Skip to main content

लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा

लेखक साहना यांनी रविवार, 07/02/2021 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
खालील ध्याग्यावर दिलेली प्रतिक्रिया थोडी खूपच लांब झाली म्हणून इथे वेगळा लेख म्हणून पाडत आहे. https://misalpav.com/node/48280 पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात. महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्ग रीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे). लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला. ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती. लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही. सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता. तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते. अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते. > अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ? हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू. आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते. मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय. मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही. मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च : मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी). जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही. जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात. पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च. त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात. टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे. टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.

वाचने 48906
प्रतिक्रिया 178

प्रतिक्रिया

पाश्चात्यांचे माहित नाही पण गिरगावात चाळीत राहत असताना परसाकडला जाण्यासाठी लोकांची जी लाईन लागायची त्यावेळेपासुन 'लोकसंख्या कमीच हवी' असे ह्यांचे मत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तेंव्हापासून आता लोकसंख्या कदाचित डबल झाली असावी पण परसाकडे जाताना अनुभव सध्या वाईट आहे कि चांगला आहे ? (ह्यां प्रश्नाच्या उत्तरांत माझ्या लेखाचे सार दडले आहे)

In reply to by साहना

लोकलच्या आसपास दुर्गंधी कमी असायची ... आता वाढली आहे ... सार्वजनिक व्यवस्थेवर, लोकसंख्या वाढीचा ताण येतोच...

In reply to by मुक्त विहारि

तेव्हा लायनीत उभ्या राहणार्या अनेकानी नंतर फ्लॅट घेतले. पण त्यामुळे बांधकाम वाढले, प्रदुषण वाढले.. वगैरे असो खायचे/ह*यचे वांदे असणार्या देशानी लोकसंख्या वाढवण्याच्या भानगडीत पडु नये असे आमचे मत आहे. मग भारत असो पाकिस्तान असो वा बांग्लादेश डेन्मार्क देशाची लोकसंख्या ६० लाखाच्या आसपास आहे. म्हणजे अर्धी मुंबई.. ह्या मंड्ळीनी विचार केला तर ठीक आहे. त्यांच्याकडे साधन संपत्तीही विपुल आहे. अमेरिकेची लोकसंख्या ३० कोटी असेल पण तो देश आकाराने आपल्या तिप्पट आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकास तेथे आपल्या ९ पट अधिक जागा/नैसर्गिक संपत्ती आहे. भारतिय सैन्यात भरती होण्यासाठी सैनिकाच्या एका पदासाठी २० अर्ज येतात. लोकसंख्या वाढ्वा म्हणणारे लोक तेवढ्या प्रमाणात नोकर्या निर्माण करू शकतील? शेयर मार्केट थेट परदेशी गुण्तवणुकीवर चाललेले. गुंतवणुक काढुन घेतली की मार्केट कोसळते. पश्चिम युरोप्/अमेरिकेपेक्षा आपली गुणवत्ता उजवी आहे अशातलाही भाग नाही.

छान

म्हणजे, येत्या काही वर्षांत, भारताची लोकसंख्या, 1000 कोटी झाली तरी काही फरक पडणार नाही, असे तुमचे मत आहे का?

In reply to by मुक्त विहारि

१००० होईल कि ५०० कोटी ठाऊक नाही पण १००० कोटी असूही शकते. २०० वर्षे मागे भारताची लोकसंख्या १३० कोटी होईल असे कुणी सांगितले असते तर कुणाचाही विश्वास बसला नसता. जी काही लोकसंख्या असेल ती आपसूक तंत्रज्ञानाशी निगडित असेल आणि लोकांचे राहणीमान खूपच उंचावलेले असेल. प्रदूषण कमी असेल, अन्नधान्य जास्त आणि स्वस्त असेल दरडोई ऊर्जेचा वापर जास्त असेल हे मात्र पैसे लावून सांगू शकते.

In reply to by साहना

तितके प्रदूषण जास्त.... 1000 कोटी जनतेला पुरेल, इतके अन्न आपण कसे तयार करणार? 1000 कोटी जनतेला, दळणवळण कसे पुरवणार? साध्या बुलेट ट्रेनला, इतका विरोध होतो... 1981 मध्ये मी डोंबिवली येथून 7:12 ची लोकल, दादरला जाण्यासाठी पकडत होतो...आरामात चढू शकत होतो...आज, लोकल तीच आहे, पण धक्काबुक्की करूनच लोकलमध्ये प्रवेश मिळतो ..अफाट लोकसंख्येचे, परिणाम आहेत.... हा एक भाग झाला ... ट्रॅफिक जॅम, हा दुसरा भाग झाला प्रदूषण वाढले आहे, 1966 पासून मी डोंबिवली येथे राहतो, गेल्या 50 वर्षांत डोंबिवली येथील हवा जास्त प्रदुषित झाली आहे... धूळ आणि आवाज, यांचे प्रदूषण वाढलेले आहे ... ह्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत ....

In reply to by मुक्त विहारि

> 1000 कोटी जनतेला पुरेल, इतके अन्न आपण कसे तयार करणार? हाच प्रश्न तुम्ही १०० कोटी जनतेला अन्न कसे पुरवणार म्हणून १९०० मध्ये विचारू शकला असता आणि तो रास्त सुद्धा वाटला असता. आता तुम्ही १००० कोटी लोकांविषयी प्रश्न विचारत आहात तो रास्त वाटत आहे.

In reply to by साहना

ह्याचेही एक लिमीट असणारच... एक वेळ, इमारती उंच होतील, दळणवळण सुधारेल, अन्नपुरवठा पण कदाचित होईल. पण, गर्दीवर नियंत्रण राहणार नाही ...जे आत्ता होत आहे गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल ... मी संख्येची गोष्ट करत नाही आहे, दर शेकडा प्रमाण वाढेल. प्रदूषण वाढेल मानसिक रूग्णांचे प्रमाण वाढेल व्यक्तीपुजेचे स्तोम जास्तच वाढेल हुकूमशाहीला अतिशय पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याने, अराजकता वाढेल...

