Skip to main content

शब्द झाले मोती.. - २

लेखक गणेशा यांनी शनिवार, 09/05/2020 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द झाले मोती..१ मागील धाग्याबद्दल : या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले. नियम : तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही. उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 179525
प्रतिक्रिया 240

प्रतिक्रिया

रम्य हाक आठवणींची.... उंबरठा ओलांडतांना माप सुखाचे अमाप सांडले सप्त रंगात रंगली पाऊले नको फिरू मागे .. कोणाला आठवतांना... असच होत त्या आठवणींची मौजच अनोखी....किती किती पाऊले चाललो न थकता न थांबता,म्हणूनच आजही ती धावपळ तो उत्साह मनाला आनंद देऊन जातो. मी तेव्हा अशी वेंधळी होते...कि पुण्यात आल्या आल्याच पीएमटी मध्ये माझी पर्स चोरीला गेली...हाय राम ..वेलकम वेंधळी मुलगी असच काहीस झालं...रडणार कोण पण ?मलाच हौस ना .पण पैसे एका ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याच्या सवयीमुळे बरोबर अजून पैसे होते...नतंर बाबांनी येऊन मला नवीन पर्स घेऊन दिली होती ‘विजय’ मधून जी मी आता पर्यत जपून ठेवली होती ....बरकत होती त्या पर्सला ,कधीच पैसे संपायचे नाहीत.आता ती पर्स गिरीजाला खेळायला दिली आहे.(अशाच दोन पर्स माझ्या चोरीला गेल्या ..पर्स चोरीला जाण्यापेक्षा त्या सगळ्या पर्स गिफ्ट होत्या म्हणून जास्तच वाईट वाटायचे) . तर ऑफिसासाठी मुलाखत चांगली झाली.निवड झाली ,राहायचा प्रश्न ?तर दादाकडे राहणार होते.तर तिथेच माझी ओळख नवीन मैत्रिणीशी झाली सोनाक्षी,सारिका यांच्याशी.सोनाक्षी खूपच बडबडी होती,मराठी शिकवायची,स्पष्ट बोलायची.अशी मोकळी राहणारी ,छान बोलणारी जे मनात ते ओठावर बोलणारी मुलगी मी पहिल्यांदाच पाहिली होती.तिच्याशी मारलेल्या एकूण एक गप्पा मला अजून आठवतात.सोनाक्षी सप जवळच राहायची ,तीच नवीनच लग्न झाल होत.नवर्याविषयी भरभरून बोलायची,त्यांचे दोघांचे फोटो दाखवायची. तेव्हा मला वाटायचं मलाही असाच नवरा मिळायला पाहिजे.ऑफिसमध्ये आमचे डेमो लेक्चर व्हायची ज्याचा मला पुढे खूप फायदा झाला.सोनाक्षीने मला खूप शिकवलं कसे बोलायचं ,तिच्यामुळे मी वेगळीच मला सापडले,कधी कधी मी जास्तच टेन्शन घ्यायचे ती मला बहिणीप्रमाणे समजावायची.पुढे ती मी आणि सारिका असा ग्रुप झाला .धमाल करायचो आम्ही ..तर माझ घर जवळ होत आणि दुपारी कोणीच नाही तेव्हा माझ्या घरी पावभाजी करायचा बेत सोनाक्षीनेच केला ...मला पावभाजी यायची आधीपासून पण हिने मला अजून चांगल्या प्रकारे शिकवली...नन्तर या घरी गेल्या.दादा संध्याकाळी आला,एवढी पावभाजी का केली ? विचारलं तेव्हा सांगितलं कि “मैत्रिणी आल्या होत्या...आंम्ही केली वगैरे”दादाचा चेहरा चिंताग्रस्त झाला...म्हणाला “हे पुणे आहे .अस ८-१० दिवस ओळखीच्या लोकांना घरी नाही आणायचं”,खरच मी त्याला आधी विचारलं पाहिजे होते....पण यां काळात मी स्वैपाक शिकले..