Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ५)

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 20/04/2021 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल गांधींंना कोरोना झालाय.

वाचने 46065
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!- महाराष्ट्र काॅंग्रेसचं ट्विट.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? -- हे तुमच्या 'आदर्श' सरकारला विचारा ? की लसीकरणाकरता नेमलेले कर्मचारी सरकारचे ऐकत नाहीत ? आणि उठसुठ कोणालाही लस देत सुटतात.

In reply to by Rajesh188

पट्टीचे पोहनारे विषय पाहून पाण्यात ऊतरायला तयार नाहीत. ;) ;) आघाडीची कामे सांगा अध्यक्श महोदय.....

फक्त दोषारोप नको. तन्मयला लस देणारे डॉक्टर, तन्मय व सर्व संबंधितांवर कारवाई करावी.

रात्रीचे पोलिस स्टेशन मध्ये गेले तर मोर्चा घेवून ते हल्ली पोलिस नी आरोपी पकडला की हे पोलिस स्टेशन मध्ये हजर होतात.. खूपच जागृत नेतृत्व आहे.

राहुल गांधींंना कोरोना झालाय.
ते लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा.

In reply to by मदनबाण

ऐकून वाईट वाटले. छान अभिनेते होते. व्हिडीओ पहिला नाही, मृत व्यक्तीच्या खाजगी जीवनाला खाजगीच राहू दयावे म्हणून.

महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनातून मार्क दिले जाणार आहेत असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. एकूणच विद्यार्थी म्हणून हा खूप वाईट आणि कठीण काळ आहे. https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-exams-2021-maharash…

In reply to by मुक्त विहारि

मुळात ते जनतेच्या भल्यासाठी सत्तेत आले आहेत, हाच सर्वात मोठा भ्रम आहे. नोटाबंदीतून जे नुकसान पवार फॅमिलीचे झाले आहे ते भरुन काढण्याकरता ते सत्तेत आहेत. याचा नमुना म्हणजे १०० कोटी दरमहा वसुली.

म्हणजे कार्यकर्ते लागणार.मोर्चे, रास्ता रोको,ह्या साठी कार्यकर्ते लागतात ते फुकट येत नाहीत .फुकट भाकऱ्या भाजायला कोणाला वेळ नसतो.त्या मोर्चे करी,रस्ता रोकोकरी लोकांना मानसी हजार रुपये तरी कमीत कमी खर्च येत असेल . मोजा किती होईल तो. मीडिया la आपल्या फेवर मध्ये ठेवण्यासाठी पैसे लागणार. मोजा किती लागतील. कायम स्वरुपी जी लोक पाळायला लागतात त्या मध्ये गुंड,विचारवंत,विविध क्षेत्रातील मान्यवर ही लोक हाताशी लागतात च त्यांचा कायम स्वरुपी खर्च. मोजा किती होतात ते. सभा त्या साठी लागणारी वाहन,माणसं,जेवण,दारू ह्यांचा खर्च. मोजा किती होतात ते. हा खर्च आमदार,खासदार,नगरसेवक ह्यांच्या अंगावर पडतो.. ते खिशातून खर्च करायला कुबेराची aulad नाहीत. वसूल तर ते करणारच. मग कोणते मार्ग असतात ह्याची माहिती पोलिस,सरकार,मीडिया ह्यांना नसते पण जनतेला असते. तेव्हा कोणत्याच राजकीय पक्षांनी सभ्य पणाचा आव आणू नये.सर्व एकच माळेचे मणी आहेतं

In reply to by Rajesh188

नाही. हा खर्च भाजपला लागत नाही. तिथे स्वखुशीने लोक येतात. घरून चटणी भाकर बांधून आणतात, स्वताच पेट्रोल जाळतात, (वरून २०० झालं तरी जाळू बोलतात), झेंडे स्वता शिवतात, बांबू ही स्वतच्या शेतातला आणतात. ईतका प्रामाणीक पक्श असूनही लोक नावे ठेवतात. आय लव भाजपा ऊऊऊम्मा. :) मै मरजाऊॅ तो मुझे भाजपा के कफन मे लपेटना अन काय काय ते... :)

