीत वेगळा नियम आणि इतर ठिकाणी वेगळा नियम, असे काही आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/19/2021 - 19:01

Permalink

“….तुम्हाला अजिबात गांभीर्य नाही,” मुंबई हायकोर्टाने

“….तुम्हाला अजिबात गांभीर्य नाही,” मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावलं -------- https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-not-at-all-serious-about-protecting-its-doctors-says-bombay-high-court-sgy-87-2475288/ ----------
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/19/2021 - 19:05

Permalink

Narada Sting: सीबीआयच्या याचिकेत ममता बॅनर्जींचंही नाव

Narada Sting: सीबीआयच्या याचिकेत ममता बॅनर्जींचंही नाव, राज्याबाहेर खटला वर्ग करण्याची मागणी... ----------- https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/national/mamata-banerjee-made-parties-in-cbi-plea-seeking-transfer-of-narada-case-459631.html/amp ---------- दोषींवर कारवाई व्हायलाच हवी ....
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on गुरुवार, 05/20/2021 - 03:26

Permalink

बधीर करुन ठेवले आहे लोकाना कौन्ग्रेस् ने

६० वर्ष एका घराण्याची सत्ता चालवुन आणि नको तितकी लोकसन्ख्या वाढु देउन. आता आकाशपाताळ एक करतायत परत सत्ता मिळवण्यासाठी आणि मुर्खासाऱ़खे राज्यान्मागे राज्य जातायत हातुन..
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on गुरुवार, 05/20/2021 - 07:51

Permalink

मुंबईतील काही भागात ज्यांचे

मुंबईतील काही भागात ज्यांचे वय 45 पेक्षा कमी आहे अशा लोकांचीही लसीकरण चालू आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे चालू असणार आहे. ग्रामीण भागात लसीचा तुटवडा असण्याचं हे एक कारण असावे. https://www.loksatta.com/mumbai-news/vaccination-special-guests-in-seven-hills-hospital-akp-94-2475714/
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on गुरुवार, 05/20/2021 - 15:13

Permalink

परत ये.

परत ये !?! https://www.lokmat.com/crime/71-year-old-seer-allegedly-committed-suicide-jain-temple-ghatkopar-a629/
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on गुरुवार, 05/20/2021 - 18:35

