Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ५)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 19/02/2021 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी पाचवा भाग काढत आहे. पहिल्या चार भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणी बंगलोरची तथाकथित चळवळी दिशा रवीची दिल्लीच्या कोर्टाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच थोडीफार प्रसिध्दी मिळाली म्हणून आपण वाटेल त्या विषयावर बोलायला मोकाट आहोत हा सोस अनेकांना आवरत नाही त्याचाच एक भाग म्हणजे ग्रेटा थनबर्गचे नवे वक्तव्य . आता ती नासाच्या मंगळ मोहिमेवर वक्तव्य करत आहे आणि म्हणत आहे की अशा मोहिमांसाठी असा खर्च करायची काहीही गरज नाही.

वाचने 61683
प्रतिक्रिया 242

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

काही मोजकेच गुंड अर्थी शहर भीती दाखवून ,हिंसाचार माजवून ताब्यात घेतील. भरल्या घरातून हाकलून देतील,जमिनी ताब्यात घेतील. सिंह सारखे प्रतेकच्या जीवाशी खेळतील आणि त्यांचे स्वतःचे साम्राज्य उभे करतील . चालेल का. हे नैसर्गिक च आहे. जंगलात असेच चालते.

In reply to by Rajesh188

साहेब जर तुम्ही म्हणता तसे नैसर्गिक नसते तर पोलिस प्रशासन सरकार वगैरेची गरजच पडली नसती ना.! माणुस प्रगल्भ असल्याने सत्ता व अधिकार हस्तगत करण्याच्या नैसर्गिक उर्मीला काबुत ठेवण्यासाठीच समाच व्यवस्था अस्तित्वात आली. आणि जिथे जिथे फट मिळते तिथे तिथे माणुसातील ह्या वृत्ती नजरेसमोर येतातच कि.

In reply to by Rajesh188

समर्थन करायचे म्हणून कोणत्या ही चुकीच्या गोष्टी चे करायचे हे अयोग्य आहे.
मुळात हे समर्थन नाही. हे वास्तव आहे आणि त्यानुसारच एखाद्याला मार्ग आखावा लागतो. जंगलातल्या कायद्याचे थोडे सभ्य रूप समाजव्यवस्थेत दिसते. इथे कोणी कोणाला जीवानीशी मारत नसले तरी एखाद्याचा प्रभाव कमी कसा होईल ह्याचे प्रयत्न होताना दिसतातच. उदा. सत्तेत राहण्याची काकांची उर्मी नैसर्गिक आहे नैतिक नाही.

In reply to by Rajesh188

मजा आली हो दादा! आपण सरकारी नोकरी केली आहे काय कधी? मी केली होती म्हणून माझ्या अनुभवावरून लिहिलं. ते सगळं जाऊ देत..आपण राहुलजी, त्यांचा साधेपणा, त्यांची दूरचा विचार करण्याची समज, भारत देशाच्या कल्याणाची आस्था, भ्रष्टाचाराची चीड, या विषयावर नक्की लिहा ही आग्रहाची विनंती. त्यामुळे उगाच उठ सूट टीका करणारी सगळ्यांची तोंडं बंद होतील. या देशात काहीतरी तर चांगलं व्हायला हवं असं वाटतं राव!

In reply to by Rajesh188

> सरकारी यंत्रणा भ्रष्ाचारा सोडला तर अत्यंत कार्यक्षम पने काम करते हे प्रतेक संकटाच्या वेळी सिद्ध झाले आहे. ती बिरबल ची कथा आठवली. पोपट हालचाल करत नाही, आवाज काढत नाही, श्वास घेत नाही पण नाहीतर तसा तो शंभर टक्के बरा आहे . > लोकशाही हवीच कशाला एकच घरण्यका देश चालवू ध्या. इतकी वर्षं तेच चालू होते ना !

