Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 12/04/2021 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents… दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.

वाचने 62167
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

महाराष्ट्रात भयावह स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ... https://www.loksatta.com/maharashtra-news/covid-patients-get-oxygen-in-… काय बोलावं ते सुचेना...

महाराष्ट्रात भयावह स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ... https://www.loksatta.com/maharashtra-news/covid-patients-get-oxygen-in-… काय बोलावं ते सुचेना...

In reply to by मुक्त विहारि

महाराष्ट्राकडून इतर राज्यांनी धडा घ्यावा..दूर्लक्ष केल्यास संपूर्ण भारताचा महाराष्ट्र होऊ शकतो. सगळ्या जगाला वाटलं होतं की, भारतासारख्या भरमसाठ लोकसंख्या ,गरीबी , निरक्षरता ,भ्रष्टाचार असलेल्या देशाचं काय होईल? आणि ते खरं ठरतेय... कोण गाफिल राहिलं खरच कोडे आहे.

In reply to by Bhakti

आपली जनता स्वैराचारच करणार, हे माहिती असायला हवे होते ... गोव्यात जर करोना रोखल्या गेला असेल तर, इतर राज्यांत का नाही रोखल्या गेला? अजून एक निरीक्षण नोंदवतो, कोकणांत प्रादुर्भाव का झाला नाही? विदर्भातच कसा काय झाला? आपापल्या राज्यांत करोना वाढता कामा नये, ही जबाबदारी त्या त्या राज्य सरकारचीच असायला हवी ...

काहीतरी चुकतय हे मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी नाही. ह्याउलट "लसीत राजकारण नको" असे म्हणणारे सेना नेते राजकारण करू पाहत आहेत हे दुर्दैवी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

1. दिपाली चव्हाणच्या बाबतीत, अक्षम्य दिरंगाई झाली, एक जीव हकनाक बळी पडला.. 2. वाझे यांच्या बाबतीत पण हाच अनुभव आपल्या सगळ्यांना आला.. आलं अंगावर तर ढकल केंद्रावर, ही नीति किती काळ चालू ठेवणार? लाॅकडाऊन करण्याची वेळ, गोव्यावर आलेली नाही, पण महाराष्ट्रावर का आली? चुकी जनतेची 5% आणि राज्य सरकारची 95% आहे... गर्दीची ठिकाणे, सर्वसामान्य माणसांसाठी ओपन केली तर, तिसर्या लाटे मुळे, अजून वाईट परिस्थिति निर्माण होणार...

In reply to by मुक्त विहारि

महाराष्ट्रात राज्य सरकारचे अस्तित्व कोठे जाणवित नाही. सर्व सत्ताधारी ओरबाडून खाण्यात गर्क आहेत. मुख्यमंत्री एक वर्षाहून अधिक काळ घरात लपून बसले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे व दुसरे वर्षही वाया जाणार असे स्पष्ट दिसत आहे. वडीलांना दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याची फार भयंकर किंमत महाराष्ट्रातील जनता चुकवित आहे.

In reply to by मुक्त विहारि

लसीच्या तुटवड्याच खापर केंद्रा वर फोडलं, पण ऑक्सिजन आणि rendemivir इंजेकशन चा तुटवडा च खापर पण केंद्रा वर आणि गुजरात वर फोडण्यात येत आहे. रुग्ण संख्या वाढली म्हणून ह्या गोष्टींचा तुटवडा असू शकतो पण प्रत्येक गोष्टीला केंद्राला जबाबदार धरण्यात येत आहे.

सेना अजूनही महाराष्ट्र हा फक्त वांद्रे , ठाणे , सेनाभवन या पुरताच आहे असे समजते. त्यांना प्रशासकीय जाणीव आहे असे कधीच जाणवत नाही. ज्यांना हे जाणीच होती त्यांना सेनेने दूर लोटले. त्याची फळे म्हणजे राउतांसारखे बाष्कळ भांडके बाहुले सेनेत वरचढ झाले . कोणावर टीका करताना अर्वाच्य भाषेत बोलणे हा स्थायीभाव झालाय. आपल्या पायाखाली काय जळतय तेच माहीत नसते त्यांना

