मावळातील बेडसे बुद्ध लेणी - का आणि कशासाठी? संपूर्ण माहिती
आपल्याच मि. पा. च्या ग्रुप मध्ये असलेलले आमचे मित्र कपिल कुलकर्णी (कपिलमुनी) यांनी काही दिवसापूर्वी "प्रचेतस" यांची "प्राचीन भारतः बेडसे लेणी" हि लिंक वाचायला दिली आणि बेडसे लेण्यांचा एक विडिओ बनवण्यास सुचवलं होत. मग काय गेल्या आठवड्यात त्या ठिकाणाला भेट देण्याचा योग्य आला आणि आपल्या सर्वासाठी हा सविस्तर माहिती चा व्हिडीओ घेऊन आलो.
पुण्यापासून जवळपास ५७ कि मी अंतरावर असलेली बेडसे बुद्ध लेणी. मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत येथून तिकोना किल्ला किंवा काळे कॉलनीकडे जाणारा रस्ता आहे. याच रस्तावर कामशेतपासून साधारणपणे आठ किमीवर असलेल्या करुंज गावातून बेडसे लेण्यांना जाणारी वाट आहे. लोणावळा पासून जवळच ३ लेणी आहेत , कार्ला , भाजे आणि हि बेडसे. या सर्व लेण्यांचा निर्माण का , कशासाठी आणि इथेच मावळात का? या प्रश्नांची संपूर्ण माहिती आपल्यासाठी या विडिओ मध्ये नक्की पहा.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेसाठी काम करणाऱ्या "संतोष दहिभाते" याने आपल्याला दिलेली हि संपूर्ण माहिती, त्याचे SPOTVAR कडून विशेष आभार.
सह्याद्रीत भटकंती करीत असताना अनेकदा कातळकोरीव लेणी नजरेस पडतात. काही लेणी धार्मिक स्थळांमुळे किंवा जाण्यायेण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे पर्यटकांनी कायम गजबजलेली असतात. पण सगळ्याच लेण्यांमध्ये पर्यटकांची अशी गजबज बघायला मिळत नाही. पर्यटकांच्या वर्दळीपासून असाच दूर राहिलेला लेणीसमूह म्हणजे पवना मावळातील बेडसे लेणीसमूह.
पूर्वाभिमुखी बेडसे लेणी दक्षिणोत्तर पसरलेल्या १००-२०० मीटर लांबीच्या कातळकड्यात खोदलेली आहेत. बेडसे लेणीसमुहात तीन चैत्यगृह (त्यापैकी एक अर्धवट), एक भव्य विहार, दोन छोटे विहार (एक अर्धवट), सहा पाण्याची कुंडे या लेण्यात कोरलेली आहेत. बेडसे लेण्यांचे सौंदर्य चैत्यगृहात आणि आगळ्यावेगळ्या विहारात आहे.
अधिक माहिती साठी संपूर्ण विडिओ नक्की पहा.
धन्यवाद...
वाचने
13674
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहिती बद्दल धन्यवाद
धन्यवाद !!!
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
भारी!!
धन्यवाद !!!
In reply to भारी!! by Bhakti
बेडसे लेणीबद्दलचा खूप छान व्हिडीओ.
धन्यवाद !!!
In reply to बेडसे लेणीबद्दलचा खूप छान व्हिडीओ. by गोरगावलेकर
spotvar चे तुमचे पुर्वीचे विडियो पाहिलेत.
धन्यवाद !!!
In reply to spotvar चे तुमचे पुर्वीचे विडियो पाहिलेत. by कंजूस
मस्त माहिती
अप्रतिम व्हिडियो
अप्रतिम व्हिडियो
संतोष यांची ओघवती भाषा आणि सांगितलेली माहिती ऐकताना थक्क व्ह्यायला होते !मस्त व्हिडिओ.. !! आवडला.
उत्तम माहिती
चांगला व्हिडिओ आहे. बेडसे
धन्यवाद !!!
In reply to चांगला व्हिडिओ आहे. बेडसे by प्रचेतस
ह्या लेण्यांचा तसे अजंठा
शोध म्हणे ब्रिटिशांनी लावला
In reply to ह्या लेण्यांचा तसे अजंठा by कानडाऊ योगेशु
स्थानिकांना माहिती असतेच.
In reply to ह्या लेण्यांचा तसे अजंठा by कानडाऊ योगेशु
ब्रिटिशांनी लेणींचे व्यवस्थित
In reply to स्थानिकांना माहिती असतेच. by प्रचेतस
सवडीनुसार अवश्य लिहिनच.
In reply to ब्रिटिशांनी लेणींचे व्यवस्थित by चौथा कोनाडा
पाटीलबुवा, हाही व्हिडियो
धन्यवाद !!!
In reply to पाटीलबुवा, हाही व्हिडियो by विंजिनेर
कलाकृती तोपर्यंत विस्मृतीत गेल्या होत्या का?
मुसलमान मोगली सत्तांनी हिंदू देवळांची तोडफोड केली .त्यातून त्यां
In reply to कलाकृती तोपर्यंत विस्मृतीत गेल्या होत्या का? by कंजूस
*analas* and antiquities....
आज संतोष दहिभाते यांची प्रत्यक्ष भेट झाली.