Permalink

बंगालमध्ये विधानपरिषद

बंगालमध्ये विधानपरिषद आणण्यात यावी हा प्रस्ताव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळाने मंजूर केला आहे. यामागचे कारण नक्की काय हा प्रश्न नक्कीच पडतो. ममतांचा नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारींनी पराभव केला तरीही ५ मे रोजी ममतांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत विधानसभेवर निवडून येणे भाग आहे. कोरोनाची दुसरी लाट थोडीथोडी ओसरायला लागली असली तरी परिस्थिती पूर्ण नियंत्रणात यायला आणखी काही महिने जातील असे दिसते. कोरोनाच्या काळातच विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान घेतल्यामुळे निवडणुक आयोगावर भरपूर टीका झाली होती. असे असताना नोव्हेंबर पर्यंत पोटनिवडणुक न झाल्यास ममतांपुढील अडचणी वाढतील. त्यामुळे राज्यात विधानपरिषद स्थापन करून त्यावर निवडून जायचा ममतांचा डाव आहे का? राज्यात विधानपरिषद स्थापन करणे म्हणजे राज्यात एखादी नवीन महापालिका स्थापन करून तिथे निवडणुका घेण्याइतके सोपे नाही. राज्यघटनेच्या कलम १६९(१) प्रमाणे- Parliament may by law provide for the abolition of the Legislative Council of a State having such a Council or for the creation of such a Council in a State having no such Council, if the Legislative Assembly of the State passes a resolution to that effect by a majority of the total membership of the Assembly and by a majority of not less than two thirds of the members of the Assembly present and voting. म्हणजेच हा प्रस्ताव बंगालच्या मंत्रीमंडळात मंजूर झाल्यानंतर विधानसभेत मतदान करणार्‍या सदस्यांपैकी दोन-तृतीयांश बहुमताने मंजूर करून घ्यावा लागेल. तो करून घ्यायला फारशी अडचण नसावी. त्यासाठी विधानसभेचे एखादे विशेष अधिवेशनही ममता बोलावू शकतील. तसे झाल्यानंतर चेंडू केंद्राच्या कोर्टात जाईल. मग केंद्रीय मंत्रीमंडळाने हा प्रस्ताव मान्य करून त्यासंबंधीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर करावे लागेल. त्याला मंजुरी मिळाल्यावर मग ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी जाईल. राष्ट्रपतींची सही झाल्यावर भारताच्या गॅझेटमध्ये ते विधेयक कायदा म्हणून प्रसिध्द होईल. त्यानंतर विधानपरिषदेची स्थापना होईल. आणि नुसती विधानपरिषदेची स्थापना झाली तरी त्याचा फारसा उपयोग नाही. त्या सभागृहात ममतांना निवडूनही जावे लागेल. आणि त्यासाठी निवडणुकांची घोषणा परत निवडणुक आयोगालाच करावी लागेल. मुख्य म्हणजे या सगळ्या पायर्‍या अमुक इतक्या दिवसात झाल्याच पाहिजेत असे कोणतेही बंधन नाही. केंद्रीय मंत्रीमंडळ या प्रस्तावावर बसून राहिले तर ममता आदळआपट सोडून काहीही करू शकणार नाहीत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सामान्यतः दरवर्षी जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात बोलावले जाते. पावसाळी अधिवेशन संपले की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनापर्यंत मधे कोणतेही अधिवेशन नसते. त्यामुळे हा प्रस्ताव संसदेत पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घ्यावा लागेल. तसेच त्यानंतर निवडणुक आयोग निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार. म्हणजे आयोगाने तशी घोषणा करावी ही नुसती अपेक्षाच. कारण कोरोनाचे कारण दाखवून सगळ्या निवडणुका आयोग बेमुदत पुढे ढकलायची शक्यता सगळ्यात जास्त. त्यातच आजच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी आपला अपमान केला, आपल्याला पुतळ्यासारखे बसून राहणे भाग झाले वगैरे गोष्टी ममतांनी बोलून ठेवल्या आहेत. मुळात मोदी आणि ममता यांच्यातून विस्तव जात नाही. त्यात हा आणखी संघर्ष ममतांनी करून ठेवला आहे. मागच्या वर्षी उध्दव ठाकरेंपुढे अशी अडचण आल्यावर मोदींनी मध्यस्थी केली आणि राज्यात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी मतदान घ्यावे अशी रदबदली मोदींनी निवडणुक आयोगापुढे केली होती. पण असे सततचे खटके ममतांकडून उडवले जाणार असतील तर मोदींनी असे काही ममतांसाठी का करावे हा प्रश्नही पडेलच. आता लिहित आहे ते बंगालमध्ये लागू पडेल. माझे हेच मत मागच्या वर्षी महाराष्ट्राविषयी पण होते. कोरोनाकाळात सगळ्या निवडणुका पुढे ढकलायचा निर्णय घेतला गेला असेल तर एका राज्यासाठी आणि त्यातही एका मुख्यमंत्र्यासाठी त्या नियमाला अपवाद करणे अयोग्य ठरेल. शेवटी दोन्ही राज्यांमध्ये निवडून गेलेली विधानसभा अस्तित्वात आहे आणि एका पक्षाला/आघाडीला बहुमतही आहे. अमुक एक मनुष्य मुख्यमंत्रीपदावर असावा यासाठी प्रयत्न करायचे कोणतेही कारण केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे नाही. तर केवळ राज्यात एक बहुमतातले सरकार असावे हेच ऑब्लिगेशन दोघांचेही आहे. तसे असेल तर मागच्या वर्षी ठाकरे किंवा यावर्षी ममतांना सहा महिन्यात विधीमंडळावर निवडून जाता येणे शक्य नसेल तर राजीनामा देऊन त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री नेमणे सहज शक्य होते/आहे. मग जेव्हाकेव्हा निवडणुका होतील तेव्हा त्यांना निवडून जाऊन परत मुख्यमंत्री बनणे शक्य आहे. त्यातून काही खूप मोठा चमत्कार झाला आणि कोरोनाची लाट अपेक्षेपेक्षा खूप जास्त वेगाने ओसरली आणि पोटनिवडणुक घेणे शक्य झाले तर सगळेच चित्र पालटेल. बघू काय होते ते.
  • Log in or register to post comments

