सध्या मी काय पाहतोय ? भाग २

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
24 Feb 2021 - 8:26 pm

हल्लीच मोदींनी हिंदुस्थानात निर्माण केलेला आणि जगात अव्वल दर्जाचा असलेला अर्जुन एमके- १ ए हा लढाऊ रणगाडा लष्कराला सुपूर्द केला. ११८ अर्जुन एमके- १ ए रणगाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव देखील आता क्लिअर झाला आहे. याच बरोबर के ९ वज्रचा १०० वा टॅक देखील आता लष्कराला देण्यात आला आहे.
या दोन्ही टॅक्स बद्धल अधिक माहिती खालील व्हिडियोत :-

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ?

मदनबाण.....

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

वाचत आहे... येऊ द्या अजून

मदनबाण's picture

26 Feb 2021 - 8:26 am | मदनबाण

स्वातंत्र्यवीर श्री विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. _/\_

जाता जाता :- रोज तैमूर च्या बातम्यांचा रतिब घालणार्‍या "मराठी" वर्तमानपत्रांना या महानायकाचा मात्र विसर पडतो !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "अनादि मी, अनंत मी , अवध्य मी भला"

सध्या नेटफ्लिक्सवर माईंडहंटर, नार्कोस मेक्सिको आणि ऍमेझॉन प्राईमवर सुपरनॅचरल ह्या सिरीज बघतोय.

शा वि कु's picture

26 Feb 2021 - 9:39 am | शा वि कु

आर्चर नावाचा ऍनिमेटेड शो पाहतोय. धमाल आहे.

आयसिस नावाच्या स्पाय एजन्सीचा "सर्वोत्तम" गुप्तहेर म्हणजे स्टर्लिंग आर्चर.
तो आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या अनेक गमती जमती दाखवल्या आहेत. डार्क कॉमेडी म्हणता येईल अशी आहे.

शा वि कु's picture

26 Feb 2021 - 1:50 pm | शा वि कु
सुखी's picture

27 Feb 2021 - 8:41 pm | सुखी

Fx on Hulu हे काय आहे, यावर ऑनलाईन आहे अस दिसतय
बाकी कुठे आहे का हे बघण्यासाठी

शा वि कु's picture

28 Feb 2021 - 9:19 am | शा वि कु

Hulu ott प्लॅटफॉर्म आहे.

पण नेटफलिक्स वर सुद्धा शो उपलब्ध आहे.
नाहीतर टेलिग्राम.

सुखी's picture

28 Feb 2021 - 9:53 am | सुखी

Ok, Netflix war शोधतो, नाहीतर टेग्रा साठी व्यनि करतो

सुखी's picture

2 Mar 2021 - 12:03 am | सुखी

Ok, Netflix war शोधतो, नाहीतर टेग्रा साठी व्यनि करतो

कानडाऊ योगेशु's picture

26 Feb 2021 - 9:52 am | कानडाऊ योगेशु

दृष्यम-२ पाहिला नुकताच. अफलातुन आहे चित्रपट. चित्रपट मल्याळम आहे पण त्याने काही अडत नाही.

कुमार१'s picture

27 Feb 2021 - 7:29 pm | कुमार१

मी पण पाहिला.
छानच .
दृश्यम (१) हिंदी पाहिला होता.
२ मल्याळम पाहिल्यावर असे जाणवले की मूळ भाषेची खुमारी वेगळीच असते.

कानडाऊ योगेशु's picture

26 Feb 2021 - 9:54 am | कानडाऊ योगेशु

रच्याकने.तुम्ही वेबसिरिज/चित्रपट कसे पाहता?
कुली नं १ वगैरे लिटरली १५ मिनिटात संपवले होते. अनेक वेबसिरिज ही पळवत पळवत पाहतो.

धर्मराजमुटके's picture

26 Feb 2021 - 10:06 am | धर्मराजमुटके

टेलिग्राम वर धाड पडलीय काय ? सध्या तिथे डाऊनलोडविण्याकरीता काहीच उपलब्ध नाहिये. टोरेंट वगैरे वापरणारी मंडळी अजून अस्तित्त्वात आहेत काय ?