In reply to by मुक्त विहारि

> 1981 मध्ये मी डोंबिवली येथून 7:12 ची लोकल, दादरला जाण्यासाठी पकडत होतो...आरामात चढू शकत होतो...आज, लोकल तीच आहे, पण धक्काबुक्की करूनच लोकलमध्ये प्रवेश मिळतो ..अफाट लोकसंख्येचे, परिणाम आहेत.... इथे लोकसंख्या हि समस्या अजिबात नाही. रेलवेचे सरकारी नियंत्रण हि समस्या आहे. मुंबई ते पुणे हा प्रवास १९८० मध्ये जास्त आरामदायक होता कि आज आहे ? आपल्या एकूण उत्पन्नाच्या किती टक्के भाग आपण दररोजच्या प्रवासावर खर्च करता ? १९८० च्या तुलनेत आपल्याकडील वाहने काय आहेत ? १९८० पासून २०२० पर्यंत विमान प्रवास आपल्याला जुन्या काळी परवडत होता कि आज परवडत आहे ? एकूण प्रवास ह्या दृष्टिकोनातून सरकारी नियंत्रित वाहतूक सोडल्यास इतर सर्व प्रकारची वाहतूक खूप चांगली झाली आहे ह्यांत शंकाच नसावी.

In reply to by साहना

अफाट लोकसंख्येला ती अपुरीच पडणार .... पुर्वीचा प्रवास जास्त सुरक्षित होता ... मी वयाच्या 10 व्या वर्षा पासून, प्रवास करत आहे ... तेंव्हा, सेवाग्राम एक्सप्रेस जास्त सुरक्षित होती.... आता नाही ... सामान्य माणसाला, विमान प्रवास आत्ता पण परवडत नाही ... वाहने वाढली आणि प्रदुषण पण वाढले .... जितकी लोकसंख्या जास्त, तितके प्रदूषण जास्त

'One-child policy' का बरे आणली असावी, त्यांच्याकडील नैसर्गिक संसाधने संपली की आणखी काही कारण होते ?

In reply to by प्रसाद_१९८२

सरकारी बाबू काही नवीन नियम आणतात त्यांत तारतम्य असतेच असे नाही. ह्या चुकीच्या पॉलिसीची फळे चीनला सध्या भोगावी लागत आहेत.

In reply to by साहना

चीनचे कसले चुकीचे नियम व त्याची कोणती फळे ... जरा इस्कटून सांगाल काय ... ? नाहीतर विधान मागे घ्या !! उगाच काहीतरी टाकत बसू नका !

In reply to by चौकटराजा

लोकसंख्या वाढीच्या बागुलबुव्याला घाबरून चीन च्या बाबू लोकांनी एक मूल पॉलिसी आणली. ह्यामुळे चीन ची लोकसंख्या वाढ जरी मंदावली तरी त्याचे एकूण परिणाम चीन देशासाठी जास्त घातक ठरले आहेत ह्यावर आता सर्वांचेच एकमत झाले आहे. सर्वांचे = इतर जग तसेच चिनी सरकार आणि विद्वान. २००१ पासून चिनी अभ्यासक चिनी सरकारला हि पॉलिसी बदल्याण्याचे आवाहन करत होते आणि शेवटी चिनी सरकारने सुद्धा देर आये दुरुस्त आहे ह्या तत्वाने हि पॉलिसी चुकली आहे हे मान्य करून ती मागे घेतली आहे. तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही हे वाचू शकता : - https://www.bbc.com/news/world-asia-pacific-11404623 - https://www.brookings.edu/articles/the-end-of-chinas-one-child-policy/ - https://www.theguardian.com/world/2019/mar/02/china-population-control-… - https://www.nationalgeographic.com/news/2015/10/151030-china-one-child-… - https://www.youtube.com/watch?v=eNKQT7Ub2Ps - https://www.bbc.com/news/world-asia-pacific-11404623 सर्वांत चांगला लेख इथे आहे : https://www.cato.org/commentary/flawed-assumptions-chinas-disastrous-ch… लोकसंख्या वाढ कमी करण्याचा सर्वांत चांगला उपाय म्हणजे लोकांचे जीवनमान उंचावणे होय. १९७८ मध्ये दक्षिण कोरियाचा प्रजनन दर चीनपेक्षा जास्त होता. त्यांनी काहीही कायदे केले नाहीत पण त्यांची अर्थी प्रगती वेगाने झाल्याने कोरिआ चा प्रजनन दर आपोआप कमी होत गेला.