In reply to by खेडूत

१. आर्थिक स्थिरता २. बँक कर्जासाठी फार खेटे घालायला लावत नाही. ३. योग्य वयात लग्न होण्याची शक्यता खूप वाढते. ४. मानसिक ताण कमी ५. कामाच्या तुलनेत चांगला पगार बरेच फायदे आहेत.का येणार नाहीत हजारोंच्या संख्येने अर्ज?

सध्याच्या शिवजयंती उत्सवात पोवाड्यावर बंदी घातली आहे हे नक्की काय प्रकरण आहे ? फक्त कायप्पवर मेसेज आलेत. बातमी वाचण्यात आली नाही

अधिकृत रीत्या शिवजयंती साजरी करण्यास प्रतिबंध च होता.जमाव बंदी कायदा लागू आहेच. फक्त शिवजयंती साजरी करण्यास अनधिकृत पने सूट दिली गेली. पोवाडा प्रकरण म्हणजे उभे केलेलं भूत आहे.

In reply to by आनन्दा

पण हेल्मेट डोक्यावर नसले तरी दुर्लक्ष करतात ना . त्याला अनधिकृत मान्यता म्हणतात.

In reply to by मुक्त विहारि

शिवसेनेचे बेगडी हिंदूत्वही उघडे पडले आणि मतांसाठी घातलेले मराठी कातडे पण निसटले. आमच्या सारख्या अडाणी माणसांना, इतपत तरी नक्कीच समजते ...

In reply to by बाप्पू

कोणतीच पळवाट न ठेवता संपूर्ण संपत्ती जप्त करण्या पासून जन्म ठेपे पर्यंत अशा लाचखोर अधिकारी कर्मचारी ह्या ना शिक्षा होवू शकेल असा कायदा असण्याची नितांत गरज आहे. लाचखोरी च्या कॅन्सर मुळे देशाची तब्बेतं बिघडत आहे.

In reply to by Rajesh188

नेत्यांना पण हीच शिक्षा होती .... मौर्य काळात, अशा लोकांची संपत्ती पण जप्त होत होती आणि जाहीर फाशी पण देत होते .... संदर्भ, कौटिल्याचे अर्थशास्त्र

In reply to by मुक्त विहारि

लाचखोर पना हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. लाचखोरी मुळे सज्जन लोक आयुष्यातून उठतात . खूना पेक्षा पण गंभीर गुन्हा आहे हा. मोदी सरकार एवढे कायदे बदलत आहे तर सरकारी अधिकारी,कर्मचारी,नेता कोणी ही लाच घेवून काम करत असेल तर त्याची आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाची (इन्कम पेक्षा जास्त प्रॉपर्टी असेल तर) संपत्ती जप्त करून ह्यांना बारा वर्ष तुरुंगात बिना जामीन टाकता आले पाहिजे असा कायदा करावा. पुढील पन्नास वर्ष मोदी ना लोक डोक्यावर घेतील असा

In reply to by उपयोजक

हे पगारावर काम करत नसून कमिशन वर काम करतात .. जेवढी जास्त लोक फाईन भरतील तेवढे जास्त पैसे ह्यांना मिळतात.त्या साठी न केलेल्या गुन्हा पण ह्या लोकांना फाईन वसूल करण्यासाठी चालतो. आणि clean marshal he कोणी प्रशिक्षित लोक नाहीत तर ओवाळून टाकलेले च आहेत. त्या मुळे असे प्रसंग घडत असतात.

In reply to by उपयोजक

नेपाळ ला भीक लागली नाही त्या मुळे नेपाल सरकार ला पेट्रोल महाग करण्याची गरज नाही. इथे पेट्रोल जेवढे महाग तेवढे देश हित जास्त असे युक्तिवाद करणारे महाभाग आहेत.

In reply to by उपयोजक

अट्टल गुन्हेगार सर्वच राजकीय पक्षात आहेत एक पण भारता मधील राजकीय पक्ष त्याला अपवाद नाही.. फक्त राष्ट्रवादी पक्ष त्या गुन्हेगार व्यक्तीला वाचवायचा प्रयत्न करेल की योग्य ती कडक कारवाई करेल हे महत्वाचे.

