Skip to main content

आयटी कंपन्यांची मग्रुरी

लेखक एकुलता एक डॉन यांनी गुरुवार, 15/06/2017 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आयटी वर भरपूर धागे आहेत पण हा धागा प्रासंगिक आहे एक महिन्या आधी विप्रो वगैरे कंपन्या ५६००० हुन जास्त लोकांना काढणार http://www.livemint.com/Industry/4CXsLIIZXf8uVQLs6uFQvK/Top-7-IT-firms-… आज मात्र नवीन कंपन्या विकत घेत आहेत http://www.wipro.com/newsroom/press-releases/Wipro-to-acquire-Appirio-A… कायदेशीर दृष्ट्या ,अर्थ शाश्त्र दृष्ट्या चालत असले तरी हा प्रकार दुभती गाय दूध काढून कत्तल खाण्याकडे टाकायची व पोपट पाळायचा असे नाही वाटत ?

वाचने 42580
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

In reply to by चिकित्सक

Fixed Price आणि Time and Material प्रमाणे Capped Time and Material नावाचा एक भयंकर बिलिंग प्रकार आहे. या प्रकारात प्रोजेक्टच्या टोटल बिलिंग ची रक्कम फिक्स्ड असते, परंतु एकूण कामाचे तास ठरलेले नसते. इन्फोसिस मध्ये असताना यूबीएस या बँकेचे काम मिळविण्यासाठी आमच्या स्वित्झर्लॅड मधील मार्केटिंगच्या माणसाने सुरवातीच्या पायलट प्रोजेक्ट साठी Capped Time and Material बिलिंग असलेले काँट्रॅक्ट केले होते. जेमतेम १२ पर्सन मंथ्सचे बिलिंग मिळणार होते. परंतु ६ माणसांनी २ महिने काम केल्यानंतर सुद्धा क्लाएंट काम देणे थांबवेना. शेवटी तब्बल ५ महिने उलटून गेले. तोपर्यंत आम्ही ३० महिन्यांचे काम केले होते, परंतु करारानुसार १२ महिन्यांचेच बिलिंग करता आले. वरीष्ठ व्यवस्थापक संतापून सर्वांना शिव्या हासडत होते. शेवटी मी स्वतः स्वित्झरलँडला जाऊन मार्केटिंगच्या माणसाबरोबर यूबीएसच्या मॅनेजरला भेटून, अक्षरशः त्याचे पाय धरून प्रोजेक्टचे काम संपवायची विनंती केली. This project is bleeding us from all directions. We're chasing a moving target. Seems there is no end to this project. या शब्दात त्याला आमची व्यथा सांगितली. शेवटी त्याने प्रोजेक्टमध्ये नवीन काम न देता पुढील काही दिवसात प्रोजेक्ट संपविण्याचे आश्वासन देऊन आमची सुटका केली.

In reply to by राघवेंद्र

हे बरचस एक्सचेंज रेट वर सुद्धा डिपेंड असत , रुपया मजबूत होतोय ह्या कारणा मुळे , सर्विस बेस्ड कंपन्याचे मार्जिन वर विपरीत प्रभाव पडलाय , ओवरसीस क्लाइंट ना भारतातल्या कंपनी ला काम देण्याहून विएतनम , फिलिपिन्स , स्पेन , बांगलादेश , श्रीलंका रश्या सारख्या देशांत काम देण परवडत् | दुसर म्हणजे १३-१४ लाख आजच्या महागाई च्या काळात काहीच नाहीत वर्षाला ५-६ लाख लोक घर गाडीचा हफ्ता भरतात वर २-३ लाख सरकार ला टॅक्स द्यावा लागतो उरल्या ३-४ लाखात इन्षुरेन्स , इनवेस्टमेंट, बायको-मुलांचे आजारपण , मुलांचे शिक्षण त्यांचेकपडे , व्ह्या पुस्तके ह्यात जातात | साधारण ३०-३२ वयाच्या आईटी प्रोफेशनल्स चा पगार त्यांचा स्किल सेट आणि एक्सपीरियन्स अनुसार १३-१४ लाख सहज असतो आणि एकदा तुम्हाला १० वर्षांच्या पुढे एक्सपीरियेन्स झाला कि नव्या ऑपर्चुनिटीस कमी होतात , तुमची प्रॉफीतीबीलेटी कमी होते |