पोळ्या नाही शिकले त्या आम्ही विकत आणायचो..म्हनुनच नवरा अजून पण तुला चांगल्या पोळ्या जमत नाही म्हणून ओरडतो. ..पण भाजी तूच कर अस सासरी कौतुक असत...पुढे वहिनी आल्यावर गोड पदार्थ मी शिकले..मी एक रेसिपी पुस्तक घेतलं होत,..मस्त होत ते त्यातले सगळे पदार्थ मी बनविले.तेव्हा यु ट्यूब नव्हत..बर झाल नव्हत नाहीतर अस पारंपारिक जेवण मी शिकले नसते. सोनाक्षी बरोबर मी तुळशी बागेत खूप फिरायचे,तिने पहिल्यांदा मला जीन्स घेऊन दिली जी मी अजून नाही वापरली ...तशीच पडली..पुढे दगडूशेठ ,मंडई,तुळशी बाग असा माझा बराचदा क्रम असायचा आता काय स्वत:चे पैसे मिळत होते ,मस्त खरेदी करायचे..इतके फिरायची कि दादा मला तुळशी बागेत सोडून घरी पळून गेला होता (हा हाहा).तेव्हा मी दीपिका सारखा ड्रेस घेतला होता...स्वत:वरच खुश होते,त्याचावर काढलेला फोटो आजही माझा जीमेलचा प्रोफ़ाईल फोटो आहे. मी पुण्यात वाचनालय लावलं होत ,,खरच नाव आठवत नाहीये पण हुजुरपाग्याच्या पुढेच त्या रोडवर होत ते...मस्त पुस्तक वाचायची ...लिखाण करायचे ,दादा मुद्दाम माझ्यासाठी laptop चालू ठेऊन ऑफिसला जायचा ,मी लिहिते हे मी घरी कोणा कोणालाच नाही सांगितलं..माझच विश्व होत ते...स्वप्नातलं... मी सोनाक्षी बरोबर माझे कांदे-पोहेच्या गोष्टी सांगायचे,ती मला सांगायची”लग्न तुला करायचय नीट विचार कर”,तसच ती सारिकाला पण तिच्या संसाराच्या चार गोष्टी समजावून सांगायची...हिला कस जमत हे सगळ काय माहीत?..मला वाटायचं. पुढे नवीन बॉस आला होता ,माझ्या कामच कौतुक करायचा सगळ्यांसमोर तर आमची सोना “तुझ्यासारखाच दिसतो हा ,तुझ्यावर लाईन मारतोय ,आम्ही काय चांगल काम करत नाही का म्हणायची” मी तर मनातच कोपरापासून तिला नमस्कार करायचे. पुढे अजून एक दिपाली नावाची एकदम मॉड मुलगी आली ,सोना आणि हीच कधीच पटल नाही..ह्या दोघी एकदा खूपच भांडल्या होत्या.दीपाचा नवरा दुबईला होता ती त्याला खूप मिस करायची..आमच काम संपल मी घरी जायला निघालो,तर खाली दीपाचा नवरा तिला सरप्राईज द्यायला आला होता थेट दुबुईहुन...दीपाने पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली...सगळे पाहतच बसले....मला तर हे सगळ नवीनच होत...तेव्हा मी अशी काकूबाई होते कि बस... सीमा हिंदी शिकवायची ,तीच घर नाना पेठेत होत.एकदम पुणेरी वातावरण होत तिच्या बोलण्यात वागण्यात...ती आणि मी जिम पार्टनर होतो,तीच लग्न ठरलं होत ,तर माझ ठरायच होत.तीच वय बरच होत,पण गोड पुणेरी बोलायची.एक कोकणातली देखील मैत्रीण होती....खूपच हुशार होती ,ती पिजी म्हणून राहायची ,मला पहिल्यांदा पिजी हा प्रकार समाजला.तिच्यामुळे मला कोकणातले लोक किती साधे पण हुशार असते याची झलक मिळाली. या सगळ्यांमध्ये आज फक्त सोनाक्षी माझ्या संपर्कात आहे ,,,कारण ती तशीच आहे गोड आणि मोकळी...तिच्याशी बोललं कि मला छान वाटत..शेवटी माणस मनात घर करतात आणि तिथे कायम फार थोडी राहतात ,,,अशी सोना... -भक्ती