करोना पुन्हा खरोखरच पसरतोय की लशीकरण सक्तीचे करण्यासाठी ह्या क्लुप्त्या आहेत? असो. करोनाच्या प्रादुर्भावामागे चीनआहे..करोनामुळे चीनमध्ये किती अब्जाधीश वाढले.. वगैरे मांड्ण्या गेल्या वर्षी येत होत्या. त्या आता बंद झाल्या.

In reply to by Rajesh188

कंगनाला, भाजप आवडते.....

https://www.loksatta.com/desh-videsh-news/shivsena-saamana-editorial-on… राम मंदिरासाठी देणगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोळा करत आहे.ह्यात केंद्र सरकारचा, काहीही संबंध नाही.

In reply to by मुक्त विहारि

सामना सारख्या टिनपाट पेपर चे संपादकियाला ईतर वॄत्तपत्रे इतके महत्व का देतात हे मला अजुन समजले नाही. सामना हे वॄत्तपत्र म्हणन्याच्या लायकीचे नाही हे माझे १० वर्षापासुन चे मत आहे. शिवराळ भाषा आणी फुकाच्या गम़ज्या सोडुन काहीही नसते.

In reply to by सुक्या

मी पण होतो .... सामना मध्ये, आधी संजय दत्तला दोषी ठरवले आणि नंतर माफ केले ... मी केलेली चूक, इतरांनी करू नये, इतकीच माफक अपेक्षा...

पूर्वीच्या निकम्म्या सरकारांनी (त्यात बीजेपीचीही सरकारे आलीच) तेलाच्या आयातीवरचे अवलंबित्व कमी करायचा अजिबात प्रयत्न केला नाही हे श्री मोदींचे म्हणणे अचूक आहे. परंतु गेल्या साडेसहा वर्षांमध्ये मोदींच्या सरकारने आयात कमी करण्याऐवजी वाढवली आहे. शिवाय देशांतर्गत तेल व नैसर्गिक वायूचे साठे शोधण्याचे काम करणार्‍या ओएनजीसीसारख्या कंपन्यांची शिल्लकही उडवली आहे. असो. सरकारच्या कामाचे मूल्यमापन करणे म्हणजेसुद्धा मोदीविद्वेष असतो असे इथल्या विद्वानांनी ठरवले असल्यास आगाऊ क्षमा मागतो. https://youtu.be/r5BV-9YR74Q

In reply to by नगरीनिरंजन

मोदी महाराजांच्या मुक्ताफळांना काहीही अर्थ नाही. जपान सर्व तेल आयात करतो, दक्षिण कोरिया बहुतेक तेल आयात करतो. आयातीमुळे ह्या देशांच्या प्रगतीला अजून तरी काहीही प्रतिबंध झालेला नाही किंवा तेलाचे दर गगनाला भिडले आहेत असेही नाही. आमच्या देशांत फुकट्या लोकांची संख्या जास्त असून शेतकरी, सरकारी बँका, नुकसानीत चालली bsnl, रेल्वे , एअर इंडिया, विजय सुपर स्कुटर, काम ना करता पगार घेणारे शिक्षक, ह्या सर्वांवर जी उधळपट्टी चालली आहे ते पैसे जनतेकडून वसूल नाही होणार तर कुठून होणार ? अर्थांत ह्या घाणीत राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही पूर्ण पणे बरबटलेले आहेत आणि एकमेकांना दोष देणे म्हणजे उदय चोप्राने वरून धवन वर तुला ऍक्टिंग येत नाही असा आरोप करणे आहे. > शिवाय देशांतर्गत तेल व नैसर्गिक वायूचे साठे शोधण्याचे काम करणार्‍या ओएनजीसीसारख्या कंपन्यांची शिल्लकही उडवली आहे नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ? मोदी महाराजानी आपल्या पहिल्या वर्षांत जर काही चांगले आर्थिक बदल केले असते तर एव्हाना भारत त्याची फळे चाखत बसला असता पण ह्यांच्या डोक्यांत उजेड इतक्या लवकर पडणार नाही. तरी कोळसा ह्या प्रकारांत त्यांनी बऱ्यापैकी सुधार केले आहेत त्यामुळे किमान भारताला कोळसा सध्या आयात करावा लागत नाही (म्हणे). सर्व उद्योग धंद्यांचा पाया हा ऊर्जा असून त्यावर प्रचंड कर लावणे म्हणजे अर्थव्यवस्थेच्य पायाला कमजोर करण्यासारखे आहे. भारत गरीब राहण्याची जी असंख्य कारणे आहेत त्यातील हे एक महत्वाचे कारण. खाजगी पेट्रोल कंपनींना मुक्त पद्धतीने व्यापार करू देणे, त्यांना त्यांचे दर ठरवू देणे, सर्व राज्यांत एकच दर ठेवण्याऐवजी आणि फिक्स्ड नफा देण्याऐवजी वाट्टेल तो भाव आकारण्याची मुभा दिली असती तर एन्व्हाना देशांत लक्षावधी जास्त पेट्रोल पम्प असते आणि पेट्रोल वरील कर सुद्धा कदाचित कमी केला जाऊ शकला असता. देशाचं भाग्य फुटलं आहे आणखीन काय !