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत... म्हणुन नियमात न बसणार्‍या दुरच्या नातेवाईकाने लस घेतल्यावर (एक नाही दोन ) फडणवीसांनी तपास करुन त्या दुरच्या नातेवाईकावर कारवाई करा असे म्हणु नये. म. वि. आघाडी सरकार खरोखरच नालायक आहे. त्यांच्यात कारवाई करण्याची धमक नाही. केंद्रातील सरकारला सांगुन दुरच्या नातेवाईकाने घेतलेल्या दोन्हि लसीकरण प्रकरणाची चौकशी करावी, प्रसंगी रातोरात सर्वोच्च न्यायालयात जाऊन C.B.I. किंवा N.I.A. ला या प्रकरणाची चौकशी करण्यास भाग पाडावे. व महाराष्ट्राच्या ( स्वता:ला ) न्याय द्यावा

In reply to by लिओ

ह्या निमित्ताने, CBI परत महाराष्ट्र राज्यात यायला हवी...

In reply to by मुक्त विहारि

CBI चे मालक बदलायचे पक्क ठरवले आहे लोकांनी.अजुन तीन वर्षांनी cbi चे मालक बदलणार आहेत.

राहुल घांदी ह्यांना कोरोना झाला म्हणजे कोरोनाचे हे शेवटचे दिवस आहेत असे मानायला हरकत नाही. विनोद बाजूला : राहुल घांदी लवकर बरे होवोत.

सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असतोच असे बिलकुल नाही. कमेंट ची भाषा बघून आम्ही शोध लावला आहे. Bjp chya चालू,फेकू,जन विरोधी, दगलबज नेत्या पेक्षा . .राहुलजी साधे,सरळ,सुसंस्कृत,शिक्षित,, आणि नीतिमान नक्कीच आहेत. भले त्यांना यश मिळत नाही तरी त्यांनी संयम सोडला नाही. तीच बाब उद्धव ठाकरे ची संयमी , शांत, विचारी,हुशार व्यक्ती ह्या राज्याला मुख्य मंत्री मिळाला हे राज्याचे भाग्य आहे. ह्या संकट काळात स्वार्थी, थापडा,कुटील फडणवीस हे राज्याचे मुख्य मंत्री नाहीत .हे राज्याचे भाग्य च आहे.

In reply to by Rajesh188

जर भविष्यात शिवसेना आणि कौन्ग्रेस् एकमेकाविरुद्ध झाले तर तुम्ही कोणाची बाजु घेणार? कारण आत्ताची शिव्सेनेची सगळी भाजपा विरोधी वक्तव्ये पुर्वी तन्तोतन्त कौन्ग्रेस विदोधी होती. फक्त भाजपा गुजराती धार्जीणी आणि कौन्ग्रेस् उत्तर भारतीय धार्जिणी... मराठी माणुस कायम बिचारा...

In reply to by सुखीमाणूस

शिवसेना कधीच कॉंग्रेसविरोधी नव्हती. बाळ ठाकरे इंदिरा गांधींचे प्रशंसक होते. आणिबाणीला बाळ ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत व १९८० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसशी युती केली होती. कॉंग्रेसच्या बहुतेक सर्व राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. खरं तर शिवसेनेचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. मुस्लीम लीग, प्रजा समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शेकाप, स्वतंत्र भारत पक्ष, रिपब्लिकन पक्ष अशा सर्व पक्षांशी शिवसेनेने वेळोवेळी युती केली आहे. मुळात शिवसेना हा पक्षच नाही. गणेशोत्सव, होळी, दहीहंडी अशा उत्सवांच्या वेळी हातात पावतीपुस्तक घेऊन हिंडून, दिसेल त्याला अडवून, वेळप्रसंगी दमदाटी करून वर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणारी ही टोळी आहे. यांना कोणतीही विचारसरणी, तत्व वगैरे नाही. यांच्याकडे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय असे कोणतेही धोरण नाही. कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ यांंच्याकडे नाही. ना हे कधी हिंदुत्ववादी होते ना कधी मराठीवादी होते ना कधी यांना जनतेशी कधी देणेघेणे होते. अर्वाच्य शिवीगाळ, दमदाटी, खंडणी वसुली, उत्सवाच्या नावाने धुडगूस एवढेच फक्त यांना जमते.

