Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 12/04/2021 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents… दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.

वाचने 62167
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

मी सचिवांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सही केली असं मंत्री म्हणू शकतो. असंच अजित पवार म्हणाले. त्यांचे हे म्हणणे कोर्टाला सादर करण्यात आले. अर्थात चौकशीच्या संदर्भातील अहवाल कोर्टाला सादर करण्याचे काम पोलीसांचे असते. ते काम पोलिसांनी केले. ताबडतोब राष्ट्रवादी वगैरेंनी फडणवीसांनी क्लीन चीट दिली अशी आवई उठवली. तपास बंद करावा वगैरे तुम्ही कुठे वाचले. असो. योग्य वेळी सर्व बाहेर येईलच म्हणा. तोपर्यंत थांबतो.

In reply to by शाम भागवत

आणि हे सर्व फडणवीसांनी पवारांच्या बरोबर सरकार स्थापन केल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी झाले. जबरदस्त योगायोग आणि टायमिंग! म्हणे हे पोलिसांनी केले. पोलिस गृहखात्याच्या अखत्यारीत, गृहखाते फडणवीसांकडे आणि पोलिस हे करायला बरोबर २५ नोव्हेंबर २०१९ च्या मुहुर्ताची वाट पहात थांबले होते! बाकी तपास बंद करावा हा अहवाल कोणी दिला याचा स्वत:च स्वतंत्र शोध घ्यावा.

In reply to by शाम भागवत

याच विषयावर मागच्या एक धाग्यात त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. क्लीन चिट दिली आहे हे त्यांना मानायचे'च' आहे भले मग पुरावा कुठलाही नसो. कोणत्या ९ केसेस बंद झाल्या, त्या का बंद झाल्या, एसीबी काय म्हणाली त्यावर हे सगळं यथास्थित चर्वण झालं आहे. गोल पोस्ट चेंज करण्यापलिकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही, आपल्या दाव्याचे पुरावे तर अजिबात मिळणार नाहीत. तुम्ही थांबलात तसे मीही थांबलो मागच्या वेळी.

In reply to by बिटाकाका

बिटाकाका, मी गुरूजींच्या पोस्टचा उपयोग फक्त दुसरी बाजू पुढे आणण्यासाठी केला. बाकी काही नाही. त्यांनी त्यांची बाजू अगोदर मांडलेलीच आहे. मुख्य म्हणजे लोकं जे काय समजायचे ते बरोबर समजून घेतात. मिपावरील लोकं तर जबरदस्त हुषार आहेत. 😁

In reply to by बापूसाहेब

मोदी पासून अमित शाह पर्यंत सर्वांनी लाखो ची गर्दी जमा केली आणि सभा घेतल्या. महाराष्ट्रात तर असे घडले नाही. गाडी मध्ये 1 व्यक्ती असेल तरी मास्क वापरला पाहिजे अशी who ची guideline आहे. सार्वजनिक ठिकाणी जे मास्क वापरत नाहीत त्यांच्या कडून दंड वसूल करण्यात काहीच गैर नाही . लाईट बिल सर्रास सर्वांचे जास्त आलेले नाही काही ठराविक लोकांचेच जास्त आहे ते बदलून मिळेल आणि असे प्रकार देशातील सर्व राज्यातील वीज महामंडळ करतात. CORONA काळात कर्ज वसूल न करण्याची घोषणा केंद्र सरकार नी केली होती पण सर्रास कर्ज वसूल केली गेली. Corona काळातील व्याज माफ करण्याचे वाचन दिले होते पण ते पाळले नाही. महाराष्ट्र सरकार corona काळात कोणाचीच वीज बिल भरले नाही म्हणून खंडित केली नाही मध्ये corona कमी झाला होता तेव्हा जे नेहमीचेच बुडवे आहेत त्यांच्या कडून वसुली चालू केली होती. आणि त्या मध्ये काही गैर नाही. मला देशातील एक राज्य दाखवा जिथे पोलिस लाच घेत नाहीत ,हफ्ते घेत नाहीत . नंतर राज्याला बदनाम करा. फडणवीस मुख्य मंत्री होते तेव्हा सुद्धा वसुली चालू च होती.ती निरंतर चालू आहे.

