एकेकाळी होतकरू विद्यार्थ्यांच्या मदतीला 'जगन्नाथ शंकर शेठ' यांच्यासारखी धनीक मंडळी मदतीला उभी असायची. आता काळ बदलला आहे. आपल्या समाजात झालेल्या शैक्षणिक क्रांतीनंतर अनेक 'मिनी जगन्नाथ शंकर शेठ' होतकरू विद्यार्थ्यांना मदत करायला सज्ज आहेत. इथे आमच्यासारखे शैक्षणिक सल्लागार त्यांना मदत करू शकतात. त्यांच्या मदतीसाठी योग्य विद्यार्थी कोण असेल याची नियमावली बनवून , त्यांना देण्यात येणार्या मदतीचे स्वरुप आणि प्रत्यक्ष मदत दिल्यावर त्या मदतीचा होणारा विनियोग या आवश्यक बाबींकडे लक्ष देणे हे काम आम्ही पार पाडत असतो.
या कार्यक्रमाची सुरुवात २०२० साली प्रायोगिक तत्त्वावर "समान संधी" कार्यक्रमाने झाली. त्यातून मिळालेल्या यशातून प्रेरणा घेऊन २०२१ साठी आता पुढे मार्गक्रमण करत आहोत.योग्य ती पात्रता आहे पण योग्य ती शैक्षणिक सामुग्री आणि साधने हाताशी नसलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणार्यांना जेईई आणि नीट या स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचे असते. या परीक्षांसाठी तयारी करणार्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी साधने आणि वर्षभर मोफत मार्गदर्शन(academic tools + Mentor support) देण्यासाठी जो खर्च येतो तो देण्यास सध्या काही 'मिनी जगन्नाथ शंकर शेठ' मदतीची रक्कम घेऊन तयार आहेत.
आपल्या ओळखीत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती द्या आणि आम्हाला संपर्क करायला सांगा. तत्पूर्वी काही नियम वाचून घ्या.
१ ही मदत आर्थिक रुपात नसेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना थेट पैसे देण्यात येणार नाहीत. बर्याच वेळ अशी थेट मदत पालक स्वतःसाठी वापरतात असे लक्षात आल्यावर हा नियम बनवण्यात आला आहे.
२ साधारण रु. २५००० मूल्याची शैक्षणिक साधने या योजनेद्वारे केवळ रु. २५०० मध्ये उपलब्ध केली जातील. हे मूल्य देणारे दाते आमच्याकडे आहेत.
आता विद्यार्थ्याच्या पात्रते संबधीचे नियम वाचा.
१ विद्यार्थी शास्त्र शाखेचाच असावा. त्याला १० वीच्या अंतिम परिक्षेत ८५% गुण असावेत. यापैकी शास्त्र विषयांत ९०+ टक्केवारी असली पाहिजे.
२ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६००००० (सहा लाख) पेक्षा जास्त नसावे.
आपल्या ओळखीत योग्य असे विद्यार्थी असल्यास 75066 46029 या क्रमांकावर संपर्क करावा.
वाचने
5456
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम.
धन्यवाद
धन्यवाद
खारीचा वाटा मी सुद्धा देऊ
धन्यवाद
इथेच अधिक माहिती सविस्तर
In reply to धन्यवाद by विनायक प्रभू
ठीक
In reply to इथेच अधिक माहिती सविस्तर by खेडूत
छान उपक्रम
आवरा.
In reply to छान उपक्रम by उपयोजक
घरातीलच उदाहरणे आहेत.....
In reply to आवरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याबद्दल जास्त लिहावे
In reply to घरातीलच उदाहरणे आहेत..... by मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद