Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ५)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 19/02/2021 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी पाचवा भाग काढत आहे. पहिल्या चार भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणी बंगलोरची तथाकथित चळवळी दिशा रवीची दिल्लीच्या कोर्टाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच थोडीफार प्रसिध्दी मिळाली म्हणून आपण वाटेल त्या विषयावर बोलायला मोकाट आहोत हा सोस अनेकांना आवरत नाही त्याचाच एक भाग म्हणजे ग्रेटा थनबर्गचे नवे वक्तव्य . आता ती नासाच्या मंगळ मोहिमेवर वक्तव्य करत आहे आणि म्हणत आहे की अशा मोहिमांसाठी असा खर्च करायची काहीही गरज नाही.

वाचने 61683
प्रतिक्रिया 242

प्रतिक्रिया

88 वर्ष वय झाल्यावर आणि आता काहीच वर्ष शिल्लक असताना ह्या श्रीधरन ला आताच कसा साक्षात्कार झाला.

In reply to by Rajesh188

श्रीधरन् तुमचे शाळासोबती आहेत का? मनमोहन सिंग वयाच्या ८९ व्या वर्षी राजस्थानमधून राज्यसभेत खासदार म्हणून गेलेत. मग श्रीधरन् यांनी का येऊ नये?

In reply to by श्रीगुरुजी

‘आधीच मर्कट त्यातही मद्य प्याला। झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला। झाली तया तदनंतर भूतबाधा। चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा।।’ दुर्लक्ष माडी बेको...

In reply to by खेडूत

उत्तम प्रशासक आहेत. मेट्रो रेल्वे,कोकण रेल्वे इत्यादी. कर्तृत्व मोठे आहे. पण त्यांना आताच bjp मध्ये जावं असे का वाटलं. Bjp ल त्यांचा वापर देश हितासाठी करायचा असता तर त्यांना योग्य ते मंत्री पद दिले असते.राज्य सभेत पाठवल असते. सक्रिय राजकारणात त्यांना उतरवून फक्त त्यांच्या चांगल्या प्रतिमेचा वापर करायचा हाच हेतू आहे. Bjp ni आडवाणी,मुरली मनोहर जोशी ह्यांना वय झाले म्हणून सक्रिय राजकारणातून बाहेर केले. पण ह्या श्रीधरन ह्यांचे वय मुरली मनोहर जोशी पेक्षा जास्त आहे. कर्नाटक चे मुख्यमंत्री ८० वर्षाचे आहेत. आणि अडवाणी ना बाहेर आहेत. श्रीधरन ह्यांचा राजकीय पिंड नाही पण bjp मध्ये येताच राजकीय भाष्य करत असतील तर त्यांचा इतिहास विसरून त्यांच्या वर टीका होणारच.

In reply to by Rajesh188

हा मुद्दा चांगला आहे. मलाही पटला. फक्त एकेरी उल्लेख नकोच. मा. मनमोहन सिन्ग यांचाही कुणी करु नये. राजकीय मतभेद वेगळे, अणि विद्वान व्यक्तिमत्व वेगळे.

In reply to by खेडूत

विद्वान लोकांचा एकेरी उल्लेख नको. मला भावलेले सर्वात मोठं व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी निवडणूक आयुक्त T.N. शेषन. भारतात निवडणुकीचा पूर्ण चेहराच त्यांनी बदलून टाकला आणि शिस्त पूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी असावी ह्याचा धडा पण दिला.

https://www.loksatta.com/maharashtra-news/had-chitra-wagh-not-joined-th… चित्रा वाघ यांना पक्षांत घेणे ही भाजपची चूक आहे. स्वतःचे चारित्र्य उत्तम असेल तरच इतरांवर दोषारोप करणे योग्य. महाराष्ट्र भाजपात, मोठी उलथापालथ करणे, आता तरी भाग आहे. जिन के घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करते.

