नमस्कार नमस्कार
लय लांबड लावत नाय मुद्द्याचं चालू करतोय
हा तर सगळं काही बंद पडून १ वर्ष झालय आणि कुठेतरी जायचंय असं म्हणून नुसतं एक्सेल वर प्लॅन बनवून बनवून आणि मॅप वर बघून बघूनच सगळं फिरून झालं (आणखी कोणी समदुःखी असेल तर बोलते व्हा)
मग बस्स आता एकच उपाय मिपावर मदत मागायची
हा तर १००-१ प्लॅन पैकी एक प्लॅन खाली देतोय, जर का कोणी तिकडे* गेलं असेल तर माहिती सांगावी
* तिकडे म्हणजे पुणे ते - दिल्ली विमानतळ, ISBT, New Delhi रेल्वे स्टेशन आणि इथून पुढे आणि परत असा प्रवास केला असेल तरी अनुभव सांगावा
पुणे - दिल्ली - विमान प्रवास
दिल्ली - डेहराडून - बस/रेल्वे
डेहराडून - मंडल - HRTC बस (Mandal is a village. District: Chamoli, Uttarakhand)
मंडल इथून सुमो करून - Chopta, चंद्रशिला, जोशीमठ, AULI (रुपये शिल्लक असतील तर Valley of Flowers)
परत येताना फक्त दिल्ली ते पुणे रेल्वे हा बदल का?
का तर फोटो आणि विडिओ पाठवायची चांगली जागा म्हणजे रेल्वे चे सहा फुटाचे बेड, कारण विमानाने लवकर माघारी आलो तरी दोन तीन दिवस फोटो पाहण्यात आणि लोकांना पाठवण्यात जातात.
अधिक माहिती
कधी प्रवास सुरु करणार: 15-April or 01-May
किती प्रवासी: एक - मी वय ३९ शुद्ध शाकाहारी (काहींना घाई असते कुठे काय चांगले मिळते ते सांगायची पण ते समोरचा खातो का हे आधी विचारत नाहीत)
खर्च: विमान प्रवास सहित दहा हजार
सुट्टी: १०० शिल्लक आहेत (बायको फक्त सात दिवस देतेय)
का प्रवास करणार: मंडल पासून अनुसया माता मंदिर आणि श्री दत्त जन्म स्थान जवळ आहे
तळटीप: (तळटीपा)
- COVID साठी कोणती काळजी घ्यावी लागतेय आणि बदलणारे नियम याची माहिती दिली तर स्वागत आहे
- माझे मिपावर कधीतरी लॉगिन होते, सगळ्यांना उत्तरे देता येतील असे नाही समजून घ्यावे
- भाषा थोडी सातारी वाटेल, मग बरोबरय - फलटणकर आहे
वाचने
11044
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुद्याचं बोलायचं तर
धन्यवाद माहिती बद्दल
In reply to मुद्याचं बोलायचं तर by कंजूस
प्रामाणिक सल्ला आहे की काही
रैट.
In reply to प्रामाणिक सल्ला आहे की काही by मनो
पटतंय....
In reply to प्रामाणिक सल्ला आहे की काही by मनो
जरा दम धरा . .
नोंद घेतलीये
In reply to जरा दम धरा . . by सुक्या
अनसूया असे बरोबर नाव आहे.
दत्ताची आई म्हणूया.
In reply to अनसूया असे बरोबर नाव आहे. by खेडूत
अनसूया असे बरोबर ... आणि सुट्ट्या बद्दल म्हणाल तर
In reply to अनसूया असे बरोबर नाव आहे. by खेडूत
फिरायचं असेल तर महाराष्ट्रातच
ठीक आहे मग
In reply to फिरायचं असेल तर महाराष्ट्रातच by प्रचेतस
- माझे मिपावर कधीतरी लॉगिन
कालचे लॉगिन तसेच चालू आहे, आता इथेच फिरून प्रतिसाद देतो
In reply to - माझे मिपावर कधीतरी लॉगिन by चौथा कोनाडा
आता कुठेच जावू नका
नोंद घेतलीये, प्रवास बंद, कुटुंबासह YouTube वर आरामात उत्तराखंड
In reply to आता कुठेच जावू नका by Rajesh188
मनो आणि प्रचेतस यांनी
महाराष्ट्रात covid वाढेल ते राज्याच्या हिताचे आहे
भिक नको पण कुत्रा आवर अशी
In reply to महाराष्ट्रात covid वाढेल ते राज्याच्या हिताचे आहे by Rajesh188
घरीच टाका तंबू ....
YouTube वरचे विडिओज पाहून