In reply to by चौकटराजा

या धोरणाचे चीनवर बरेच परिणाम झाले आहेत. एक तर चीनी समाजात दीर्घायुषी लोकांचे प्रमाण जास्त आहे. काहीही कारण असले चीनमध्ये life expectancy ७६ वर्षे आहे असे आंतरजालावर समजले. भारतात ते ६७ वर्षे आहे. म्हणजे ६० व्या वर्षी निवृत्ती धरली तर सामान्य चीनी निवृत्तीनंतर सरासरी १६ वर्षे जगतो तर सामान्य भारतीय निवृत्तीनंतर सरासरी ७ वर्षेच जगतो. १९७० च्या दशकाच्या शेवटापासून चीनने हे धोरण अवलंबायला सुरवात केली. याचा परिणाम हा झाला की चीनी नागरिकांचे सरासरी वय वाढले. आर्थिक प्रगतीत तरूणांचा हातभार वृध्दांपेक्षा जास्त असतो हे वेगळे सांगायला नको. दुसरे म्हणजे आता टिपीकल चीनी कुटुंब म्हणजे एक जोडपे त्यांचा एक मुलगा/मुलगी आणि नवरा बायकोचे आईवडिल. म्हणजे दोघांच्या उत्पन्नावर सात जणांना पोसायची जबाबदारी. त्यामुळे चीनी समाजात सेव्हिंगचे प्रमाण गेल्या दहा वर्षात कमी झाले आहे हे https://data.worldbank.org/indicator/NY.GDS.TOTL.ZS?locations=CN वरून कळेल. तरीही चीनी समाज बर्‍यापैकी काटकसरी असल्याने अमेरिकेपेक्षा हे प्रमाण बरेच जास्त आहे पण चीनने इतकी वर्षे जो दर राखला आहे तो कमी होत आहे हे नक्की. आणि चीनने एक मूल धोरण १९७९ पासून अंमलात आणले आणि सेव्हिंगचा दर २०१० पासून कमी व्हायला लागला यात बरेच काही आले नाही का? आता सेविंग्जचा दर कमी झाला म्हणून काय बिघडले? तर सेव्ह केलेले पैसे कोणी आपल्या गादीमध्ये किंवा उशीमध्ये भरून ठेवत नसतो तर बँकेत ठेवतो. त्यातून मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टना कर्जे द्यायला चीनी बँकांकडे भरपूर पैसे इतकी वर्षे उपलब्ध होते ते यापुढील काळात कमी होतील ही भिती आहे. त्यातून चीनने इतकी वर्षे infrastructure development for the sake of it असे काही अंशी केल्याने १००% वापर न होणार्‍या अनेक मोठ्या इमारती, विमानतळे वगैरे पडून आहेत. याविषयी https://www.npr.org/sections/parallels/2015/10/15/446297838/chinas-whit… वगैरे अनेक लेखांमध्ये. त्यामुळे चीनी अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगावर प्रश्नचिन्ह नक्कीच उभे राहिले आहे. चांगल्या हेतूने सरकार करायला काहीतरी जाते आणि त्याचे परिणाम वेगळेच होतात हा प्रकार अनेक ठिकाणी बघायला मिळतो त्यातलाच हा प्रकार दिसतोय.

In reply to by प्रसाद_१९८२

त्यामुळेच, चीन त्या बाबत जास्त बोलत नाही किंवा चुकीची माहिती देतो.. चीन आणि घराणेशाहीचे अपरिपक्व उमेदवार, यांच्यावर मी कधीच विश्र्वास ठेवत नाही ...

कंपू बाजी करणारी गँग गायब आहे ह्या धाग्यावर सोयी नी मत व्यक्त करत नाहीत. फसण्याची शक्यता आहे एक तर सर्व दावे चुकीचे आहेत अर्थ शास्त्र मधील कोणत्या तरी पानावर बारीक अक्षरात लिहलेले विचार आहेत. आणि दुसरे मुस्लिम लोक शक्य तेवढ्या जास्त बायका करून शक्य तेवढी जास्त मुळ जन्मास घालतात. ह्या धाग्याला पाठिंबा देणे म्हणजे मुस्लिम समाजाच्या मुलांना जन्न देण्या विषयी विचारणा पाठिंबा देण्या सारखे आहे. अवघड जागेचे दुखणं आहे. मुस्लिम समाज हा खूप प्रगत विचाराचा असून तो अर्थ व्यवस्था वाढावी म्हणून जगावर उपकार करत आहे हे मान्य करण्या सारखे आहे त्या मुळे कंपू बाज गायब आहेत.

मुळात पूर्वी मुले हणजे म्हातारपणीची काठी अशी कल्पना भारतात तरी होती.. कितो काही म्हटले तरी ती कल्पना आता हळूहळू मोडीत निघू लागली आहे.. अश्या परिस्थितीत किती पालक आपले तारुण्य मुलांच्या खस्ता काढण्यात खर्च करतील? त्यापेक्षा नोकऱ्या करिअर करून सेव्हिंग केले, आणि उतारवयात एखाद्या 5 स्टार वृद्धाश्रम बुक केला की झाले नाही का? सध्या एकल मूल नव्हे, तर मूल नको असं ट्रेंड वाढू लागला आहे.

In reply to by आनन्दा

Double Income No Kid, अशा पद्धतीने कुणी संसार करत असेल तर, अशा कुटुंबाला सरकारी सोयीसुविधा आणि सबसिडी आधी मिळायला हवी ...

त्यांना गर्भ निरोधक मान्य नाही,मुल ही अल्ला ची देणं आहे असे त्यांचे पक्के मत आहे. जास्त मुल जन्माला घालण्यासाठी जास्त बायका करा ही त्यांची परंपरा ह्याचा अर्थ सरळ आहे मुस्लिम समज हा प्रगत समाज आहे. जगाची उन्नती करायची असेल, भरभराट करायची असेल खूप लोकसंख्या हवी आणि त्या साठी आपल्याला च प्रयत्न करायला हवेत असा त्यांचा निस्वार्थी विचार आहे. आज जी कशी अफाट प्रगती दिसत आहे ती फक्त जास्त लोकसंख्या मुळे. बाकी पर्यावरण (त्या वर आधारित असलेली शेती आणि रोगराई) मोकळ्या जागा,विस्तीर्ण पसरलेला जंगल आणि हवेतील कार्बन शोषून राखला जाणारा समतोल . हे सर्व बकवास आहे. Trump नी असेच तारे तोडले आणि पॅरिस करारा मधून अमेरिका बाहेर पडला आणि biden आल्या बरोबर ट्रम्प चा निर्णय त्यांनी फिरवला. म्हणजे biden हे अमेरिका द्रोही आहेत.