स्वेच्छानिवृतीचा मार्ग उपलब्ध असताना कंपन्या इतका घोळ का घालतात हेच समजत नाही. गोल्डन शेकहॅड करुन कामगार आणि कंपन्या एकमेकांना रामराम करु शकतात ना?

In reply to by कलंत्री

गोल्डन शेकहॅड करुन कामगार आणि कंपन्या एकमेकांना रामराम करु शकतात ना?
हे वयाची पन्नाशी ओलांडलेल्यांना शक्य आहे. पण तिशीतल्या कर्मचार्‍यांना हे कसे शक्य आहे? कुटुंबाची जबाबदारी असते, होमलोन घेतलेले असले तर त्याचे हप्ते असतात. मग अशावेळी असा रामराम करता येणार नाही ना.

In reply to by गॅरी ट्रुमन

जितका-जितका मी पुढचा विचार किंवा पुढील आयुष्याचा विचार करतो, तितका-तितका मी स्वयंरोजगाराकडे वळत आहे. माझ्या मुलांना तरी मी एकच सल्ला दिला आहे, "एक वेळ विडी-सिगारेटची टपरी टाका किंवा वडा-पाव विका, पण गुलामगिरी कधीच करू नका.गुलामगिरी कधीचपूर्ण वेळ फायदेशीर नसते.(अर्थात ह्याला पण अपवाद आहेतच.) व्यसने आधारीत धंद्यांना कधीच मरण नसते आणि ते धंदे जमत नसतील तर, खाण्या-पिण्या आधारीत धंदे उत्तम." जाताजाता, बाजारात कितीही मंदी असू दे, राजश्री लॉटरी. बियरबार, पान-तंबाखूच्या टपर्‍या ह्यांची गिर्‍हाईके काही कमी होत नाहीत.लोकसंख्या वाढीच्या प्रमाणा पेक्षाही, ह्या व्यसनी लोकांचे प्रमाण जास्त वाढत आहे.

In reply to by मुक्त विहारि

मी स्वयंरोजगार आणि कोणत्याही कामाला/धंदा/ व्यवसायाला बिलकुल कमी लेखात नाही पण ... धंदा टिकून ठेवण्यासाठी करावी लागणारी गुलामगिरी नोकरी करण्याच्या गुलामगिरी पेक्षा खूप भयावय आहे. मोक्याच्या ठिकाणी टपरी आणि वडापावची गाडी टाकण्यासाठी आणि त्या टिकवण्यासाठी कितीजणांचे तळवे चाटावे लागतात हे फर्स्ट हॅन्ड अनुभव असणाऱ्या धन्देवायिकांना विचारून बघा. दारूचे दुकान चालवणाऱ्यांचा पैसा दिसतो पण समाजात किंमत शून्य..!! (विनंती: काका भावनेच्या भरात स्वतःच्या मुलांना असल्या धंद्याचे सल्ले कृपया नका देऊ. फुल्ल टाईम शेती करायचा तर नकोच नको.)

