Skip to main content

लसीचे अर्थकारण

लेखक साहना यांनी मंगळवार, 20/04/2021 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
Price is what you pay value is what you get - Warren Buffet बराच काळ ह्या लेखावर माझे काम सुरु होते. विकारी नाम संवत्सर मध्ये कोरोना सुरु झाला आणि शर्वरी मध्ये ह्याचे सावट संपूर्ण जगावर पसरले. डॉक्टर सुनेत्रा गुप्ता ह्यांनी ह्या विषयावर २०१३ मध्येच लिहिले होते. अगदी ज्योतिष्य प्रमाणे त्यांनी विमानवाहतूक आणि वाढलेला प्रवास ह्यामुळे पुढील महामारी जागतिक स्तरावरील असेल आणि त्याच वेळी मानवजात सुद्धा अश्या महामारीला पुरून उरेल असे प्रतिपादन त्यांनी ह्या पुस्तकांत केले होते. जाणकारांनी वाचावे. (डॉक्टर गुप्ता ह्यांनी कोविड लोकडाऊन ला विरोध केला होता). औषध निर्माण कि एक क्लिष्ट गोष्ट आहे. आपण फ्रिज विकत घेतला आणि त्या फ्रिज मुळे घराचे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली तर कदाचित फ्रिज कंपनी विमा वापरून तुम्हाला दुसरे घर देऊ शकेल पण वजन कमी करण्याची जादुई गोळी घेतली आणि किडनी फेल झाली तर मग काय ? कितीही पैसा दिला तरी तिथे नुकसान भरपाई होत नाही. त्यामुळे कुठलेही औषध घेताना ग्राहकाला त्या औषधावर विश्वास असणे गरजेचे आहे. मागील १०० वर्षांत वैद्यकीय क्षेत्राने भूतो न भवती अशी प्रगती केली आहे आणि विविध औषधें दिवसें दिवस अधिक परिणामशाली पण त्याच वेळी अधिक क्लिष्ट होत चालली आहेत. ह्या औषधांवर विश्वास कसा ठेवावा हे खूपच कठीण समस्याच झाली आहे. ह्याला प्रत्युत्तर म्हणून बहुतेक सरकारांनी स्वतःला ह्या मोर्च्याच्या पुढे लीडर म्हणून नियुक्त केले आहे. कुठलेही औषध निर्माण झाले कि FDA सारख्या संस्थेने त्याला मान्यता दिल्याशिवाय अमेरिकेत ते विकले जाऊ शकत नाही. अशीच संस्था भारतांत सुद्धा आहे. त्यामुळे कुठल्याही कंपनीने नवीन औषध शोधले कि किमान २-३ वर्षे ह्या संस्थेच्या मागे फिरल्याशिवाय ते पेशंट पर्यंत पोचत नाही. FDA सारख्या संस्थांनी लोकांचा फायदा होतो कि नुकसान ह्यावर अनेक अभ्यास उपलब्ध आहेत. काही ठिकाणी FDA ने जीव वाचवले असले तरी अनेक ठिकाणी दिरंगाई, चुकीचे सल्ले इत्यादींनी अनेक मृत्यू सुद्धा FDA मुळे झाले आहेत. वैयक्तिक मत म्हणून FDA सारख्या संस्था असायला पाहिजेत असे मला वाटते पण त्याच वेळी ह्या संस्थांना स्पर्धा सुद्धा असायला पाहिजे असे माझे मत आहे. आणि ज्या पेशंटला विशेषतः जो नाही तरी मरणारच आहे त्याला कुठलीही ट्रीटमेंट स्वखुशीने घ्यायला मनाई नसावी असे मला वाटते. औषध निर्माणाची प्रक्रिया हि कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे म्हणजे ह्याला प्रचंड भांडवल लागते पण रियल इस्टेट प्रमाणे नाही. औषध निर्मिती हे जुगार खेळण्याप्रमाणे आहे. तुम्ही वर्षभर दररोज एक रुपयाची लॉटरी घेतली आणि डिसेम्बर ३१ ला तुम्हाला १०० रुपये लागले तर ? काही लोक एक रुपयाची लॉटरी आणि शंभर बक्षीस म्हणजे नफा १:१०० आहे असे म्हणतील पण प्रत्यक्षांत हा रेशो ३६५:१०० म्हणजे नुकसानीचा धंदा आहे. कारण ज्या लॉटरी लागल्या नाहीत त्या सुद्धा इथे गृहीत धरल्या पाहिजेत. ३६४ रुपये जे तुम्ही न लागलेल्या लॉटरीवर खर्च केले तो होतो संक कॉस्ट, म्हणजे तो पैसा गेला पण कुठल्याही औषध निर्मितीत हा खर्च अपेक्षित असतोच. त्यामुळे तुम्ही औषध शोधले तर कंपनीला फायद्यांत ठेवण्यासाठी फक्त त्याचा उत्पादन खर्च आणि रिसर्च खर्च गृहीत धरून भागत नाही तरी इतर औषधांचा (जी फेल झाली) संक कॉस्ट सुद्धा तुम्हाला वसूल करावा लागेल. अनेक वेळा औषधे शोधणारी कंपनी आणि ती विकणारी कंपनी वेगळी असते. ऑक्सफर्ड ने औषध शोधले आणि अस्त्रा झेनेकाला त्याचे हक्क विकले आणि भारतांत सिरम ने त्याची निर्मिती करण्याचे हक्क घेतले. त्याशिवाय विविध देशांच्या FDA प्रकारच्या संस्थांबरोबर काम करून त्यांची परवानगी घेऊन देणाऱ्या वेगळ्या कंपन्या दलाल स्वरूपाची कामे करणाऱ्या असतातच. जी कंपनी औषधे शोधते तिला त्यातून नफा अपेक्षित असतो. नफा जितका जास्त तितकी गुंतवणूक जास्त, विद्वान लोकांना नोकरीत ठेवण्याची क्षमता जास्त इत्यादी त्यामुळे एकदा औषध शोधले कि इतर कंपन्या त्याला कॉपी करून आपला नफा चोरणार नाहीत ह्याची शाश्वती ह्या कंपन्यांना हवी असते, हि शाश्वती नसेल तर हि विविध औषधे शोधलीच जाणार नाहीत. त्यामुळे पेटंट वगैरे विषय येतात, जे पुन्हा क्लिष्ट आहेत. पण FDA मधील सरकारी अधिकाऱ्याना पैसे चारून सर्वसाधारण औषधांवर सुद्धा आपले हक्क प्रस्थापित करणे असली कामे सुद्धा औषध कंपन्या करतात. कोविड ची लस शोधण्याचे काम वेगाने अनेक कंपन्यांनी केले.