मैं क्या कुछ नही सोचता क्या क्या सोच सकता हूँ ये तुम सोच नही सकती तुम्हारी सोचको है मर्यादा अनखिंची अनकही अनसुनी दुनिया और समाज की सोच से तुम्हारी सोच मिलनी चाहिए ये किसीने युगों पहले सोच रखा है पर आज तक क्यूं इसे ढोया जा रहा है ये कोई नही सोचता अब तुम सोच कर देखों की, मैं भी क्या क्या सोचता हूँ... ...तुम्हारे लिए, हमारे लिए! - सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

आयला? आमाला काय इचारच करता येत नाय असं समजतीस का काय? अगं माझ्या टकुर्‍यात कसले कसले सर्किट सूरु असत्यात तुला काय ठाव? तुज्या सारखं नाय आपलं डोकं... कुणी बी काय बी सांगितल की लागली बुगू बुगू मुंडी हलवायला कोण म्हनलं जे तुज्या आज्याने केलं त्येच तुज्या बापानं केल पायजे अन जे बापाने केलं त्येच तुला बी करायला पायजे अग येडे जमाना बदललाय आता आता इचार करून बघ माज्या टकुर्‍या काय काय शिजत असेल ते तुज्यासाठी.. आपल्या दोघांसाठी पैजारबुवा,

आश्वस्त सुबह थकी दोपहरी के साथ अंगडाई भरती सांज के सायें लिए रात के मौन मलमली आंचलसे मुझे बांधे हुए फिरसे मिलने के लिए पुरवाई पर एक पुकार छोडती है तब वह पुकार मेरी खालिस मगर एक वीरान जीवनी बन जाती है जब मेरी जीवनी अपनी करूणामय हाथोंमे लिए तुम पढती हो और प्रीतभरी अनुपम आंखोंसे उसे संवार लेती हो तो वह बन जाती है फिरसे शबनम से सजी हुई आश्वस्त सुबह! - सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

एक एक शब्दावर सुंदर नक्षीकाम केले आहे असे वाटते आहे.. वाचताना खुप छान आनंद देतायेत शब्द. खोटे वाटेल.. पण आजच तुझी आठवण आलेली... त्यामुळे मस्त वाटले वाचुन

In reply to by चांदणे संदीप

सकाळी सकाळी कोठा साफ झाला की दुपारी परत एकदा चापून जेवता येते आणि मग संध्याकाळी चहा सोबत भजीचा मनमुराद आनंद लुटता येतो रात्री चे जेवणं झाले की तटतटून फुगलेल्या पोटावर हात फिरवताना कधीतरी एखादा चूकार आवाज निघून जातो अन तू नाकाला पदर लावतेस अन कुत्सित नजरेने माझ्या कडे पहात खोलीतुन निघून जातेस मी हा अपमान कसाबसा पोटात ढकलतो कायमचूर्णा सोबत कारण मला माहीत असतं सकाळी सकाळी कोठा साफ झाला की दुपारी परत एकदा चापून जेवता येते पैजारबुवा,

आजकाल उन्हं सरळ खिडकीतून आत येतात, तू बसायचीस त्या खुर्चीवर रेंगाळतात काही वेळ... कदाचित, शोधत असतील ते तुझ्या खाणा-खुणा.. तुझे इथे तिथे विखुरलेले अस्तित्व सापडतेय का ते पुन्हा पुन्हा पाहत असतील बहुतेक... पण त्यांना काहीच सापडत नसणार.. मार्च च्या असल्या उन्हाळ्यात ही तुझ्या आठवणींचे मग आभाळ भरून येते, आणि मग उन्हाला हि कळते तुझ्या सावल्या कधीच डोळ्यांत विरघळल्यात.. कायमच्या. आणि मग आल्या पावली दाटलेल्या आभाळाच्या पलीकडे उन्हं जाऊन बसतात... - शब्दमेघ... २२ मार्च २०२१

आताशा ऊन मोकळ्या केसांत ऊनपारा देऊन खिडकीत निवांत पहूडत.. बिल्लोरी आभाळ हळूच डोकावत ही उन्हाची झळ असं भासवत कोसळत.. पार्याचा बिंदू थेंबाचे मोती केसांतली धूंदी ऊनआभाळ वरती खेळतात.. -भक्ती