In reply to by Rajesh188

पॅरिस करारा मधून बाहेर पडण्याचा ट्रम्प ह्यांचा निर्णय १००% बरोबर होता. पॅरिस करार काय आहे ते इथे पहा https://www.youtube.com/watch?v=cVkAsPizAbU&t=2s

सहना यांच्याशी अजिबात सहमत नाही. लोकसंख्या किती हवी याबाबत तारतम्य असायला हवे कारण एका मनुष्य आणि इतर प्राणी असे डायरेक्ट कंपॅरिजन केले जाऊ शकत नाही. इतर प्राणी फक्त खाणे आणि प्रणय या दोनच गोष्टीसाठी आपले जिवन जगत असतात पण मनुष्याचे तसे नाहीये. त्यामुळे मनुष्यांची संख्या वाढली तर प्राकृतिक संसाधनांवर तसेच मानवनिर्मित संसाधनांवर देखील मर्यादा येणार हे नक्की. ज्यादिवशी मनुष्य फक्त खाणे आणि प्रणय या दोनच गोष्टीसाठी जगेल.. त्याला वस्त्र, निवारा, नोकरी, शिक्षण, रस्ते, आरोग्य, वीज, पर्यटन, चैनीच्या गोष्टी, पाणी इ सर्व गोष्टींची गरज नसेल तेव्हाच सहना ताईंची मते बरोबर असतील.. पण आता या सर्व गोष्टी मानवी जीवनाचा भाग आहेत त्यामुळे लोकसंख्या वाढवून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतोय. इथे काही लोकं मुस्लिम समाज कसा प्रगतिशील आहे.. 4 4 बायका आणि सोळा पोरं काढून कशी मानवजातीच्या प्रगतीला हातभार लावतायेत हे वाचून डोळे पाणावले. कारण मांजर फक्त एकटीच परत नाही आली तर सोबत आपला जुळा भाऊ देखील घेऊन आली (188).. हे नक्की झाले. इतके दिवस शंका होती पण आज कळले कि गंगाधरच शक्तिमान आहे.

In reply to by बाप्पू

आणि अवतारी मंडळींना, वारंवार सहन करण्या इतपत, मिपाकर सहनशील आहेत .... रामचन्द्र कह गए हैं की, हंस चबेगा दाना-तिनका, कौवा मोती खाएगा.

लोकसंख्यावाढ आणि बागुलबुवा => 'अस्माकं बदरीचक्रं युष्मांक बदरीतरुः । बादरायणसंबंधात् यूयं यूयं वयं वयंम् ।' 😄 😄 😄 - (हस्तदंती मनोऱ्यात नसलेला) सोकाजी

लोकसन्ख्या कमी करण्यासाठी कोणतेही सरकारी धोरण असु नये असे वाटते. (उदा: अमुक इतकीच मुले असतील तर सरकारी नोकरी इ इ.) शिक्षण, सुबत्ता आली की लोकसन्ख्या वाढ आपोआप नियंत्रणात येते. चीनने वन चैल्ड पोलिसी अलिकडेच मोडीत काढली कारण त्याचे तोटेच दिसले.

लेख आवडला. एक प्रश्न- टॅक्सेशनमध्ये लाफर कर्व्ह असते त्याप्रमाणे लोकसंख्येच्या बाबतीत एखादा ऑप्टिमम पॉईंट असू शकेल का? ही संज्ञा अर्थतज्ञ आर्थर लाफर यांनी आणली. laffer सामान्यतः असे वाटेल की कराचे दर कमी केले तर सरकारचे करसंकलन कमी होईल. पण प्रत्येकवेळी तसे होतेच असे नाही. वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे सध्याचे कराचे दर टी-४ असतील तर त्यावरून कर टी-३ पर्यंत कमी केल्यास करसंकलन वाढेल. कर आणखी टी-२ पर्यंत कमी केल्यास करसंकलन कमी होईल. याचे कारण हे की समजा ०% टॅक्स असेल तर सरकारचे करसंकलन अर्थातच शून्य असेल. पण १००% टॅक्स असेल तरी सरकारचे करसंकलन शून्यच असेल. याचे कारण १००% टॅक्स असेल तर अर्थव्यवस्थेतील उलाढाली शून्य होतील. आपण जितके कमावतो ते सगळे सरकार कराच्या रूपात द्यायचे असेल तर किती लोक कामधंदा करतील? त्यामुळे १००% टॅक्स असेल तरीही सरकारचे करसंकलन शून्य असेल. त्यामुळे सरकारचे करसंकलन सर्वात जास्त करणारा ऑप्टिमम पॉईंट मध्ये कुठेतरी असतो. आता माझा प्रश्न हा की लोकसंख्या अगदी कमी असेल तर जीवनमानाचा स्तर कमी असेल हे मान्य. पण वाढती लोकसंख्या हा प्रत्येकवेळी जीवनमानाचा स्तर वाढेल का? की लाफर कर्व्हप्रमाणे मधे कुठचातरी ऑप्टिमम पॉईंट असेल? समजा लोकसंख्या त्यापेक्षा जास्त असेल तर लोकसंख्या कमी होणे हितकर असेल आणि लोकसंख्या त्यापेक्षा कमी असेल तर त्यापेक्षा लोकसंख्या वाढणे हितकर असेल अशी परिस्थिती असेल का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हा बदलतो वातावरण, जमिनीची सुपिकता, भौगोलिक परिस्थिति, राजकीय इच्छाशक्ती, हे पण भाग महत्वाचे ठरतात