कोट्यवधी लसी विकल्या जाऊन आपण अब्जावधी पैसे कमावू अशी अपेक्षा असल्याने विविध कंपन्यांनी ह्यांत पैसा ओतला, सिरम ने साधारण ५०० लोकांना आधीच ह्या कामासाठी कामावर घेतले होते आणि काही शेकडो कोटी रुपये परताव्याची काहीही खात्री नसताना आधीच खर्च केले होते. नफ्याची अपॆक्षा नव्हती तरी कुणीही ह्या भानगडीत पडले नसते. फायझर वगैरेंनी ह्या वर्षीचा डोस आपण कमी किमतीत देऊ असे सांगितले असले तरी भविष्यांत त्याच्या किमती वाढवून आपण फायदा करू असे आपल्या गुंतवणूकदारांना सांगितले आहे. सिरम आणि भारत सध्या भारतात लसीची चणचण जाणवू लागली आहे. अमेरिकेचे उदाहरण पाहता किमान ५०% लोकांना लस दिल्याशिवाय कोरोना आटोक्यांत एणार नाही असे वाटते. भारत सरकारने वाटाघाटी न करता तुघलकी न्यायाने लसीची किंमत १५० रुपये (सिरम साठी, हॉस्पिटल फी १००) ठेवली. पुनावाला ह्यांची शेंडी सरकारी हातांत असल्याने त्यांना निरुपाय होता. पण बायोकॉन च्या किरण शॉ वगैरेंनी सरकारवर बरेच तोंडसुख घेतले. भारत सरकारचे आडमुठे धोरण पाहून इतर अनेक कंपन्यांनी ह्या क्षेत्रांत न घुसण्याचा निर्णय घेतला. फायझर वगैरेंनी सुद्धा भारतात उतरण्याचा आपला निर्णय बदलला. लस जनतेसाठी फुकट असणे चांगले. बहुतेक भारतीय अत्यंत गरीब असल्याने ह्यांना विनामूल्य लस उपलब्ध करून देणे संपूर्ण समाज हिताचे आहे. ज्या प्रमाणे प्राथमिक शिक्षण फुकट असते किंवा पोलिओ लस फुकट दिली जाते त्याच पद्धतीने लस सुद्धा फुकट द्यावी ह्यांत दुमत नाही. पण लस निर्माण कायाला पैसे लागतातच त्यामुळे हे पैसे कुणी द्यायचे हा प्रश्न आहे. ज्यांना लस फुकट दिली जाते त्या लसीचे पैसे सरकारने द्यावेत किंवा इतर धर्मादायी संस्थांच्या द्वारे हि किंमत दिली जावी हे योग्य आहे. पण इथे सरकारने सिरमवर निर्बंध टाकून त्यांना आर्थिक ओझे दिले. भारतांत लसीचा सर्वांत मोठा ग्राहक भारत सरकार असल्याने निव्वळ मार्केट तत्वावर सिरम कडून चांगला डिस्काऊंट मिळवणे सरकारला सहज शक्य होते त्याशिवाय खाजगी इस्पितळांत काहीही निर्बंध ठेवले नसल्यास सिरम ला अजून पर्यंत बऱ्यापैकी पैसा उभारणे शक्य होते. बॉलिवूड तारका आणि गलेलठ्ठ पगाराच्या व्यक्ती खाजगी इस्पितळांत जाऊन ३०० रुपयांत लस टोचून घेत आहेत ह्या पेक्षा मूर्खपणाची ती गोष्ट कुठली ? संपूर्ण जगांत लस साठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे. काही तुटवडा डिमांड मुळे आहे तर काही ठिकाणी हा तुटवडा त्यांच्या मूळ देशाने निर्बंध घातल्याने झाला आहे. अमेरिकेने काही महत्वाच्या गोष्टींवर निर्बंध घातल्याने सिरम आपली लस वेगाने निर्माण करू शकत नाही. पण त्याच वेळी १५० रुपयांचे बंधन घातल्याने हाच कच्चा माल इतर देशांतून जास्त पैसे देऊन आणणे सुद्धा सिरम ला शक्य नाही. त्याशिवाय प्रचंड मोठा देश असल्याने वाहतूक आणि स्टोरेज सुद्धा कठीण आहेत. विदर्भांत लस पोचवणे आणि पुण्यात लास पोचवणे ह्यासाठी वेगवेगळा खर्च येतो. त्यामुळे सर्वानाच १५० रुपये परवडणारे नाही त्यामुळे लसी कदाचित दुर्गम भागांत पोचणार नाहीत. काही बातम्याप्रमाणे काही भारतीय बाबूंनी सिरम ला १५० रुपये तरी का द्यावेत असा मुद्दा उठवला होता. किमंत निर्धारित करून सिरम ची आर्थिक स्थिती खराब केल्यानंतर आता भारत सरकारने त्यांना ३००० कोटी ची "मदत" देऊ केली आहे. जुन्या मराठी चित्रपटांत निळू फुले विविध खेळ्या खेळून गरीब शेतकऱ्याला आपल्याकडून कर्ज घ्यायला भाग पडायचा तसाच हा घाणेरडा प्रकार आहे. भारत सरकाने एकूण ६ कोटी लसी विकत घेतल्या आहेत. त्यातील १ कोटी लसी जरी ३००० रुपयांना विकल्या असत्या तर हे पैसे सिरमला आपल्या हक्काच्या पैश्याप्रमाणे २ महिने आधीच मिळाले असते. (लस वर GST का लावला आहे हे सुद्धा तर्काच्या पलीकडले आहे. मध्याच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे). अर्थतज्ञ् अजय शाह ह्यांची हि संपुन मुलाखत वाचाच https://www.indiaspend.com/indiaspend-interviews/price-caps-limit-priva… लसीचा तुटवडा आणखीन गंभीर होणार आहे. कदाचित पुनावाला बोलून दाखविणार नाहीत पण त्यांना ह्या भानगडीत पडण्याचा पश्चात्ताप होत असेलच.

