चवदार, चटकदार जवळा!
साहित्य : सुका जवळा (या नावाची सुकी मासळी बाजारात वाट्यावर मिळते. साधारण १० रुपायाचा एक वाटा असतो)
तेल, कांदा, गरम मसाला, २-४ कोकमं, मीठ चवीप्रमाणे.
दोन माणसांकरता.
बाजारातून छानपैकी तीन वाटे सुका जवळा आणावा. थोडा निवडावा. काही खडेबिडे असतील तर काढून टाकावेत. नंतर तो जवळा तव्यावर थोडा भाजून घ्यावा व त्यानंतर स्वच्छ धुवावा. पाणी निपटून टाकावे.
पातेल्यात तेल घेऊन झकासपैकी कांद्याची फोडणी करावी. कांदा छान लालसर परतून घ्यावा व त्यात सुका जवळा टाकावा. मिश्रण थोडा वेळ चांगले परतून घ्यावे, जवळा शिजू द्यावा. नंतर त्यात आमसूल, गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण पुन्हा एकवार परतावे व सारखे करून घ्यावे.
झाला तैय्यार चटकदार, चटपटीत सुका जवळा! :)
हा जवळा तांदळाच्या भाकरीसोबत खावा, फारच छान लागतो. किंवा ओल्या बाजाराच्या जेवणासोबत तोंडीलावणं म्हणून घ्यावा. जेवणाची लज्जत वाढते! सुका जवळ्याचा स्वाद बाकी सुरेखच असतो!
संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत दारू पितांना चाखना म्हणूनही हा जवळा विशेष सुंदर लागतो. आज बुधवार होता म्हणून मुद्दामून थोडी सवड काढली, बाजारात गेलो आणि जवळा घेऊन आलो व सौताच्या हाताने तुम्हा सर्व मिपाकरांकरता चवदार, चटपटीत सुका जवळा बनवला!
आपला,
(सुकाबाजार प्रेमी आणि साधना कोळणीचा लाडका) तात्या अभ्यंकर.
चित्तपावन ब्राह्मण समाजाने 'अभ्यंकर' हे आडनाव त्यांच्या ज्ञातीतून बाद केले आहे असे कळते! :)
हा घ्या चवदार चटपटीत सुका जवळा खास मायबाप मिपाकरांकरता! - :)


याद्या
14808
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
वा! सुंदर...
'जवळी'क
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(सुकाबाजार
पाककृतीबर
वा छान
वाह
माझा आवडता..
तसं
पण
In reply to तसं by मेघना भुस्कुटे
मी पण कधी
रेसिपी
बापरे!!
भारतवारीत
In reply to बापरे!! by प्राजु
तात्या..
ओलो नाय रे, नाटक्या!
In reply to तात्या.. by नाटक्या
पिडाकाका...
In reply to ओलो नाय रे, नाटक्या! by पिवळा डांबिस
निस्त्याचे इंग्रेझ नांव
In reply to पिडाकाका... by नाटक्या
असेच
In reply to निस्त्याचे इंग्रेझ नांव by धनंजय
अरेरे!
जबराट
सुटले ना विमानतळाव्रून
In reply to जबराट by मयुरा गुप्ते
तात्या,
खल्लास....
अमेरिकेत