In reply to by Rajesh188

+१. भाजप समर्थकानी आधी चतूर प्रदेश मधील गुन्हेगारी वसूली ह्यावर बोलावे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

म्हणजे तिकडे हे चालतं म्हणून इथेही त्याचे समर्थन करणार का? चांगले आहे.. :)

In reply to by सॅगी

आरो लागलेत. ते कोर्टात सिध्द झालेले नाहीत. दोन चार भाजप समर्थकानी वसूली चाललीय असं सांगीतलं म्हणून गुन्हा सिध्द झाला असं होत नाही. त्यासाठी न्यायालय आहे. वसुली चाललीय तर ती कोर्टात सिध्द होईल, नसेल तर नाही. अर्थात सरकारवर बिनबूडाचे आरोप करन्यात भाजपवाल्यांचा हात कुणी धरू शकत नाही. त्यांची सत्ता होता तेव्हा किती नेते जेल मध्ये गेले हेयावरून भाजप्यांच्या विश्वासार्हता समजेल. ऊलट अनेक नेते भाजप मध्ये येऊन पावन झाले. त्यामुळे भाजपचे आरोप ही निव्वळ थापेबाजी असते हे राज्यातील जनतेला कळलेय. आणी हे कळल्यानेच जनता भाजपच्या आरोपांना सिरीयस घेत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तर तुम्हीही तेच करताय की... मग,
भाजपचे आरोप ही निव्वळ थापेबाजी
आणि तुमचे आरोप म्हणजे राजा हरिश्र्चंद्राचा न्याय म्हणायचे का?

In reply to by Rajesh188

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

In reply to by Rajesh188

आणि आपल्याला कि बोर्डाचे , एवढंच काय तो फरक , पवारांच्या खेळीपुढे फडणवीस टिकले नाहीत एवढाच काय तो कमीपणा , नाहीतर उद्धव पेक्षा फडणवीस कधीही श्रेष्ठच हे कुठे ना कुठे मान्यच करावे लागेल , मागचे पाच वर्ष विसरलात काय , बरं तसं म्हणावे तर दुधाची वाटी पण समोर नाही ( असे मी गृहीत धरतो) भाजपचे वय काँग्रेस च्या वयाचे निम्म्याने सुद्धा नाही , त्या मानाने काम बरेच उत्तम आहे , भलेही ते राम मंदिर असो वा इतर भिकारपंथी प्रश्न , निकृष्ट दर्जाचे प्रश्न असले तरी किमान ते सोडवले तरी , केंद्राने जी एस टी घेऊ नये म्हणे ----- अरे आधी जो भ्रष्टाचार आहे तो थांबवा , जी एस टी ची सुद्धा गरज पडणार नाही , विस्तार भयास्तव नाहीतर इकडून तिकडे गेले वारे ( आणि ते दरवेळी जातेच) होऊ नये म्हणून थांबतो

In reply to by स्वलिखित

तर उद्धव पेक्षा फडणवीस कधीही श्रेष्ठच हे कुठे ना कुठे मान्यच करावे लागेल , >>> असहमत. फडणवीसाचा कारभार आजपर्यंतचा सर्वात खराब कारभार होता. ऊध्दव अतिशष ऊत्तृयेट प्रशासन चालवत आहेत. भलेही ते राम मंदिर असो वा इतर भिकारपंथी प्रश्न , निकृष्ट दर्जाचे प्रश्न असले तरी किमान ते सोडवले तरी ,>>>> राममंदीराच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलाय तो पुरावे पाहून. भाजपचा तिथे काहीहा संबंध नाही. अफवा पसरवण्याचो काम भाजप समर्थक करत असतात. अरे आधी जो भ्रष्टाचार आहे तो थांबवा >>> भ्रष्टाचार आहे तर पुरावे गोळा करून कोर्टात जावे. खोटे आरोप करून काहीच मिळत नाही. हवेत लाथा. केंद्राने जीएसटी अडवून निच राजकारण सुरू केलंय हे जनता पाहतेय.