वाचने 39853
प्रतिक्रिया 117

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

गर्भधारणा झाली की उलट्या होतात त्यांचा त्रास कमी व्हावा, म्हणून एक औषध आले होते पण, त्या औषधाच्या साईड इफेक्ट मुळे, जन्माला आलेली बाळे, अपंग किंवा व्यंगे घेऊन आली होती...

In reply to by सुबोध खरे

> हा भ्रष्टाचार खाजगी एफ डी ए मध्ये होणार नाही असे आपले म्हणणे असेल तर बोलणेच संपले. खाजगी किंवा सरकारी पेक्षा, स्पर्धा हा विषय महत्वाचा आहे. कुठली संस्था किती कार्यक्षम आहे हे मोजले पाहिजे नाहीतर काय फायदा ? आणि हे मोजण्याचा महत्वाचा मापदंड म्हणजे बाजारातील स्पर्धा. सध्या FDA ला ह्या विषयावर अमर्याद सत्ता आहेच पण त्याच वेळी त्याचे उत्तरदायित्व अकाऊंटंबिलिटी शून्य आहे. हे बदलले पाहिजे असे माझे म्हणणे आहे. > कितीतरी औषधे अशी आणली गेली ज्यांचा काहीही उपयोग नव्हता आणि ती अत्यवस्थ रुग्णांना प्रचंड किमतीला विकून औषध कंपन्यांनी भरमसाट नफा मिळवला आहे आणि नंतर ते औषध संपूर्णपणे निकामी आहे असे लक्षात आलेले आहे. इथे सदर कंपन्यांना फ्रॉड साठी शिक्षा करणे हे न्यायव्यवस्था आणि सरकारचे प्रमुख कर्तव्य आहे. पण तरी सुद्धा इथे नमूद केले पाहिजे कि आपण ज्या औषधांबद्दल बोलत होता त्याला FDA ने अप्रूव्ह केले होतेच do no harm आणि efficacy दोन्ही साठी. ह्याच एका उदाहरणावरून FDA किती अकार्यक्षम आहे आणि त्या अकार्यक्षमतेची किमंत त्यांनी अजिबात मोजली नाही. लिली ला मात्र १०० ते २०० दशलक्ष नुकसानभरपाई अनेकांना दयावी लागली. फक्त औषधांचा साठा नष्ट करण्यासाठी ९५ दशलक्ष डॉलर्स खर्च आला. माझ्या माहितीप्रमाणे ३ वर्षांत लिली ने २००+ १०० + ६५ दशलक्ष डॉलर्स ची औषधें विकली होती त्याशिवाय OMCL च्या खटल्यांत लिलीला ह्या ड्रॅग साठी आणखीन १०० दशलक्ष नुकसान भरपाई द्यावी लागली. कुठल्याही कोर्पोरेशनत. साठी हि किंमत तशी मोठी आहे आणि ह्यावर "भरमसाठ" वगैरे फायदा झाला हे लिली चे बॅलन्स शीट पाहून वाटत नाही. FDA ला ह्या संदर्भांत काय नुकसान झाले ? FDA ला स्पर्धा असती तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी ढोल बडवून त्यांची लक्तरे सार्वजनिक ठिकाणी टांगली असती. FDA ची अंतर्गत अकार्यक्षमता इतकी आहे कि ढळढळीत फ्रॉड सुद्धा ह्यांना आढळून आले तरी हि मंडळी त्याला गुपचूप लपवतात. आणि सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे FDA preemption theory म्हणजे समजा एखादे औषध FDA ने अँप्रूव्ह केले आणि त्या औषधाने पेशंटचे नुकसान झाले तर पेशंट औषधनिर्मात्याला कोर्टांत खेचू शकत नाही कारण त्याला FDA अँप्रूव्हल आहे आणि त्या औषधाचे लेबल, वॉर्निंग इत्यादी ब्लाडण्याचा अधिकार औषध कंपनीला नाही. (सुदैवाने २००९ मधील सुप्रीम कोर्ट निवाड्याने हे बदलले. ) -- कोविडचेच उदाहरण घ्या. अमेरिकेत कोविड चा उद्रेक होण्याचे एक कारण FDA आणि CDC ह्या संस्था आहेत. The FDA screwed up in prohibiting researchers from testing affected populations in the early days of 2020, when the virus might have been better contained upon arrival in