In reply to by मुक्त विहारि

पूर्वीच लिहिले आहे. सत्ता न मिळाल्याने भाजप ठाकरेंना अडचणीत आणत आहे. संजय राऊत, प्रताप सरनाईक, धनंजय मुंडे, सुशांतसिंग राजपूत, संजय राठोड ही प्रकरणे भाजपने वापरली. शिवसेना चित्रा वाघच्या नवऱ्याचे जुने प्रकरण काढून उत्तर देतेय. जर ठाकरे अजूनही झुकले नाहीत, तर विधानसभा निवडणुकीनंतर थेट ठाकरे कुटुंबियांना लक्ष्य केले जाऊ शकते. काहीही करून, दडपण आणून, चौकशी मागे लावून हे सरकार घालवून आपले सरकार आणण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करतोय. जाता जाता . . . इतर मागासवर्गीय व ब्राह्मणांची कमी झालेली मते भरून काढण्यासाठी फडणवीसांनी इतर सर्व पक्षातून जमेल तेवढा कचरा उचलून भाजपत आणला. यापैकी कोणीही विश्वासार्ह नाही, त्यांची भाजपला फारशी मदत होणार नाही व ते भाजपला गोत्यात आणणार हे नक्की. पक्षातील जुन्या निष्ठावतांना संपवून बाहेरचा कचरा पक्षात आणण्याची शिक्षा भाजपला मिळायलाच हवी.

In reply to by मुक्त विहारि

मुक्तविहारी, चित्र किशोर वाघ या बाई दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमच्या कसल्याश्या कार्यक्रमांना हजेरी लावायच्या म्हणे. ऐकीव माहिती आहे. खखोदेजा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ह्याचा अर्थ सर्वपक्षीय एकमत आहे.दाऊद पाकिस्तान मध्येच ठीक आहे भारता ला पाकिस्तान नी सोपवला तरी तो राज्यकर्त्यांना नको आहे. नको नको ते संबंध उघड व्हायचे.

https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/bjp-mns-may-form-allian… राज ठाकरे, यांचा काहीही भरवसा नाही. शरद पवार यांच्या बरोबर, राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे, सत्तेचे गाजर दिसताच, राज ठाकरे पण पलटी मारण्याची शक्यता आहे. शरद पवार, हे हळूहळू भाजपचा एक एक साथीदार कमी करत आहेत. पुढच्या निवडणूकीत, सगळे पत्ते शरद पवार यांच्या हातात असणार आहेत.

राजकारणात प्यादी महत्वाची असतात पण राजकारणात एक गमत असते प्यादी कोण आहेत आणि कोणाची आहेत हे ओळखता येत नाही. आणि राजकारणात विचारधारा हा प्रकार फक्त बोलण्यासाठी असतो . Bjp ल मुफ्ती पण चालते. आणि ज्या पक्षांवर टीका करण्यात आयुष्य गेले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेनेला जवळचे वाटतात. फक्त सत्ता मिळवणे महत्वाचे. जनहित साठी सत्ता ध्या असे सर्वच पक्ष सांगत असतात पण जनहित पेक्षा स्व हित च ते बघत असतात. आपण सामान्य लोकांनी इतक्या आत मध्ये न जाता आपल्या रोजच्या समस्या जो व्यक्ती सोडवेल त्याला च मत द्यावे.

In reply to by नगरीनिरंजन

भंगारवाला, वडापाव विकणारा, खारे दाणे विकणारा, इत्यादी माझ्या दृष्टीने, बेरोजगारी हे एका अर्थाने, काही लोकांसाठी वरदान आहे..... काही लोकांसाठी ....

In reply to by मुक्त विहारि

अभियांत्रिकी शाखेतील पदवी धारक, उच्च शिक्षित तरुण ह्यांनी खरे तर भज्जी विकली पाहिजेत . त्या मध्येच त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.