In reply to by स्वलिखित

आधी जो भ्रष्टाचार आहे तो थांबवा , जी एस टी ची सुद्धा गरज पडणार नाही >>> सहमत. मंत्र्यांचे बंगले दुरुस्त करण्यात व खंडणी गोळा करण्यात वेळ घालवत आहेत ते थांबवले तर कोरोंनाकडे लक्स यायला जमेल यांना.

In reply to by दिगोचि

ते आपले बेगडी हिंदुत्व आणि भोंदू मराठीपण जपण्यातच दंग आहेत... हिंदुहृदय सम्राट पण जनाब झाले आणि केम छो वरलीचे पोस्टर्स लागले... हिंदूंची कत्तल करणारा, टिपू सुलतान, ह्याचे गोडवे गाणारा, राहुल गांधी, हाच ह्यांचा नेता झाला आहे...

In reply to by स्वलिखित

ही आत्मप्रौढी आहे.उध्दव ठाकरे हे फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम राज्य कारभार करत आहेत. त्यांचा संयमी स्वभाव आणि काम करण्याची ईच्छा ही फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम आहे.

In reply to by Rajesh188

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत... गोल गोल राणी ......

In reply to by मुक्त विहारि

अमित शाह,योगी ह्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे आहेत.अनेक bjp नेत्यावर खुनाचे,दंगल मजवण्याचे गुन्हे आहेत. सामान्य लोकांना मारहाण ह कथित गुन्हा आहे. परत तेच तेच प्रश्न विचारू नका. नाही तर इतिहास उकरून कढवा लागेल आणि उत्तर देणे मुश्किल होईल.

In reply to by Rajesh188

हे सर्व गुन्हे खोटे होते हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. नाही तर इतिहास उकरून कढवा लागेल आणि उत्तर देणे मुश्किल होईल. काढा उकरून. स्वत:ला कणभरही माहिती नाही हे कायमच दिसले आहे. ठाकरे सरकार अत्यंत उत्तम काम करीत आहे हे नुसते पालुपद सुरू आहे. परंतु १७ महिन्यात केलेले एकही काम सांगता येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

परंतु १७ महिन्यात केलेले एकही काम सांगता येत नाही. -- जनतेसाठी केले असेल एकादे काम, तर सांगतील ना. फक्त स्वत:साठी १०० कोटी दरमाह वसुली सुरु होती, करोना काळात. जनतेची काय पडलेय या भ्रष्टवादींना. आज साडे आठला परत येणार आहे फेसबुकवर लाईव्ह, बिन कामाची बकबक ऐकायला तयार राहावे जनतेने.

In reply to by प्रसाद_१९८२

फक्त स्वत:साठी १०० कोटी दरमाह वसुली सुरु होती, करोना काळात. मी नाय ज्जा !!!!! प्रसादभावा गणित कच्च आहे आपल. ते १०० कोटी फकस्त हुंबैतले हायेत. बाकीचा म्हाराष्ट्रातले पण मोजा. (प्रति जिल्हा १०० कोटी तर ३६ जिल्हे गुणिले १०० कोटी = ३६०० कोटी प्रतिमहिना)

In reply to by Rajesh188

मग तर नक्कीच काढा.... सामान्य लोकांना मारहाण ह कथित गुन्हा आहे. हो का? मग त्या मारहाण करणार्या पोलीसांना का निलंबित केले? --------- पळपुटेपणा सोडा आणि थापा मारणे, पण सोडा ....

