Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीगुरुजी on Fri, 04/09/2021 - 15:13
आजपासून आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होतेय. नेहमीचेच ८ संघ आहेत. यावेळी दिल्ली, चेन्नई, पंजाब व राजस्थान या संघाचे कर्णधार नियमित यष्टीरक्षक आहेत. संजू सॅमसन बहुधा प्रथमच नेतृत्व करतोय. नेहमीप्रमाणे मुंबईच संभाव्य विजेता आहे. कोहली कितीही यशस्वी फलंदाज असला तरी या स्पर्धेत त्याच्या संघाला आजतागायत विजेतेपद मिळविता आले नाही. सर्वात पहिल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर राजस्थानला एकदा सुद्धा वरील ४ संघात स्थान मिळविता आले नाही. बहुसंख्य वयस्कर खेळाडूंमुळे चेन्नई संघ हा भाऊसाहेबांचा संघ म्हणून ओळखला जातो. आता त्यांनी कसोटीकुशल पुजाराला संघात घेतलंय. धोनीची ही बहुधा शेवटची स्पर्धा असावी.
  • Log in or register to post comments
  • 26469 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 05/01/2021 - 23:35

Permalink

चेन्नई २१८/४ (२०)

चेन्नई २१८/४ (२०) मुंबई २१९/६ (२०) पोलार्ड २-०-१२-२ आणि नाबाद ८७ (३४ चेंडू, ६ चौकार, ८ षटकार)
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Sun, 05/02/2021 - 08:39

In reply to चेन्नई २१८/४ (२०) by श्रीगुरुजी

Permalink

पोलार्ड :):):)

पोलार्ड :):):)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/03/2021 - 15:28

Permalink

आयपीएल संघात स्थान मिळवूण देतो सांगत, ३० लाखांची फसवणूक

https://www.loksatta.com/mumbai-news/saying-that-ipl-allows-him-to-get-a-place-in-the-kkr-team-fraud-of-rs-30-lakh-abn-97-2460600/ ------- ये बाज़ार है....
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Mon, 05/03/2021 - 15:33

Permalink

आजचा सामना रद्द

https://www.esakal.com/krida/ipl-2021-varun-chakravarthy-sandeep-warrior-test-covid-positive-match-can-be-rescheduled
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Mon, 05/03/2021 - 15:38

In reply to आजचा सामना रद्द by नावातकायआहे

Permalink

सि एस के संघाला पण लागण. रद्द करा आय पि एल

https://www.lokmat.com/cricket/ipl-2021-3-csk-camp-5-ddca-staff-test-positive-covid-19-after-kkr-confirm-2-cases-a593/
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 05/04/2021 - 14:17

Permalink

आयपीएल स्पर्धा रद्द केल्याची

आयपीएल स्पर्धा रद्द केल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. स्पर्धा रद्द करण्याचा योग्य निर्णय आहे. मुळात नोव्हेंबरमध्येच मागील स्पर्धा संपली असताना ४ महिन्यात पुन्हा स्पर्धा खेळविण्याचा दुराग्रह नडला. ऑक्टोबरमधील ट-२० विश्वचषक स्पर्धा भारताबाहेर खेळविली जाण्याची बरीच शक्यता आहे. आता सायंकाळी वेळ कसा घालवू?
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Tue, 05/04/2021 - 15:19

In reply to आयपीएल स्पर्धा रद्द केल्याची by श्रीगुरुजी

Permalink

मदनबाण साहेबांच्या धाग्यावर खजिना आहे!

https://misalpav.com/node/48702
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 05/05/2021 - 08:19