Submitted by दिगोचि on Fri, 05/21/2021 - 06:00

In reply to बंगालमध्ये विधानपरिषद by चंद्रसूर्यकुमार

Permalink

ममतान्चा अपमान

आजच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी आपला अपमान केला, आपल्याला पुतळ्यासारखे बसून राहणे भाग झाले वगैरे गोष्टी ममतांनी बोलून ठेवल्या आहेत. >>> ही ब्रेकिन्ग न्युज असल्याचे वाचले. ही मुख्यमंत्र्यांच्या बैठक कोरोनासाठी बोलावली असता ममतानी दुसराच विशय काढला म्हणुन मोदीनी त्याना गप्प बसवले. काहीतरी विशय काढून भाण्डण करायचे हा ममतान्चा स्वभाव आहे. जसे त्यानी जय श्रीराम म्हणणार्याशी केले होते. आज हेच फक्त परत सिद्ध झाले.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 05/23/2021 - 21:16

In reply to ममतान्चा अपमान by दिगोचि

Permalink

बंगाल मधली निडणुक मॉमता

बंगाल मधली निडणुक मॉमता दीदींच्या पक्षानी जिंकली याचा आनंद आपल्या राज्यातील काही माठ नेते आणि काही इतर बोलबच्चन करत होते. मात्र स्वतः मॉमता दीदी यांचा व्यक्तीगत पराभव झाला हे मात्र जसे तो झालाच नाही असे सगळीकडे दर्शवण्यात येत होते, मिडिया देखील मोदी / बीजेपीचा पराभवच कसा झाला अन् कुठली लाट वगरै नसते अश्या आशयाच्या बातम्यांचा जणु काही पुर आणण्यात आला... बीजेपी जरी बहुमतात नसली तरी त्यांची संख्या मात्र वाढली यांचा मुद्दामुन विसर पाडण्यात आला तसाच दीदींच्या पक्षाला मुस्लिम एकगठ्ठा मतदानाचा सगळ्यात मोठा फायदा /आधार मिळाला या बद्धल मात्र सोयिस्कर रित्या मौन बाळगण्यात आले. आता जे काही मॉमता दीदींच्या राज्यात चालले आहे ते अत्यंत भयानक आहे, अनेक बीजेपी कार्यकर्त्यांना त्या राज्यातुन जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला, तर काहींचे मुडदे देखील पाडण्यात आले, याच बरोबर हिंदू स्त्रियांवर बलात्काराच्या घटना झाल्या असुन त्यात वाढ होत आहे. मुळात बंगाल राज्यात आता हिंदू जणु काही अल्पसंख्यकच झाले की काय असे वाटते. हा सर्व घटनाक्रम बघताना मला २०१७ मधील रुपा गांगुलींची एक छोटी बाईट आठवली :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Sun, 05/23/2021 - 21:22

In reply to बंगाल मधली निडणुक मॉमता by मदनबाण

Permalink

प्रश्न.