In reply to by Rajesh188

ही आत्मप्रौढी आहे.उध्दव ठाकरे हे फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम राज्य कारभार करत आहेत. त्यांचा संयमी स्वभाव आणि काम करण्याची ईच्छा ही फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम आहे. -- बस कर पगले ! अब रुलायेगा क्या ? तुही सच्चा 'वडापाव' सैनिक है. :))

In reply to by प्रसाद_१९८२

आणि गंमत म्हणजे काहीही झाले तरी आपल्या पक्षाचे किंवा नेत्याचे अमुक एक चुकले याविषयी चकार शब्द यांच्या (आणि आप समर्थकांच्या) तोंडातून बाहेर कधी पडायचा नाही. आणि हेच लोक इतरांना 'भक्त' वगैरे सर्टिफिकिटे वाटत फिरत असतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आधी असल्या लोकांचं हसू यायचं आता तेही येत नाही. हास्यास्पद च्या पलीकडे काही असतं तिकडे पोहोचले आहेत. कधीही तथ्यांवर आधारित न बोलणे, स्वतःचा बायस लाळघोटेपणाच्या पलीकडे पोहोचलेला असताना दुसऱ्याला अंधभक्त वगैरे संबोधणे, कोर्टात नाचक्की झालेली असतानाही अजून आरोप आहेत असं एक बाजूला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला कोर्टाने निर्णय दिलेले असतानाही दोषी धरणे, टिपीकल आहे हे सगळं. कधी कधी वाटतं सगळ्यात चांगला मार्ग दुर्लक्ष करणे आहे पण खोटी माहिती रेटून पुढे ढकलणे चालू असते म्हणून केव्हातरी उत्तर द्यावेच वाटते. ************** शेवटी काय भक्ती ही स्वतःच्या इच्छेने केलेली असते, पण गुलामगिरी मात्र मजबुरी मधून येते. त्यामुळे गुलाम होण्यापेक्षा भक्त होणे केव्हाही चांगले.

In reply to by Rajesh188

+१. शिवाय ऊत्तम मंत्रामंडळ आहे. पुरात दात दाखवत सेल्फ्या घेणारे सत्तेत नाहीत हे पवारांच्या कृपेने राज्यावर झालेले ऊपकार आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

छगन भुजबळ - भ्रष्टाचारामुळे २ वर्षे तुरूंगवास, सध्या जामिनावर बाहेर नबाब मलिक - शिवसेना हा मुर्दाडांचा पक्ष आहे, उद्धव ठाकरे मुर्दाडांचे नेते आहेत, असे जाहीर वक्तव्य केले होते. पूर्वी भ्रष्टाचारामुळे मंत्रीपद सोडावे लागले होते. धनंजय मुंडे - दुसऱ्या महिलेबरोबर संबंध, बलात्काराचे आरोप संजय राठोड - दुसऱ्या महिलेबरोबरील संबधातून महिलेची आत्महत्या, मंत्रीपद सोडावे लागले. अनिल देशमुख - खंडणीच्या आरोपांमुळे मंत्रीपद सोडावे लागले. हसन मुश्रीफ - २६/११ चा हल्ला संघाने केल्याचे खोटे आरोप केले. बच्चू कडू - सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याने एक वर्षे तुरूंगवासाची शिक्षा, सध्या जामिनावर बाहेर. उद्धव ठाकरे - शून्य निर्णयक्षमता, १३ महिने घरातून बाहेर पडले नाहीत. वर्षा गायकवाड - सर्व परीक्षा सातत्याने पुढे ढकलणे एवढेच निर्णय घेतले, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण वर्ष वाया गेले. आव्हाड - टीकाकारांना घरी पकडून आणून बेदम मारहाण केली. __________ ऊत्तम मंत्रामंडळ !