In reply to by नगरीनिरंजन

इंधन आयात करणे थांबवणे म्हणजे अर्थव्यवस्थेला खीळ घालणे. जोपर्यंत पर्यायी गोष्टी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कुठलीही आयात थांबवणे घातक ठरले असते. पर्याय उपलब्ध व्हायला वेळ लागतो. इथेनॉल वर चे प्रयत्न श्री. गडकरी करत आहेत, पण प्रचंड पाणी घातलेल्या उसापासून इंधन तयार करणे हे फारसे चांगले नाही. दुसरा पर्याय अणू उर्जेचा. Kudankulm चा विरोध कोण करतंय आणि का ते सांगायची गरज नाही. विकी वरून: The Church of South India and the National Council of Churches opposed the power plant and supported the protests against it.[47] Supporters of the power plant and the government have alleged that the protest against the power plant was instigated by churches and funded by foreign sources. The protestors dismissed the allegation of foreign funding, but said that seeking support from church was "natural" as many protestors were Christian localities living in the vicinity of the Reactor.[48] शेवटचा पर्याय सोलर. आपली कॅपॅसिटी वाढतेय. 2022 पर्यंत 100 gw च उद्दिष्ट आहे. https://www.hindustantimes.com/india-news/pm-modi-to-inaugurate-asia-s-… https://www.nsenergybusiness.com/features/largest-solar-power-plants-in… असो.

In reply to by पिनाक

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला सुद्धा शिवसेनेने विरोध केला. तेव्हा स्वखुर्चीहित देशहितापेक्षा वरचढ ठरल्याने फडणवीसांनी तो प्रकल्प गुंडाळून टाकला.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते शिवसेनेला एवढी किंमत द्यायची काहीच गरज नव्हती. अर्थात जर त्या वेळी फडणवीसांचे आडाखे हे तात्पुरते बंद करून नंतर पूर्ण बहुमत आल्यावर पुन्हा सुरू करण्याचे असले तर नकळे. किंवा मग कदाचित फुकुशिमा मुळे हे सगळं थंडया बस्त्यात गेले असेल.

In reply to by पिनाक

तुम्ही च अती हुशार आणि जनता महामूर्ख हाच भक्त शिरोमणी चा agenda तुम्ही लोक वापरत आसल तर . तर सत्तेत इथून पुढे bjp कधीच नसेल. अजुन पण वेळ गेली नाही आत्मचिंतन करा.

In reply to by Rajesh188

Admin साहेब, कृपया या id बद्दल माझी फॉर्मल complaint घ्यावी. हा id spamming करत आहे आणि पर्सनल अटॅक करतो आहे.