In reply to by विशुमित

एकंदर काय? तर इतरांना गुलाम बनवणे हे मानवी स्वभावातच आहे, मग तुम्ही धंद्यात असा, नोकरीत असा किंवा शेतीत असा

In reply to by विशुमित

विनंती: काका भावनेच्या भरात स्वतःच्या मुलांना असल्या धंद्याचे सल्ले कृपया नका देऊ. सहमत. मुवि काका, तुमचे धागे आणि एकंदर विचार वाचत आहे. तुम्ही जे चाकोरीबाहेरचे प्रयोग करत आहात त्यातून चांगले झाले तर कुणालाच काही अडचण असणार नाही पण असे वेगळे प्रयोग अंगाशी आले तर सगळा दोष तुम्हालाच दिला जाईल. तुम्हाला त्याची टोचणी लागणार नसेल तर प्रश्नच मिटला पण तसे नसेल तर एक "प्लॅन B" हाताशी असूद्यात. अगदीच रहावले नाही म्हणून सांगितले. राग मानू नये.

In reply to by मोदक

प्लॅन "ब" प्लॅन "सी" आणि प्लॅन "डी" हाताशी आहेत. कारण, आता एकाच आर्थिक स्तोतावर अवलंबून राहणे, कुणालाच परवडत नाही. किंबहूना आमची सगळी गणितेच उलटी असल्याने, आधी इतर प्लॅन्स झाले, त्यामुळेच प्लॅन "ए" कडे वळत आहे. देअर इज नथिंग टू लूझ.

In reply to by मुक्त विहारि

मूविकाका सॉरी टू से पण असले भंकस सल्ले मुलाला देण्यापेक्षा त्याला त्याचे स्वतःला काय येते अन काय करायचे ह्याचा विचार करायला पात्र करायला हवे. आपण यशस्वी पालक असाल, तुमच्यापुढे मि फार छोटा आहे पण असले सल्ले तुमच्याकडून अपेक्षित नाहीत. खान्यापिण्याच धंदे काय कुणीही उठून करावेत इतके सोपे नाहीत. माझ्या डोळ्यासमोर गेल्या वर्षात 10 नवीन हॉटेल बंद पडलेत. ते फार विचारपूर्वक, आवडिने आणि डोक्यानेच करायचा धंदा आहे. धंदा करणाऱ्याच्या घरात तसे वातावरण ही फार महतत्वाचे असते. निम्मी मराठी व्यावसायिक पीढ़ी याबाबतित कमनाशिबि असते. दारात देनेकरी आला की थरथर कापरे भरणार पालक पोराला काय धंद्यात पडू देणारेत. कुठल्याही परिस्थितिवर डोस्के शांत ठेऊन येता काळ पाहायला वेगळेच संस्कार लागेतात. गुजराती मारवाड्यात ते कैसे येतात ते मि तुम्हाला सांगायला नको. धंदा सोपा नाही आणि नोकरी म्हणजे गुलामगिरी नाही. मुद्दा हा की त्याला काय करायचेय.

In reply to by अभ्या..

दारात देनेकरी आला की थरथर कापरे भरणार पालक पोराला काय धंद्यात पडू देणारेत. कुठल्याही परिस्थितिवर डोस्के शांत ठेऊन येता काळ पाहायला वेगळेच संस्कार लागेतात. ही एक विशिष्ट पिढी होती. सरकारी नोकरी सर्वोत्तम, कर्ज कधी काढू नये, कोणाचे उपकार घेऊ नयेत वगैरे विचित्र संस्कार हळू हळू काळाच्या पडद्याआड गेले. आता खाजगी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करुन घरासाठी अवाच्या सवा कर्ज काढणे किंवा धंद्यासाठी कर्ज काढणे यात फारसा फरक नाही. म्हणजे रिस्क फॅक्टर सारख्याच मापाचा आहे. आयुष्य चढउतारांचे असते हे बहुतांश जणांनी आता स्वीकारले आहे.

In reply to by अभ्या..

अतिशय उत्तम प्रतिसाद अभ्या भाऊ आणि मोदक यांना पण अनुमोदन. स्वतः सध्या धंदा करत आहे, नशिबाने बरा चालू आहे धंदा पण या आधी ४/५ वेळा तोंडावर सपाटून आपटलो आहे आणि प्रत्येक वेळी परत शून्यातून सुरवात केली आहे, पण सगळ्यांनाच हे जमेल असे नाही अपयश पचवायची ताकत असेल तरच खरे आहे.