In reply to by श्रीगुरुजी

ह्यातील बहुतांश आरोप आहेत. मुख्यमंत्री घराबाहेर निघालो नाहीत ही खुपच चांगली गोष्टय. दो गज की दुरी रखे असं टीवीवर सांगून बंगालात लाखोंच्या सभा घेणार्यांमधले ते नाहीत ह्या बद्दल राज्यातील जनतेला गर्व वाटतो. कृतीतून सिध्द करनार्यातील आहेत. आणी वराल काही ऊद्या भाजपात आले की पावन होतील. ठाकरेंनी युती साठी हात पुढे केला की तेच कर्तृत्वशुन्याचे कर्तृत्ववान होतील : ) सर्व सत्ते भोवती फिरतं. भाजपाला जनतेशी नाहीतर सत्ते शी घेणेदेणे असते. त्यामुळे विरोधात बसवले पवारांनी तेच योग्य केले. राज्यात जनहिताचे सरकार आहे म्हणून ऊत्तम सुविधा मिळताहेत. नाहीतर कोल्हापुर चा पुर ऊदाहरणासाठी आहेच.

In reply to by श्रीगुरुजी

उत्तम कामे आहेत.. बाकी महामहीम मुख्यमंत्र्यांच्या नावासमोर अजुन एक काम लिहायचे राहिले.... "गोल गोल बोलबच्चन देणारे फेबु लाईव्ह करणे आणि सभागॄहात दसरा मेळाव्याचे भाषण वाचणे."

In reply to by अमरेंद्र बाहुबली

राज्य सरकारने केलेली जनहिताची कामे सांगीतलीत तर फारच उत्तम... उगाच, शाब्दिक बुडबुडे सोडत बसू नका...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रधानसेवक कधीही दसरा मेळावा वगैरे घेत नाही हो...ते माननीय महामहीम उद्धवरावांचेच काम...

केंद्रीय उद्योगपती धार्जिणे सरकार शेती व्यवसाय चे संघटित उद्योगात रूपांतर करण्याचे प्रयत्न करत आहे .म्हणजे एक हाती शेती व्यवसाय वर सत्ता गाजवता येईल आणि गोरगरीब शेतकऱ्यांना गुलाम ,नोकर बनवता येईल. हा उध्येश आणि एकहाती सत्ता निर्माण झाली की मध्यम वर्गीय,नोकरदार ह्यांना कधी ही कसे ही पिळून काढता येईल. येईल त्यांना अनुभव काही वर्षातच.

In reply to by Rajesh188

तुम्ही पळपुटेपणा करता... 1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

Mumbai: mid-day investigation jolts BMC into action, probe ordered against fliers who escaped quarantine -------------------------------------------------------------------------------------------- Blame game ensues after Mid-Day finds BMC officials at Mumbai airport took bribes from international passengers to allow escape from mandatory quarantine आपल्या महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या अनेक कारणां पैकी एक ! खा साल्यांनो पैसे खा, लोकांचे आयुष्य खा... :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati Badi... :- Sunny

In reply to by मदनबाण

आता पावसाळ्याआधी नालेसफाईचे टेंडर निघतील ना BMC चे. लाखो रुपयांचे टेंडर. एक दोन ठिकाणचे नाले सफाई करतानाचे आणि महापौर वगैरे अधिकारी पहाणी करतानाचे फोटो पण येतील. आणि मग आहेच नेमीची येतो पावसाळा आणि नाले गटारे तुडुंब.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सहमत. पण फक्त लाखो रुपयांचे टेंडर? अहो शेकडो कोटींचे बोला. कारण राज्यातील अनेक शहरामधे हाच प्रोंब्लेम आहे. शिवाय अनेक ठिकाणी मलमुत्र विसर्जन सेवा पण चान्गली नाही तिकडे पण लक्षद्यायला हवे. यासाठी सरकारकडे पैसे नाहीत फक्त मन्त्र्यान्चे बन्गले दुरुस्त करायला आहेत.