In reply to by पिनाक

तुम्ही चुकीची माहिती पसरवत असाल तर विरोध होणारच. इथे तुम्ही काही माझे पर्सनल विरोधक नाही आहात .. वैचारिक विरोध क आहात. मी शिव्या किंवा गलिच्छ भाषा तर वापरत नाही ना.. Admin ते समजून घेतील

In reply to by पिनाक

शिवसेना पायाखालील चादर ओढेल या भीतिने फडणवीसांनी शिवसेनेची प्रत्येक मागणी मान्य केली (जैतापूर व नाणार प्रकल्प गुंडाळणे, जागतिक वारसा असलेले मुंबई महापौर निवासस्थान ठाकरे स्मारकासाठी देणे, त्यावरील हस्तांतरण शुल्काचे ७-८ कोटी रूपये माफ करणे, सोमय्यांना उमेदवारी नाकारणे, ४ वेळा जिंकलेला पालघर मतदारसंघ शिवसेनेला देऊन टाकणे, मुंबई महापालिकेत पूर्ण रान मोकळे देणे, शिवसेनेची अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ सहन करणे, शिवसेना करीत असलेली प्रत्येक अडवणूक सहन करणे, शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत तब्बल १२४ जागा देणे इ.). शिवसेनेची मर्जी राखण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रहिताकडे व देशहिताकडे दुर्लक्ष केले. एवढे करूनही शेवटी हातात भोपळाच मिळाला.

In reply to by श्रीगुरुजी

जैतापूरचं इतकं नाव घेत आहात तर तुम्हाला डॉ. मनमोहन सिंग यांनी मोठ्या प्रयत्नाने अमेरिकेसोबत केलेला अणुऊर्जा करारही माहित असेल अशी आशा. आधीच्या सरकारांनी काहीच प्रयत्न केले नाहीत आणि मीच एकटा मोठा शहाणा असा अविर्भाव फक्त अर्धवट माणूसच घेऊ शकतो. मोदींनी बर्‍याचदा पूर्वसुरींवर जबाबदारी ढकलून हात झाडायचे प्रयत्न केले आहेत. बाकी फडणविसांचे म्हणाल, तर बहुमताने सत्ता हाती असतानाही विरोधकांना घाबरून काही करता येत नसेल तर काय उपयोग सत्तेचा? नवी मुंबईतले खारफुटीचे जंगल तोडणे व आरेमध्ये कारशेड बनवणे हे उद्योग मात्र बरे धडाडीने जमत होते फडणविसांना!

In reply to by नगरीनिरंजन

अभिनंदन! विषय कोणताही असला तरी त्याचा मोदींंशी येनकेनप्रकारेण बादरायण संबंध जोडून दुगाण्या झाडण्याचे तुमचे कौशल्य वादातीत आहे.

In reply to by पिनाक

इंधन आयात थांबवणे ह्याचा अर्थ काय.. सरकारी कंपन्या bpcl,hpcl ह्यांची ताकत वाढवणे. वाढवली का ह्या सरकार नी. तुम्ही जेवढे फेकाल तेवढे जास्त गाळात rutal ते तर अतिशय

आता पर्यंत च्या भारताच्या इतिहासात जेवढी सरकार झाली ती आताच्या सरकार पेक्षा अनेक पट उच्च दर्जाची होती. केंद्रीय सरकार मधील महत्वाच्या लोकांना एकाध्या विषयाची माहिती नसेल तर त्या विषयात ज्यांचा अभ्यास आहे त्यांची मतं ऐकुन घेतली जात असत. मीच शहाणा ही वृत्ती नव्हती. आताचे सरकार सर्वच क्षेत्रात पूर्ण अयशस्वी झाले आहे ह्याचे कारण हुशार लोकांना च्या मताना फालतू समजणे आणि मीच शहाणा असा गैर समज करून घेणे. हिंदू कार्ड वर भरवसा ठेवू नये ह्या सरकार नी हिंदू आता पर्यंतच्या सर्व सरकार च्या काळात आर्थिक बाबतीत मजबुत होते आणि ह्या सरकार च्या काळात आर्थिक बाबतीत कमजोर झालेले आहेत फक्त चार पाच हिंदू च फायद्यात आहेत हिंदू च हे सरकार उलथून टाकतील निवडणुकीत.