the United States. It screwed up in refusing to lift requirements for mask manufacturers and by declining to allow good substitutes for masks in short supply. It screwed up by collaborating with the Centers for Disease Control and Prevention (CDC) to protect a monopoly on testing tools that ended in a disastrous shortage. FDA staffers tasked with approving both treatments and vaccines screwed up by delaying meetings and taking days off as Americans were dying in unprecedented numbers of a disease for which the agency had potential solutions. At press time, the AstraZeneca vaccine, which was widely available in many other nations, remained unapproved in the U.S., for reasons that are opaque to Americans desperate to resume normal lives. ऑक्सफर्ड चे वॅक्सीन अमेरिकेत अद्याप का अँप्रूव्ह झाले नाही हे अजून एक मोठे कोडे आहे.

In reply to by साहना

At press time, the AstraZeneca vaccine, which was widely available in many other nations, remained unapproved in the U.S., फक्त अमेरिकेत नाही तर येथे ऑस्ट्रेलियन ने पण लगेच त्याला परवानगी दिली नाही येथील टी जि ए ने पण आपल्याला यौग्य वाटला तेवढा वेळ घेतला .. हा कदाचित त्याला हे हि कारण असले कि अमेरिकेच्या मानाने येथे करोना खूप गंभीर पणे घेतला गेला आणि रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच आटोक्यात ठेवता आला म्हणून येथे असे थांबणे परवडले असेल ... हे सगळे चांगले चालू असतांना आत ५० च्या आतील व्यक्तीस ASHTRA झेनका देणे थांबवावे लागले आणि फायझर परवडत असून पण सोप्पे नाही .. सार काय तर जगातील अनेक सरकारचे अंदाज कधी बरोबर होते तर कधी चुकले .. म्हणून लगेच कोठेतरी दोष देत बसू नये ( जसे येथे एफ डी ए ला धारेवर धरण्यात येत आहे )

In reply to by साहना

अमेरिकन पेशंट ला इंग्लंड मधील औषध किंवा ट्रीटमेंट घेण्यापासून का रोखावे ? किंवा कॅनडा मध्ये अप्रूव्ह झालेली औषधे अमेरिकेत बॅन का करावीत ? माफक स्वातंत्र्याला किमान ह्या माफक स्वातंत्र्याला सुद्धा लोकांचा विरोध अनाकलनीय आहे. हे माफक स्वातंत्र्य नाही तर याने अराजकता माजेल ... काय वाट्टेल ते दुसरे असे कि ज्या देशांनकडे पैसा आहे पण "मूळभूत संशीधन करणे त्यांना शक्य नाही असहायन्ना इतर देचशय "स्टॅंडर्ड " वर भरोसा ठेवावा लागतोच ... उदाहरण छोटे श्रीमंत आखाती देश थोडेच स्वताचे एफ डी ए निर्मण करत बसतील ? ते इंग्लंड अमेरिकेतील औषध परवानगी ग्राह्य धरतात त्यानं पर्याय नसतो .

In reply to by साहना

FDA ने आपली शक्ती वाढवून त्यानंतर efficacy वर सुद्धा आपले नियंत्रण आणले. ह्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू विनाकारण ओढवला. म्हणजे ? तुमचे असे म्हणणे आहे का कि औषध विकण्याला परवानगी देण्यासाठी त्यावर efficacy सिद्ध करण्याचे चे बंधन असू नये??? अरे बापरे ! १८८ पद्धतीचे विधान करू नका हो ! कोणी डॉक्टर efficacy किती महत्वाची आहे हे जरा सांगू शकेल का ...