बंगाल मध्ये परत ममता दीदी च सत्तेवर येणार,केरळ मध्ये bjp ल भोपळा पण फोडता येणार नाही. किंवा दोन तीन च जागा मिळतील असे अंदाज आहेत. पेट्रोल दर वाढ,शेती विषयक कायदे ,बँकांचे चे खासगीकरण ह्याचा प्रभाव मतदार वर नक्की असणार आहे.

https://www.loksatta.com/manoranjan-news/karbhari-layabhari-actress-gan… दोन साधूंची हत्या झाली सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली अभिनेत्याने आत्महत्या केली सोलापूर बलात्कार केस आहेच आणि आता तर, ट्रान्सजेंडर पण सुरक्षित नाहीत .....

In reply to by मुक्त विहारि

मु.वि. जी मग तुम्हाला उत्तर प्रदेशात स्थायिक झाल पाहीजे. सर्वात सुरक्षितता तुम्हाला तिथेच मिळेल. तुमच्या पक्षाच सरकार तर तेथे आहेच.(क्रु. ह. घ्या.)

In reply to by गोंधळी

योग्य सल्ला. भारता मधील सर्वात सुरक्षित राज्य म्हणजे योगीचे उत्तर प्रदेश. लोकांना एवढे स्वतंत्र आहे की पोलिस वर सुद्धा गोळीबार करून त्यांना मारण्याचे तिथे स्वतंत्र आहे. तिथे बलात्कार,खून,चोऱ्या,दरोडे असले किरकोळ खूने होतच नाहीत. राम राज्य च म्हणा ना

In reply to by Rajesh188

तिथे पोलिसांनाही स्वातंत्र्य आहे बहुदा...गुन्हेगारांच्या गाड्या उलटवुन त्यांना मारण्याचे... आमच्या कडचे गुन्हेगार तर तुरुंगातुन सुटल्यावर लगेच पोलिसांच्या नाकावर टिच्चून मिरवणुका काढुन टोल न भरताच निघुन जातात म्हणे. आमच्या कडे "अजब तुझे सरकार" असल्याने असे होत असावे बहुदा.

In reply to by Rajesh188

आमच्याकडे तर रात्री १२ वाजता तलवारीने केक कापुन, फटाके फोडुन बड्डे सेलिब्रेट करण्याचे, कोयते/तलवारी नाचवत दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या गाड्या तोडायचेही स्वातंत्र्य आहे. आमचे अजब सरकार तोडीस तोड आहे म्हणायचे...

https://www.hindustantimes.com/elections/abpcvoter-opinion-poll-predict… एबीपी-सीव्होवटर मतदानपूर्व मतदार सर्वैक्षणाचे अंदाज - बंगाल (२९४): तृणमूल १४८-१६४, भाजप ९२-१०८ आसाम (१२६): भाजप ६८-७६, कॉंग्रेस ५३-५१ पॉंडीचेरी (३०): रालोआ १७-२१, कॉंग्रेस १२ केरळ (१४०): डावी आघाडी ८३-९१, कॉंग्रेस आघाडी ४७-५५ तामिळनाडू: द्रमुक १५४-१६२ अद्रमुक ५८-६६ तामिळनाडू व पॉंडीचेरीत सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

In reply to by मुक्त विहारि

वडिलांच्या स्मारकासाठी स्वतःच्या खिशातून दमडी सुद्धा न देता जागतिक वारसा असलेले महापौर निवासस्थान बळकावले. त्यावरील ७-८ कोटी रूपयांचे हस्तांतरण शुल्क माफ करून घेतले. आता सरकारचे (म्हणजे जनतेचे) ४०० कोटी वापरून वडिलांचे स्मारक बांधणार. बोला आवाज कोणाचा . . . !

In reply to by श्रीगुरुजी

राम मंदिराला देणगी देतांना हात आखडला.... शेतकरी वर्गाला, बांधावर जाऊन 25-30 हजार देतांना, हात आखडला...