सर्व जबाबदारी राज्य सरकारची. केंद्र फक्त टॅक्स ओरबाडण्यासाठी आहे. तसेच महापालिकेत भाजपची सत्ता असेल तर कोरोना आटोक्यात आणण्याची जबाबदारी पालिकेची नसते. असेच वरील सर्व प्रतिसादातून जाणवतेय. केंद्राने लसी रोखल्या किंवा जीएसटी रोखला तरी राज्यच जबाबदार. १०५ घरी बसवल्याची खदखद कोरोना आडून प्रतिसादरूपाने पुर्ण करण्याची चढाओढ लागल्याचे दिसतंय. प्रधानसेवकाला देश संकटात असताना निवडणूका महत्वाच्या आहेत. जनता मरो. पण आपण फक्त राज्य सरकारच्या नावाने बोंबलूया. काहीही झाले तरी राज्य सरकार अतिशय ऊत्तम काम करत आह. भाजपची लक्तरे दोनजिल्ह्यातील पुरपरीस्थीती वेळी वेशीवर टांगली गेली. त्यामुळे पवारांच्या कृपेने आणी राज्यातील जनतेच्या नशिबाने पुन्हा भाजपे सत्तेत आले नाहीत. नाहीतर आता राज्यातील नेते बंगाल निवडणूकीत प्रचार करत असते. (कोल्हापूर वेळी मते मागत फिरत होते तसे) भाजपच्या दृष्टीने जनतेपेक्शा नेहमी निवडणूका महत्वाच्या राहील्यात. त्यामुळे १०५ घरी बसणे हे महाराष्ट्रावर राऊत/पवारांचे झालेले ऊपकारच. मागच्या धाग्यात राजेश ह्यांनी सांगीतल्या प्रमाणे काहींना चर्चे पेक्शा भाजपचा प्रचार करण्यातच जास्त रस आहे.

In reply to by मुक्त विहारि

दिपाली चव्हाणच्या बाबतीत झालेली अक्षम्य दिरंगाई, खूप उदाहरणे आहेत, नाही का?

In reply to by मुक्त विहारि

डोळे ऊघडे ठेवले तर सर्व दिसतं. पण फक्त राज्याच्या नावाने छाती बडवायची असेल तर काहीच दिसनार नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असं होय. पंढरपूर ला जाऊन या एकदा मग कळेल निवडणुकांची चिंता कुणाला आहे ते. आता लागुदया निवडणुका पालिकांच्या मग बघू कुणाला देशाच्या संकटाचं काय पडलंय ते.

महाराष्ट्र मधून एक रुपया पण tax केंद्र सरकार नी घेवू नये. महाराष्ट्र la इतर देशांशी करार करण्याची पूर्ण मोकळीक असावी. कोणतेच केंद्रीय हस्तक्षेप महाराष्ट्रात बिलकुल नको. पुण्यात असणाऱ्या लस उत्पादन कंपनी मधून होणारे उत्पादन केंद्राला मिळणार नाही. हे सर्व पाहिले मान्य करा . केंद्राची काडी ची पण ह्या राज्याला लागणार नाही. केंद्रीय सरकार च्या असंख्य चुका मुळे देशाची अवस्था गंभीर झाली आहे. राज्य सरकार उत्तम काम करत आहे. पण bjp राज्याला अडचणीत आणण्याचे उद्योग केंद्र करत आहे

In reply to by Rajesh188

+१ जनता हे पाहत आहे. पुढील निवडणूकीत जनता धडा शिकवेलच. दुटप्पीपणासाठी निधी केंद्राला जाब राज्याला. अशी नवी म्हण पडलीय.१०५ निवडूण दिल्याबद्दल जनतेला पश्चाताप होत असेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

१०५ निवडूण दिल्याबद्दल जनतेला पश्चाताप होत असेल. 105 निवडून दिल्या बद्दल नक्कीच पश्चाताप होत आहे, 144 दिले असते तर बरं झालं असतं.

