मे १९७२ मधील एक मध्यरात्र. अमेरिकेची राजधानी वॉशिन्ग्टन डीसी शहर झोपेत होतं. परंतु काही जणांच्या गुपचुप हालचाली सुरू होत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला ६ महिन्यांपेक्षा कमी अवधी शिल्लक होता. दुसर्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक जिंकण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन जिवापाड प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी Nixon’s Committee to Re-Elect the President (CREEP) या नावाची एक समिती स्थापन केली होती. या समितीचे ५ सदस्य मे १९७२ मधील एका मध्यरात्री वॉशिंग्टन डीसी मध्ये असलेल्या वॉटरगेट कॉम्प्लेक्स या इमारतीतील प्रतिस्पर्धी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयात गुपचुप घुसले. त्यांनी रबरी हातमोजे परीधान केले होते व हातात प्लॅस्टिकच्या बॅगा होत्या. त्यामुळे नंतर ही हेरगिरी संस्था प्लंबर म्हणून ओळखली जाऊ लागली. तेथून काही गुप्त कागदपत्रांच्या प्रती त्यांनी घेतल्या व चोरून बोलणे ऐकण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी छुपे मायक्रोफोन लावून ठेवले. सुरक्षा रक्षकांना कोणताही सुगावा लागून न देता ते निसटले. निवडणुकीसाठी डेमॉक्रॅटिक पक्ष प्रचारासाठी नक्की कोणत्या योजना आखत आहे हे त्यांच्या नकळत समजून घेण्यासाठी ही घुसखोरी झाली होती. आपल्या कार्यालयात कोणीतरी गुपचुप येऊन त्यांनी हेरगिरी करणारी, पाळत ठेवणारी यंत्रे बसविली आहेत याचा डेमॉक्रॅटिक पक्षकार्यालयात काम करणार्यांना थांगपत्ताही लागला नाही.
हे मायक्रोफोन नीट चालत नाहीत हे काही दिवसातच त्यांना समजले. त्यांमुळे १७ जून १९७२ या दिवशी मध्यरात्री पुन्हा एकदा या समितीचे ५ सदस्य नवीन मायक्रोफोन लावण्यासाठी याच कार्यालयात पुन्हा एकदा जाण्यासाठी वॉटरगेट इमारतीत गुपचुप घुसले. परंतु त्यांच्या दुर्दैवाने या वेळी तेथील एका सुरक्षा रक्षकाला इमारतीतील अनेक दारांच्या कुलुपांवर टेप चिकटवलेला आढळला. त्यामुळे संशय येऊन त्याने लगेच पोलिसांना बोलविले आणि हे पाचही घुसखोर पकडले गेले. पोलिस आले तेव्हा त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्य कार्यालयाचा मुख्य दरवाजा तुटलेला आढळला. अधिक तपासानंतर कार्यालयात ध्वनीमुद्रण करणारी अत्यानुधिक उपकरणे सापडली. हा फक्त भुरट्या चोरीचा प्रकार आहे असे सुरूवातीला पोलिसांना वाटले. हे चोरटे कोणाशी संबंधित आहेत का हा विचारच त्यांच्या डोक्यात आला नव्हता. परंतु पोलिस ठाण्यात नेऊन चोरट्यांची तपासणी करताना पोलिसांना व्हाईट हाउसशी संबंधित काही दूरभाष क्रमांक सापडले. त्यामुळे सुरूवातीच्या काळात पोलिस संभ्रमात पडले होते. (क्रमशः)
वाचने
9140
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त विषय
रोचक सुरुवात
एक्झॅट्ली...
In reply to रोचक सुरुवात by श्रीरंग_जोशी
आपला कोळसा घोटाळा "Coalgate".
In reply to रोचक सुरुवात by श्रीरंग_जोशी
मस्त
मस्त
छान . मोठे भाग प्लिज.
चांगली सुरूवात
कधीपासून ह्या प्रकरणावर
अमेरिकन अध्यक्षांच्या इतिहासातील सर्वात काळे प्रकरण
द पोस्ट सिनेमा भारी आहे,
In reply to अमेरिकन अध्यक्षांच्या इतिहासातील सर्वात काळे प्रकरण by तुषार काळभोर
इराण-कॉन्ट्रा प्रकरण सुध्दा
In reply to अमेरिकन अध्यक्षांच्या इतिहासातील सर्वात काळे प्रकरण by तुषार काळभोर
या प्रकरणाची माहिती नव्हती.
In reply to इराण-कॉन्ट्रा प्रकरण सुध्दा by चंद्रसूर्यकुमार
सुरुवात रोचक
या वॉटर गेटची ओळख इथे मिपावरच झाली होती
सर्वांना धन्यवाद!
लिहा ...