In reply to by चंद्रसूर्यकुमार

उत्कृष्ट प्रतिक्रिया आहे. आपला प्रश्न वाचून खूप आनंद झाला. ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही त्यामुळे एक संपूर्ण लेख लिहून सविस्तर उत्तर देईन. ग्राफ सुद्धा देईन. > पण वाढती लोकसंख्या हा प्रत्येकवेळी जीवनमानाचा स्तर वाढेलच का? बहुतेक वेळा हो. झांबिया पासून चीन पर्यंत आणि भारत पासून ब्राझील पर्यंत सर्वत्र हाच अनुभव संपूर्ण इतिहासांत आहे. ह्याला अनेक कारणे आहेत जी मी वेगळ्या लेखांत मांडेन. मॅट रिडली ह्यांचे ह्युमन प्रोग्रेस वेबसाईट पहा. > की लाफर कर्व्हप्रमाणे मधे कुठचातरी ऑप्टिमम पॉईंट असेल? क्ष अक्षावर लोकसंख्या आणि य अक्षावर राहणीमान ह्यांत लाफर कर्व्ह प्रमाणे संबंध नाही कारण लोकसंख्या आणि राहणीमान ही इंडिपेंडंट व्हेरिएबल्स नाही आहेत. ती दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. उदाहरण म्हणजे सरकार वाट्टेल तो कर दर ठरवू शकते. पाहिजे तर अगदी १००% कर ठरविला जाऊ शकतो. पण लोकसंख्या आणि राहणीमान ह्यांचा तसा संबंध नाही. लोकसंख्या हि राहणीमानावर अवलंबून आहे आणि राहणीमान हे लोकसंख्यवर अवलंबून आहे. काही प्रमाणात दोन्ही सेल्फ रेगुलेटिंग आहेत यिंग आणि यांग प्रमाणे. मला काही सुपर पावर आहे आणि ठाणोस प्रमाणे चुटकी वाजवून उद्या सकाळी मी जगाची लोकसंख्या डबल केली किंवा अर्धी केली तर तर मात्र कदाचित तुम्हाला लाफ़र कर्व्ह प्रमाणे संबंध सापडेल. पण निव्वळ अकॅडेमिक दृष्टिकोन सोडून प्रत्यक्ष जीवनात त्याचा काहीही उपयोग नाही. > पण वाढती लोकसंख्या हा प्रत्येकवेळी जीवनमानाचा स्तर वाढेलच का? जो पर्यंत लोक स्वखुशीने लोकसंख्या वाढवत आहेत तो पर्यंत जीवनमानाचा स्तर वाढत राहील. ह्याची करणे वेगळ्या लेखन देईल. मी उल्लेख केलेल्या सायमन ह्यांच्या पैजेत सायमन ह्यांचा मुख्य मुद्दा तोच होता. > समजा लोकसंख्या त्यापेक्षा जास्त असेल तर लोकसंख्या कमी होणे हितकर असेल आणि लोकसंख्या त्यापेक्षा कमी असेल तर त्यापेक्षा लोकसंख्या वाढणे हितकर असेल अशी परिस्थिती असेल का? प्रत्यक्षांत "हित" हे नेहमी वैयक्तिक हित असते. लोकसंख्येची वाढ हितकर आहे कि नाही ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्ती मला मूल होणे मला स्वतःला हितकर आहे कि नाही हा निर्णय घेऊन ठरवते. काही कारणांनी मूल नको असेल तर आपसूक प्रजननदर खालावतो. बहुतेक वेळा मला स्वतःला स्वतःचे आयुष्य जगायचे आहे आणि मुलांच्या फंदांत पडायचे नाही असा विचार करून लोक मुलं टाळतात. ह्याचा अर्थ राहणीमान एका स्तराच्या वर गेले आहे असे समजावे आणि आपसूक लोकसंख्या वाढ कमी होते. लोक वैयक्तिक हित साधतात त्यातून मग समाजाचे हित आपसूक ठरवले जाते. मुक्त बाजारपेठीय अर्थशास्त्रांत तसेच ऍडम स्मिथ ह्यालाच इन्व्हिसिबल हॅन्ड असे संबोधित करतो. ह्याचे चपखल उदाहरण म्हणजे आपले स्टॉक मार्केट. कुठल्याही शेअर चा दर मार्केट ठरवते. लक्षावधी लोक कंपनीच्या विविध बातमीवर लक्ष ठेवून भूतकाळांतील त्याचा परफॉर्मन्स वगैरे पाहून दार सेकंदाला "ह्या शेअर चा भाव माझ्या मते अमूक आहे" असे सांगून तो विकत घेण्याचा किंवा विकण्याचा प्रयत्न करत असतात. इथे नक्की "हितकर" भाव कुठला आहे हे कुणालाही ठाऊक नसते पण त्याच वेळी मार्केट अत्यंत वेगाने बदलांना रीस्पॉन्ड करत असते. अमुक कंपनीचा शेअर X आहे तो बरोबर आहे का ह्या प्रश्नाला काहीही अर्थ नाही कारण मार्केट ने तो भाव ठरविला असल्याने तुम्हाला (किंवा आणखी कोना एक्स्पर्ट ला) काय वाटते हा प्रश्न नगण्य आहे. समाज साक्षांत सर्व व्यापून राहिलेला प्रभू नारायण पृथ्वीवर आला तर त्याला त्या कंपनीची इत्यंभूत माहिती असेल. अजून उघडकीस न आलेली स्कँडल्स ठाऊक असतील, बॅलेन्स शीट मधील भानगडी ठाऊक असतील, कुठल्या अफवा सत्य आणि कुठल्या अफवा खोट्या हे ठाऊक असेल त्यामुळे प्रभू नारायण कदाचित खरा भाव आम्हाला सांगू शकेल पण सरकार, एक्सपर्टस, इत्यादी मंडळी इथे पूर्णपणे निरुपयोगी आहेत. लोकसंख्या किती असावी ह्याचे सुद्धा तसेच आहे. मुले निर्माण करून (किंवा न करून) प्रत्येक व्यक्ती ह्याविषयावर आपले भाष्य करत असतो आणि ह्यांतून लोकसंख्या ठरते. अमुक एक आकडा हितकर आहे कि नाही ह्या प्रश्नाला इथे त्यामुळे काहीच अर्थ नाही.