In reply to by Rajesh188

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

In reply to by Rajesh188

केंद्रात काँग्रेस चा सरकार असता तर हेच बोलला अस्तरात का? महाराष्ट्र la इतर देशांशी करार करण्याची पूर्ण मोकळीक असावी. कोणतेच केंद्रीय हस्तक्षेप महाराष्ट्रात बिलकुल नको. पुण्यात असणाऱ्या लस उत्पादन कंपनी मधून होणारे उत्पादन केंद्राला मिळणार नाही. या दोन विधानावरून तुम्हाला देश हि कल्पना नकोशी वाटायला लागली असे दिसतेय...हा देशद्रोहच आहे // मग हिंमत असले तर जाहीर रित्या हीच विधाने करा ...

In reply to by चौकस२१२

केंद्रीय सत्तेचा वापर करून राज्याची अडवणूक करायची आणि राज्य संकटात आले की बघा राज्य सरकार कसे कुचकामी आहे अशी टीका करायची ही वृत्ती दिसून आल्या मुळेच तसे मत मी व्यक्त केले आहे. इथे देशद्रोह चा काय संबंध

In reply to by Rajesh188

पुण्यात असणाऱ्या लस उत्पादन कंपनी मधून होणारे उत्पादन केंद्राला मिळणार नाही.>>> तो त्यांचा धंदा आहे. त्यावर सरकार आता बंदी आणणार का? हे सरकार मंन्त्रांचे बंगले दुरुस्त करायला जवळजवळ 4000 कोटी रुपये खर्च करणार आहे. ती रक्कम लस खरेदी करायला वापरावी. प्रत्येक वेळी जबाबदारी केंद्रावर ढकलू नये.

योगीं च्या उत्तर प्रदेश मध्ये कोविद लस देण्याऐवजी 2 महिलांना रेबीज ची लस दिली, यात योगीं चा दोष नाही तसेच महाराष्टातील प्रत्येक प्रॉब्लेम ला उद्धवच जवाबदार नाहीयेत

In reply to by Vichar Manus

बरोबर, लसीऐवजी सॅनिटायझर पाजलं त्याला तरी कुणी कुठे जबाबदार होतं. https://www.livemint.com/news/india/12-children-in-maharashtra-given-sa…

निवडणूकीत BJP ला हरवत होती ती उगाच नाही.हा पक्ष लोकांचे भले करू शकणार नाही ह्याची पूर्ण खात्री लोकांना होती. आता मंदिराच्या भावनिक प्रश्नात अडकून लोकांनी ह्यांना मतदान केले . पण परत अशी चूक लोक करणार नाहीत. चांगलाच फटका लोकांना बसला आहे.

In reply to by Rajesh188

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

तर फडणवीस फक्त फक्त बोलायला पोपट कार्य ०.कसलेच सामाजिक भान नाही,विकासाची दृष्टी नाही,फक्त बोल bachhan. दुसरे चंपा त्यांच्या स्वतःच्या मतदार संघात तरी त्यांनी विकासाची काम केली आहेत का . त्या मानाने आताच्या तिनी पक्षात उत्तम प्रशासनिक अनुभव असलेली लोक आहेत. सामाजिक भान असलेली लोक आहेत. लोकांच्या अडचणी काय आहेत ह्या समजण्याची कुवत असणारी लोक आहेत.. BJP मध्ये एक पण चांगला नेता नाही. सर्व उधारी वर घेतलेले पळपुटे च जास्त आहेत.

In reply to by Rajesh188

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

In reply to by Rajesh188

भाजप मधील चांगले नेते संपवले गेले अथवा निवडणूकीत त्यांचे तिकीट कापले गेले. आता ऊरलेत बाहेरून आलेले ज्यांना जनाधार नाही. पुढील निवडणूकीत मोठाप्रमाणात घरवापसी होऊन अनेक नेते सेना, राकाॅ, काॅग्रेस मध्ये जातील. भाजपच पानिपत अटळ आहे.