In reply to by Rajesh188

फक्त चार पाच हिंदू च फायद्यात आहेत वा वा.. जगातल्या मोजक्या 4 हिंदूंमध्ये समावेश केल्याबद्दल मी आपले आभार मानतो. पेढे खायला कधी येताय?

दादरा नगरहवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह मुंबईतील मरीन लाईन्समधील सी ग्रीन हॉटेलमध्ये सापडला आहे. मोहन देलकर यांचा जन्म १९ डिसेंबर १९६२ रोजी झाला. ते १९८९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून, १९९१ आणि १९९६ मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून, १९९८ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून, १९९९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून, २००४ मध्ये स्वतःच्या भारतीय नवशक्ती या पक्षाचे उमेदवार म्हणून दादरा नगरहवेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. २००९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण त्यांचा २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या नथुभाई पटेल यांनी पराभव केला. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवत भाजपच्या नथुभाई पटेल यांचाच पराभव केला. Mohan Delkar

शिवसेना नेते अनंत तरे यांचे निधन झाले आहे. ते १९९३ ते १९९६ या तीन वर्षांच्या काळात ठाण्याचे महापौर होते. anant tare

https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-cm-uddhav-thacker… अंतराळ विज्ञान हे केंद्रीय अखत्यारीत येते .... रायगड हा महाराष्ट्र राज्यात येतो .... महाराष्ट्र राज्यातील पाण्याची अडचण पण केंद्रानेच सोडवायची का?

गेले दोन आठवडे गायब असलेले मंत्री संजय राठोड यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी मंदिराच्या यात्रेत अवतीर्ण झाले आहेत. पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव गोवले गेल्यानंतर ते गायब झाले होते. त्यांनी सपत्निक देवीची पूजा पण केली. त्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांची हजारोंच्या संख्येने तोबा गर्दी जमली आहे. परवाच मुख्यमंत्र्यांनी राज्यात परत वाढत असलेल्या कोरोनाच्या आकड्यांमुळे असले कार्यक्रम राज्यात करायला बंदी घालण्याची घोषणा केली होती पण त्या घोषणेला केराची टोपली दाखवली जात आहे. विदर्भात आता कोरोना परत मोठ्या प्रमाणावर डोके काढत आहे, अमरावती विभागात अनेक ठिकाणी परत लॉक डाऊन लावला आहे असे असताना असला प्रकार आणि तो पण मंत्र्याकडूनच होणे धक्कादायक आहे. सगळा प्रकार बघून खरोखरच संताप आला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पोहरादेवीला हजारोंची गर्दी झाली होती आणि त्यातील १९ जणांना कोरोनासंसर्ग झाला आहे असे उघडकीला आले आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/mahant-kabirdas-maharaj… हा प्रकार विदर्भाला आणि म्हणून महाराष्ट्राला आणि म्हणून देशाला भलताच महागात पडायची शक्यता आहे. परत लॉक डाऊन लावायला लागला तर त्याची जबाबदारी कोणाची?

काही दिवसांपूर्वी पंजाबमधील स्थानिक निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वत्र विजय मिळाला होता. अकाली दल, भाजप व आआपचा दारूण पराभव झाला होता. भाजपला पंजाबमध्ये तसे नगण्य स्थान आहे. अकालींशी युती असताना विधानसभेच्या ११७ पैकी ९४ जागा अकाली व फक्त २३ जागा भाजप लढायचे. लोकसभेच्या १३ पैकी ११ जागा अकाली व २ जागा भाजप लढायचे. अशा पक्षाला पंजाबमध्ये खूप कमी जागा मिळणे स्वाभाविक आहे. खरा पराभव अकाली दलाचाच होता. परंतु अकाली दलाचे नावही न घेता, शेतकरी कायद्यांमै भाजपचा दारूण पराभव झाला असे माध्यमांनी ठोकून दिले. आज गुजरातमधील स्थानिक निवडणुकीचे निकाल येताहेत. आताची परिस्थिती अशी आहे. GUJARAT MUNICIPAL ELECTION RESULTS 2021 SO FAR: Ahmedabad: 80 BJP; 20 congress Surat: 56 BJP; 8 Congress Vadodara: 41 BJP; 7 Congress Rajkot: 48 BJP; 0 Congress Jamnagar: 28 BJP; 0 Congress Bhavanagar: 32 BJP; 8 Congress गुजराती जनतेने कृषी कायद्यांना प्रचंड पाठिंबा दिल्याचे स्पष्ट आहे.