In reply to by अभ्या..

ते तर आहेच किंबहूना तेच महत्वाचे पण आहे. पण, बर्‍याचदा होते असे की, मुलांना कधीतरी असे वाटते की, बस्स झाली ही नौकरी. पण त्यावेळी वाढलेले वय, वाढलेला आर्थिक खर्च, जोडीदारांची स्थिरते कडून अस्थिरतेकडे न जाणारी मानसिकता. (बर्‍याचदा ही आर्थिक अस्थितरता १००० दिवसांपेक्षा जास्त नसते. किंबहूना योग्य आर्थिक नियोजन केले तर १००० दिवसात कुठल्याही कामात यश मिळतेच आणि त्याला फक्त २च गोष्टी लागतात. चिकाटी आणि समर्पित भावना...... ह्या २ही गोष्टींवर तर आत्ता पर्यंत जगलोय.), नातेवाईकांचे टोमणे (भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी.) शिवाय आजकाल सर्वच्ग क्षेत्रात, विशेषतः नौकरीत, स्पर्धा इतकी वाढली आहे की, अगदी एका ग्लासातले मित्र पण नौकरी टिकवण्यासाठी मित्राचे/मैत्रिणीचे गळे कापायला तयार होतात. स्वयं-रोजगार जर युनिक असेल आणि गिर्‍हाइकांना देव मानलेत तर, कुठल्याही स्वयं रोजगाराला यश मिळतेच मिळते.(इथे एम.एल.एम. हा स्वयंरोजगार नाही, मित्रांचे गळे कापणे, हा कसला आलाय स्वयं-रोजगार) "दारात देणेकरी आले की थरथर कापरे भरणारे पालक पोराला काय धंद्यात पडू देणारेत?" एक नंबर वाक्य. आपल्याच मुलाला परत विकत घेणारे बाप बघीतले आहेत.त्यामुळे ह्या वाक्याला प्रचंड सहमत.तुला ह्या वाक्याबद्दल आमच्या सौ.च्या हातची चिकन-बिर्याणी किंवा आमच्या हातची पाव-भाजी लागू.कधीही ये.तुमचे गांव ते डोंबोली फार जास्त अंतर नाही.

In reply to by अभ्या..

ओके नोटेड... आता ऐनवेळी टांग मारू नकोस म्हणजे मिळवले. बरेच मिपाकर ऐनवेळी टंग मारतात. (मी पण मारलेली आहे. उगाच आम्ही नाही त्यातले असे म्हणण्यात काही अर्थ नाही. शिवाय सोलापूरातून येत असल्यास "शेंगदाण्याची चटणी" न आणल्यासही हरकत नाही.)

In reply to by मुक्त विहारि

विशुमित जी, अभेंद्र जी आणि मुवी जी यांचे विचार समांतर आहेत पण १००% सत्य ही आहेत. शिवाय परिपक्व सुध्दा आहेत. यातील एक स्विकारुन दुसरा नाकारणे संयुक्तिक होणार नाही. यास पर्याय म्हणजे संबंधीत व्यक्ती कुठली(नोकरी की व्यवसाय) गुलामगिरी करण्यासाठी तयार आहे हे त्या व्यक्तीलाच ठरवू द्यावे. जेणे करुन त्याला फार वाईट वाटणार नाही व तो ते काम (नोकरी कींवा व्यवसाय) निमुट पणे करेल.

