५. मिपाकर संदीप चांदणे यांची कन्या धाकटी कन्या मानसी (वय ४ वर्षे) हिचे एक चित्र.
.
.
५.अ मिपाकर संदीप चांदणे यांचा भाचा आरव (वय ५ वर्षे) ह्याचे एक चित्र.
.
.
.
५.ब मिपाकर संदीप चांदणे यांची जेष्ठ कन्या मुग्धा (वय ७ वर्षे) हिची काही कणीक शिल्पे.
.
.
.
.
.
.
.
.
ह्या पालीने दोन सीन्स क्रिएट केले घरात.
झाले असे की, एका रविवारी मुग्धाची आत्तू येणार होती भेटायला. तर मुग्धाचा सकाळी उठल्यापासूनच आत्तूला घाबरवण्याचा प्लॅन सुरू होता. तिने बाबाला तसे हळूच कानात सांगितले सुद्धा. बाबाने 'येस्स' म्हटल्याबरोबर तिची तयारी सुरू झाली. खरं बाबाला याची कल्पना नव्हती की, पहिल्यांदा त्याच्यावरच ह्याचा प्रयोग होणार आहे.
सीन १) बाबा अंघोळ करून बेडरूममध्ये येतो. घालायची कपडे आधीच बेडवर टाकून ठेवलेली असतात त्यातला शर्ट घालण्यासाठी उचलतो तर शर्टखाली पाल. तो एवढ्या मोठ्याने दचकून मागे सरकतो की मागच्या कपाटाला धडकून कपाटावरच्या दोन चार वस्तू त्याच्या टाळक्यात. की लगेच बाजूला उभ्या तीन कार्टूनांचा दंगा सुरू! बाबाही मग ती खोटी पाल उचलून त्यांच्या दंग्यात सामील होतो.
सीन २) दुपारी साडेबाराच्या सुमारास मुग्धाची आत्तू घरी येते. हाश्श हुश्श करून सोफ्यावर बसते. मुग्धाच तिला ग्लासात पाणी आणून देते आणि आत्तू पाणी पीत असतानाच हळूच तिच्या मागे जाऊन सोफ्यावर उभा राहून वरून पाल तिच्या मांडीवर टाकते. आत्तू फुर्रर्र करून पाण्याचा फवारा समोर बसलेल्या आजोबांच्या अंगावर उडवते.
बोनस सीन ३) आजी किचनमध्ये असते. ती ह्या आवाजाने हॉलमध्ये येऊन मुग्धाच्या पाठीत एक जोरदार धपाटा घालते. मग तिचे रडे थांबवण्यासाठी बाबा तिला आईस्क्रीम खायला बाहेर घेऊन जातो.
वाचने
12420
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
पालीचा किस्सा भयंकर आवडल्या गेला आहे
पाल प्रकरणाने धुमाकूळ घातलेला
हाहा छान किस्से
कणीक शिल्पे आणि गमती भारी
मस्त कलाकृती ! +१
चित्रे, कणिकशिल्पे आणि पालीचा
मस्त.. आणि पाल प्रकरण पण
छान!
मस्त भारी किस्सा
हवालदिल -कासावीस
पालीचा धुमाकूळ .... भारी आहे
अगदी सेम...!
In reply to पालीचा धुमाकूळ .... भारी आहे by चौथा कोनाडा
+१
15 Feb 2021 ला प्रकाशित
In reply to +१ by भागो