In reply to by मुक्त विहारि

ह्या राजवटीने केलेली चांगली कामे काही सांगीतलीच नाहीत ... -- ते सांगतील तेंव्हा सांगतील, मी काही कामे सांगतो. - या सरकारचे सर्वात पहिले चांगले काम म्हणजे, १. भाजपा सरकारने सुरु केलेली कामे व योजनांना, टक्केवारी मिळवण्यासाठी स्थगिती देणे. २. मेट्रोला स्थगिती ३. जलशिवार योजनेला स्थगिती. ४. मंत्र्यासाठी नविन गाड्या विकत घेणे ५. राज्यपालांवर टिका करुन वर त्यांच्याच कोट्यातील आमदारकी घेणे. ६. स्वत:ची लायकी काय आहे हे न ओळखत, चीन व पाकिस्तान मुद्द्यावर केंद्राला सल्ले देणे. ७. कारण नसताना, कंगना रानौतचा बंगला पाडणे. ८. खंडणी उखळण्यासाठी पोलीसांमार्फत अनिल अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे. ९. संपूर्ण करोना काळात एकादा ही राज्यातील जनतेत न जाता फेसबुक लाईव्ह मधून लोकांना वायफळ सल्ले देणे. १० संपूर्ण करोना काळात जनता उपाशी मरत असताना केंद्रासरकारने सर्वसामन्य जनतेसाठी दिलेला तांदुळ परस्पर विकून टाकणे. ११. हॉटेल व बार मालकांकडून महिना शंभर कोटीची वसुली करणे. इत्यादी लोकउपयोगी कामे या सरकारने सत्तेत आल्यावर केली आहेत, याशिवाय आणखी भरिव कामगिरी महावसुली अघाडीची असेल तर इतरांनी सांगावे.

In reply to by प्रसाद_१९८२

दिपाली चव्हाणच्या बाबतीत झालेली अक्षम्य दिरंगाई, हे पण आहेच जाताजाता, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण, एका हिंदू माणसाला घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली, हे पण आहेच .... अर्थात आपण कितीही लिंक्स दिल्या तरी, 20% जनता त्या स्वीकारणार नाहीच...

In reply to by प्रसाद_१९८२

अजून काही.. 12. स्वतः च्या हट्टापायी कोरिया मधुन पेंग्विन आणून त्यावर कोट्यवधी रुपये उधळणे. एका पेंग्विन चा नाहक मृत्य. यामुळे जनतेला काय फायदा झाला ते शेणे तील लोकांनी सांगावे. 13. जनतेच्या माथ्यावर वाढीव वीजबिल मारणे आणि न भरल्यास दंड आणी वीज कट करण्याची धमकी. 14. मंत्री व आमदार यांच्यासाठी घरांचे रेनोवेशन करणे. 15. कोणीही टीका केल्यास त्यावर महाराष्ट्र द्रोही असा शिक्का मारणे. 16. अजान स्पर्धा भरवणे. 17. लोकडाऊन दरम्यान कोणत्याही बाबतीत सामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांना दिलासा न देणे. 18. पोलिस आणि इतर लोकांकडून जबरदस्ती हप्ता वसुली करणे. 19. प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकार जबाबदार धरणे. कोरोना केसेस कमी झाल्यानंतर उभी केलेली सर्व आरोग्य व्यवस्था गुंडाळून हप्ता वसुली सुरू करने.. जणू काही कोरोना संपला याच आविर्भावात सर्व गोष्टींना परवानगी देऊन तिथून वरकमाई मिळवण्यासाठी धडपड करने. 20. मास्क च्या कारणावरून सामान्य जनतेकडून कोट्यवधी रुपये वसुल करणे. अगदी चार चाकी गाडीत एकटा माणूस असला तरी त्यांच्याकडून हप्ता वसुल करणे. पण मंत्री, आमदार सर्व विनामास्क फिरतात सभा घेतात त्याच ठिकाणी कितीतरी पोलिस उभे असून पण षंढ उभे असतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ते वाझे यांनी जे पत्र लिहिले, ती पण थापच आहे का? परमबीरसिंग यांनी पण असेच आरोप केले आहेत नाही का? ----------

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आम्ही लिहिल्यात त्या थापा. मात्र तुम्ही, गेल्या वर्षे दिडवर्षात केलेली चार बरी काम लिहा, या 'महा वसुली आघाडीची'

