१० मे १८५७ - भारतीय स्वातंत्र्ययुद्धाची तुतारी ह्याच दिवशी फुंकली होती
फेडून नवस माहोरास
गेले लाहोरास
जिंकीत झेंडे !
अरे त्यांनी अटकेत
पाव घटकेत लाविले झेंडे...
एप्रिल २० १७५८ मध्ये मराठ्यांनी लाहोर जिंकले आणि आणि अवघ्या ८ दिवसांत अफगाणिस्तान मधील अटक. "अटकेपार झेंडे" हा वाक्प्रचार त्यावरूनच सुरु झाला.
त्यानंतर १० दिवसांनी म्हणजे मे ८ ला त्यांनी अब्दालीच्या सेनेचा पेशावर मध्ये मोठा पराभव केला.
(अवांतर : ह्याच वर्षी प्रिन्स्टन विद्यापीठांत कुलगुरूंनी लोकांची भीती घालविण्यासाठी पहिले स्मॉलपॉक्स वॅक्सीन घेतले. दुर्दैवाने ह्यांत खर्चारीचा रोग असल्याने काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला)
१०० वर्षांनी इंग्रजांनी भारतांत बऱ्यापकी बस्तान बसवले होते आणि मराठा सैन्याने इंग्रजांविरुद्ध तथाकथित बंड पुकारले. आधुनिक भारतीय इतिहासांत ह्या युद्धाला बंड म्हणून संबोधिले जातेच पण त्याशिवाय हे युद्ध काही तरी शुल्लक कारणावरून झाले होते अशी बतावणी केली जाते. हे युद्ध प्रत्यक्षांत अत्यंत चाणाक्ष पणे प्लॅन केले गेले होते आणि नशिबाची थोडी जरी साथ असती तर ब्रिटिशाना पूर्ण पणे हाकलून लावणे शक्य होते.
ह्या युद्धांत ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांनी अत्यंत भ्याडपणे आपल्या बायको मुलांना मानवी ढाल बनवून पळण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी भारतीय सैनिकांनी नाईलाजाने त्यांच्यावर सुद्धा गोळ्या चालविल्या. हे युद्ध जिंकण्याच्या नादात ब्रिटिशांनी मात्र हजारो निरपराध मुले आणि स्त्रियांना धाक घालण्यासाठी ठार मारले. हा इतिहास ब्रिटिश सरकारने लपवून ठेवला असला तरी ब्रिटिश जनतेला सुद्धा ज्या प्रकारची किळस आल्याने ब्रिटिश राणीने त्याकाळांतील सर्वांत मोठी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी बंद केली आणि भारताचा ताबा स्वतः घेतला.
अर्थशास्त्राचे जनक आणि मुक्त आर्थिक व्यवस्था आणि भांडवलवादाचे पुरस्कर्ते ऍडम स्मिथ ह्यांनी १७७६ मध्येच भाकीत केले होते कि ईस्ट इंडिया कंपनीला ज्या प्रकारची मोनोपॉली ब्रिटिश सरकारने दिली आहे त्याचे पर्यावसन शेवटी भारतीय आणि ब्रिटिश लोकांच्या नुकसानीत होईल.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्या विषयावर शेषराव मोरे
स्वातंत्र्यवीर सावरकर हे
हेच लिहायला आलो होतो
माझ्यामते सावरकर त्यांच्या
ओके मग आपण काय समजायचे?
हिंदूंसाठी आणि धर्माचे सोयर
ओ माय गुडनस...
हिंदूंसाठी आणि धर्माचे सोयर
+१,१११मुद्द्दा पटतो !
शांतताप्रिय समाजशी दोन हात
हल्ली
सावरकर आणि मोरे दोन्ही
१८५७ चे स्वातंत्र्यसमर ह्या
शेषराव मोरेंनी हा जिहाद होता
मग Last Mughal
अटक
घटना तीच, विश्लेषण वेगवेगळे
इथे म्हणतात -
दोन वर्षांमधे इतके मत
तुमच्या आकलनाबद्दल आदर आहे.
कित्ती गं बाई ते कौतुक करायचं एका माणसाचं. हाच तो एक वीर
हे गाणं
हल्ली यूट्यूबवरील विडियोंचे भडक मथळे कैच्याकै असतात
दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के सन्त तूने ....
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची
तुम्ही लहानपणापासुन इतके
@ स्वप्निल रेडकरः विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरा.
ब्रिटीशांनी १८५७ च्या लढ्याला
कोण ब्रिटीश?
चांगली लेखमालिका.
१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याला....