सूर्य १८० अंशाकडे वळू लागला की तू यायची तशीच तूझी गुलाबपाकळी आठवण येते माझ्याकडे.. ती पार विरघळते माझ्या हृदयात.. आणि मग माझ्या शरीरातून गुलाबरक्त वाहत राहते.. लालसर.. तुझ्या आठवणींचे... हृदयाच्या आवर्तनांचा वेग वाढतच जातो, अगदी दुप्पट वेगाने हृदय धडधड करते, जणू काही माझ्या श्वासात तुझ्या श्वासांना गुंतवून पुन्हा तूच उभी आहेस..अगदी तशीच....तुझ्या अस्तित्वाचा सुगंध सगळी कडे दरवळायला लागतो आणि तेव्हड्यात तुझी आठवण मला निशब्द करून पुन्हा दूर क्षितिजापल्याड निघून जाते..सारे रक्त गोठल्या सारखे होते...आता सूर्य मावळून गेलेला असतो.. मागे उरलेला असतो तुझा मरून लाल रंगाचा पदर... तो अजूनही अडकलेला असतो हलकासा ढगांच्या हातात..आता मात्र हळू हळू रात्र येते.. तीच वेचते गुलाबपुष्प माझ्या डोळ्यातून... दूर चंद्राची कोर सुरेल बासरी वाजवतेय असा भास होतो मला... पण तो भास कसला? त्या मधून मला तुझी धून ऐकू येते.. आणि तेव्हड्यात रात्र अलगद हळुवार केसांवर हात फिरवत कुशीत घेते मला... तूच माघारी आलेली असते का पुन्हा ? हा प्रश्न घेऊन मी पहाटे उठतो आणि गुलाबा सारखे लाल झालेले आकाश पुन्हा माझ्याकडे पाहत राहते... - शब्दमेघ २४ मार्च २०२१

बोचरी पहाट शिंपडे गुलाबदाणी अन..तुझ्या अत्तरथेंब आठवणी . . अलगद उशाशी ठेवून माझ्या श्वासांचे आवर्तन स्वप्नांना घट्ट बिलगून मंदधून हृदयात मिसळून हलके हलके... साखरझोपेतच अर्क सांडतो दरवळला सूर्य क्षितिजी उगवतो कोमल ऊन ऊन न्हाऊ घालतो तरीही आठवदर्प डोळ्यांत उतरतो चालत चालत... स्थिरावू पाही लालसर पदरात माळलेल्या वेणीच्या पाकळ्यांत गुलाब अर्काच्या रेशम धूपात प्रसन्न गात्र गायन सुरांत -भक्ती

(नाव बदलले आहे ) मेघा... "तू हसलीस कि फुले उमलू लागतात.." ह्या ओळी आज आठवायची काहीच गरज नव्हती खरे तर... आज चतुर्थी होती, मनसोक्त श्रीखंड खाऊन, ४५ अंशात आलेल्या चंद्राच्या छान प्रकाशात गच्चीवर मस्त मच्चरदाणी लावून पडलोय...आकाशात निरखूण पाहिल्यावर त्याच्या वेगवेगळ्या तुकड्यात एखादी चांदणी लुकलूक करताना दिसतेय.. उद्या पासून नविन फायनान्स वर्ष सुरु होते आहे, त्या संबंधी विचार करत बसलो होतो आणि मध्येच... "तू हसली कि फुले उमलू लागतात.. आणि त्याचे रंग तुझ्या ओठांवर खुलू लागतात.. तू अशीच हसत रहा..सर्वांचे मन मोहत जा.. माझी नसताना पुन्हा.. माझीच होत रहा..." पुन्हा विचार बाजूला सारायचा प्रयत्न केला.. तू कायम म्हणायचीस मला, गणेश तू अजिबात व्यवहारी नाहीस..मी तसे नाही गं असे म्हणालो तरी... 'न'ला एक काना आणि 'ह'ला दुसरी वेलांटी देण्याची तुझी सवय काही नविन नव्हतीच मला.. पण आजहि खुप प्रयत्न करून हि, मी तुझ्या आठवणीला 'नाही' म्हणू शकलो नाही.. मी कदाचीत व्यवहारी नाहीच.. आपण एकत्र घालवलेल्या क्षणांच्या कित्येक आठवणी माझ्याकडे अजूनहि येतात, आणि त्यावेळेस दिलेल्या वेळेपेक्षा कितीतरी जास्त वेळ 'व्याज' म्हणुन कायम घेत राहतात.. कित्येक वर्षे झालेत आणि अजूनही व्याजावर व्याज देतोय मी, आणि मुद्दल मात्र तशीच आहे.. कधीच न संपणारी... "दिवस सरत जातात तसतसे आपल्या आठवणींची फुले बनत जातात.. " आणि माझे मन, मग फुलपाखरू बनते... एका एका फुलांवर मग ते हलकेच जाऊन बसते.. प्रत्येक फुलाचा रंग वेगळा.. गंध वेगळा.. काही काही फुले मात्र अजूनही चिंब भिजलेली असतात... - गणेशा... ३१ मार्च २०२१, चतुर्थी.