ह्याचा ममता बॅनर्जींच्या निवडून येण्याशी काय संबंध ?
याच बरोबर हिंदू स्त्रियांवर बलात्काराच्या घटना झाल्या असुन त्यात वाढ होत आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 05/23/2021 - 21:32

In reply to प्रश्न. by कॉमी

Permalink

ह्याचा ममता बॅनर्जींच्या

ह्याचा ममता बॅनर्जींच्या निवडून येण्याशी काय संबंध ? हिंदू स्त्रियांवर बलात्कार करणारे तथाकथित शांतता प्रेमी धर्मांचे आहेत, ज्यांच्या बळावरच दीदी सत्तेत आल्या ना ? सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Sun, 05/23/2021 - 22:07

In reply to ह्याचा ममता बॅनर्जींच्या by मदनबाण

Permalink

अरेरे.

फार कुतर्क,आणि दिशाभूल करणारी वाक्ये.
हिंदू स्त्रियांवर बलात्कार करणारे तथाकथित शांतता प्रेमी धर्मांचे आहेत
काय आधारावर दावा आहे ? ज्या बलात्काराचा राजकीय आणि धार्मिक संबंध जोडला जात होता त्याला तसा कोणताही पैलू नव्हता. इथे वाचा. २.
ज्यांच्या बळावरच दीदी सत्तेत आल्या ना ? सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ?
प्रतिवाद करण्याच्या लायकीचे वाक्य नाही, त्यामुळे पास. शब्दाशब्दाला कुतर्क आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Sun, 05/23/2021 - 22:20

In reply to अरेरे. by कॉमी

Permalink

ओके.

हे योग्य नाही, प्रतिवाद करतोच. ज्यांच्या बळावर कोणाच्या बळावर ? हिंदूच्या मतसंख्येमध्येसुद्धा TMC ने पूर्वीपेक्षा बाजीच मारली आहे. तुम्ही तुमचा द्वेषमूलक मुद्दा रेटायसाठी फक्त मुस्लिम मताकडे पाहात आहात. इथे वाचा- गटनिहाय मत कसे हलले आहेत ते- इथे वाचा. सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ? हिंदूनच्या बळावर भाजपा निवडून येते तर हिंदूनी केलेल्या गुन्हाच उत्तरदायित्व भाजपावर टाकण्यास तयारी आहे काय ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 05/23/2021 - 23:34

In reply to ओके. by कॉमी

Permalink

काय आधारावर दावा आहे ? ज्या

काय आधारावर दावा आहे ? ज्या बलात्काराचा राजकीय आणि धार्मिक संबंध जोडला जात होता त्याला तसा कोणताही पैलू नव्हता. तुम्ही जी बातमी दिली आहे तशीच बातमी त्याच मुली बद्धल इथे देखील वाचता येइल :- 21-year-old college student raped and murdered in Medinipur district in West Bengal, 3 including a woman arrested हिंदूनच्या बळावर भाजपा निवडून येते तर हिंदूनी केलेल्या गुन्हाच उत्तरदायित्व भाजपावर टाकण्यास तयारी आहे काय ? बलात्काराचा गुन्हा कोणत्याही धर्मीय व्यक्तीने कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने केल्यास त्याल शिक्षा ही झालीच पाहिजे. जसा शांतता प्रेमी समाजाकडुन लव्ह जिहाद गेला जातोय तसे हिंदू समाजातुन कुठला जिहाद केला जातोय ते नक्की सांगा. तुम्ही तुमचा द्वेषमूलक मुद्दा रेटायसाठी फक्त मुस्लिम मताकडे पाहात आहात. बरे झाले द्वेषमूलक हा शब्द तुम्ही वापरलात, मग जिहाद आणि काफिर हे हिंदूच्या मैत्रीसाठी आणि त्यांच्या गुणगाणासाठी वापरले जातात असे म्हणावे काय ? Consolidating Muslim, secular votes worked for TMC The TMC has always had strong following among Muslims in south Bengal, including Kolkata West Bengal assembly poll results: Muslims pressed button for TMC in Congress bastion Muslim belt completely switches over to Trinamool from Congress