चौकटराजा's picture

26 Feb 2021 - 10:46 am | चौकटराजा

नुकताच " खोज" नावाचा " डिटेक्शन मुव्ही यू ट्यूब वर पाहिला ! उत्तम ! सध्या भारत भर जे नितीन गडकरी यांचे अफलातून काम चालू आहे त्याचे व्हीडियो पाहात आहे ! बेशिस्त लोकांच्या देशात विकास मात्र शिस्तीत चालू राहिलेला दिसतोय ! स्पेन मधील सेव्हिल येथील अचाट वास्तू शास्त्राचे दर्शन घडविणारा स्पॅनिश चौकाचे व्हिडीओ पाहात आहे ! घरी फोर के टी व्ही घेतल्यापासून जागतिक प्रवासाची(?) मजा लुटत आहे ! खेरीज काही उत्तम थ्रिलर पहिलेत !साऊथ वाल्यां ना थ्रिलर नीट बनविता येत नाहीत असा अनुभव येत आहे ! दृश्यम सारखा एखादाच !

मदनबाण's picture

26 Feb 2021 - 10:47 am | मदनबाण

माझ्या लहानपणी मला माझ्या आई-वडिलांनी Animals are Beautiful People हा चित्रपट दाखवला होता, हा संपूर्ण चित्रपट तर आठवत नाही परंतु वाळवंटातील रेती फेकणारा किडा तेव्हढा डोक्यात राहिला. [ हा तोच चित्रपट आहे की नाही ते आता आठवत नाही. ]
मला बहुधा प्राणी विश्वा बद्धल आवड आणि आकर्षण या चित्रपटामुळेच निर्माण झाले असावे, या नंतर बहुधा दुरदर्शनवर वाईल्ड अमेरिका नावाची सिरिज लागायची ती न-चुकता पहायचो.

@ प्रचेतस
नार्कोस बहुतेक मला मुनींनी सुचवली होती आणि पाहिली छान आहे, पण मोठी असल्याने शेवटचे काही भाग पळवुन पाहिले.
@ शा वि कु
आपण पाहत असलेल्या शोजच्या लिंक्स [ ट्रेलर इ... ] देत जा म्हणजे बरं पडेल.
@ कानडाऊ योगेशु
होय आजच दृष्यम-२ बातमी वाचली ज्यात दृष्यम-३ देखील येणार असल्याचे म्हंटले होते.
मी The White Tiger डाउनलोड मारुन ठेवलाय आणि वेळ मिळताच पाहणार आहे, चोपडीण बाई आहेत यात. याच बरोबर Lahore Confidential बद्धल लक्ष गेले आहे आणि पाहण्याचा विचार आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "अनादि मी, अनंत मी , अवध्य मी भला"

ऍमेझॉन प्राईम वर केसरी चित्रपट पाहिला. अफलातून आहे.

कर्नलतपस्वी's picture

18 Mar 2021 - 3:04 am | कर्नलतपस्वी

21 Sarfarosh - Saragarhi 1897 बघा केसरी पेक्षा मला चांगला वाटला. सारागढी डे अजुनही सेलिब्रेशन होते.

अनन्त अवधुत's picture

18 Mar 2021 - 3:31 am | अनन्त अवधुत

21 Sarfarosh - Saragarhi 1897 कोठे पाहिली ते आठवत नाही, पण केसरी सिनेमापेक्षा ही मालिका खरेच उजवी आहे.

चौथा कोनाडा's picture

26 Feb 2021 - 12:18 pm | चौथा कोनाडा

हॉटस्टार वर होस्टेजेस वेसि पहात आहे.
पहिले पर्व ओके होते. दोन-तीन भाग कमी केले असते तर धार आली असती.
आता दुसरे पर्व पहात आहे, हा जास्त उत्कंठावर्धक आहे. प्रकाशयोजना अफलातून आहे.
पण ताणून ट्वीस्ट आणलेले आहेत.

Bhakti's picture

26 Feb 2021 - 7:30 pm | Bhakti

मारा (अ प्र ति म )
मास्तर (ध मा लं)
हार्मोनी विथ ए आर रेहमान (पाहतेय)

मदनबाण's picture

27 Feb 2021 - 10:37 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manmohana Tu Raja Swapnatla... :- Hamaal De Dhamaal

शा वि कु's picture

27 Feb 2021 - 4:07 pm | शा वि कु

अगदी अफलातून सिनेमा आहे. नव्यानेच एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालेल्या तरुण जोडप्याची गोष्ट आहे. रोझमेरीला बाळ होणार असते, आणि त्यांच्या शेजारचे वृद्ध दांपत्य शेजारधर्म म्हणून जरा जास्तच सलगी दाखवत असतात. आणि काही घटनांमुळे रोझमेरीला आपल्या आणि आपल्या बाळाविरुद्ध चेटक्यांच्या "कोव्हेन"चा काही कट चालला आहे असे वाटत असते.
रोजमेरीची चिंता योग्य आहे की नाही ?