Permalink

तेंडल्या खेळायचा बंद झाला आणि

तेंडल्या खेळायचा बंद झाला आणि मी क्रिकेट पहाणे जवळपास सोडुन दिले,आयपीएलची क्रेझ काही काळा पासुन तयार झाली होती पण त्यातही खेळ सोडुन भलत्याच गोष्टी जास्त ! आयपीएल चे वर्णन मी सट्टे बाजांचा महाकुंभ असे करतो. आता बीसीसीआय ला हा इव्हेंट [ खेळ कधीच मेला ] रद्द झाल्याने करोडाचा फटका बसणार आहे म्हणे ! इतर वेळी हजारो कोटी छापतात त्या बद्धल यांनी कधी ब्र देखील काढला नाही, देशात करोना संकट आहे तेव्हा हा बाजार कशाला ? हा प्रश्न कोणाला कधी पडलाच नसावा, शेवटी आपल्या देशात माणसा पेक्षा पैसा महत्वाचा. बीसीसीआय ने करोनासाठी मदत केली केवल ५१ कोटी रुपये, का ? इतके कमी का ? ज्या हिंदूस्थानी नागरिकांचा अमुल्य वेळ स्वतःवर खर्ची करायला लावुन बक्कळ पैसा मिळवला जातो त्यांच्यासाठी यांना मात्र सढळ हस्ते मदत करता आली नाही. बीसीसीआय ही संस्थाच मला पहिल्या पासुन संशयास्पद वाटत आली असुन यात असलेले चेहरे नक्की या संस्थेत का ? किंवा त्यांचा आणि क्रिकेटचा काय संबंध ? असे प्रश्न जे तुम्हालाही कधी तरी पडले असतील तेच मलाही पडलेले आहेत. आत्ता पर्यंत मोदी सरकार ने या संस्थेची पाळेमुळे का खणुन काढली नाही ? हे मला उमगलेले नाही. जाता जाता :- अरबाझ खान ने २.८० कोटी आयपीएल सट्ट्यात घालवल्याची बातमी तुमच्या लक्षात आहे का ? तो कसा सुटला ? हा देखील असाच एक न सुटलेला प्रश्न !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/05/2021 - 10:51

In reply to तेंडल्या खेळायचा बंद झाला आणि by मदनबाण

Permalink

सचिन होता, तोपर्य॔त क्रिकेट मध्ये मजा होती ....

पण, मला आयपीएलचे मराठी समालोचन जास्त आवडते ... स्नेहल प्रधान, संदीप पाटील आणि अमोल मुझुमदार, अप्रतिम समालोचन करत होते पण सगळ्यात भारी म्हणजे, विनोद कांबळी.... विनोद कांबळी म्हणजे ... फक्त मी आणि मी आणि मी... एखाद्याने स्वतःचे किती गुणगान करावे ते विनोद कांबळी कडून शिकावे ... आपल्या पैकी किती जण मराठी समालोचन ऐकत होते?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 05/05/2021 - 14:53

In reply to सचिन होता, तोपर्य॔त क्रिकेट मध्ये मजा होती .... by मुक्त विहारि

Permalink

कोणत्या वाहिनीवर?

कोणत्या वाहिनीवर?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/05/2021 - 15:21

In reply to कोणत्या वाहिनीवर? by श्रीगुरुजी

Permalink

सोनी वाहिनीवर

मराठीत समालोचन नक्की ऐका .... ह्या विषयावर धागा काढता येईल, इतपत मटेरियल नक्कीच आहे...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 08/14/2021 - 12:51

In reply to तेंडल्या खेळायचा बंद झाला आणि by मदनबाण

Permalink

#Dark secrets of #IPL??

आयपीएल चे वर्णन मी सट्टे बाजांचा महाकुंभ असे करतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Na Ja (Official Video) Pav Dharia
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 05/05/2021 - 09:58

Permalink

भारतीय क्रिकेट नियामक मंडळात

भारतीय क्रिकेट नियामक मंडळात मोठ्या संख्येने राजकारणी घुसल्यापासून क्रिकेटला ग्रहण लागले आहे. आयुष्यात कधीही क्रिकेट न खेळलेले, क्रिकेटची शून्य माहिती असलेले क्रिकेटविषयी निर्णय घेतात. राजीव शुक्ला हा गुटख्याचा तोबरा भरलेला व क्रिकेटशी कणभरही संबंध नसलेला ठोंब्या इतकी वर्षे क्रिकेट नियामक मंडळात कसा? त्याला कूलिंग पिरीयडचा नियम लागू नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 05/05/2021 - 17:03

Permalink

सर्कस बंद पडली की

सर्कस बंद पडली की
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/05/2021 - 19:40

In reply to सर्कस बंद पडली की by विजुभाऊ

Permalink

हो ना ....

आमची मराठीतली करमणूक गेली ....
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 05/06/2021 - 08:37

Permalink

न्यूज चॅनेल वर दिवसभर

न्यूज चॅनेल वर दिवसभर दाखवणारी भीती दायक माहिती.. आरडा ओरडा या पेक्षा ipl थोडीसी करमणूक होती.. असो नाईलाजाने बंद झाली स्पर्धा.. ठीक आहे..
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com