कौलाला पण महत्व आहेच्.चिदम्बरम ह्यानी 'त्याला माफ करा असे म्हन्टले आहे'.अर्थात असे म्हणण्यामागे निवड्णूकीची पार्श्व् भूमी आहेच्.समजा सरकार नुकतेच सत्तेवर आले असते तर एव्हाना त्या पत्रकारावर थर्ड डिग्री चा प्रयोग झाला असता आणि सी.बी.आय. चौकशी झाली असती. निवडणुकीचा फायदा त्या पत्रकाराला मिळाला.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
मोठा विचारप्रवर्तक प्रश्न आहे. केवळ काही वाक्यात उत्तर देणे अवघड आहे. बुट फेकुन मारणे या घटनेमागे राजकारण असते. तसे राजकारण आपण प्रत्येक गोष्टीत करत असतो, पण राजकारण्यांना नावे ठेवत असतो. निवडणुका आल्यावर उगाचच वाद उकरणारे मुद्दे काढण्याचा फायदा ज्याच्यावर आरोप होतात त्यालाच होत असतो, रोजच्या आयुष्यात पण असेच असते. अशा प्रकारचे वर्तन व्हावे अशी अंतर्गत फुस पण असु शकते किंवा नसु शकते. राजकारणातील म्हणा किंवा रोजच्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची उकल स्पष्टपणे करणे अवघड असते. हे राजकारणातले डावपेच युद्धनीतीतील शांततेच्या काळातले धोरण या नावाने ओळखले जातात.
मी वैयक्तिकरीत्या अमेरिकन आर्थिक धोरणांचा चाहता नसलो तरी त्यांची युद्धनिती आणि राजकारण मला आवडते. कधी कधी ७ डिसेंबर १९४१ होवु दिलेले बरे असते, लिटल बॉय साठी आयतेच कारण मिळते. हे वाक्य ज्यांना समजणार नाही त्यांनी राजकारणात चुकुनही जावु नये हा न मागता दिलेला सल्ला.
--अवलिया
जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे, उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते
नानासाहेब काय विचारप्रवर्तक अभिप्राय आहे! अगदी धनंजयांची आठवण झाली!!!:)
राजकारण आपण प्रत्येक गोष्टीत करत असतो, पण राजकारण्यांना नावे ठेवत असतो. निवडणुका आल्यावर उगाचच वाद उकरणारे मुद्दे काढण्याचा फायदा ज्याच्यावर आरोप होतात त्यालाच होत असतो
क्या बात है!!
कधी कधी ७ डिसेंबर १९४१ होवु दिलेले बरे असते, लिटल बॉय साठी आयतेच कारण मिळते.
आँ! हे म्हणजे १९७१ साठी कारण मिळावे म्हणून १९४७ होवू दिले असे म्हणण्यापैकी आहे!!
राजकारणात चुकून घुसलेला,
पिडां
एक होता सर्दार्जी
त्याने मारला बूट
अन् म्हटला मला जर्नेलसिंग म्हणा
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
माझे परात्पर गुरू श्री. जालिंदर जलालाबादी यांचे ह्या विषयावरील मौलिक विचार "बूटवाद, गांधीवाद, जलालाबाद आणि सारेगमप" या निबंधात प्रकाशित झालेले आहेत. हा निबंध त्यांच्या "जलालाबादच्या जलकुंभातून" या पुस्तकात संग्राहित केला आहे (संपादक: श्री. सतलज "मास्तर" भडकमकर आणि श्री. पाषाणभेद मिपावाला, प्रकाशकः पोलरास्वल प्रकाशन, दक्षिण गंगोत्री). सध्या हे पुस्तक उपलब्ध नाही. माझ्या संग्रहातलं पुस्तक कोणी एका हैद्राबादस्थित व्यक्तीच्या हल्ल्यात हरवले.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
माझ्याकडे हे सुद्धा पुस्तक आहे. पण मी स्कॅन करुन टाकणार नाही.
माझ्या पुढील 'बुद्ध पुनःपुन्हा हसला' या लेखमालेसाठी संदर्भ म्हणुन मी ते पुस्तक वापरणार आहे तेव्हा सगळ्यांना समजेलच त्यात काय काय आहे ते !!
तेव्हा वाट पहात रहा .... आगामी लेखमालेची !!