In reply to by साहना

बहुतेक वेळा हो. झांबिया पासून चीन पर्यंत आणि भारत पासून ब्राझील पर्यंत सर्वत्र हाच अनुभव संपूर्ण इतिहासांत आहे.
यात एक उपप्रश्न म्हणजे गेल्या काही दशकात/शतकांमध्ये राहणीमान उंचावले आणि लोकसंख्या वाढली पण लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावले असे म्हणता येईल का? म्हणजे अनेकदा दोन गोष्टी एकाच वेळेला होतात त्यावेळी एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट झाली असा अर्थ प्रत्येक वेळेस काढता येईलच असे नाही. गेल्या काही दशकांमध्ये/शतकांमध्ये तंत्रज्ञानात विशेषतः मेडिकलशी संबंधित तंत्रज्ञानात कमालीची प्रगती झाली त्यामुळे ज्या कारणांमुळे गावेच्या गावे, शहरेच्या शहरे एकेकाळी मारली जायची ती कारणे आता काळजी करायचा विषय राहिलेली नाहीत. त्यामुळे लोकसंख्या वाढली. आता असे म्हणता येईल की गरज ही शोधाची जननी असती त्यामुळे ही प्रगती झाली. उदाहरणार्थ कॉलरा/टायफॉईड/प्लेग इत्यादी साथींमुळे एकेकाळी हजारो-लाखो लोक मरायचे त्यामुळे त्यावर उपाय शोधायला म्हणून तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि कित्येक नवी औषधे शोधून काढली गेली असे म्हणता येईल. पण आता अशी गावेच्या गावे निर्मनुष्य करणार्‍या साथी राहिलेल्या नाहीत तरीही तंत्रज्ञानाची प्रगती चालूच आहे त्यातून आपल्या राहणीमानाचा स्तर उंचावत आहे आणि लोकसंख्याही वाढत आहे. तेव्हा माझा उपप्रश्न हा- तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे राहणीमान उंचावणे आणि लोकसंख्या वाढणे हे दोन्ही परिणाम होत असतील आणि म्हणून वरकरणी असे वाटत असेल की लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावत आहे पण त्यामागचे कारण वेगळेच आहे असे असेल का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बाकी तंत्रज्ञानाच्या प्रगतीत दरवेळी जीव वाचवावेत हा हेतू असतोच असे नाही तर आपण नफा कमवावा हे हेतू अधिकवेळा असतो. त्यामुळे मी स्वतः अगदी पूर्ण फ्री मार्केटवाला आहे आणि बराचसा ऑस्ट्रीयन इकॉनॉमिक्सवाला आहे. मी प्रोफेसर डॉनल्ड बोडरॉक्स यांचा कॅफेहायेक हा ब्लॉग नेहमी वाचतो. त्यात मागे वाचले होते की १९२४ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष केल्व्हिन कुलीज यांचा मुलगा व्हाईट हाऊसमध्ये टेनिस खेळत असताना गंजलेला पत्रा लागून त्यामुळे इन्फेक्शन झाले आणि ते वाढून त्यात गेला. आज भारतासारख्या देशातले गरीब लोकही त्या कारणाने मरण पावायचे नाहीत. पण १०० वर्षांपूर्वी त्या कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांचा तरूण मुलगा गेला. तसेच जॉन डी. रॉकफेलर त्यावेळचा जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस होता. पण त्यालाही न्यू यॉर्कहून कॅलिफॉर्नियात एखादी महत्वाची गोष्ट पाठवायची असेल तर तीन-चार दिवस लागायचे. पण आज तंत्रज्ञानामुळे बर्‍याचशा गोष्टी इलेक्ट्रॉनिकली पाठवता येणे शक्य झाले आहे आणि एखादे कागदपत्र तातडीने पाठवायचे असले तरी ओव्हरनाईट कुरियरने ते पाठवता येऊ शकेल. रॉकफेलरला चांगली गाणी ऐकायची असतील तर मुद्दामून गायकांना घरी बोलावून वगैरे मेहफिल करावी लागायची. आज आपण ते माऊसच्या एका क्लिकवर घरबसल्या करू शकतो. तेव्हा आजचा सामान्यातला सामान्य माणूसही पूर्वीच्या श्रीमंतातील श्रीमंतांपेक्षा जमिनजुमला, वाडेगढ्या-बंगले वगैरे गोष्टी सोडल्या तर अधिक चांगले आयुष्य जगत असतो. पण ते आपल्याला समजत नाही.
पण सरकार, एक्सपर्टस, इत्यादी मंडळी इथे पूर्णपणे निरुपयोगी आहेत.
+१ लक्ष. एकेकाळी एक्सपर्ट वगैरे लोकांविषयी आदर वाटायचा पण कोरोना काळात त्यांनी केलेली सगळी भाकिते चुकली त्यानंतर तो बराचसा कमी झाला. भारतात ३० ते ५० कोटी कोरोनाच्या केसेस होणार, ३०-४० लाख लोक मरणार वगैरे नानाविध भाकिते त्यांनी केली होती. पण त्यापैकी कोणतेही भाकित (सुदैवाने) बरोबर ठरले नाही. इतकेच नव्हे तर या एक्सपर्ट मंडळींना आपले भाकित का चुकले आणि १८-१९ सप्टेंबरपासून कोरोना अचानक उतरणीला का लागला हे पण सांगता आले आहे असे दिसत नाही. म्हणजे स्वतः काहीतरी अचाट भाकिते करायची आणि ती चुकल्यास का चुकली हे पण सांगता येत नसेल तर यांना एक्सपर्ट नक्की कशाकरता आणि कोणत्या आधारावर म्हणायचे?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

जो सगळ्यात जास्त चुकतो, तो एक्सपर्ट. असे, आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात ... ..... 1. तंत्रज्ञान कितीही सुधारले तरी, एखाद्या धातूचे सोन्यात रुपांतर होत नाही.. 2. एका वर्षांत, एक इंच जाडीची, माती बनवू शकत नाही. 3. प्रदुषण कमी होणार नाही ..उलट कचरा वाढतो, प्लास्टिकच्या बॅगा वाढल्या.... कितीतरी घरांत अजूनही, जुने मोबाईल असतील किंवा हा घन कचरा, एखाद्या ठिकाणी, पडलेला असेल

In reply to by मुक्त विहारि

तंत्रज्ञान सुधारले तर तितक्याच चौरस फुटात दसपट उत्पादन घेता येईल - व्हर्टिकल फार्मिंग.. कदाचित 100पट पण.. बाकी चालू द्या, चर्चा वाचायला मजा येत आहे. मी पण सरकारने कायदे करून लोकसंख्या नियंत्रण करू नये, किमान एक कुटुंब 1 मूल या लेव्हलला जाऊ नये, एक कुटुंब 2 मूल पर्यंत आहे हे ठीक आहे, ते देखील मला लोकसंख्या विस्फोटाची भीती आहे म्हणून नव्हे, तर लोकसंख्या असमतोलाची भीती आहे म्हणून. काय आहे, वर साहना यांनी म्हटल्याप्रमाणे, लोकसंख्या नेहमी ज्यांचे राहणीमान चांगले नसते त्यांचीच जास्त वाढते.. असा असमतोल वाढत गेला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि आपल्या 188 मुख्यमंत्र्यांना काळं मांजर आडवं जेल, म्हणून कायदा आणावा असे माझे मत आहे.

