एक विचार
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आमचे एक निसर्ग प्रेमी मीत्र, यांनी ट्विटर वर गुलबक्षीच्या फुलांबद्दल माहिती दिली.
वाचता वाचता सहज एक विचार डोक्यात आला आणी मन पन्नास वर्षे मागे गेल.विचार आला की नाती कशी असावीत, गुलबक्षीच्या वेणीसारखी, सहजपणे एकमेकात गुंफलेली .
लहानपणी आमच्या परसदारी गुलबक्षीची रोपे होती. झुडूपवर्गीय, नाजुकशी ,हिरवीगार पाने, नाजुक , रंगबिरंगी फुलांनी बहरलेली. फुलांचे रूपांतर हलक्याफुलक्या काळ्या छोट्या बियां मधे व्हायचे. ती छोटीशी बि बंद ओठांवर ठेवून फुकंरीने जास्तीत जास्तं वर उडवायची आसा आम्हां मुलांचा खेळ.
फुले फुलण्याची वेळ साधारण संध्याकाळी चार साडेचार वाजता. नेहमीच संध्याकाळी आजी, काकू, मावशी बहिणी यानां या फुलांची वेणी बनवून केसात माळताना बघीतले.
बाकी फुलांची वेणी बनवताना
सुई टोचते , दुखापत होते तर दोरा फुलांना बाधूंन ठेवतो म्हणजे जबरदस्तीने एकत्र आणतो. तसच काहीस नात्यांत, थोपलेल्या नात्याची गुंफण घट्ट जरी असली तरीही ती क्लेशदायक तशीच त्याची उकल सुद्धा अवघड.
गुलबक्षीची वेणी बनवताना ना दोरा ना सुई याचा वापर होतो.गुलबक्षीची फुलं एकमेकात गुंफली जातात जणू दोन जिवलग मैत्रीणी हातात हात गुंफलेल्या.जशी वेणी विणायला सोपी तशीच उकलायला पण. अवघडपणा नाही तर नुसतीच गुंतागुंत. फुले एकदम नाजूक , नात्यांसारखीच, जास्त हाताळली तर कोमेजतात. यानां कुठल्याही प्रकारचे बंधन लागत नाही. दिवसभर डोक्यात माळली तरी गुंफण काही सुटत नाही. नाते कसं आणी कीती घट्ट आसाव याचं सुंदर उदाहरण.
प्रतिक्रिया
- (वेणी/हार बनवायची पद्धत
नाती कशी असावीत?
गुलबक्षी