पुण्यात सकाळ पासून ससून मध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला. ऍडमिट होण्यासाठी रांग पण खाटा उपलब्ध नाहीत. रोज रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे राज्यकर्ते आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात दंग आहेत. यांना परिस्थिचे काही गांभीर्य आहे की नाही? पुणे आणि महाराष्ट्र सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर दिसतो आहे. वेळीच उपाय केले नाही तर कोरोना भयानक तांडव माजवेल अशी स्थिती आहे. दुसरीकडे टी व्ही वर कुंभ मेळ्याची गर्दी दाखवताहेत. पंढरपूरच्या निवडणूक प्रचाराच्या सभा गर्दीत होताना दिसताहेत. बंगालमधल्या प्रचंड सभा टी व्ही वर पाहिल्या. ही पंढरपूरची पोट निवडणूक आणि पाच राज्यातील निवडणुका निवडणूक आयोगाला पुढे ढकलता आल्या नसत्या का? की एव्हढी अक्कल त्यांनी खुंटीला टांगली आहे. बरं करोनाची एव्हढी परिस्थिती गम्भीर असताना पंतप्रधान, बीजेपी आणि इतर प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूकांबाबत काय भूमिका घेतली? त्यांनी का नाही पुढे ढकलण्याची विंनन्ती केली? काय चाललंय काही कळत नाही.

In reply to by बबन ताम्बे

सहमत. कुणाला गांभीर्य आहे असं दिसत नाही. जबाबदारी केंद्र अणि राज्य एकमेकांवर ढकलताहेत. राज्यात विरोधी पक्ष आहे म्हणुन केंद्र परिस्थितीचा फायदा घेतय की काय अशी शंका यायला लागली आहे. स्थानिक पातळीवर खाबूगिरी, टक्केवारी, रिग हे प्रकार सुरुच आहेत. आमच्या इमारती समोरील फुटपाथवरील मागच्याच वर्षी बसवलेल्या आणि चांगल्या असणाऱ्या टाईल्स बदलायला घेतल्यात. अशी कित्येक बिनकामाची "विकासकामे" बिनबोभाट सुरू आहेत. जिथे रस्ते पुल हवेत (पिंचिंवाडी ग्रामीण भाग) ते वर्षानुवर्षे करत नाहीत. शहरी भाग खाबुगिरी करत चकचकीत होपलेस स्मार्ट करत आहेत. या असल्या खाबूगिरीला कोण जाब विचारणार हाच प्रश्न आहे. इथे भाजपा सत्ताधारी झाल्यापासून कोणीच भ्रष्टाचाराच्याविरुद्ध आवाज उठवत नाही. बरेचसे काँगीवाले आता सत्ताधारी बनले आहेत. फक्त पक्ष बदलला. मंडळी तीच आहेत.