In reply to by मुक्त विहारि

> 1. तंत्रज्ञान कितीही सुधारले तरी, एखाद्या धातूचे सोन्यात रुपांतर होत नाही.. चुकीची माहिती आहे. ऊर्जेची किंमत कमी झाली तर प्रचंड प्रमाणात सोने निर्माण केले जाऊ शकते. सोनेच काय कुठलेहि खनिज निर्माण केले जाऊ शकते. समुद्राच्या पाण्यांत प्रचंड प्रमाणात सोने आहे. सध्या हे काढण्याचा खर्च लागणाऱ्या ऊर्जेमुळे प्रोहिबीटिव आहे पण ऊर्जा स्वस्त झाली तर सर्वच खनिजांचे दर आपोआप खाली पडतील. मी आधी लिहिल्या प्रमाणे खनिज संपत्ती कमी होईल हि भीती पूर्णतः निरर्थक आहे. जगांतील क्रूड ऑईल चे साठे वाढत गेले आहेत, कमी नाही झाले. > एका वर्षांत, एक इंच जाडीची, माती बनवू शकत नाही. अहो कशाला पाहिजे ? मातीची कमतरता आहे का कुठे ? नक्की म्हणायचे काय आहे ? गंगाधर उर्फ शक्तिमान सारखे युक्तिवाद कशाला ? > 3. प्रदुषण कमी होणार नाही ..उलट कचरा वाढतो, प्लास्टिकच्या बॅगा वाढल्या.... कितीतरी घरांत अजूनही, जुने मोबाईल असतील किंवा हा घन कचरा, एखाद्या ठिकाणी, पडलेला असेल पॉईंट काय आहे ?

In reply to by साहना

एका ठराविक कालावधी नंतर आणि अति वापरामुळे, हे साठे, कधी ना कधी संपणारच आहेत ... साठे आहे तिथेच आहेत, पण तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे, आता काही ठिकाणी, हे तेल काढणे आर्थिक दृष्टीने परवडत आहे... अजूनही काही ठिकाणी, तेलाचे साठे आहेत, पण त्यांचा काढण्याचा खर्च जास्त आहे. तेलाची किंमत वाढली की, हे पण साठे वापरात येतील ... सौदी अरेबिया, उगाच इतर क्षेत्रांत गुंतवणूक करत नाही आहे. अरामको, भारतीय व्यापारांच्या बरोबर उगाच संबंध वाढवत नाही आहे. नाणार रिफायरीला, उगाच विरोध झालेला नाही. तेलाचे खूप आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि हुकूमशाही पदर आहेत.एकाचा अभ्यास करायला घेतला तर दुसरा समोर येतो...तेल हळूहळू कमी होत आहे, ही वस्तुस्थिति आहे.. कोणे एके काळी, नैसर्गिक वायुंपासून तेल काढणे हा आतबट्याचा व्यवहार होता. तंत्रज्ञान होते पण परवडत न्हवते. तेलाची किंमत वाढल्यामुळे, आता ही प्रोसेस परवडत आहे .... 2. रासायनिक खते आणि कीटकनाशके, यांच्या वापरामुळे, अन्न उत्पादन वाढले पण, जमिनीचा कस कमी होत आहे ...एकदा नापिक व्हायला लागलेली जमीन, परत कसदार व्हायला वेळ लागतो... तुम्हाला ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल ...विदर्भ, मराठवाड़ा, कोंकण,खानदेश,पश्र्चिम महाराष्ट्र इथे फिरलात तर, तुम्हाला माहिती मिळेल... जमिनीचा कस कमी झाला आहे, ही वस्तुस्थिति आहे आणि जमिन एका वर्षांत कसदार होत नाही .... 3. लोकसंख्या वाढली की प्रदुषण वाढतेच, हे साधे गणित आहे..

In reply to by मुक्त विहारि

हे अनुभवाचे बोल आहेत म्हणून 100% खरे आहेत. रासायनिक खते वापरून जमिनी चा कस निघून गेला की ती परत उपजावू करणे अत्यंत अवघड आहे खर्चिक आहे. नवीन शोध पर्याय देतील पण जी गोष्ट फुकट मध्ये उपलब्ध होती त्या साठी खूप मोठा खर्च येईल. जंगल जमिनी च्या पोटात गाडली गेल्यावर अनेक वर्षाच्या कालावधींतर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू तयार झाले असे शास्त्र सांगते . ती खूप वर्षाची क्रिया प्रक्रिया आहे . तेच खनिज तेल संपले तर ते कारखान्यात लगेच निर्माण करता येणार नाही. चांगल्या प्रकार ची दारू हवी असेल तर 50 ते 100 वर्ष त्या दारू ची निर्मिती करण्यासाठी लागतात.