हॉरर मधले नेहमीचे धक्कातंत्र, आणि इतर क्लुप्त्या आजिबात नसून सुद्धा चांगलाच भीतीदायक सिनेमा आहे.

इरा लेव्हीन यांच्या पुस्तकावर आधारित आहे. २०१४ मध्ये रिमेकसुद्धा आला आहे, पण रिव्ह्यूजवरून गंडला आहे असे दिसते.

रोझमेरीज बेबी- १९६८

मी हा चित्रपट पाहिला आहे, हा एक कल्ट चित्रपट आहे.
द व्हाइट टायगर पाहिला, ओके ओके आहे. The Predator देखील पाहिला पण जी मजा पहिल्या पार्ट मध्ये मिळते ती त्यानंतर आलेल्या एकाही चित्रपटात मिळत नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Narayana Kavacham

सध्या मंगळ ग्रह चर्चेत आहे. महिन्यांच्या प्रवासा नंतर नासाचा परसेव्हेरन्स रोव्हर मंगळावर यशस्वीपणे उतरला आणि त्याने त्याचे काम सुरु केले, फोटो आणि इतर माहिती पृथ्वीतलावर पाठवण्यास सुरुवात केली. इथे हिंदुस्थानात मंगळ आणि राहु यांचा "अंगारक" योग यावर बरीच चर्चा होताना जालावर दिसते. मंगळ अग्नी तत्वाचा असल्याने अग्नी विषयक घटना घडताना या काळात दिसतात.

==================================================================================

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Narayana Kavacham

मंगळ अग्नी तत्वाचा असल्याने अग्नी विषयक घटना घडताना या काळात दिसतात.
मला वाटतं आत्ता पर्यंत आगीच्या इतक्या होलसेल मध्ये बातम्या इतक्या कमी काळात मी कधीच वाचल्या नसतील,सध्या कुठलेही न्यूज चॅनल, पेपर, पोर्टल्स चाळल्यास अग्नी तांडवाच्या बातम्या हमखास नजरेस पडतील. मला वाटत चाणक्ष मिपाकरांनी या आग लागण्याच्या बातम्या वाचल्याच अससतील.यात अजुन भर अपघातांची असते, माझ्या अंदाजाने [ जो चुकीचा ठरावा अशी इच्छा ] मोठा अपघात होण्याची देखील या काळात शक्यता असते. वाहने, विमान, बोट [ सबमरिन ? ], रेल्वे इ इ इ.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bheegi Bheegi Raaton Mein...

वाहने, विमान, बोट [ सबमरिन ? ], रेल्वे इ इ इ.

देव करो आणि ती पाणबुडी नीट असो आणि तिचे सर्व नैसैनिक सुखरुप राहोत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #BoycottRadhe

टेलिग्राम वरचे अनेक मुव्ही डाउनलोड चॅनल्स उडवले गेले आहेत. तस्मात आता परत टोरेंटचा आधार घ्यावा लागणार.
John Wick चा पहिला भाग पाहिला आता बाकीचे २ बघायचे बाकी आहेत.
माजी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टोलेबाजी :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 8:05 am | मुक्त विहारि

जबरदस्त

मला अजुनही आठवतं की कोणती क्ष व्यक्ती हार्ट अ‍ॅटॅक ने गेली असं कुठुन समजल, तर ती फार मोठी घटना वाटायची ! अता माणसं चटाचट अ‍ॅटक होउन जात आहेत. खायचे तेल आणि अ‍ॅटक यांचा संबंध असल्याचे समजले, मग या वेळी तिळाचे कोल्ड प्रेस्ड तेल घेउन रिफाइन्ड ऑइलला घर बंदी करुन टाकली आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Billa 2 - Madurai Ponnu Song Video | Yuvanshankar Raja

सिरुसेरि's picture

6 Mar 2021 - 12:55 pm | सिरुसेरि

एबीपी माझा कट्टा वरील मान्यवरांच्या मुला खती असलेले गेल्या १ , २ वर्षांतील नवे जुने भाग यु ट्युबवर पाहिले .