गुंफलेले हात ताऱ्यांचे गुंतलेले श्वास ताऱ्यांचे स्पर्शाचे धुक ताऱ्यांचे पावलांना आभास ताऱ्यांचे ....अन आठवणी टिमटिमत्या ताऱ्यांच्या रोजच हिशोब मागतात.... तुझ्या डोळ्यातल्या प्रकाश आपण बांधलेलं आकाश दूर फडफडणार अवकाश चांदण वाहणारे स्वयंकोश ....मी सगळ जपून ठेवलंय उन्हात नाही घर बांधलं.... ....सांगितलं की मगच निजतात पुन्हा फिरतात ताऱ्यांच्या जगात... -भक्ती

भरू दे मला घास तुझ्याही चोचीत मग उरतिल आठव पोटाच्या चक्रात धरू दे थरथर भरलेल्या नभाची नाळ मग बरसतील सांज नयनी आभाळ येऊ दे कापरी शून्यात ती सदैव हाक मग राहतील फक्त भास विरून साद घेऊ दे आज मायेनं कुरवाळून मग करशील पोरके हात सोडून -भक्ती ०९/०४/२०२१

भक्ती बोचरी पहाट शिंपडे गुलाबदाणी अन..तुझ्या अत्तरथेंब आठवणी जबरदस्त शब्द आहेत फक्त तो आठवदर्प शब्द कशा अर्थाने घ्यायचा ते मात्र कळले नाही .

लांबवर जाणारी धुक्यात हरवणारी हुरहूर लावणारी एक वेडी पायवाट अन न सुटणारी मनाला छळणारी तुझ्या आठवणींची एक पक्की गाठ एवढंच उरलंय आता हाताशी अन व्याकुळ प्राण कंठाशी

तुझे मुक्त हासू उमलते कळ्यांच्या श्वासांसम धुंद धुंद तुझे कोवळे हासू घमघमतो मोहोर जसा चैत्रात मंद मंद तुझे दिलखुलास हासू गडगडतो नभी मेघ तोऱ्यात बेधुंद बेधुंद तुझे स्मित हासू खुलतो चंद्रचकोर आकाशी ताऱ्यांत ताऱ्यांत तुझे मिश्कील हासू बिलगतो पारिजात पहाट गारव्यात गारव्यात -भक्ती ही कविता माझ्या लाडक्या लेकीसाठी  (कविता साधीच आहे पण ती हसली की मी हसते .शेवटी कशासाठी चालले आहे सगळे  तिच्या हासूसाठी)

पावसाच्या अल्लड सरी तुझ्या माझ्या तळहाती प्रतिबिंब चिंब मानसी आज बरसती प्रीतमोती| झेलल्या सृजन सरी तुझ्या माझ्या गात्री रूजली नाजूक माला अन् गंधाळली माती| क्षितिजाच्या शोधात सरी तुझ्या माझ्यात गुंतती भुलल्या चांद चकव्यात गंधर्व मल्हार गाती| स्वप्नी सुखाच्या सरी तुझी माझी अबोल धुंदी आठवणींच झुकलं अंबर अनवट मधु धुकं पसरती| -भक्ती .

जब दिन होवे मध्धम मध्धम और रात सारी धुआं धुआं ओ ss मेहबुबा ...तेरी याद बुलाये ... ..ओ ss सखी रे ss...सखी रे ss मुझे तेरी भिगी याद बुलाये .... बिखरा ये आसमान पुरा .. ना रंग सूरज पे चढा .. तू थी मेरी परछाई तेरे बीन मै अधुरा रहा .. ..ओ ss मेहबुबा ... यही कही , ढुंडता रहा मै लब्जोंको तेरे और अधुरी रही मेरी जान-ए-गझल... तसबीर मन मे और आँखो मे तसव्वुर तेरी ..ओ ss सखी रे ss...सखी रे ss मुझे तेरी भिगी याद बुलाये .... जब दिन होवे मध्धम मध्धम और रात सारी धुआं धुआं ओ ss मेहबुबा ...तेरी याद बुलाये ... पतझड मै कुछ नम से पत्ते गुंज उठते है कानों मे कही... आहट कुछ हलकीसी जैसे सुरूर मुरझे सप्ने का ओ ss मेहबुबा ... ..ओ ss सखी रे ss...सखी रे ss तेरी याद बुलाये ... मुझे तेरी भिगी याद बुलाये .... . . -- गणेशा ३१ ऑगस्ट २०२१