बैतूल, मध्य प्रदेशच्या कॉंग्रेस आमदार निलाय डागा याच्या कंपनीवर आयकर विभागाने धाड घालून साडेचारशे कोटींची बेहिशोबी मालमत्ता आणि परकीय चलन उघड केले. त्याची बातमी. आता वरवर पाहता ही कंपनी सोयाबीन प्रक्रिया करत आहे, मग हे धंदे आंदोलन जीवी मंडळींशी संबंधित असतील का हे कळायला हवे.

एक नातेवाईक भेटला जो शेती करतो. त्याची शेती जुन्नर तालुक्यात आहे.त्याला विचारले तू शेतकरी आहेस तर कृषी कायद्याबद्द्ल तुझे काय मत आहे. तो म्हणाला की एका गोष्टीचे सरकारने निराकरण केले तर कायदा चांगला आहे. त्याचे म्हणणे असे की एखाद्या कंपनीबरोबर करार केला आणि मधेच अवकाळी पाऊस, गारपीट, पिकांवर रोग अशा नैसर्गिक आपत्ती आल्या, तर कंपन्या अंग काढून घेऊ शकतात. अशा परिस्थितित शेतकर्‍याला कुणी वाली रहाणार नाही. शेतकर्‍याचेच नुकसान होईल. त्याच्या नुकसानभरपाईची कायद्यात तरतूद केली तर शेतकर्‍यासाठी हा कायदा वरदान ठरेल असे त्याचे म्हणणे पडले.

In reply to by बबन ताम्बे

आपक्तालीन परीस्थिती मधे काय करायचे अशा क्लॉजेसचा अंतर्भाव करारात करता येउ शकेल ना ?

In reply to by मराठी_माणूस

पण कायद्यात तशी तरतूद असेल तर कंपन्यांवर तसा क्लॉज टाकणे बंधनकारक होईल. कायदा नसेल तर ते कंपनीच्या हातात असेल तो क्लॉज टाकायचा की नाही.

In reply to by बबन ताम्बे

मधेच अवकाळी पाऊस, गारपीट, पिकांवर रोग अशा नैसर्गिक आपत्ती आल्या, तर कंपन्या अंग काढून घेऊ शकतात.
अशा प्रसंगी आपल्याकडे विकायला पीक नाही म्हणून शेतकर्‍यांनी अंग काढून घेतले तर समजू शकतो पण पीक विकत घेणार्‍या कंपन्या का अंग काढून घेतील?