धर्मराजमुटके's picture

7 Mar 2021 - 10:31 pm | धर्मराजमुटके

बंगाल निवडणू़कीची हवा तापू लागली आहे. त्याची धग दृकश्राव्य माध्यमांमधे पाहायला मिळते. तॄणमुल चे "खेला होबे" व भाजपा चे "खेलार माटे लडाई होबे" गाणी ही निवडणूक गीते चांगलीच गाजत आहेत. सध्या या गाण्यांचा आनंद घेत आहे.

या दोन्ही गाण्यांमधे तुम्हाला दुसरी कोणती गाणी ऐकू आली असतील तर सांगा.

मदनबाण's picture

13 Mar 2021 - 3:18 am | मदनबाण

दोन्ही गाण्यांचा लुफ्त लुटण्यासाठी हेडफोन्स मस्ट आहेत. :)

@ धर्मराजमुटके
खेला होबे उडालेले दिसतय... बाकी काही काळा पूर्वी श्रेया घोषाल चे ऐक बंगाली गाणे ऐकले होते, त्यात ती माझा आवडता हेडफोन लावुन गाणं गाताना दिसते. [ जाहिरातः- अनबॉक्सिंग ऑडियो टेक्निका ATH-M20X ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्‍यांची इतिहास नोंद ठेवत नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्‍यांची इतिहास नोंद ठेवत नाही.

मदनबाण's picture

14 Mar 2021 - 8:25 pm | मदनबाण

John Wick Chapter २ आणि John Wick Chapter ३ बघुन झाले. ३ ही भागात मारामारी व्यतिरिक्त संपूर्ण चित्रपटात काहीही नाही ! परंतु हीच मारामारी पाहण्यासारखी आहे. :)
आज सकाळ पासुन Peaky Blinders च्या गाण्याने माझ्या मनाचा ठाव घेतला आहे [ जे आजच्या माझ्या स्वाक्षरीत आहे.], ही एक ब्रिटिश क्राईम ड्रामा टिव्ही सिरीज असल्याचे जालावर शोध घेतल्यावर समजले. या सिरीज चे IMDB रेटिंग ८.८ असल्याचे समजते आहे. आज याचा पहिला सिजन डाउनलोड मारुन ठेवला आहे आणि सवड मिळताच तो पहायला घेणार आहे. [ तुमच्या पैकी कोणी ही सिरीज पाहिली असल्यास नक्की सांगा. ]
खाली या सिरीजचा एक रिव्हू देउन जातो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )

शा वि कु's picture

14 Mar 2021 - 8:52 pm | शा वि कु

पहिला सिझन पाहीला आहे.
आवडला. पण पुढचे भाग पाहायची खास इच्छा झाली नाही. मात्र त्यातल्या "ब्रमी" लहेजा ऐकायला मजा येते.

किलियन मर्फी आवडतो. इन टाइम, इंन्सेप्शन, बॅटमॅन वैगेरे मधले काम आवडते. सॅम नील सुद्धा आवडतो. ज्युरासिक पार्क आणि इन द माउथ ऑफ मॅडनेस (हा सुद्धा भारी सिनेमा आहे.) मध्ये त्याला पाहीले होते.

मात्र त्यातल्या "ब्रमी" लहेजा ऐकायला मजा येते.
हे मला समजले नाही,तसही मला ब्रिटिश ऐक्सेंट समजायला जरा कठीण जातो. पण या कमेंट वरुन मला पॉश लहेजा असलेली व्हॉयलीन प्लेअर आठवली ! तिच्या व्हॉयलिन वादनामुळेच मला काउंटिंग स्टार्स गाणे समजले होते. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Y2K & Bbno$ - Lalala (ilkan gunuc remix) (Bass Boosted)

"अटॅक आॅन टायटन" ही अॅनिमे सीरीज पाहत आहे. सिजन ४ (फायनल) चालू आहे. फँटसी, राजकारण, सत्ताकारण, फंदफितुरी इ. चा अफलातून मेळ जमला आहे.

मदनबाण's picture

16 Mar 2021 - 5:12 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili

नगरीनिरंजन's picture

18 Mar 2021 - 5:36 am | नगरीनिरंजन

आनंद पटवर्धन यांचा विवेक नावाचा माहितीपट Reason या नावाने इंग्रजीत पुनर्प्रदर्शित होतोय. ऑनलाईनच आहे.
पाहिला नसल्यास अवश्य पाहा.