In reply to by सुबोध खरे

सरकारी म्हणजे प्रत्येक गोष्ट वाईटच असा आपला पूर्वग्रह दिसूनच येतो आहे डॉक्टर खरे यांचं प्रतिसादाशी सहमत ... सरकारी खाते काम नीट करत नसेल तर त्यावर टीका जरूर असावी पण असे खाते हे एकतर खाजगी तर नसावेच आणि त्याला एकाच देशात तेच काम करणारी दोन खाती असावीत असे म्हणणे हे विचित्र वाटते .. त्यातून एकाच देशात २ प्रकारचेच नियम तयार होऊ शकतात इतर बाजारात स्पर्धा जरूर असावी जसे कि एक पेक्षा जास्त शेअर एक्सचेंज ( एन एस सी , बीएस सी किंवा नियोर्क आणि फिलाडेल्फिया एक्सचेंज इत्यादी ) वैद्यकीय उपकरणे ( शरीरात आत बसवण्यात येणारी उदाहरण हि अरिंग इम्प्लांट, हार्ट असिस्ट डिवाइस या शेतरात मी थोडे काम केले आहे तसेच नॅशनल स्टॅंडर्ड याचा अभ्यास करून त्या प्रमाणे एकाध गोष्टीची रचना करणे ( प्रोडक्त्त डिझाईन ) याचा अनुभव हि आहे .. म्हणून बोलतो

FDA संदर्भांत अशी स्पर्धा नसली तरी इतर अनेक ठिकाणी अशी स्पर्धा आहे FDA बद्दल बोलूयात का ? कारण तेच सध्यतंरी सर्वात महत्वाचे आहे तिथे कशाला स्पर्धा आणि आहे का अशी कुठे ? दुसरे असे कि अमेरिका म्हणजे सर्व "पाश्चिमात्य देशांचा " प्रतिनिधी होत नाही , युरोप, कानडा , ऑस्ट्रेलिया , नेऊझीलँड , सिंगापोर अश्या ठिकाणी विचारा .. अमेरिकेतील टोकाची "स्पर्धा पाहिजेच" किंवा "वयक्तिक स्वातंत्र्ययापुढे पुढेसब कुछ झूट " हे अति विखारी आणि टोकाचे वाटते .. बिडलिंग इंडस्ट्री घ्या .. केवळ स्पर्धा हवी म्हणून इमारती चा पाया किती असावा हे ठरवण्याचा अधिकार जर दोन संस्थांना दिला तर ? काय विचित्र परिस्थिती उभी राहील ? वृध्दाश्रमाचें घ्या . तिथे पण अशी मुभा दिली तर ? माफ करा सहनजी पण आपण औषध प्रश्न यावर केवळ "मुक्त अर्थ व्यवस्था आणि स्पर्धा " हा मुद्दा ताणताय असे वाटते

https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/serum-institute-of-i… --- लसीचे दरही 'सीरम'नं निश्चित केले आहेत. त्यानुसार, कोविशिल्ड लसीसाठी राज्य सरकारला प्रति डोस ४०० रुपये मोजावे लागतील तर, खासगी रुग्णालयांना लसीचा एक डोस ६०० रुपयांना पडणार आहे. अमेरिका, रशिया व चीनमधील लसीच्या तुलनेत कोविशिल्ड स्वस्त असल्याचं सीरमनं म्हटलं आहे. भारताबाहेरील लसीचे खुल्या बाजारातील दरही पत्रकात नमूद करण्यात आले आहेत

In reply to by प्रसाद_१९८२

कोविशिल्ड लसीसाठी राज्य सरकारला प्रति डोस ४०० रुपये मोजावे लागतील. आता हे पण पैसे केंद्राने द्यावेत, असेही काही टक्के जनता म्हणणारच....

In reply to by मुक्त विहारि

माझ्यामते हे पैसे केंद्रानेच द्यावेत.. संपूर्ण देशव्यापी लसीकरण ही केंद्राची प्राथमिकता असली पाहिजे. प्राथमिक आरोग्य सुविधा ही राज्याची.

In reply to by आनन्दा

गुड न्यूज! १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार; योगी सरकारचा निर्णय..... "Corona Vaccine: गुड न्यूज! १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार; योगी सरकारचा निर्णय - Marathi News | yogi govt declared to provide free vaccination to all above 18 years | Latest national News at Lokmat.com" https://m-lokmat-com.cdn.ampproject.org/v/s/m.lokmat.com/national/yogi-…

In reply to by मुक्त विहारि

योगी पैसे भरणार आहे का लसी चे.की केंद्रावर च बोजा टाकणार ,केंद्रावर बोजा म्हणजे महाराष्ट्र,गुजरात,तामिळनाडू,कर्नाटक वर बोजा .त्यांच्या पैशावर हा स्वतःची वाह व्वा करून घेत आहे.