चालु घडामोडीतील मथळ्यातील. शेतक-यांच्या आंदोलनाची धग कमी होत आहे, ते सध्याचा करोनात्सव पाहता, टेंट रीकामे पडणे हे साहजिकच आहे, तरीही बातमीतील '' सध्या येथे ३०० -४०० आंदोलनकर्ते राहीले आहेत, त्यातील १०० शेतकरी आसपासच्या गावातील आहेत, जे येऊन जाऊन असतात'' ही गोष्ट चिवटपणाची साक्ष देणारी गोष्ट वाटली, शेतक-यांच्या लढावू बाण्याचं आपल्याला सुरुवातीपासून कौतुक वाटले आहे. आत्तापर्यंत दोन-तीनशे शेतक-यांना आपले प्राण गमवावे लागले, मात्र केंद्रसरकारला ते फार महत्वाचं वाटत नाही. पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटते, यातून सत्ताच केवळ किती आवश्यक आहे, आणि मोदी सरकार किती सत्तेचे भूकेले आहेत, तेही दिसून येते. कुंभमेळ्याची गर्दी पाहिली (दुवा) सरकारने कितीही काहीही महत्वाचे असले तरी असे कुंभमेळे, जत्रा, उत्सव, बंद केले पाहिजेत. परवानगी देऊ नये. पण, मतांसाठी आपला एक गठ्ठा असलेल्या मतांच्या विरोधात निर्णय घेणे कठीण काम असते. सरकारच्या मर्यादा आपण समजू शकतो. मागच्या वेळी त्या तबलिकी जमातीला करोनाच्या प्रादुर्भावासाठी जवळ जवळ सर्वांनीच जवाबदार धरले होते, त्यांची गर्दी करणे हे चुकच होते. तेव्हा, एकेक हुडकून त्यांच्या संपर्कातल्यांना होम कोरंटाईन किंवा दवाखान्यात भरती केले होते, काहींवर कायदेशीर गुन्हे दाखले केले होते. कुंभमेळ्यातील सर्वच सहभागींना शोधणे आता महाकठीण काम दिसते. सुरुवातीलाच १३०० लोक करोनाग्रस्त आल्याचे बातमी म्हटल्या जात आहे, आता होणा-या प्रादुर्भांवाबद्दल कायदेशीर कार्यवाही सहभागींवर व्हायला हवी. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पुढे कमी करणे अवघडा वाटत आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित होत आहे असे एकूण बातम्यांवरुन दिसत आहे. महाराष्ट्रात ठोस अशा उपाययोजनांच्या बाबतीत सध्या काही नवीन दिसत नाही, लस दिलेल्यांचे प्रमाण वाढत असले तरी वाढत्या रुग्णांवर काही उपाय ना केंद्राला सुचवता आला ना महाराष्ट्राला नवे काही करता आले, आता लॉकडाऊन करुन या वाढत्या रुग्ण संखेला किती आळा बसेल हे काळ ठरवेल. सर्वपक्षीय बैठकीत मा.फडनवीस म्हणाले की, व्यापारी, रोजगार, मजुर यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था, जनभावना याचा आदर करुन निर्णय घ्यावा. मा. फडनवीस एक महाराष्ट्राचा चांगला नेता दुर्दैवाने सत्तेच्या मोहापोटी वाया चालला आहे, असे वाटते. मा.पंतप्रधानांनी मा.मुख्यमंत्र्यांना सध्या इतर गोष्टींकडे ( म्हणजे फडनवीसांकडे) दुर्लक्ष करुन कामावर फोकस करावे असे म्हटले आहे. मा.पंतप्रधानांनी साताठ महिने जे लॉकडाऊन देशावर लादले, हजारो मजुर पायी चालून, टेंपोत बसून, गुदमरुन मरण पावले, गरोदर स्त्रीयांना पायी प्रवास करावा लागला, तो केवळ आज रात आठ बजह से, कोणता आगा न पिछा पाहता, सब कुछ बंद रहेगा असे अचानक निर्णय घेतल्यानंतर झालेले आपण पाहिले आहे, तो निर्णय घेतल्यावर अन्नाची पॉकीटं आणि पैशाची पाकीटं काही हेलीकॉप्टरमधून मजुरांच्या घरांवर, गरजुंच्या घरावर टाकली नव्हती. सध्या पंधरा एक दिवस कळ काढणे सर्वांच्या हिताचे आहे, असे दिसते. एक दिव्यभास्करची बातमी वाचनात आली गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं की ५००० रेमडिसीव्हिर इंजेक्शन भाजपाच्या प्रदेश अध्यक्षाकडे सापडले. एकीकडे सर्व जनता इंजेक्शनसाठी परेशान असतांना त्यांच्याकडे एवढा साठा कसा सापडला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं '' उन्ही से पुछे'' त्यावर दिव्य भास्करने बातमीबरोबर प्रदेशाध्यक्षांचा मोठ्या अक्षरात हेडलाईन म्हणुन केवळ मोबाईल नंबर छापला, हे लै भारी वाटले. राजकारण, समाजकारण, आणि विकासाच्या बाता या आणि इतर सर्वच गोष्टींच्या बाबतीत गुजरात म्हणजे देशाचा स्वर्ग असे आपल्या माथी मारल्या गेले आहे. कालच्या एका व्हीडीयोत सुरत, भावनगर, सुरत, अहमदाबाद, या ठिकाणीही करोनाचा हाहाकार माजलेला दिसत आहे, रुग्णांची हेळ्सांड होतांना दिसत आहे, सुविधांचा अभाव दिसत आहे, अशा वेळी महाराष्ट्रालाच बदनाम केले जाते त्याचं कारण केवळ राजकीयच आहे, असे वाटत आहे. देश म्हणून सर्वच राज्यांना समान सुविधा अशा कराल काळात दिला गेला पाहिजेज. लशीच्या असमान पुरवठ्याबद्दल उडालेलेला गदारोळ पाहता, मा. मोदीसरकार इथेही राजकारणच करतांना दिसत आहे, सध्या सर्वांचीच वेळ खराब आहे. सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्याची जवाबदारी पालक म्हणून केंद्राची आहेआणि दुर्दैवाने लॉकडाऊन शिवाय आजही परिस्थिती फार बदललेली नाही असेच म्हणावे लागत आहे. बाकी, आता दिवाबत्तीच्या महोत्सवानंतर घेऊन येत आहोत. 'लसोत्सव' कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट कसा करायचा ते शिकायचं आपल्या आदरणीय पंतप्रधान यांच्याकडून. पण, गेल्यावर्षापासून करोनाची कंडीशन हाताबाहेर जात असल्यामुळे टीव्हीवर येऊन काही नवीन टास्क दिला नाही. टीव्हीवर प्यारे देशवासीयो, भाइयो और बहनो असे ऐकण्यासाठी माझे कान आतूर झाले आहेत. :) -दिलीप बिरुटे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही ह्या राजवटीने केलेली, चांगली कामे, काही सांगीतली नाहीत ...