नोंदणीचा दुवा

अगदी पाहण्यासारखा महितीपट आहे.
युट्युबवर काही भाग आहेत.
https://youtube.com/playlist?list=PL05qSwQnAG9gaMAuoVM3i8wacYmrAEuTQ

मदनबाण's picture

18 Mar 2021 - 11:05 am | मदनबाण

तुम्ही जी लिंक दिली आहे ती पाहिली त्यात मागच्या भागात दिलेला Indian Durbar (1938) - filmed in Alwar मधला एक सीन आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bheegi Bheegi Raaton Mein...

शा वि कु's picture

19 Mar 2021 - 1:20 pm | शा वि कु

जस्टीस लीग स्नायडर कट पहिला. मूळ रिलीज झालेला सिनेमा भंपक आहे असे समजल्याने पहिला नव्हता. त्यामुळे गोष्ट माहीत नव्हती.

सिनेमा बरा आहे. चार तास रन टाईम नसता तर बरे झाले असते. जितक्या धामधुमीमध्ये स्वागत झालं तितका काही भारी नाहीये. पण मूळ सिनेमा अत्यंत कचरा असावा, त्यामुळे बरे असण्याची पातळी पण चांगली अचिव्हमेंट म्हणावी.

डीसी सिनेमॅटिकल एक्सटेंडेड युनिव्हर्स (DCEU) ची एकसंध कथा वाढवण्याच्या दृष्टीने हा सिनेमा चांगला आहे. बऱ्याच डीसी कन्सेप्टसची ओळख करून दिली आहे. डार्कसाईड, अपॉकोलिप्स हे त्याचे घर, अँटी लाईफ इक्वेशन, इनजस्टीस टाईमलाईनची झलक हे म्हणजे पुढे येणाऱ्या उत्तम गोष्टींची चाहूल आहे. पुढे "फ्लॅशपॉईंट पॅराडॉक्स" वर काम चालूच आहे. हि अगदी जबर गोष्ट आहे. ह्याचा अनिमेटेड सिनेमा मस्त आहे.

इनजस्टीस हि अगदी एपिक स्केल वरची गोष्ट आहे. त्यात आवडत्या आणि नावडत्या प्रसिद्ध पात्रांना इतक्या मुक्तहस्ते मारून टाकलंय, कि खास या गोष्टीसाठी स्वातंत्र्य म्हणून एक अल्टरनेट टाइमलाईन डेडिकेट केली आहे. हि गोष्ट मी कॉमिकस्टोरीयन चॅनेल वर ऐकली. हे चॅनेल जबरदस्त आहे. कॉमिकबुक हे काही आपल्याकडे चटकन मिळत नाहीत, आणि मिळाले तरी परवडतील कि नाही माहित नाही. आणि तुटक तुटक पणे गोष्ट वाचणे पण कंटाळवाणे. कॉमिकस्टोरीयन मोठ्या कॉमिकसिरीज घेऊन त्यांच्या फिल्म्स बनवतो.

कॉमिकस्टोरीयन- इनजस्टीस

बॅटमॅन हु लाफ्स

डीसीचे अनिमेटेड सिनेमे मस्तच आहेत. मार्व्हल लाईव्ह ऍक्शन पेक्षा कितीतरी भारी.

हे तर खासच:
१) Batman: Gotham Knight नोलनच्या बॅटमॅन बिगिन्सचा हा कंपानियन पीस आहे. बॅटमॅन व्यक्तीची गोष्ट नसून, बॅटमॅन या कल्पनेच्या पाच/सहा गोष्टी ह्यात आहेत. प्रत्येक गोष्टीत वेगळे ऍनिमेशन, वेगळ्या प्रकारचा बॅटमॅन.

२)Dark Knight Returns ज्या कॉमिक वर हा आधारित आहे, नोलनचा डार्क नाईट रायसेस पण साधारण त्यावरच आधारित होता. ह्यात जोकरचे अत्यंत पाशवी रूप दिसते, आणि बॅटमॅन आणि जोकरच्या एपिक दुष्मनीचा शेवट.