In reply to by मुक्त विहारि

चोवीस कोटी लोकसंख्या आहे. त्यातील १६-१८ कोटी लोकांना लसीकरण केले तर ३५ कोटी डोस. १४,००० कोटी रुपये. सध्या ज्या अडचणी चालू आहेत, त्या मानाने राज्यसरकारला हा खर्च करणे जास्त चांगले. (सेम विथ महाराष्ट्र - अंदाजे ८,००० कोटी रुपये). जर राज्यांना हा भार जास्त होत असेल, तर मला वाटते केंद्र सरकार थोडा बोजा उचलायला तयार होईल. (पण गरज लागू नये).

In reply to by मुक्त विहारि

बारा कोटी लोकसंख्येतील १८च्या पुढे अंदाजे १० कोटी असतील. वीस कोटी डोस साठी ८,००० कोटी रुपये खर्च करायला हरकत नसावी. (विकत लस फार कमी घेतील अशा समजुतीने). लॉकडाउन, निर्बंध, लाखो रुग्णांवर होणारा पाण्यासारखा खर्च या तुलनेत राज्यसरकारला ८,००० कोटी रुपये खर्च केलेले परवडतील.

In reply to by तुषार काळभोर

उर्वरित महाराष्ट्र राज्यातील शहरांपासून किमान 400 कोटी महिना 500 कोटी टॅक्स जर तळीराम मंडळी गोळा करून देत असतील तर, जास्तीत जास्त, दोन वर्षांत, नो प्राॅफीट नो लाॅस .... मग उर्वरित वर्षे आरामात टॅक्स गोळा करत रहा ... मी, "टॅक्स" हा शब्द वापरला आहे... हा पैसा सरकार जमा असतो... 100% White Money... .

In reply to by मुक्त विहारि

:) १०० कोटी वाचून जरा प्रतिसादाच्या हेतू विषयी शंका आली ;) पण बोल्ड अक्षरे वाचून प्रतिसाद सरळ* असल्यासारखे वाटले. * तसे नसल्यास या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे:)

महाराष्ट्र सरकार ने लवकरात लवकर सीरम कडे लसिंची ऑर्डर द्यावी. नाहीतर परत केंद्राचा महाराष्ट्रावर अन्याय ची आरोप करायला मोकळे

मुक्त व्यापार आणि स्पर्धा वगैरे ठीकच पण स्पर्धा असली तरी स्पर्धकही काही वेळा कार्टेल वगैरे करतात बिनधास्त आणि ग्राहकांना लुबाडतात. एकीकडे कोरोनाचा महाविस्फोट झाला आहे तसेच दुसरीकडे अनेक ठिकाणी कामावर रुजू होण्याकरिता लसीकरण बंधनकारक केले गेले आहे. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेत लस उत्पादकांनी लस किमतीवर सध्या म्हणजे काही महिने वा फारतर वर्षभर सरकारी नियंत्रण असणे यात काही गैर आहे असे वाटत नाही खेरीज रिटेलमध्ये मुक्तपणे किंमत ठरवायचा अधिकार दिला तर या उत्पादक कंपन्या सरकारशी वाटाघाटी करताना अडवणूक करु शकतील , सरकारि पुरवठा कमी करतील ही भिती आहेच. कदाचित आदर पुनावाला हे चांगली नितीमत्ता असलेले उद्योजक असं काही करणारही नाही (मला एकूणच पारशी उद्योजकांबद्दल आदर वाटतो) पण तरी सद्यस्थितीत असे नियंत्रण गैर नाहीच कदाचित लोकांकडून वसूल करायची किंमत रु २५० वा सिरम/भारत बायो ला मिळणारे रु १५० ही किंमत फार कमी वाटते हे खरे पण मला असे वाटत नाही की सरकारने अगदीच परस्पर / एकतर्फी किंमत ठरवली असेल .. या कंपन्यासोबत काही तर चर्चा नक्कीच झाली असेल. आणि पुढे काही महिन्यात ही किंमत काही प्रमाणात वाढवताही येईल. आणि वर्षभराने वगैरे मुक्तपणे बाजारात विकायला परवानगी दिली जावू शकते (जसे आज प्लू /व्हायरल वगैरेच्या वेगवेगळ्या लसी ७०० रुपयापासून ते १५०० रुपयांना मिळतात.. पण फ्लू लसीकरण सक्तीचे नाही हे पण लक्षात घ्यायला हवे)

उत्पादन खर्चावर आधारित च विक्री किंमत असली पाहिजे सर्व उत्पदांची नफा किती कमवायला हवा ह्या वर सरकारी नियंत्रण असेलच पाहिजे .दहा रुपयांची वस्तू आणि मुक्त व्यापार हवा म्हणून ती वस्तू कोण १०० रुपयाला विकत असेल तर ते चुकीचेच आहे. सरकार नी अशा वेळी हस्तक शेप केलाच पाहिजे. साध्या आपल्या रोजच्या जीवनातील वस्तू च्या किमती चा विचार केला तर संघटित उद्योग अक्षरशः लूट करत आहे लोकांची. ह्या वृत्ती ल दरोडे खोरी असे संबोधले तरी काही चूक नाही लाखाचा I phone च निर्मिती खर्च वीस ते पंचवीस हजार च असते. किती लुटणार लोकांना. स्कूटर जी ६५ हजार ल विकतात त्या स्कूटर च्या सर्व सुट्या भागाच्या किमती चा विचार केले तर पंधरा वीस हजार खूप झाले. अनियंत्रित उद्योग व्यवसाय चे समर्थन कधीच केले जावू नायेम

