Skip to main content

श्वासांचा बाजार

लेखक खिलजि यांनी बुधवार, 28/04/2021 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्वासांचा बाजार शिगेला पोचलाय करोनाचा विळखा सर्वाना पडलाय लालीपावडर लावून घरात जरी बसला तरी करोनारूपी राक्षस घरात जाऊन डसला वॉट्सऍपवर तर नुसता ऊत आलाय अरे , तिथे जाऊ नका रे त्याला करोना झालाय इस्पितळात तर जायची सोयच राहिली नाही रेमडीसीवीर नाही तर खाट मिळत नाही अरे कुठून आणू मी हे सर्व , जर तो इलाजच अस्तित्वात नाही चांगला ठणठणीत होता तो कुणास ठाऊक कसा गेला ? कुणी म्हणत अटॅक आला तर कुणी म्हणे त्याला करोना झाला खरं खोटं काय ते त्या वैद्याला ठाऊक पण दीडफूट फाटली सर्वांची आपलं काही झालं तर म्हणून सर्वच भावुक सरकार काय करतेय ते देव जाणे काहीतरी करतेय असे त्यांचेच म्हणणे लोकडाऊन हा पर्याय त्यांना परवडतो हातावरचे पोट असलेला मात्र निष्काम भरडतो सर्व बसतात मग माश्या मारत, गप्पा ठोकत करोना मात्र दूरचित्रवाणीवर बेफाम पसरत असतो भीती हळूहळू मनाच्या मातीत मिसळली जाते आणि मग , रंग चढतो , चढतच जातो करोनाच्या सोबतीला भीतीची छाया आता उकळा मदत , मागा भीक जातायत तेव्हढे जाऊन देत आपण जमवुया माया अरे बघा त्या तळपणाऱ्या सूर्याकडे त्याचे निर्भेळ ऊन तुमच्या रेमिडिसीवीर्पेक्षा स्वस्त आहे मग का म्हणून तुमचेच म्हणणे रास्त आहे? सरकारने निदान हुकूम काढावा प्रत्येकजण किमानवेळ उन्हात असावा जागोजागी क जीवनसत्वाचे वाटप करावे जे खरेच आजारी आहेत त्यांनाच इस्पितळात भरावे इथे तर सर्व विचित्र चालू आहे घरोघरी वाईटबातम्यांचं चर्चासत्र चालू आहे सर्वांच्या मनात करोनाने जागा घेतलीय मराठी माणसानेही आता मान टाकलीय महाराष्ट्र मेला तर अख्ख जग बुडेल पण असे कधी होणार नाही कारण ... हि शिवभूमीच याचं कोडं उलगडेल
लेखनविषय:

वाचने 4112
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

चांगलं कधी लिहायला येत नाही ती दौत आपण विकत घेतलीच नाही या शाईने आधी बरेच वार केले आता बसलोय शांत नदीकिनारी म्हणून तुला बातम्यांनी बेजार केले

खिलजी साहेब तुम्ही पुन्हा एकदा लिहीते झालात याचा आनंद झाला.. लिहित रहा आम्ही आहोत वाचणारे. आता थांबू नका. कोसळू द्या धबधबा अविरत.

अरे बघा त्या तळपणाऱ्या सूर्याकडे त्याचे निर्भेळ ऊन एव्हड कड़़क ऊन असत. पाच मिनिट उभ राहील तर भाजुन निघायला होत.