In reply to by श्रीगुरुजी

असहमत. लोकांचे प्रश्न रस्त्यावर ऊतरून सोडवणे. हिंदूत्वासाठी थएठ पंगे घेणे. गरज असेल तिथे मदतीला हजर असणे. मराठी माणूस भाषा ह्यांच्यावर अन्याय झाला की पाठीमागे ऊभे राहणे. रिक्शाचालक ते रसवंतीचालक अश्या कार्यकर्त्याना थेट मंत्रीपदावर बसवणे हे फक्त सेनेत घडते. कार्यकर्ते वापरून फेकून देणे, जुन्या नेत्यांचे तिकीटे कापणे, असे भाजपी कृत्य सेना करत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हिंदुत्व आणि शिवसेना यांचा कधी संबंध होता तरी का? मराठी बाणा आणि शिवसेना यांचा कधी संबंध तरी होता का?

In reply to by श्रीगुरुजी

स्थानिक लोक अधिकार समित्या च्या माध्यमातून सेने नी मराठी लोकांसाठी काम केले आहे. railway, बँका,मध्ये मराठी तरुण जे दिसत आहेत ते सेने मुळेच. मराठी भाषा च वापर केंद्रीय आस्थापना मध्ये करण्याचा हट्ट नेहमीच सेना करत आली आहे. मराठी रिक्षावाले,टॅक्सी वाले,फेरीवाले,ह्यांना सेने नी नेहमीच पाठिंबा दिला आहे त्यांचे रक्षण केले आहे. अगदी ट्रेन मध्ये सुद्धा गर्दीत मराठी लोक असंख्य परप्रांतीय लोकांच्या गर्दीत असतात तेव्हा सेने चे नाव च त्यांना आधार देते. किती तरी काम सेने नी मराठी लोकांसाठी केली आहेत. आणि ही काम अशी होती की ती गुंडगिरी केल्या शिवाय होणे शक्यच नव्हते म्हणून त्यांनी गुंडागर्दी पण केली दबदबा निर्माण केला. हिंदुत्व वाच विचार केला तर. १९९३ दंगलीत सेने च्या नेत्यानं पासून सैनिक पर्यंत सर्व रस्त्यावर होते.दंगेखोर ना सडेतोड प्रती उत्तर रस्त्यावर देत होते. फक्त शिवसेना च तेव्हा हिंदू चे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर लढत होती Bjp चे कार्यकर्तेे तेव्हा घरात दरवाजा लावून बसले होते.

In reply to by Rajesh188

Bjp नी हिंदुत्व वा ची झूल घेतली आहे तर फक्त मला हे सांगा bjp नी हिंदू च्या प्रगती साठी,त्यांच्या हितासाठी काय विशेष योगदान दिले आहे. बघा एक पण उदाहरण सापडणार नाही हे नक्की.

In reply to by Rajesh188

+१ भाजपचे हिंदूत्वासाठी काहीच कर्तृत्व नाही. काही भक्तगण तर राममंदीराचे श्रेय ही भाजपला देतात. वास्तविकता ही आहे की राममंदीराचा निकाल कोर्टाने ऊत्खननात मशीदी खाली सापडलेल्या पुराव्यांवरून दिला. अश्या भक्तांना देव सुबूध्दी देवो.

In reply to by Rajesh188

"ज्वलंत हिदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक" काढून सर्वसामान्यांना मुर्ख तरी बनवत नाही भाजपा. बाकी चालू द्या तुमचे पुराण..

In reply to by मुक्त विहारि

तो सैनिक खूप चावट होता.कसले तरी विकृत कार्टून त्यांनी fb वर शेअर केले होते आणि एका सज्जन व्यक्ती ची बदनामी केली होती. " भले तर देवू कासे ची लांगोटी नाठाळ च्या माथी हाणू काठी" ही महाराष्ट्र ची परंपरा च आहे .त्याच परंपरे नुसार घडलेले आहे. सज्जन लोकांच्या अभ्रू चे रक्षण करणे हेच सैनिक (बाळासाहेब चे सैनिक)चे काम आहे तशीच शिकवण आहे

In reply to by Rajesh188

सुशिक्षित व्यक्ती समतोल विचार करेलच असे बिलकुल नाही, "किंबहुना" काही अति सुशिक्षित व्यक्ती आंधळेपणाने गुलामगिरी करतात असा शोध आम्हालाही लागला आहे.