In reply to by Rajesh188

स्कूटर जी ६५ हजार ल विकतात त्या स्कूटर च्या सर्व सुट्या भागाच्या किमती चा विचार केले तर पंधरा वीस हजार खूप झाले. उत्पादन क्षेत्रातील आपल्यास माहिती आहे कि नाही ते माहित नाही पण १-२ गोष्टी सांगतो - असे वाहन निर्माण करण्यासाठी "फिक्स्ड कॉस्ट" म्हणजे यंत्रे , इमारती लागतात या शिवाय त्यासाठी संशोधन, त्याचा खर्च .. ! हे सगळे धोके पत्करून मग माल विकला जाईल याची खात्री नाही ... तेवहा उत्पादकाचा पण जरा विचार केला पाहिजे .. का फक्त सगळी कडे खाजगी उद्योग म्हणजे १००% वाईटच असे धरून चालला आहात ?

In reply to by चौकस२१२

मुळांत 15-20 हजार रुपयांत, खरोखरच स्पेयर पार्टस् मिळतात का? स्कूटर बनली तरी, पुढचा प्रश्र्न उरतोच की, गाडीचे RTO पासिंग कसे करणार? अर्थात, एखादा छगनलाल गाठला असेल तर, गोष्ट वेगळी आहे ..

In reply to by Rajesh188

स्कूटर जी ६५ हजार ल विकतात त्या स्कूटर च्या सर्व सुट्या भागाच्या किमती चा विचार केले तर पंधरा वीस हजार खूप झाले... हे नक्की का? बाय द वे, एका स्कूटर मध्ये किती पार्टस् असतात? आणि प्रत्येक पार्टची किंमत किती?

In reply to by Rajesh188

स्कूटर जी ६५ हजार ल विकतात त्या स्कूटर च्या सर्व सुट्या भागाच्या किमती चा विचार केले तर पंधरा वीस हजार खूप झाले.
आजवर इतका उत्तम विनोद केला नव्हता =))

In reply to by टवाळ कार्टा

यांना ते नेते मानतात .... बाय द वे, टका... तुमच्या कडे शाकाहारी कोंबडी किंवा शाकाहारी अंडी मिळतात का? डोंबिवली येथे मिळत नाहीत... मिळाली तर मेसेज कर...

In reply to by टवाळ कार्टा

काही तरी विचित्र कमेंट करण्या पेक्षा थोडा स्वतःच हिशोब करावा .110 cc इंजिन ची किंमत 87 usd आहे आता बाकी हिशोब करत बसा दोन wheel , दोन टायर,battery,bulb,aani बाकी किरकोळ गोष्टी. ह्या मधील बऱ्याच गोष्टी काही लोक स्वतः पण बनवू शकतात.

In reply to by Rajesh188

घोर अज्ञान .. कुणाचे ? मी स्वतः बजाज मध्ये काम केले आहे. साध ऍव्हरेज ५ kmpl नी वाढवायला किती मेहेनत लागते ते माहिती आहे. गाडीत एक गिअर बॉक्स म्हणून गोष्ट असते .. क्लच म्हणून काहीतरी असते. .. हे सर्व एकमेकांना पूरक लागते. हे सर्व बॅलन्स करायला लागते बाकी असेम्ब्ली, फिटिंग वगैरे गोष्टी दूरच्या ... मी चॅलेंज देतो .... तुम्ही वीस हजारात स्कुटर बनवून दाखवा ... ६५ हजारासारखी ... मी विकत घेईन

In reply to by Rajesh188

एखाद्या गाडीच्या इंजिनचा साचा बनवायला किती खर्च येतो हे एखाद्या ऑटोमोबाईल इंजिनियरला विचारून बघा. त्याचा खर्च वसूल व्हायला किती गाड्या बाजारातील स्पर्धा विचारात घेता विकाव्या लागतील हेही विचारा.

In reply to by Rajesh188

२०२० मध्ये जवळपास २,२६,००० Honda Activa विकल्या गेल्यात रच्याकने ६५ हजाराच्या स्कूटरच्या क्वालिटीची स्कूटर २५ हजारात बनवून अगदी ३५ हजाराला जरी विकली आणि फक्त १,००,००० स्कूटर विकल्यात तर तुमचा नफा वट्ट १०० कोटी तुम्ही अशी स्कूटर बनवा आणि खराब झाली तर मेकॅनिकऐवजी पंक्चर काढणार्याकडे न्या =)) नैतरी तुमचे दैवत डॉक्टर ऐवजी कंपौंडरवर जास्त विश्वास ठेवणारे आहे =))

In reply to by टवाळ कार्टा

तुमचा नफा वट्ट १०० कोटी
हे बरोबर नाही हं. सारखं सारखं त्या १०० कोटींचा उल्लेख करायचा म्हणजे काय? अहो लोकशाही टिकवण्याची किंमत आहे ती! स्कूटरच्या वीस हजारांचा आणि त्या १०० कोटींचा काही संबंध आहे का? हे थांबवा, नाहीतर मी मिपा सोडून जाईन बघा!