In reply to by प्रसाद_१९८२

वारंवार विचारून सुद्धा महा वसुली आघाडी सरकार समर्थकांना या सरकारने १६-१७ महिन्यात केलेले एकही काम (चांगले काम तर लांबच राहिलं) सांगता येत नाही. मुळात मुख्यमंत्रीच १३ महिने घराबाहेर पडले नाही. घराबाहेर पडले नाही तर काम कोठून करणार? हे सरकार उत्तम काम करीत आहे एवढेच पालुपद सुरू आहे. महाराष्ट्राचे १७ महिने पूर्ण वाया गेले आहेत. अर्थात ही घाण सत्तेवर यायला भाजपच कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मुख्यमंत्री समजदार आहेत. गर्दी जमवून कोरोना नियमांचा भंग करू नये हे त्यांना एक जबाबदार वागरीक म्हणून कळते. विरोधकांना कळत नाही म्हणून ते सत्ते त येण्याच्या लायकीचे नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

त्याच सेनेच्या गळ्यात गळा घालून bjp नी केंद्रात आणि राज्यात सत्ता उपभोगली आहे तेव्हा सेना म्हणजे चांगला पक्ष होता . आता ह्यांना हाकलून दिले त्याला एक वर्ष झाले तेव्हा पासून सेना ह्यांना फालतू पक्ष वाटायला लागली सत्ता मिळवण्यासाठी मुफ्ती बरोबर पण ह्यांनी युती केली होती.. त्या bjp नी नीतिमत्ता विषयी एक शब्द पण बोलू नये राष्ट्रवादी chya एका इशाऱ्यावर सर्व वैचारिक मतभेद विसरून फडणवीस सकाळी पाच ला बाशिंग बांधून गेले होते आणि आता हे शहाणपण शिकवत आहेत.

In reply to by Rajesh188

+१ सत्तेसाठी नितीमत्ता गुंडाळून ठेवनारा पक्श म्हणजे भाजप. जनतेला भूलथापा देऊन जनतेचीच फसवणूक करण्यापर्यंत ह्या पक्शाची मजल जाते. सेनेने सत्ता ताब्यात घेतली ते ऊत्तमच.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ज्या काँग्रेसला शिव्या घालण्यात बाळासाहेबांनी उभी हयात घालवली त्यांचेच सुपुत्र त्याच काँग्रेसच्या गळ्यात गळे घालून सत्तेची चोरी करतात आणि त्यांचे गुलाम इतरांना नीतिमत्ता शिकवतात तेव्हा मौज वाटते. :)

In reply to by सॅगी

हे भाजपलाही लागू आहे. हे अजित पवारांना चक्की पिसायला तुरूंंगात पाठविणार होते. पण सत्तेसाठी क्लीन चिट देऊन युती केली. शिवसेना नेते यांना दिवसाचे २४ तास अर्वाच्य शिवीगाळ करून प्रत्येक निर्णयावर टीका करायचे व प्रत्येक निर्णयात अडवणूक करायचे. पण हे मातोश्रीवर जाऊन लाळघोटेपणा करायचे आणि उद्धव ठाकरेंची प्रत्येक मागणी मान्य करून व नंतर युतीसाठी गळ्यात पडून पक्षाचे नुकसान करून ठेवले.

In reply to by श्रीगुरुजी

ही आततायीपणे केलेली चूकच होती. आणि शिवसेनेला अवास्तव महत्त्व देणे ही देखील चूकच होती. केंद्रात बिन महत्त्वाचे मंत्रिपद देऊन मोदींनी शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली होती, पण तसेच काहीसे करण्यात महाराष्ट्र भाजपा कमी पडली. यापुढे असे होणार नाही ही काळजी त्यांनी घ्यावी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परफेक्ट कार्यक्रम होईल तेव्हा सेनेला दिसेलच त्यांची जागा. :) . . . आणि नाहीतर मतदार आहेतच सेनेचा "परफेक्ट कार्यक्रम" करायला.. :D

In reply to by सॅगी

तुम्ही बघा. परफेक्ट कार्यक्रम व्हायचे :) चाणक्याचीलचाकक्यनिती पवारांनी दिड दिवसात भघडी पाडल्यावर पुन्हा महाराष्ट्राच्या वाटेला गेले नाहीत ते : )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्याच सो कॉल्ड "चाणक्यांना" अजुन स्वतःच्या राज्यात कधी एक हाती सत्ता मिळवता आली नाही...आणि म्हणे डोहाळे लागलेत पंतप्रधान पदाचे.. :) बाकी त्याच "चाणक्यांना" अहमदाबादला जाऊन कुणालातरी सलाम ठोकावा लागला म्हणे मध्यंतरी...

