म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - ४ अंतिम)
माझ्या गुंतवणुकीच्या प्रवासातले म्युच्युअल फंड हे महत्वाचे स्थानक आहे. सिप च्या माध्यमातून गेली बारा वर्षे गुंतवणूक करण्याचे फायदे मी अनुभवतो आहे. हेच अनुभव तुमच्या समोर मांडण्याची संधी ह्या निमित्ताने मिळाली. मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्ट नाही. या लेखमालेतील माहितीचा कोणाला फायदा झाला तर आनंदच आहे. ह्या लेखमालेच्या सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार
_________________________________________________________________________________________________________________
ह्या शेवटच्या भागात म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कसा बनवायचा याविषयी बोलूया
यातली गुंतवणूक मुख्यत्वे सिप च्या माध्यमातून आणि दीर्घ मुदतीची असणार आहे
सर्व प्रथम आपले लक्ष्य (टार्गेट) ठरावा
हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. यात दोन घटक आहेत :
आपण किती वर्षे गुंतवणूक इच्छिता (Duration) ?
आपणास किती रक्कम (कॉर्पस) जमवायचा आहे ?
जितकी गुंतवणूक दीर्घ मुदतीची तितका परतवा जास्त.
खालच्या तक्त्यावरून याचा अंदाज येईल
ह्या तक्त्यात १२% CAGR गृहीत धरला आहे. तक्त्यावर नजर टाकलीत तर दीर्घ मुदतीचे महत्व लक्षात येईल
तुम्ही दरमहा दहा हजार पाच वर्षासाठी सिप कलेत तर तुमचे सहा लाख गुंतवले जातात आणि आठ लाख चोवीस हजार जमु शकतात.
याउलट जर फक्त पाच हजार दहा वर्षांसाठी गुंतवले तर तुमचे सहाच लाख गुंततात पण ११ लाख ६१ हजार जमू शकतात.
सारांश ... मुदत जास्तीतजास्त ठेवा. दरमहा गुंतवयाची रक्कम तुम्ही वाढवत जाऊ शकता. अर्थात ही रक्कम इतकीच वाढावा की दीर्घ मुदतीत कमी करायला लागू नये. मी स्वतः ५००० दरमहा पासून सुरुवात केली होती. जसजसा पगार वाढला इतर जबाबदाऱ्या (liabilities.. गृहकर्ज वगैरे ) कमी झाल्या तसतशी दरमहा गुंतवणूक वाढवत नेली
आता असा प्रश्न येतो .. वीस वर्षे सिप शक्य आहे का ?
जर योग्य वयात सिप चालू केली तर हो. आपल्या आयष्यातली साधारणतः २५-३० वर्षे आपण कमावत असतो. त्यामुळे वीस वर्षे सहज शक्य आहे,
माझे आता हे सिप चे १३वे वर्ष आहे. मी जरी लवकर निवृत्ती घेण्याचा विचार करत असलो तरी अजून पाच सहा वर्षे नक्की नोकरी करणार .. त्यामुळे १७-१८ वर्षे सिप होईल. आजही मला वाटत रहाते ... मी जर पाच - सात वर्षे आधी सुरुवात केली असती तर ?
त्यामुळे स्वतः सुरुवात करा ... पुढच्या पिढीला लवकर सुरुवात करायला प्रवृत्त करा
दुसरा प्रश्न : दरमहा किती गुंतवणूक करावी ?
दरमहा जितकी रक्कम तुम्ही पुढची दहा - पंधरा वर्षे गुंतवू शकता तेव्हडी ...
उदाहरणार्थ .. जर माझा पगार दरमहा पन्नास हजार असेल आणि मी पाच हजाराची सिप करणार असेल तर माझा पगार ४५ हजारच आहे असे गृहीत धरून त्यात खर्च बसवावा. सहा महिने दहा हजार , दोन तीन महिने काहीचनाही .. मग परत काही महिने पाच हजार असे शक्यतो करू नये .