In reply to by कपिलमुनी

मला तर उगीचच युपीच्या मंत्रीमंडळात शपथविधी झाल्यागत वाटले क्षणभर. लगेच कम्मुचा प्रतिसाद दिसला, म्हणलं "हाय, आपल्या लोकातंच हाय"

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, अन्याव करु नका हो, धर्मेंद्राची लेकरं पण आता म्हातारी झाली. नातवासाठी पिक्चर काढायले पाजी आता. ;) मला बसंती सापडेना अजून. :(

In reply to by मुक्त विहारि

नोकरी म्हणजे निव्वळ गुलामगिरी ही चुकीची कल्पना वाटते. जवळपास प्रत्येकाला आपण नोकरी न करता धंदा करावा असे वाटते. पण चित्रपटात दाखवतात तसे 'केला धंदा सुरु आणि ६ महिन्यात धंदा यशस्वी होऊन गाडी बंगला घेतला' इतके ते सोपे नाही. असंख्य समस्या असतात.

In reply to by अभिजीत अवलिया

त्या तर स्गळ्याच ठिकाणी असतात. पण ह्या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा नंतर करू.आता टंकाळा आला आहे.

नोकरी म्हणजे गुलामगिरी हे सरसकट विधान मलाही नाही पटलं. हे म्हणजे लग्न फक्त शरीरसंबंधांची सोय म्हणून करतात, सगळ्या क्रिकेट मॅचेस फिक्स असतात, सगळे राजकारणी चोर असतात, सगळ्या नट्या छिनाल असतात वगैरे सोप्या, सरसकट (आणि त्यामुळेच) लोकप्रिय axioms आहेत त्यातला प्रकार आहे.

In reply to by आदूबाळ

हे वाक्य जरी सरकटी करण असले तरी पण ते माझ्या अनुभवानुसार योग्य आहे. एखादा मनुष्य जर अतिशय स्थिर नौकरीत असेल तर त्याला हे वाक्य लागू होणार नाही.पण आजकाल अशा स्थिर नौकर्‍या किती आहेत? अगदी आय.ए.अस. अधिकार्‍यांना पण मारहाणीच्या आणि वेळप्रसंगी जीव गमावण्याच्या घटना ह्याच पवित्र देशांत घडलेल्या आहेत.(त्या अधिकार्‍याच्या नंतर आलेला अधिकारी मात्र अशा हल्ल्यांचा बळी ठरत नाही, ह्यामागचे कारण मात्र गुलदस्ताच आहे.) लोकसंख्यावाढीच्या प्रमाणात स्थिर नौकर्‍यांचे प्रमाण नगण्याच आहे, असे माझे अनुभव आहेत. तुमचे अनुभव माझ्या पेक्षा वेगळे असल्याने, तुमची मते वेगळी असणे पण स्वाभाविकच आहे.

In reply to by मुक्त विहारि

तुमचे अनुभव माझ्या पेक्षा वेगळे असल्याने, तुमची मते वेगळी असणे पण स्वाभाविकच आहे.
सहमत आहे. म्हणून तुमच्या अनुभवातून जन्म घेतलेल्या तत्वांबरहुकूम तुमच्या मुलाला वागायला लावणं पटलं नाही.

In reply to by आदूबाळ

सल्ले मुलाला देण्यापेक्षा त्याला त्याचे स्वतःला काय येते अन काय करायचे ह्याचा विचार करायला पात्र करायला हवे.
वई तो कय रिया मई

In reply to by मुक्त विहारि

कशाकरता स्थिर नोकरी पाहिजे. त्याने शैथिल्य येते उगाच.