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Sun, 05/23/2021 - 23:55

In reply to काय आधारावर दावा आहे ? ज्या by मदनबाण

Permalink

आररारारा

१. तीच बातमी आहे ओपिंडीयात, त्यात काय वेगळे मांडले आहे ? अहो, तो बलात्कार मुस्लिम व्यक्तीनी केलाच नाहीये. आणि लोकल पोलीस आणि त्या मुलीच्या परिवाराने सुद्धा ह्यात कम्युनल आणि राजकीय अँगल नाही असे स्पष्ट केले आहे. २.
बलात्काराचा गुन्हा कोणत्याही धर्मीय व्यक्तीने कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने केल्यास त्याल शिक्षा ही झालीच पाहिजे.
अर्थातच ! पण मुळात ह्या घटनेत मुसलमान इन्व्हॉल्व्हच नाहीयेत. तुम्ही काय आधारावर दावा केलाय ह्या प्रश्नल बगल दिली. OpIndia सुद्धा गुन्हेगार मुसलमान आहेत असे कुठेही म्हणताना दिसत नाही. म्हणून तुम्ही द्वेषमूलक आहात. समजले ? ३.
जसा शांतता प्रेमी समाजाकडुन लव्ह जिहाद गेला जातोय तसे हिंदू समाजातुन कुठला जिहाद केला जातोय ते नक्की सांगा.
नुसती इकडून तिकडे गोलपोस्ट बदलतंय. आधी ममता बॅनर्जींचे नाव काढलेत. आणि ह्या घटनेत मुसलमान आणि TMC दोघेही नाहीत तरी उगाच काहीही आरोप लावलेत. OpIndia मध्ये bjp आणि tmc चा संबंध सुद्धा ऐकीव माहितीवरच जोडला आहे.
some social media users claimed that the girl was a BJP supporter, and her rape and murder was part of ongoing TMC violence against BJP and other opposition parties
हे पोलिसांनी आणि मुलीच्या परिवाराने सुद्धा खोडून काढले आहे! सोशल मिडियावरचे वाचुन बातमी लिहिणारे OpIndia धन्यच. जिहाद चा प्रश्न कुठून उकरून काढलात मध्येच ? आधी ममता बद्दल बोला, मग इकडे तिकडे धावा. आणि तुम्हीच म्हणाला होता की मुस्लिम मत मिळल्यामुळे ममता मुस्लिम गुन्ह्यांना (जो झालाच नाही!) जबाबदार आहे. मग माझ्या सध्या प्रश्नचे उत्तर द्या. हिंदू मत मिळवल्यावर भाजपा हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ? ४.
मग जिहाद आणि काफिर हे हिंदूच्या मैत्रीसाठी आणि त्यांच्या गुणगाणासाठी वापरले जातात असे म्हणावे काय ?
कुठे कुठे धावताय हो! मी कधी म्हणलं असं काही ? तुम्हीच शांतताप्रेमी धर्मातील माणसाने बलात्कार केला आणि त्याचा ममता tmc विजयाशी संबंध आहे असा दावा केला. एकही आधार नाही एकाही assertion साठी. आणि उगाच भसभास व्हिडीओ देणार असाल तर माझा खरोखरीच पास. व्हिडिओतील मुद्दे टंकायचे कष्ट घेणार असाल तर ठीक, नाहीतर राहूदे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 05/24/2021 - 00:33