--अवलिया
जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे, उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते
मी "अजून एक मार म्हणून सांगू - नवीन बूटाचा जोड मिळाल्याचा आनंद!" याला मत दिले आहे.
माझे आदर्श साहित्यीक श्री. जालिंदर जलालाबादी यांच्या "बूटवाद, गांधीवाद, जलालाबाद आणि सारेगमप" या निबंधात त्यांनी हेच धोरण सांगीतलेले आहे. शेवटी साहीत्यसंमेलनात होणार्या मारामारीत जोडे घालुन जोरात पळता येते. हा अनुभव मला व अदिती ताईंना बुरुंडी येथील संमेलनात आलाच. माझ्याकडे मगरीच्या कातड्याच्या चपलाच होत्या. त्यामूळे पळण्यास वेळ लागला व मार लागुन एक डोळा थोडा अधु झाला आहे.
अवांतरः आम्हास अजुन "जलालाबादच्या जलकुंभातून" या पुस्तकाचे मानधन मिळालेले नाही. अधु डोळ्याच्या उपचारास खर्च सोसवत नाही. सिएरा-लिओन,घाना,बोट्स्वाना इथले मराठी साहित्य मंडळे आम्हास हे मानधन सुवेझ कालव्यातले चाच्यांच्या एका ट्रष्ट ला दान देण्याचे सुचवत आहेत. त्यात आयकर सवलत पण आहे असे सांगतात. पण ती सवलत भारत सरकात देणार का याबाबत शंका आहे. मि. पा. मधले अर्थीक गुरू याबाबत खूलासा करतील काय?
श्री. जालिंदर जलालाबादी हे आदिती ताईंचे परात्पर गुरू आहेत हे आम्ही जाणतो. त्यांनी मानधनाच्या रकेमेबाबत प्रयत्न करावा.
अतिअवांततः आम्हास अजुनही " लिहिते व्हा.." हे पुस्तक मिळालेले नाहीत. भडकमकर मास्तर उत्तर देत नाहीत. मि.पा. वर अनेक लोक आय. टी. तले आहेत. त्यानी ह्या पुस्तकाचा ISBN NO. घेउन वेब वर शोध घेणे. ISBN NO. आदिती ताईंकडे आणि भडकमकर मास्तरांकडे मिळेल. डोळा दुखत असल्याने मी तो नंबर टाईप करू शकत नाही.
- पाषाणभेद
जलालाबादच्या जलकुंभातून
हे पुस्तक खरंच तुम्ही वाचलंय?
मला हे पुस्तक फार ऍब्स्ट्रॅक्ट वाटलं होतं...
काहीही कळलं नव्हतं... गुरुजीना विचारलं तर त्यांनी ओशोंसारखे फक्त मंद स्मित केले होते. थोर लोकांचे सारे असेच..
या सार्या बूटवादावर आमचं मत एकच...
आता पत्रकारपरिषदा या धर्मस्थळाप्रमाणे पवित्र होणार...
सर्व पत्रकारांनी बाहेर पादत्राणे काढून ठेवावीत .... ( स्वतःच्या जबाबदारीवर) चोरीला गेल्यास आम्ही जबाबदार नाही...ज्याला चोरीची भीती वाटते त्याने आपापल्या वाहनामध्ये काढून ठेवावीत.....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
हे पुस्तक खरंच तुम्ही वाचलंय?
मला हे पुस्तक फार ऍब्स्ट्रॅक्ट वाटलं होतं...
काहीही कळलं नव्हतं... गुरुजीना विचारलं तर त्यांनी ओशोंसारखे फक्त मंद स्मित केले होते. थोर लोकांचे सारे असेच..
खरं आहे हो मास्तर. मी बर्याचदा जालिंदरजींच्या (मलखांब करणार्या) फोटोकडे पहात ध्यान केलं तेव्हा कुठे मला हळूहळू या पुस्तकातले संदर्भ उलगडायला लागले, अगदी गुंडाळलेली गादी कशी पाहुणे आले की उलगडते तसंच! तसं वाचलंय म्हणा मी एकदा थोडं थोडं, पण जेव्हा मनाच्या अंतःचक्षूंनी वाचनविचार केला जातो तेव्हा अनेक ऍबस्ट्रॅक्ट गोष्टीसुद्धा अगदी सहजसुंदर भासतात, उदा: पंगत-२मधे पिडाकाकांनी जसं मुक्तसुनीतरावांनी दिलेल्या श्लोकाचं स्पष्टीकरण लिहिलं आहे तसंच.
