गुढीपाडव्याची नैमित्तिक खरेदी - झेंडूची फुले, कडुलिंबाचा मोहोर, आंब्याची, केळीची पाने, फळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गाठ्या इ. साठी बाहेर जायला आज दिवसभरात वेळ मिळाला नाही. मग ही खरेदी उद्या सकाळी उठून करावी असं ठरलं. रात्री जेवणे झाल्यावर, गाठ्या करून बघाव्यात असा विचार पत्नीच्या मनात आला. मीही तिला मदत करायला (म्हणजे लुडबुड करायला) तयार झालो!
या गाठ्या आम्ही trial and error basis वर केल्या आहेत. त्या बऱ्याच बऱ्या जमल्या आहेत असं वाटत आहे. या वीकांताला अजून प्रयत्न करून घरीच गाठ्या बनविण्याचं कौशल्य प्राप्त करायचंच असं ठरलं आहे.
गाठ्या किंवा नुसतेच बत्तासे करताना शक्यतो लहान-लहान बॅचेसमध्ये करणं चांगलं, असा तर्क अनुभवांती खरा ठरला आहे.
प्रत्येकी सात पदकाच्या चार गाठ्या बनवण्याची कृती
साहित्य:
.
जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात साखर घ्या. साखर जेमतेम बुडेल इतकेच किंवा थोडे कमीच पाणी घाला. मंद आचेवर साखर विरघळू द्या. साखर विरघळली कि गॅस मध्यम करून गोळीबंद पाक होईपर्यंत हलवत राहा. ताटात एक थेंब पाक टाकल्यावर तो पसरला नाही तर गोळीबंद पाक झाला असे समजावे.
मग त्यात सोडा आणि हवा असेल तर रंग घाला. या पूर्ण प्रक्रियेदरम्यान पाक सतत ढवळत राहा. बुडबुडे येऊ लागले की गॅस बंद करून पळीने ताटात / साच्यांमध्ये दोरा बुडेल असा पाक घाला. ही क्रिया झटपट करायला हवी नाहीतर पातेल्यातच पाक घट्ट होऊन साखर तयार होत जाईल.
.
दहा मिनिटांनी गाठ्या थंड झाल्यावर हळुवारपणे ताटापासून / साच्यातून सोडवून घ्या.
आपल्या हातांनी घरी बनवलेल्या गाठ्यांनी गुढीची सर्वोपचारसंपन्न पूजा करा. नंतर रुचकर पन्हेर आणि मधुर गाठ्यांचा आस्वाद घ्या.
.
श्री शालिवाहन शके १९४३ प्लव नाम संवत्सर प्रारंभानिमित्ताने सर्व मिपावासीयांना गुढीपाडवा तथा हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जाओ!
- साखर - दोन वाट्या
- खाण्याचा सोडा / इनो - एक चमचा
- पाणी - पाव वाटीपेक्षाही कमी
- खाण्याचा रंग - वैकल्पिक
- जाड दोरा - दुहेरी अंदाजे तीस इंच, असे चार तुकडे
वाचने
6975
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
डु धा का टा
मस्तच झालीय
हं, बरोबर आहे.
In reply to मस्तच झालीय by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पहिल्याच प्रयत्नात सुबक सुंदर
In reply to हं, बरोबर आहे. by वामन देशमुख
छान जमली आहे.