प्रचेतस's picture

19 Mar 2021 - 1:41 pm | प्रचेतस

आज टोरेन्टवर डाऊनलोड करुन ठेवेन.
मूळ सिनेमासुद्धा पाहिला होता, वाईट नक्कीच नाही, तो ही चांगलाच आहे. व्हिडॉनने रिशूट केलेले सीन्स डार्कनेस कमी करुन ह्युमरने भरलेले होते. स्नायडरचा भर मात्र अंधार्‍या प्रसंगांवर, स्लो मोशन वर जास्त असतो. २००९ साली आलेला वॉचमेन पाहिला आणि त्यानंतर आलेले मॅन ऑफ स्टील, बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन डॉन ऑफ जस्टिस पाहिले तर सहज लक्षात यावे. फ्लॅशपॉइन्ट तर डीसीच्या द फ्लॅश सिरिजमध्ये उत्तमपणे हाताळली आहे. मल्टीव्हर्स, अल्टरनेट टाईमलाइन्स भारी आहेत त्यातल्या.

बाकी नोललने मात्र बॅटमॅन सिरीज विलक्षण उंचीवर नेऊन ठेवलीय. आता पुढील वर्षी येणारा मॅट रीव्हजचा द बॅटमॅन कसा असेल ते पाहणे औत्सुक्याचे होईल. रिडलर आणि पेन्ग्विन हे दोन व्हिलन्स ह्यात आहेत.

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 2:20 pm | मुक्त विहारि

असलेले सगळेच पिक्चर एकदा बघायला आवडतात...

X-Man, Avengers, वंडर वुमन, लय भारी ....

पण नवा सुपरमॅन काही आवडला नाही, जुना सुपरमॅन जास्त देखणा होता

बॅटमॅन, खर्जात का बोलतो? ते पण अनाकलनीय...

पण ह्या सगळ्या सिनेमात थाॅरचा अभिनेता जास्त आवडला... देखणा पण आहे, बलदंड आहे आणि त्या कॅरेक्टरला सूट होईल, असा अभिनय पण आहे...

वंडर वुमनला, अभिनय जमत नाही आणि Captain Marvel फायटिंग करू शकत नाही...
----------

कथा, अभिनय, वेग, व्हिज्युल इफेक्ट ह्यात नंबर वन म्हणजे X-Man

नंतर Avengers

आणि नंतर जस्टीस लीग

हे माझे वैयक्तिक मत आहे ...

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 2:28 pm | मुक्त विहारि

सहमत आहे ....

व्हिलन जितका तगडाच पाहिजे.....थॅनाॅसमुळेच, Avengersचे, Infinity Warआणि End Game गाजले...

Infinity War मात्र, जास्त आवडला...End Game गुंडाळल्या सारखा आणि नंतर फाफटपसारा, असलेला वाटला...कॅप्टन अमेरिका आणि आर्यन मॅन, नंतर Avengersचे पुढचे भाग बघायची ओढ कमी झाली..... Deadpoolची Entry आणली तर, Avengersजास्त मनोरंजक होईल...

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 2:31 pm | मुक्त विहारि

पण....

मनोरंजक आहेत...

दोन चार घटका, आनंदात जातील...

पहिला भाग बघीतला नाहीत, तरी काही चुकलेले नाही...

सह्याद्री चॅनेलवर सध्या संगीत नाटके पाहायला मिळतात. ज्यांना आवडतात त्यांनी अवश्य बघावीत. मजा येत आहे.

सह्याद्री चॅनेलवर सध्या संगीत नाटके पाहायला मिळतात. ज्यांना आवडतात त्यांनी अवश्य बघावीत. मजा येत आहे.
वेळ काय आहे ?

peaky blinders च्या ३ र्‍या सिझन पर्यंत पोहचलो आहे, अजुन तरी ही सिरीज कंटाळवाणी वाटलेली नाही उलट चित्रिकरण इतके सुंदर केलेले आहे की पुढाचा भाग पहावा ही इच्छा निर्माण होतेच.
काही काळापूर्वी पाहिलेले २ व्हिडियो आज इथे देत आहे :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSION

धर्मराजमुटके's picture

28 Mar 2021 - 8:11 pm | धर्मराजमुटके

आज रात्री १०.३० पासून पुढे

मदनबाण's picture

29 Mar 2021 - 10:24 am | मदनबाण

ओक्के. धन्यवाद. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Alec Benjamin - Let Me Down Slowly [Official Music Video]

कुमार१'s picture

4 Apr 2021 - 5:22 pm | कुमार१

AAME( तेलुगू आणि तामिळ दोन्ही) प्राईमवर .
आवडला.
स्त्रीची नग्नता हा विषय अगदी सभ्यतेने घेतला आहे. अमला पॉल चा सुरेख अभिनय