आता जर माझ्या कडे २-३ लाख रुपये आहेत आणि ते गुंतवायचे आहेत .... तर एकदम गुंतवण्यापेक्षा ते पैसे शॉर्ट टर्म फंडात ठेवावेत आणि आणि STP करावा
____________________________________________________________________________________________________________________
आता कुठल्या स्कीम्स मध्ये गुंतवणूक करावी ते पाहू
गुंतवणुकीसाठी स्कीम निवडताना दोन गोष्टी सारख्या कानावर पडतात फंड हाऊस (Asset Management Company) आणि फंड मॅनेजर
फंड मॅनेजर हे थोडे फॉर्मुला वन ड्रायव्हर सारखे आहे. तो जरी टीमचा चेहरा असला तरी त्याच्या मागे असणारी टीम जास्त महत्वाची. ही टीम हा AMC चा महत्वाचा भाग असते
सध्या जवळ जवळ ४४ AMCs कार्यरत आहेत. हे सर्व SEBI च्या नियंत्रणाखाली असतात. भावे साहेबांच्या कार्यकाळानंतर SEBI चा कारभार अत्यंत प्रभावशाली आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना बराच दिलासा मिळाला आहे.
सध्याचे महत्वाचे AMCs : SBI, HDFC, Canara Robeco, ICICI Prudential, Franklin Templeton, DSP, Kotak, Axis.
मुच्युलफंडाबद्दल नेहमी म्हटलं जात : past results do not guarantee future performance
पण स्कीम निवडताना पास्ट रिझल्ट अत्यंत महत्वाचा. विशेषतः गेल्या ३ आणि ५ वर्षाचे रिझल्ट्स जरूर पाहावेत.
क्रिसिल रेटिंग (CRISIL Mutual Fund Ranking) : क्रिसिल एकूण सात निकष वापरून वेगवेगळ्या स्कीम्स रँक करतात. हे रँकिंग १ ते ५ या मोजपट्टी वर असते.
रँकिंगचे सात निकष (इंग्लिश मधे लिहिणं सोप असल्याने तसेच देतो)
1. Superior Return Score (SRS)
2. Portfolio Concentration Analysis
3. Mean Return & Volatility
4. Quality of Assets
5. Exposure to Sensitive Sector (Mainly for Debt Funds)
6. Liquidity Analysis
7. Tracking Error
___________________________________________________________________________________________________________________
थोडक्यात एखादी स्कीम निवडताना खालील निकष विचारात घ्यावे (क्रमाक्रमानेच)
१. कुठल्या प्रकारच्या फंडात किती गुंतवणूक करायची हे ठरावा
२. त्या प्रकारातल्या स्कीम्सच्या गेल्या ३ ते ५ वर्षांतल्या परताव्याची (returns ) तुलना करा
३. स्कीम चा पोर्टफोलिओ पहा (कुठल्या कंपन्यांत गुंतवणूक आहे ते )
४. क्रिसिल रेटिंग चेक करा
५. फंड हाऊस वर दिलेल्यापैकी आहेना ते बघा
६. फंड मॅनेजर (हे बघणे ऐच्छिक आहे) शक्य असेल तर वरच्या ४ पायऱ्यांमधून शॉटलिस्ट झालेल्या स्कीम्स चे फंड मॅनेजर ची नावे मिळतील. प्रत्येक फंड मॅनेजरचे इतर मॅनेज केलेले फंड्स पहा. त्यातून काही काळजी करण्यासारखे आढळले नाही तर ...
७. सिप चालू करा
___________________________________________________________________________________________________________________
आता आपण एक उदाहरण घेऊ ...
समजा मला दरमहा १० हजार रुपयाची सिप चालू करायची आहे आणि किमान दहा वर्षे तरी सिप चालू ठेवायची माझी (स्वतःशीच) कमिटमेंट आहे (बाकी एक बार जो हमने कमिटमेंट कर दी तो ..... )
ही दहा हजार रक्कम मी वर सांगितल्या प्रमाणे टार्गेट आणि सध्याची कमाई वजा खर्च / जबाबदाऱ्या यावर अवलंबून आहे
____________________________________________________________________________________________________________________
१. लार्ज कॅप फंड्स हा गुंतवणुकीचा पाया आहे त्यामुळे सुरुवात त्यापासूनच. (इंडेक्स फंड पेक्षा मी लार्ज कॅप ला प्राधान्य देतो) त्यामुळे मी दहा पैकी किमान चार हजार तरी लार्ज कॅप मध्ये गुंतवीन. ते सुद्धा दोन स्कीम्स मध्ये २ हजार प्रत्येकी. आणि सिप चे दिवसही वेगळे. एक महिन्याच्या ५ तारखेला आणि एक १५ तारखेला
आता दोन स्कीम्स कुठल्या? तर लार्ज कॅप्स स्कीम्स वर नजर टाकली तर असे दिसते :
टॉप ३ स्कीम्स आहेत
Canara Robeco Bluechip Equity Fund - Direct Plan - Growth
Axis Bluechip Fund - Direct Plan - Growth
Edelweiss Large Cap Fund - Direct Plan - Growth
यातली पहिली स्कीम जरा तपशीलवार बघूया
Canara Robeco Bluechip Equity Fund - Direct Plan - Growth
Basic Info :
Fund manager(s) – Sanjay Bembalkar , Shridatta Bhandwaldar
Launch date – 02-Jan-2013
Expense ratio – 0.48% as declared on 31-Mar-2021 (category average is 1.11%)
ही स्कीम ८ वर्षे चालू आहे आणि कायमच उत्तम परफॉर्मन्स दिला आहे. (तीन वर्षे : 15.75% पाच वर्षे : 16.69% )
एक्स्पेंस रेशो फक्त ०.४८% आहे. जो लार्ज कॅप ऍव्हरेज पेक्षा खूपच कमी आहे.