सर्व पत्रकारांनी बाहेर पादत्राणे काढून ठेवावीत .... ( स्वतःच्या जबाबदारीवर) चोरीला गेल्यास आम्ही जबाबदार नाही...ज्याला चोरीची भीती वाटते त्याने आपापल्या वाहनामध्ये काढून ठेवावीत.....
नायतर चित्रं चितारून एम.एफ. हुसेन व्हावं.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
तुमच्या अंगावर कोणी बूट फेकून मारला तर तुम्ही काय कराल ?
बाकरवडि,
चांगला प्रश्न आहे.
वास्तविक ह्या प्रश्नाचे उत्तर आपणच द्यावेत,कारण असे वांझोटे कौल काढल्यावर मिपाकर
आपल्याला दुसरे काय फेकून मारतील?
अभिज्ञ.
>>वास्तविक ह्या प्रश्नाचे उत्तर आपणच द्यावेत,कारण असे "वांझोटे" कौल काढल्यावर मिपाकर
आपल्याला दुसरे काय फेकून मारतील?
प्रतिसाद नसता दिला तरी चालल असतं , शिव्या देउन स्वतः चा उद्धार कशाला करायचा?
असो, वाढदिवसाच्या शुभेछा !
सूहास (verified= न पडताळणी केलेला)बुधवार, 08/04/2009
मी "अजून एक मार म्हणून सांगू - नवीन बूटाचा जोड मिळाल्याचा आनंद!" याला मत दिले आहे.
बाकी आमच्यावर असे "बा़के"प्रसंग बरेच आले आहेत ,सौजन्य आणी कारण : आमचे तिर्थस्वरुप.
अभिज्ञ,
असे कौल गमंत म्हणुन घ्यायचे असतात..
सुहास
अवांतरः
मला या संबधातील चित्रफीत पाहताना एक कुतुहल म्हणून प्रश्न पडला. एक बूट फेकल्यावर जर्नेलसिंगाना जेंव्हा सुरक्षा अधिकार्यांनी बाहेर नेले, तेंव्हा त्यांनी पायातील दुसरा बूट काढून ठेवला की तसेच एकपाय अनवाणी आणि दुसरा बुट घातलेला असे गेले? :-)
"जर्नेलसिंगचे घालायचे बूट आणि मारायचे बूट वेगळे असतात." :)
______________________________
बाकी आता आम्ही एक नवीन तंत्रज्ञान विकसीत करायच्या मागावर आहोत - अमेरिका, चीन, भारत (येथील नेत्यांना बूटपछाड मिळाला असल्याने) येथे त्याची मागणी चांगली असेल - "बूट डीटेक्टर सिस्टीम" तुमच्या झोळीत आधी एखादा जास्तीचा बूट आहे का हे ते शोधेल. मग तुमच्या पायातील बुटांच्या गाठी कशा आहेत हे ते बघेल आणि "स्पेशल" सेन्सॉरने सभेच्या ठिकाणी कोणी १० सेकंदापेक्षा जास्तवेळ वाकले तर धोक्याची घंटा वाजवेल.
प्रतिक्रिया
पण लोकांनी
अहो ह्या
In reply to पण लोकांनी by परिकथेतील राजकुमार
पण लोकांनी
In reply to पण लोकांनी by परिकथेतील राजकुमार
का कोणास
In reply to पण लोकांनी by परिकथेतील राजकुमार
ह्या कौला
कौल
मोठा
वा!
In reply to मोठा by अवलिया
एक होता
माझे
माझ्याकडे
In reply to माझे by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी
In reply to माझे by ३_१४ विक्षिप्त अदिती
जलालाबादच्या जलकुंभातून
हे पुस्तक
In reply to जलालाबादच्या जलकुंभातून by भडकमकर मास्तर
चांगला प्रश्न!
अभिज्ञ
In reply to चांगला प्रश्न! by अभिज्ञ
बाकरवडी..
एक प्रश्न...
मारायचा
In reply to एक प्रश्न... by विकास
नवीन म्हण
In reply to मारायचा by नितिन थत्ते
गुजराथी बुश,
आता