In reply to आररारारा by कॉमी

Permalink

तीच बातमी आहे ओपिंडीयात,

तीच बातमी आहे ओपिंडीयात, त्यात काय वेगळे मांडले आहे ? अहो, तो बलात्कार मुस्लिम व्यक्तीनी केलाच नाहीये. आणि लोकल पोलीस आणि त्या मुलीच्या परिवाराने सुद्धा ह्यात कम्युनल आणि राजकीय अँगल नाही असे स्पष्ट केले आहे. होय, ते अजुन स्पष्ट झालेले नाही. पण मुळात ह्या घटनेत मुसलमान इन्व्हॉल्व्हच नाहीयेत. त्याच गोष्टीसाठी मी व्हिडियो देतो आणि ते न पाहता तुम्ही तुमचा मुद्दा मांडु पाहता. आधी ममता बॅनर्जींचे नाव काढलेत. आणि ह्या घटनेत मुसलमान आणि TMC दोघेही नाहीत तरी उगाच काहीही आरोप लावलेत. OpIndia मध्ये bjp आणि tmc चा संबंध सुद्धा ऐकीव माहितीवरच जोडला आहे. ममता दीदींच्या पक्षास मुस्लीम वर्गाचा पाठिंबा आहे त्या स्वरुपाच्या बातम्या मी वरती संदर्भ म्हणुन दिलेल्या आहेत. हिंदू मत मिळवल्यावर भाजपा हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ? त्यांच्या कार्यकर्त्यांनी जसा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस / मारहाण / खुन / बलात्कार केले तर तो दोष भाजपावर द्यावाच लागेल, काहीही कारण नसताना मोदींना दोष देणारे तर रोजच दिसतात. कुठे कुठे धावताय हो! मी कधी म्हणलं असं काही ? तुम्हीच शांतताप्रेमी धर्मातील माणसाने बलात्कार केला आणि त्याचा ममता tmc विजयाशी संबंध आहे असा दावा केला. एकही आधार नाही एकाही assertion साठी. आणि उगाच भसभास व्हिडीओ देणार असाल तर माझा खरोखरीच पास. मी फक्त ४ व्हिडियो दिले आहेत, त्यातील शेवटचे २ व्हिडियो पाहिले तरी बंगाल मधील अवस्था सहज कळुन येइल. शेवटचा व्हिडियो खरं तर मला द्यायचा नव्हता, कारण ५०+ वर्ष वय असलेल्या त्या स्त्रीवर शांतता प्रेमी समाजाच्या गुन्हेगाराने बलात्कार केला. ती महिला आधी सीपीएम नंतर टीएमसी आणि आता बीजेपी समर्थक झाली होती. ही जाळपोळ खून आणि बलात्कार करण्याचे जे सत्र बंगाल मध्ये सुरु झाले आहे त्याचा आणि टीएमसीच्या विजयाशी काडीमात्र संबंध नाही असे जर आपले मत असेल तर मी इथेच थाबतो.... व्हिडियो हे पाहिले जाण्यासाठीच दिले जातात... आता मी हिंदू राहिलेली नाही आणि माझ्या लोकांना मी माझे तोंड कसे दाखवु ? अशी ती वृद्ध महिला व्हिवळत सांगते आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Risk and time are opposite sides of the same coin. If there were no tomorrow, there would be no risk.”
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Mon, 05/24/2021 - 01:04