या विषयात अनेक मुद्दे आहेत. काही वर मांडले गेले आहेत तर काही नाहि. मी आता एकच मुद्दा मांडू इच्छितो. ज्या कंपन्या मोठ्याप्रमाणावर कर्मचारी कमी करत आहेत त्य स्वतःचेही नुकसान तर करुन घेत आहेत आणि एका दुष्टचक्रात स्वतःला अडकवत आहेत असे मला वाटते. म्हणजे असे की एखादी कंपनी (उदा: विप्रो) मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कमी करत असेल तर एखादा अनुभवी व्यक्ती विप्रोत जाण्यापुर्वी दहावेळा विचार करेल , गरजेच्या वेळेला विप्रोला लवकर योग्य गुणवत्ता असणारे कर्मचारी मिळणे कठीण होईल. मग त्यातून मार्ग म्हणजे मार्केटपेक्षा जास्त वेतन द्या.. म्हणजे मग जॉब सिक्युरिटीची रिस्क आहे तर रिस्कसाठी अधिक प्रिमियम म्हणून काही लोक विप्रोत येतील. पण याने विप्रोची ARC (average resource cost) वाढेल. त्यामुळे गिर्‍हाईकाला ते भाव वाढवणार, परिणामी त्यांची स्पर्धात्मकता कमी होणार, परिणामी त्यांना मिळणारे काम कमी होणार, परिणामी पुन्हा कर्मचारी कपात.... आणि पुन्हा नवीन कर्मचार्‍यांना आकर्षित करण्याकरता मोठाले पगार. बघा पटतंय का ?

In reply to by मराठी कथालेखक

उपयुक्तता नसलेले कर्मचारी कमी केल्यास ते वेतन उपयुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडे वळवता येईल. वेतन सुधारल्यास नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे शक्य होईल. अनुपयुक्त असल्यास नोकरीवरून कमी करण्याची शक्यता असल्याने कर्मचारी reskill होण्याचा किमान प्रयंत्न करतील. आणि हेच तत्त्व बऱ्याचशा कंपन्यांनी अवलंबल्यास वेतन फुगवटा होणार नाही. लिन प्रोसेसेस मध्ये अनुपयुक्त गोष्टी काढूनच टाकायच्या असतात. अर्थात वरील कपात हि केवळ उपयुक्तता या एका मुद्द्यावर असल्यास हे सर्व.

In reply to by sagarpdy

उपयुक्तता कशी ठरते ? एखादा कर्मचारी .Net वर काम करत होता तो प्रोजेक्ट आता संपला , .Net चे आणखी प्रोजेक्ट नाही, त्याला जावा येत नाही म्हणून तो उपयुक्त राहिला नाही असे नसते. जो कर्मचारी मनापासून काम करत नाही, बेजबाबदारपणे वागतो, नवीन शिकण्याची इच्छा नाही, टीमसोबत नीट मिसळून काम करत नाही ई आणि समज देवूनही त्याच्यात सुधारणा होत नाही अशा कर्मचार्‍याला जरुर काढावे. अजून लिहिण्यासारखे आहे या मुद्यावर, नंतर पुन्हा लिहितो.

In reply to by मराठी कथालेखक

सपोर्टचे वा मेंटेनंसचे काम करणार्‍या कंपन्यांना कधी कधी हायर एन्ड फायर पॉलिसी सोयीची वाटते. आपल्याकडे नव्या दमाच्या इंजिनीअर्सची कमतरता नसते. मग काही वर्ष जुने आणि स्कील फारसे न बदललेले कर्मचारी काढून तिथे नवे स्वस्त कर्मचारी येतात. प्रॉडक्ट किंवा रीसर्च ओरिएंटेड कंपन्यांना असे करता येत नाही.

In reply to by थॉर माणूस

इंजिनिअर्सची कमी नसते हे जरी खरं असलं तरी जॉब बदलताना कर्मचारी पगारवाढ मिळेल हे बघतातच आणि ज्या कंपनीत जॉब सिक्युरिटी कमी तिथे जॉईन करायचे असेल तर जास्त हाईक मागतात किंवा जॉईन करतच नाही.

'नोकरी म्हणजे गुलामगिरी, स्वतः स्वतःचे मालक व्हा' या आशयाची यलायशीची अतिशय भंपक जाहिरात आहे. वास्तविक ही एजंट लोकं अतिशय लाळघोटे असतात. मागे यलायशी आणि आरटिओ चा एजंट असलेल्या माझ्या मित्राने या क्षेत्रात खूप स्पर्धा आहे (संपादित)