काल मुंबई आणि दिल्लीच्या क्रिकेट सामना पाहात होतो, आपण दिल्लीच्या विरोधात आहोतच... मुंबई जिंकावी म्हणून सामना पाहात होतो की देश के नाम पर संबोधन ८ वाजून ४५ मिनिटांनी असे ऐकले. आणि पोटात गोळाच आला. शेठ इतक्या उशीरा कसे काय ऑनलाइन आले, म्हणून काळजी लागली. आज मध्यरात्री पासून सगळं बंद होणार की काय अशी शंका आली. महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊनचा विचार चालू असताना देशाला उद्देशून भाषण करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान आले आणि माइक्रो कंटेमेंट झोन करुन करोनाशी लढूया, १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस आणि अंतिम पर्याय म्हणून राज्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा असे सांगितले. खरं, तर मला पुन्हा एकदा 'टास्क' देतील असेही वाटले होते. माननीय पंतप्रधान यांनी केवळ राज्यांनी लॉकडाऊन करु नये हे सांगण्यासाठी आले, हे पाहुन आणि ऐकून नंतर स्वत:शीच हसून हसून पुरेवाट झाली. जनतेला माझा विसर तर नसेल ना, म्हणून टीव्हीदर्शनाचा तो एक भाग असावा असे वाटले. देशात करोनाचा भयंकर संसर्ग वाढत असतांना काही तरी विशेष असा संदेश असेल, त्या शिवाय का असे अचानक 'आकाशवाणी' साठी आले असतील. पण काहीही विशेष नव्हतं. सध्या जितका करता येईल तितका भ्रम निरास करायचा असेच मा. पंतप्रधान आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाने ठरवले असेल तर, आपण जनता म्हणून, सहन करण्याशिवाय दुसरं तरी काय करु शकतो...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंतप्रधान साहेबांच्या मन की बात वर खूप जोक मारायची.किती सहन करायचे त्यांनी. शेवटी त्यांनी निर्णय घेवून च टाकला मन की बात ,मना मध्येच ठेवायची.

हा देशाचा राष्ट्रीय टाईमपास आहे. ते लवकर बरे झालेच पाहिजेत.

In reply to by नावातकायआहे

प्रश्न राहुल गांधीनी किती विनोदी वा उत्तम भाषणे केलीत ती ऐकणे हा नाही. मुवीनी उल्लेख केलेले राहुल गांधींचे 'आलू डालके सोना निकालो वाली मशीन' हे भाषण मुवीनी नीट व संपूर्णपणे ऐकले आहे का व्हाटस्अप विद्यापीठातून आलेला एक मिनीटाचा व्हिडीओ पाहून वरील स्टेटमेंट केले आहे हे जाणून घ्यायचे होते.

In reply to by अभिजीत अवलिया

शीतावरून भाताची परिक्षा ... नंतर ते मोदींवर किंवा भाजपच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर खपवणार...

In reply to by मुक्त विहारि

शीतावरून भाताची परिक्षा
दरवेळी ह्या म्हणीप्रमाणे वागणे योग्य ठरेलच असे नाही. आता तंत्रज्ञान फारच प्रगत झाले असल्याने, एखाद्या व्यक्तीच्या भाषणाची मोडतोड करणे, आपल्याला हवी असतील ती वाक्ये घुसवणे, नको असलेली वाक्ये काढून टाकणे ह्या गोष्टी सहज शक्य होतात. त्यामुळे अबक ने अमुकतमुक भाषण केले हे लिहून त्यांची टर उडवण्यापेक्षा, नक्की अबक ने काय म्हटलेय ते पूर्ण ऐकले की आपले गैरसमज दूर होतात.

In reply to by मुक्त विहारि

हो. राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की
'ऐसी मशीन लगाऊंगा, इस साईड से आलू घुसेगा, ऊस साईड से सोना निकलेगा. इधर से आलू डालो उधर से सोना आयेगा. इतना पैसा बनेगा. असे नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना म्हणाले'.
आता मोदी असे म्हणाले कि नाहीत हा मुद्दा आहे. जर मोदीनी हे वाक्य म्हटले नसेल आणि तरीही राहुल गांधींनी मोदींच्या नावावर खपवले असेल तर त्याबद्दल त्यांना निश्चित शाब्दिक मार दिला जाऊ शकतो. पण विडिओ मधील फक्त पहिले वाक्य व्हायरल केल्यामुळे पूर्ण अर्थ बदलतो आहे हा माझा मुद्दा आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

अगदी असाच अर्थाचा अनर्थ खाली दिलेल्या सुप्रसिध्द व्हिडिओतील वाजपेयींचे शेवटचे वाक्य विचारात घेतले नाही तर होतो.