In reply to तीच बातमी आहे ओपिंडीयात, by मदनबाण

Permalink

१. आजिबात नाही. दोन्ही मुद्दे

१. आजिबात नाही. दोन्ही मुद्दे पूर्ण स्पष्ट झाले आहेत. त्या घटनेत tmc आणि मुसलमान दोघाचा संबंध नाही असे स्पष्ट झाले आहे. आरोपींना अटक झाली आहे आणि त्यांनी गुन्हा मान्य पण केला आहे. यापेक्षा काय स्पष्ट होणार आहे ? २. तुम्ही दिलेला व्हिडीओ- Ewoke TV १३५ view ५ like १ comment काय अहो ? असे कुठलेपण रँडम व्हिडिओ मी मुळात का पाहू, विश्वास ठेवणे फाsssss र लांब. विश्वसनीय सोर्स द्या, मग पुढे बोलू शकेन. ३.
त्यांच्या कार्यकर्त्यांनी जसा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस / मारहाण / खुन / बलात्कार केले तर तो दोष भाजपावर द्यावाच लागेल, काहीही कारण नसताना मोदींना दोष देणारे तर रोजच दिसतात.
मूळ प्रश्न टाळला. तुम्ही म्हणत होता मुस्लिम व्होट ममताला मिळाले म्हणून ममता मुस्लिम व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे. मग मी विचारले मग भाजप हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ? तुम्ही शिताफीने पुन्हा पुन्हा उत्तर द्यायचे टाळले आहे.पार्टी कार्यकर्त्यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी पार्टी जबाबदार बऱ्याचदा असते हे तर अत्यंत obvious आहे. तो प्रश्नच नव्हता माझा. ४. मुस्लिम लोकांचे समर्थन असणे तुम्ही काहीतरी आरोप केल्याच्या थाटात पुन्हा पुन्हा सांगत आहात ,हे दुर्लक्ष करून, कि TMC ला हिंदू मतं सुद्धा लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्तच मिळाली आहेत.. अर्थातच! जिथे तिथे कम्युनल ट्विस्ट देऊन मुस्लिम जनतेवर आरोप करणे ही भाजपाची/भाजप समर्थकांची (तुम्ही, उदा.) स्ट्रॅटेजी असेल तर का म्हणे मुस्लिम लोक त्यांना मत देतील ? मुस्लिम मतं इतक्या वाईट प्रकारे घालवणे हे भाजपचे अपयश आणि तृणमूलचे यशच आहे. त्यात तृणमूल वर आरोप करण्यासारखे काहीही नाही. तृणमूल ने स्वतःची हिंदू मतसंख्या सुद्धा लोकसभा इलेक्शन तुलनेत वाढवली आणि मुस्लिम मतसंख्या सुद्धा. ५.ही जाळपोळ खून आणि बलात्कार करण्याचे जे सत्र बंगाल मध्ये सुरु झाले आहे त्याचा आणि टीएमसीच्या विजयाशी काडीमात्र संबंध नाही असे जर आपले मत असेल तर मी इथेच थाबतो.... - बलात्काराशी नाहीच आहे. तुम्ही पुन्हा तेच का सांगताय माहित नाही. बाकी जाळपोळ आणि हत्या ह्याचा TMC विजयाशी संबंध आहेच, पण त्यात धार्मिक ट्विस्ट देणे हे पुन्हा खोटारडेपणाचे आहे. ६. व्हिडीओ द्यायचे असतील तर सोर्स म्हणून द्यायचे, तुमचा अख्खा प्रतिवाद म्हणून नाही. आणि विश्वसनीय सूत्राकडून असले पाहिजेत हेवेसांनल.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 05/21/2021 - 08:33

Permalink

केर्न्स एनर्जीने एअर

केर्न्स एनर्जीने एअर इंडियाविरुद्धचा म्हणजेच पर्यायाने भारत सरकारविरुद्धचा खटला जिंकला आहे. परदेशातल्या सरकारी संपत्तीवर जप्ती येऊ नये म्हणून पळापळ सुरु झाली आहे. देश की संपत्ती पे पंजा नही पडने दूंगा म्हणणारे गायब आहेत. https://www.ndtv.com/business/cairn-energy-government-asks-state-run-lenders-to-withdraw-cash-from-cairns-accounts-2436593
  • Log in or register to post comments

Submitted by पिनाक on Fri, 05/21/2021 - 08:48

In reply to केर्न्स एनर्जीने एअर by नगरीनिरंजन

Permalink

एकदा त्यांनी नक्की कुठे कुठे

एकदा त्यांनी नक्की कुठे कुठे लक्ष घालायचं हे पण सांगून ठेवा. तुमचा सल्ला घेऊनच करतील ते कारभार या पुढे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com