In reply to by वामन देशमुख

अरे बाप रे.. १०० कोटी नफा स्कूटर विकूनही मिळवता येतो?? मला वाटल त्यासाठी फक्तं पोलिस दल हाताशी ठेवावं लागते..

स्कूटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातू , प्लॅस्टिक आणि काच ह्याचे वजन करून त्यांच्या किलोचा भाव काढून स्कुटरची किंमत अजून कमी करता येईल की.

In reply to by प्रदीप

यात ' आपदा देश की' हे कळलं. पण अवसर मोदी मित्रोंका हे नाही कळलं. एकतर पूनावाला हे प्रो- बिजेपी नक्की नाहीत. मोदी अथवा भाजपा आणि पुनावाला/सिरम यांचा पूर्वी कधीही संबंध आल्याचे ऐकिवात नाही. (नशीब, पूनावाला अहिंदू आहेत. नाहीतर तेवढ्याने शिक्कामोर्तब झालं असतं मैत्रीवर.) अन्याय केंद्र सरकार का हे पण नाही कळलं. म्हणजे बऱ्याच गोष्टीत सध्या केंद्र सरकार कडून महाराष्ट्राबद्दल दूजाभाव होत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. पण पूनावाला यांचं मीडिया स्टेटमेंट अन अन्याय यातला संबंध लक्षात नाही आला. काँग्रेस अख्खा पक्ष यांना डोक्यावर घेऊन का बसतो हे अनाकलनीय आहे.

In reply to by तुषार काळभोर

याचं आणि देशातल्या उद्योगपतींचे वाकडं आहे. प्रत्येक उद्योगपती वर काहीही टीका आणि आरोप करुन मोदींशी संबंध जोडायचा.. आता पूनावला यांच्या मागे लागलेत.

अवांतर पुनावाला किंवा इतर सगळेच, यांच्यावर कमी प्रॉफिट मध्येबलास विकावी लागली म्हणून अन्याय का होतोय कळले नाही. १. त्यांना research कॉस्ट नाहीये. त्यांनी काही पेटंट माफक दरात विकत/ भाड्याने घेतली आहेत. २. Phase 2/3 टेस्टिंग वरती त्यांना फारसा खर्च करावा लागला नाही. 3. मार्केटिंग कॉस्ट शून्य 4. किमान 40कोटी ची ऑर्डर नक्की अश्या परिस्थितीत एक लाशिमागे 10रु जरी फायदा धरला तरी 400कोटी नेट प्रॉफिट होते. तेव्हढेही त्यांना मिळत नाहीये असे म्हणायचे आहे का? नेमके माझे काय चुकतेय या हिशोबात?

In reply to by आनन्दा

आनन्दा योग्यच मुद्दे मांडले आहेत आपण त्याना फक्त १) "कॅश फ्लो" आणि २) क्षमता ववाढवण्यासाठी लागणारे भांडवल याबद्दल प्रश्न असतील.... आणि ३) मनात फारतर याचे दुख्ख असेल कि १५० मध्ये फार कमी नफा आहे ... पण इतर कुणाला मिळण्यापेक्षा आपल्याला कंत्राट मिळाले यात आनंदच असावा ! अर्थात हि भीती असेलच कि समजा उद्या ती लस निरुपयुगी म्हणून देशाने किंवा इतर ग्रहक्कानी वापरयाची बंद केली तर सरकार किंवा इतर ग्राहक पुढील कंत्राट टप्पे पूर्ण करणार नाहीत आणि पैसे अडवतील ? पण त्यासाठी कोट्याधीष पुनावाला यांनी यौग्य तो वकिली सल्ला घेतलाच असले एकूण काय यात नक्की काय प्रश्न आहे मूळ धागाकर्ती ला आणि इतरांना हे नीट समजत नाहीये

"प्रत्येकाला मोफत लस मिळणार" हे सांगण्यासाठी राज्यांची चढाओढ लागली आहे. सगळ्यांना देता येईल इतकी लस भारतात कधी उपलब्ध होईल हे निश्चित सांगता येत नसतानाच प्रत्येक राजकीय पक्षांनी "खयाली पुलाव" पकवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक जण लस खरेदी करु शकेल असे नाही मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी ती विकत घ्यावी हा पर्याय प्रत्येक राज्याने नागरीकांसमोर ठेवला पाहिजे. त्यासाठी वेगळा न्यास किंवा सीएम केअर फंडात पैसे जमा करणे असा काही पर्याय निवडता येणे शक्य आहे काय याचा विचार करावा.

In reply to by धर्मराजमुटके

हे सरकार नंतर परत, बियर बार टॅक्स वाढवण्याची शक्यता आहेच....