In reply to by अभिजीत अवलिया

मशीन खपवायचा प्रयत्न केला....आणि मग उघडे पडले .... साहजिकच, मग ह्या वाक्याचे उत्तर दायित्व, परमपूज्य राहुल गांधी, यांच्यावरच येते...

In reply to by अभिजीत अवलिया

प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार असे मोदींनी आश्वासन दिले होते, हे धडधडीत असत्य राहुल व इतर अनेक विरोधी पक्षनेते अजूनही पसरवित आहेत. मग त्यांच्याही बाबतीत असे होणारच.

In reply to by अभिजीत अवलिया

मुविकाकांकडे दुर्लक्श करावे. थेटरात सिनेमा पहाताना एखादे लहान मूल रडत असते पण लोक सिनेमा कडेच लक्श केंद्रीत करतात तसेच ईथेही करावे. :)

कॉंग्रेसचे मंत्री आशिष देशमुख यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणिबाणी जाहीर करण्याची विनंती केली आहे. यांनी थेट उधोजींच्याच नाडीला हात घातला की.

In reply to by श्रीगुरुजी

एक तर हा व्यक्ती bjp मध्ये होता पहिला. त्या नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस मध्ये गेला आणि फडणवीस विरूद्ध लढला आणि पडला. ह्या व्यक्ती ला राज्य द्रोही च म्हणता येईल ह्याचा इतिहास बघितला तर हा नेहमीच महाराष्ट्र विरूद्ध चळवळी करण्यात आघाडीवर होता.. राज्य द्रोही तर आहेच राज्याचे तुकडे होण्यासाठी हा माणूस तडफडत होता. आता ह्याला ना काँग्रेस विचारात ना bjp . अशी अवस्था आहे.. असे काही तरी भारी बोलून BJP खुश झाली तर झाली हाच हेतू.. स्व स्वार्थ.. बाकी ह्याला राज्य विषयी ना कधी प्रेम होते ना आत्मीयता.


In reply to by प्रसाद_१९८२

अगदी किळसवाणा प्रकार आहे हा. म्हणजे या सरकारचे उद्दिष्ट स्पष्ट दिसत आहे. स्वतः कोरोनाची परिस्थिती गंभीर झालेली असताना त्याविषयी काहीही न करता कोमट पाणी प्यायचे सल्ले द्यायचे आणि प्रत्येक गोष्टीसाठी मोदींना नावे ठेवायची. राज्य सरकार काही करत नाही म्हणून दुसरे स्वतःच्या प्रयत्नांनी सरकारलाच औषधे आणून देत असतील तर त्यांना पोलिस ठाण्यात आणून किंवा बदल्या करून त्रास द्यायचा. हे सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जितक्या लवकर हे सरकार जाईल तितके चांगले. नाहीतर केंद्र सरकारने ३५६ वे कलम वापरून हे सरकार बरखास्त करावे. महाराष्ट्रात सावळागोंधळ चालू असताना केंद्र सरकार नुसते हातावर हात ठेऊन बसू शकत नाही. त्यांचीही काहीतरी जबाबदारी आहे हे नक्की. बादवे, मामुंचे भाषण किती वाजता आहे? भाषण सुरू व्हायच्या दहा मिनिटे आधी गॅसवर पाणी गरम करायला ठेवणार आहे. मामुंचे भाषण असले तर ते कोमट पाण्याशिवाय ऐकवतच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. + ९९९९९९९९९९९ . . . हे तीनही पक्ष म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.

In reply to by सॅगी

करोना समोरून हल्ला करतो. करोना आपल्या कडे यायच्या आत, आपण करोनापाशी पोहोचायला पाहिजे. ही दोन वाक्ये ऐकल्या पासून, मी ह्यांची भाषणे लाइव्ह ऐकणे सोडून दिले आहे ...

In reply to by मुक्त विहारि

ते महाराष्ट्राला स्वर्ग बनवण्याचीही तयारी करत आहेत, फक्त राज्यातील जनतेने स्वर्गवासी झाले पाहीजे.