कौशल्यमापन कसे करावे?
हा धागा श्रीमंतीचे नियम या धाग्याला पुरक असा आहे. चांगला बाजारभाव असणारे एखादे कौशल्य स्वत:मधे निर्माण करणे, असलेले अद्यतन करणे हा आर्थिक समृद्धी खात्रीने वाढवण्याचा मार्ग आहे.पण हे करताना आपल्या कौशल्याचा स्तर कोणता आहे हे मोजता आले तर? म्हणजे समजा क्ष नावाची व्यक्ती आहे. ती संगीताच्या क्षेत्रात गाण्यांना चाली लावण्याचे काम करते त्याशिवाय तीच व्यक्ती चित्रकारही आहे, तीच व्यक्ती गायकही आहे असे समजू. आता गाण्यांना चाली लावतो म्हणजे तो संगीतकार आहे. पण त्याची लेवल किंवा स्तर किती आहे याचे नेमके मापन कसे करणार? म्हणजे तो ए.आर. रहमानच्या तोडीचा संगीतकार आहे की अनु मलिकसारखा बाजारात मागणी ते पुरवू वाला संगीतकार आहे? हे कसे मोजणार? चित्रकार अाहे तर कोट्यावधी रुपयांना विकले जाईल अशी चित्रे काढतो किंवा जहांगीरमधे प्रदर्शन भरवण्याइतका दर्जेदार आहे की २-५ हजार रुपयाला म्हणेल ते पेंटींग बनवून देणारा छोटासा चित्रकार आहे? गायक आहे तर बॉलीवूडच्या सिनेमांसाठी गाईल इतका चांगला आहे की भजनी मंडळापुरताच मर्यादित आहे?
हे केवळ कलाक्षेत्रापुरतेच मर्यादित नाही तर तांत्रिक किंवा वाणिज्य अशा कोणत्याही क्षेत्रात असे असू शकते. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की तांत्रिक किंवा वाणिज्य क्षेत्रातील शिक्षणाच्या विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल मिळालेल्या प्रमाणपत्राचा आणि प्रत्यक्षात त्या क्षेत्रातल्या ज्ञानाचा संबंध असेलच असे नाही. तसा संबंध नसल्यानेच आपल्याला अनेकदा जिथे बीकॉम झालेला उमेदवार पुरेसा आहे तिथे कॉमर्सच्या थोड्याशा प्रशिक्षणाने प्रशिक्षित केलेला पदवीधर अभियंता काम करत असलेला दिसू शकतो. याचाच अर्थ त्या पदवीधर अभियंत्याला बीकॉम झालेल्या उमेदवाराइतकेच ज्ञान आहे.तितपतच त्याची कुवत असू शकते. अशाचप्रकारे एखादी १२वी MCVC झालेली व्यक्ती निव्वळ जिज्ञासेतून त्याच्या शाखेतल्या तज्ञ डिप्लोमा किंवा पदवीधर अभियंत्याइतके ज्ञान असणारी असू शकते.
नोकरी शोधताना 'उमेदवाराला काय येतंय? किंवा त्याच्या ज्ञानाचा स्तर' हीच गोष्ट नोकरी देणार्यासाठी महत्वाची असते/असायला हवी. नोकरीच्या ठिकाणी मुलाखत घेणारा उमेदवार ज्या पदासाठी मुलाखत द्यायला आलाय त्याच पदाचा/कामाचा चांगला अनुभव असणारा असेल तरच त्या उमेदवारासोबत योग्य न्याय होईल. अन्यथा नोकरी देणारा आणि तो उमेदवार दोघांचही नुकसान होऊ शकतं. काही ठिकाणी एचआरवाले किंवा सेल्सवाले टेक्निकल कामासाठी नेमून घ्यायच्या उमेदवाराची मुलाखत घेत असतात. किंवा टेक्निकल पर्सन वाणिज्य कामासाठी घ्यायच्या उमेदवाराची मुलाखत घेत असतात. लहान कंपन्यांमधे हा प्रकार सहज घडू शकतो.
अशाप्रकारे शैक्षणिक प्रमाणपत्रावर उल्लेखित पात्रतेपेक्षा प्रत्यक्षातलं ज्ञान जास्त असेल किंवा कमी असेल तर ते मोजणार कसं?
सारांशाने आपल्याकडे कोणत्या क्षेत्रातलं ज्ञान हे सर्वाधिक आहे किंवा आपला कल हा सर्वाधिक कोणत्या क्षेत्रात आहे हे मल्टीटॅलेंटेड व्यक्ती स्वत: कसे तपासू शकते?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
म्हणजे तो ए.आर. रहमानच्या
असेही वाचू शकता
असे लौकीक अर्थाने यशस्वी ते
ए. आर.रहमान चे संगीत अजिबात न आवडणारे खुप जण आहेत.
पैसा हाच निकष असेल तर मग ...
पूलं ..
वा! चौकटराजा
एखादा व्यवसाय आणि जात हे
जात हे समीकरण पटले नाही...
बँकेतील कारकुनाची नोकरी
चौकटराजा !!
एका वाक्यात सांगायचे तर .....
माझ्या बेड च्या वरती सिलिंग
जसे प्रतेक व्यक्तीचा चेहरा वेगळा असतो.
सहमत आहे...
धाग्याचा हेतू कौशल्यवर्धन कसे
धाग्याचा हेतू कौशल्यवर्धन कसे करावे
एक किस्सा
चांगले नशीब
कौशल्याची गंमत ..
कामापुरते चे स्किल शिकून घेणे ही वृत्ती सर्वत्र आहे
आपल्या अंगच्या इतर अनेक क्षमता ..
कौशल्य मापन
बरोबर आहे.खूप चांगले खेळाडू
खूप चांगले खेळाडू,संशोधक ,शिक्षक,कारागीर,हमाल,कारकून इत्यादी जगाला मिळतीलज्या मुलांमध्ये चांगली हमाली करण्याचे पोटेनशियल असेल त्यांना कुली, कुली नं १, हमाल दे धमाल हे पिक्चर दाखवले पाहिजेत. त्यांना हमालीची लाज वाटणार नाही तर ते काम ग्लामरस वाटेल :)खरी स्थिती आहे
काही काळाने,
महत्वपुर्ण लेख आणी त्यावरील