In reply to by मुक्त विहारि

केंद्र सरकार महाराष्ट्र ची अडवणूक करत आहे. प्रतेक कामात आडवा पाय घालत आहे. ह्या सरकार ची काम काय विचारताय सातवे वर्ष सुरू झाले मोदी सरकार चे. काय काम केले आहे . कंपन्या विकणे, नोट बंदी सारखे उथळ निर्णय घेणे,बँका चे खासगीकरण करणे,शेती उद्योगाची वाट लावणे,धार्मिक भावना भडकवने,विरोध पक्षाची राज्य सरकार असतील तर cbi पासून सर्व केंद्रीय संस्थेचा वापर करून राज्य चालवणे मुश्किल करून ठेवणे. सकाळी पाच लाच ह्यांचे राज्यपाल गुपचूप मुख्य मंत्री पदाची शपथ देत होते.

In reply to by Rajesh188

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत.... पळपुटेपणा न करता, वरील प्रश्र्नांची उत्तरे कधी देणार आहात?

In reply to by मुक्त विहारि

तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत राज्य सरकार कोणालाच वाचवत नाही जसे केंद्र सरकार अर्णव ला वाचवत होते.

In reply to by Rajesh188

निम्मा महाराष्ट्र आणि निम्मा भारत रस्त्यावर हागायला बसायचा , तो बंद झालाय , तेच खूप झालं सात वर्षासाठी , सत्तरचा हिशोब एवढ्या एकाच कामावरून क्लिअर करतो ... अजून काही ,

In reply to by स्वलिखित

Bjp सरकार यायच्या अगोदर किती तरी संडास बांधण्यासाठी सरकार प्रोत्साहन आणि सबसिडी देत होते. सार्वजनिक संडास मुतारी बांधण्यासाठी सरकार गावांना निधी देत होते. मुंबई मध्ये किती वर्षा पासून सार्वजनिक संडास आहेत त्याची देखभाल पण सरकार च करते. मोदी आल्यावर फक्त जाहिरात बाजी झाली काम झीरो. पेयजल योजना पण खूप वर्षांपासून आहे

In reply to by Rajesh188

प्रोत्साहन दिले , सबसिडी दिली , निधी दिले ह्यात फायनल गोल अचिव्हमेंट कुठे आहे ?? उलट आलेला निधी असा लुटला कि कीर्तनकार सुद्धा म्हणाले " कडबा तर सोडाच , ह्यांनी संडास खाल्ले " पेयजल योजना जितकी झाली तितकी उत्तम झाली त्याबद्दल दुमत नाही ,