मळभ हटले की सूर्य सापडतोच असं नाही. तोवर रात्रही झालेली असू शकते. प्रकाश वाट्याला आला की तो मनाप्रमाणे नसतो उधळायचा. आपलं मन म्हणजे खोल गुहा- उभी की आडवी ते नाही माहीत. कदाचित दोन्हींच मिश्रण असावं. त्यामुळेच तर कधी खूप खोलात गेल्यासारखं वाटतं तर कधी खूप मागे. कुठून आणायचा मग इतका सारा प्रकाश, स्वत:चं मन पादाक्रांत करायला? बरं गुहेचं हे भारी असतं नाही- बाहेरून कितीही आग लागू देत, आतला अंधार अचल, अविरत आणि जवळपास अजिंक्य! म्हणून सूर्य माथ्यावर असला की डोक्यात अंधारात चाचपडायचं बळ आणि अनुभव दोन्ही गोळा करावा. ज्यांनी वचन दिलं नाही त्यांना गृहीत का धरावं? उद्या पृथ्वी फिरलीच नाही तर...
वाचने
4248
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
जी ए ( १२० एम एल ) + ग्रेस (
धन्यवाद
In reply to जी ए ( १२० एम एल ) + ग्रेस ( by विजुभाऊ
धारप जरा कमी करा.
In reply to जी ए ( १२० एम एल ) + ग्रेस ( by विजुभाऊ
सही है
आभार
In reply to सही है by गोंधळी
उद्या प्रुथ्वी फिरलीच नाहीतर ...
म्हणजे पुन्हा उगम!
In reply to उद्या प्रुथ्वी फिरलीच नाहीतर ... by चौकटराजा
भन्नाट ;)
बुद्धांची आठवण होते...
In reply to भन्नाट ;) by Bhakti