In reply to by सॅगी

सलाम ठोकला. की ठोकवून घेतला हे त्यांनाच माहीत. आजवरचा अनूभव पाहता मातोश्रीवर जाऊन सलाम ठोकणे ते पवारांना पहाटे सलाम ठोकणे, हे पाहून कुणी कुणाला ठोकला असेल हे लक्शात येईल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तरी ठोकायला तरी कशाला गेले हेही त्यांनाच माहीत... बहुतेक अहमदाबादच्या चाणक्यांकडुन पदरात काही पडते का हे पहायला गेले असावेत... :)

In reply to by सॅगी

बाकी त्याच "चाणक्यांना" अहमदाबादला जाऊन कुणालातरी सलाम ठोकावा लागला म्हणे मध्यंतरी... त्याआधी १९ ऑक्टोबर २०१४ ला स्वत:हून मोदी-शहांना सलाम ठोकला होता. नंतर २९ ऑक्टोबर २०१९ ला दिल्लीत जाऊन पुन्हा मोदी-शहांना सलाम ठोकला होता. पण दोन्ही वेळा हकालपट्टी झाली. १९९९ मध्ये आव आणून सोनिया गांधींच्या विरोधात गेले होते. पण ५ महिन्यातच सोनिया गांधींंना सलाम ठोकून घालीन लोटांगण वंदीन चरण करावे लागले होते.

In reply to by श्रीगुरुजी

त्याना एका नेत्याने गुरू मानले होते म्हणे. शरद पवारांचे बोट धरून राजकारणात चालू लागलो. :)

In reply to by श्रीगुरुजी

क्लीन चीट दिली म्हणजे नक्की काय केलं?

🤣

प्रकरण तर हायकोर्टात आहे. हायकोर्टानी अजित पवारांना निर्दोष मुक्त केलं का? अजून ६०० पैकी ३०० प्रकरणांच्या चौकशीला सुध्दा सुरवात झालेली नाही. त्याचा तपास तर हायकोर्टाने सांगितल्यावरच सुरू होणार आहे. सगळंच हायकोर्टाच्या हातात आहे. असो. . . . . फडणवीस नको म्हणून काहीही हं गुरूजी. कृहघ्या. आपण सर्व जण जे काही लिहित आहोत ते वाचून नक्कीच मोदी भाजपचे मुम ठरवणार नाही आहेत. 🤣

In reply to by शाम भागवत

फडणवीस हवे म्हणून काहीही हं शामराव. उच्च न्यायालय स्वतः तपास करीत नाही. तपाससंस्था जे पुरावे पुढे आणते त्यावर न्यायालय निर्णय देते. अजित पवारांवरील आरोपात तथ्य नाही व त्यामुळे प्रकरण बंद करावे, असा अहवाल तपाससंस्थेनेच (परमवीर सिंह हेच तपास अधिकारी होते) उच्च न्यायालयाला दिला. तपासयंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर नाचते हे उघड गुपित आहे. तपासयंत्रणा गृहखात्याच्या अखत्यारीत, गृहमंत्री फडणवीस आणि हा अहवाल दिला तो २३ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या हितासाठी अजित पवारांबरोबर फडणवीसांनी सरकार स्थापन केल्याच्या दुसऱ्या दिवशी! काय जबरदस्त योगायोग आणि टायमिंग आहे! ते सरकार टिकले असते तर पुढील काळात उर्वरीत प्रकरणातही क्लीन चिट दिली असती. कारण एकच, ते म्हणजे महाराष्ट्राचे हित! भाजपला बहुमत मिळाले किंवा बहुमताच्या जवळ पोहोचले तर भाजपचा मुख्यमंत्री होईल व तो कोण हे मोदी ठरवतील. पण भाजपला किती जागा जिंकून द्यायच्या ते जनता ठरविणार. ते मोदी ठरवू शकत नाहीत. अन्यथा ऑक्टोबर २०१९ मध्येच फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असते. पण हाय रे दैवा! नतद्रष्ट जनतेने कमी जागा देऊन महाराष्ट्राचे अहित केले.