In reply to by बबन ताम्बे

1. Companies futures ट्रेड करतायत. समजा गव्हाचा सध्याचा दर 2000 रुपये प्रति क्विंटल आहे. कंपन्या शेतकऱ्याला म्हणू शकतात की मी 1950 रुपये ने घेईन. उद्या भाव 1600 ला गेले तरी 1950 आणि 2200 रुपये गेले तरी 1950. जर पीक असेल आणि ते योग्य क्वालिटी चे असेल (त्याचे मापन करून प्रतवारी ठरवली जाईल) तर कंपन्या घेणार. जर निकृष्ट प्रतीचे असेल तर एकतर घेतील कमी किमतीने किंवा घेणार नाहीत. ते agreement मध्ये लिहायला हवे. जर प्रतवारी बरोबर असेल आणि धान्य बरोबर असेल तर कंपन्या पण ट्रेड मधून बाहेर पडू शकत नाहीत, आणि शेतकरी ही. म्हणजे अगदी शेतकरी सुद्धा 2200 मिळत असतील तरी त्यांना 1950 ला विकावे लागेल. पण यात एक प्रकारचा insurance असेल म्हणून दर बदलला जाणार नाही. 2. दुसरा प्रकार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा. मी तुमचे शेत घेतो. तुम्हाला ठरावीक पैसे देईन. किंवा ठराविक धान्य देईन ते तुम्ही विका. काय हवं ते आधी कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहायचं. 3. तिसरा प्रकार म्हणजे no contract. शेतकरी बाहेर किंवा APMC मध्ये विकू शकतात. आता हे सगळं पहाता नक्की काय changes expected आहेत? तुमच्या पिकावर रोग पडला (प्रकार 1 मध्ये) तर कंपन्या नक्कीच जबाबसरी घेणार नाहीत. प्रकार 2 मध्ये जबाबदारी घेतील. तेव्हा मला नक्की concern कळला नाही.

In reply to by पिनाक

तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण काय हवं ते काँट्रयाक्ट मधे लिहायला शेतकरी तेव्ह्ढा जागरूक अथवा सुशिक्षित हवा. कंपनीने फक्त स्वतःच्या नुकसानीचा विचार न करता शेतकर्‍याच्या नुकसानीचा पण विचार करायला हवा आणि त्याप्रमाणे कलमे टाकावीत. कन्सर्न तोच आहे

In reply to by बबन ताम्बे

शेतकरी तेव्ह्ढा जागरूक अथवा सुशिक्षित हवा
हाच खरा कळीचा मुद्दा आहे. काही शहरी लोक हा प्रश्न नीट समजाउन न घेता , शेती आणि शहरी उद्द्योग यांची तुलना करतात आणि शेती विषयी असंवेदनशीलता व्यक्त करतात. मोठ्या उद्योगा मधे प्रत्येक विभागामधे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी काम करत असतात. (उदा: एमबीए, सीए, ईंजीनीअर्स वगैरे) . तेच लोक बाहेरच्या जगाशी संपर्कात असतात आणि स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करुन उद्योगाला लाभ होईल असेच व्यवहार करतात. इथे एकाच शेतकर्‍याक्डुन उत्पादनापासुन विक्री पर्यंत सर्व काही व्यवस्थित पार पाडण्याची आपण कशी अपेक्षा करु शकतो

In reply to by बबन ताम्बे

पण काय हवं ते काँट्रयाक्ट मधे लिहायला शेतकरी तेव्ह्ढा जागरूक अथवा सुशिक्षित हवा.
एक गोष्ट सांगा- समजा कंपन्यांनी काही शेतकर्‍यांना फसवले तर आताच्या काळात ही घटना लपून राहिल का? आठ दिवसात देशभर ती बातमी पोहोचेल आणि सगळ्यांना त्याविषयी कळेल. अशा परिस्थितीत इतर शेतकरी कंपन्यांबरोबर करार करायला पुढे येतील का? म्हणजे शेतकर्‍यांना न फसविण्यात कंपन्यांचे पण हितसंबंध आहेत असे वाटत नाही का? म्हणजे कंपन्यांना या उद्योगात राहायचे असेल तर शेतकर्‍यांना फसवू नये एवढे कळणार नाही? अर्थात कंपन्या धुतल्या तांदळाच्या आहेत असे अजिबात नाही पण डिमांड-सप्लाय मार्केटमध्ये हे स्वसुधारणा तंत्र असते त्यामुळे डांबरट लोकांना पण आपल्या स्वार्थासाठी का होईना मार्केटमध्ये सौजन्याने वागावे लागते याकडे पण दुर्लक्ष व्हायला नको इतकेच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सध्याच्या शेतकर्‍याच्या आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा विचार करता त्याला फसवणे खूप सोपे आहे. शेतकरी संघटित नसल्याने असल्या घटना माध्यमांपर्यंत पोहचणे कठीण आहे.