Crisil Rank : ५ Star : Very good performance among peers
अधिक माहितीसाठी खालचे पोर्टफोलिओ डिटेल्स बघा
लार्ज कॅप इक्विटी मध्ये ७३.२% गुंतवणूक आहे
तसेच गुंतवणूक केलेल्या कंपन्यांची नावे बघितली तर बँक , IT , Petrochem , Manufacturing अशा विविध सेक्टर मध्ये गुंतवणूक विभागली आहे. याचाच आठ व्होलॅटिलिटी कमी आणि स्टॅबिलिटी जास्त
थोडक्यात आपल्या गुंतवणुकी साठी सर्वोत्तम पर्याय
असे सर्व चेक केल्यावर मी
Canara Robeco Bluechip Equity Fund - Direct Plan - Growth
Axis Bluechip Fund - Direct Plan - Growth
या दोन स्कीम्स निवडीनं
२. एकदा लार्ज कॅप चा पाया भक्कम झाल्यावर आपला जास्त परतावा मिळवण्यसाठी Flexi cap ला पर्याय नाही. थोडी जास्त Volatility चालणार असेल तर Mid Cap चा ही विचार करता येईल
वरील प्रमाणे विश्लेषण केले तर
PGIM India Flexi Cap Fund - Direct Plan - Growth (तीन वर्षे : 17.06% पाच वर्षे : 18.06% )
UTI Flexi Cap Fund - Direct Plan - Growth (तीन वर्षे : 16.09% पाच वर्षे : 16.70% % )
DSP Flexi Cap Fund - Direct Plan - Growth (तीन वर्षे : 12.95% पाच वर्षे : 16.35% )
या उत्तम स्कीम्स आहेत
३. राहिलेले ३ हजार
आता या साठी आपण ऍसेट क्लास बदलूया (International markets ) : १५००/-
आणि investment strategy (Focus फंडस्) : १५००/-
एकंदरीत विचार करता Franklin India Feeder - Franklin U.S. Opportunities Fund - Direct - Growth आणि Axis Focused 25 Fund - Direct Plan - Growth हे पर्याय योग्य वाटतात
थोडक्यात दरमहा १० हजाराची सिप चालू करायची असेल (आजच्या दिवशी) तर :
:
__________________________________________________________________________________________________________________
नेहमीचे डिस्क्लेमर देतो :
वर आलेली फंडस् ची नवे ही उदाहरण म्हणून दिली आहेत. प्रत्यकाने इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या अभ्यासाप्रमाणे फंड्स निवडावेत
मी मला आलेल्या अनुभवांवरून लेखमाला लिहली आहे. गुंतवणुकीचा हा एकमेव मार्ग आहे असे माझे म्हणणे नाही. पण हा Tried & Tested मार्ग नक्कीच आहे. अर्थात तुमचे अनुभव / मते जरूर सांगा. मलाही उपयोग होईल
Happy Investing
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माहिती बद्दल धन्यवाद .....
NPS बद्दल
NPS (National Pension Scheme)
धन्यवाद
अतिशय उत्तम माहिती.
डॉक्टर साहेब
धन्यवाद
आता दोन स्कीम्स कुठल्या? तर
मनीकंट्रोलवर म्युच्युअल फंड्स
राघवजी ..
मी सर्वसाधारणपणे मनीकंट्रोलच
https://www.moneycontrol.com
सोमवारचा लोकसत्ता
बातमी वाचली ... ही बातमी फंड
ते सुद्धा विचार करण्यासारखे आहेच
DSP , Franklin दोन्ही उत्तम
AUM and Fund inception date doubt
AMU आणि Fund Performance
अमर विश्वासः- हे जे तुम्ही
धन्यवाद सनईचौघडा
छान माहिती . MF च्या back