In reply to by मुक्त विहारि

लोकसंख्या वाढत राहावी असे मला वाटत नाही. कारण वाढती लोकसंख्या कायम चांगली असे असेल तर मग लोकसंख्या अमर्याद का वाढू नये म्हणजे उभे राहायला जागा नाही अशी परिस्थिती पृथ्वीवर सर्वत्र (किंवा पाणी हटवून तिथे जमिन रिक्लेम केली तिथे किंवा परग्रहावर वस्ती झाली तर तिथे) आली तरी ते पण चांगलेच म्हणायला लागेल. ते कसे चांगले हे कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी त्याची मला तरी कल्पना करता येत नाहीये. म्हणजे एक कोणतातरी आकडा येईल त्यानंतर जास्त लोकसंख्या ही अ‍ॅसेट न होता लाएबिलिटी व्हायला लागेल असे मला अजूनही वाटते. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लेखिकेच्या नव्या लेखाची वाट बघत आहे. तरीही
एका ठराविक कालावधी नंतर आणि अति वापरामुळे, हे साठे, कधी ना कधी संपणारच आहेत ...
यात आता ज्या पध्दतीने गोष्टी चालू आहेत त्या तशाच चालू असतील हे एक गृहितक आहे. तंत्रज्ञानाचा विकास या प्रकाराला एंडरएस्टिमेट करून चालणार नाही. एक साधे उदाहरण द्यायचे तर एकेकाळी म्हणजे फार पूर्वीची गोष्ट नाही- १० वर्षांपूर्वीची सौर उर्जा बर्‍यापैकी महाग होती (१० रूपये पर युनिटपेक्षा जास्त). पण दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये २.६५ रूपये प्रति युनिट या दराने पॉवर परचेस अ‍ॅग्रीमेन्ट गुराविमंने केले (https://mercomindia.com/gujarat-ppa-solar-projects/). तेव्हा समजा तेलाचे साठे संपले तरी इतर पध्दतीने (अणुउर्जा, टायडल एनर्जी वगैरे) उर्जा निर्माण करता येणे अशक्य आहे असे नाही. आणखी काही वर्षांनी इलेक्ट्रिक कार्स सर्रास वापरात आल्या की तेलाची उपयुक्तता बरीच कमी होईल. अगदी भारतात एक लॅन्डलाईन फोन मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट बघणे ते अगदी भाजीवाले-कामवाल्यांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल येणे हा मोठा पल्ला १२-१५ वर्षात पार पडला तेव्हा पुढील १२-१५ वर्षात तेलावर/नैसर्गिक वायूवर आधारीत वाहने जाऊन इलेक्ट्रिक वाहने येणे अशक्य आहे असे नक्कीच नाही. लेखिकेच्या जास्त लोकसंख्या नेहमी चांगली हा दावा मलाही तितकासा पटलेला नाही. पण वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दुसर्‍या लेखाची वाट बघू आणि नवे कोणते मुद्दे येतात का ते बघू.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

> लोकसंख्या वाढत राहावी असे मला वाटत नाही. माझ्या लेखांत मी तसे लिहिलेही नाही आहे. माझा दावा हायेकीयन आहे. लोकांना त्यांना पाहिजे तशी मुले निर्माण करण्याचे स्वातंत्र्य द्या आणि आपोआप समाजाचे हिट त्यातून साधले जाईल. कुना सरकारी बाबूने काही वैश्विक फॅमिली प्लॅनिंग करण्याची गरज नाही. > कारण वाढती लोकसंख्या *** कायम चांगलीच *** असे असेल तर मग लोकसंख्या अमर्याद का वाढू नये तुम्हाला ठाऊक असलेले फ्री मार्केट ची तत्वेच इथे लागू पडतात. जो पर्यंत ट्रेड फ्री आहे तोपर्यंत तो पॉसिटीव्ह सम गेम असतो. सरकारी किंवा इतर कुणी लुडबुड सुरु केली कि त्या व्यवहाराचे सामाजिक चांगले परिणाम कमी होत जातात. वाढती लोकसंख्या तो पर्यंत चांगली आहे जो पर्यंत लोक ती स्वखुशीने वाढवत आहेत. तुम्ही कृत्रिम रित्या लोकांना ती जास्त किंवा कमी करण्यास मजबूर केले तर त्याचे नेहमी प्रमाणे अन इंटेंडेड परिणाम होतील आणि ते बहुतेक करून वाईट असतील. (चीन आणि कोरिया ह्यांचा विरोधाभास पहा). > ते कसे चांगले हे कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी त्याची मला तरी कल्पना करता येत नाहीये. म्हणजे एक कोणतातरी आकडा येईल त्यानंतर जास्त लोकसंख्या ही अ‍ॅसेट न होता लाएबिलिटी व्हायला लागेल असे मला अजूनही वाटते. कल्पना करण्याची गरज नाही कारण अशी स्थिती उध्दभवणे शक्य नाही. > कोणतातरी आकडा येईल बरोबर आहे. आपले इंट्युशन बरोबर आहे. पण हा आकडा कसा निर्धारित होईल ? तर लोकसंख्येचा आकडा ठरविण्याऐवजी, प्रत्येक व्यक्ती आपले मूल असेट आहे कि लायेबिलिटी हे वैयक्तिक स्तरावर ठरवेल आणि त्यामुळे एका मोठ्या मार्केट प्रमाणे लोकसंख्येचा एकूण आकडा ह्या इन्व्हिसिबल हॅन्ड ने ठरविला जाईल. अर्थांत काही लोक चांगले निर्णय घेतील तर काही लोक चुकीचे पण फ्री मार्केट च्या तत्वानुसार काय चांगले आणि काय चांगले नाही हे काळाच्या ओघांत स्पष्ट होईल आणि लोकसंख्या एका योग्य आकड्यावर येऊन आपोपाप स्थिरावेल. हा आकडा नक्की काय आहे हे कुणालाच ठाऊक नाही आणि कुठल्याही एक्स्पर्ट ला सुद्धा तो ठाऊक नसेल त्यामुळे त्या संदर्भांत काहीही कायदे वगैरे केले तरी ते बहुतेक करून चुकीचे असेल हे नक्की. > तेव्हा समजा तेलाचे साठे संपले आपले म्हणणे १००% बरोबर आहे. तेलाचे साठे संपणार सुद्धा नाहीत. जर सप्लाय कमी झाली तर किमती वाढतील आणि त्यामुळे मागणी आपोआप कमी होईल. हे सर्व इलॅस्टिक असेल आणि साधारणतः ३०३० मध्ये सुद्धा खनिज तेल जमिनीत उपलब्ध असेलच. खनिज तेलाच्या आधी पाश्चात्य जग व्हेल ऑईल वापरत होते. व्हेल ऑईल आजही उपलब्ध आहे, फक्त प्रचंड प्रमाणात महाग आहे.

In reply to by मुक्त विहारि

चक्रम (सर्क्युलर) वाद घालण्यात अर्थ नाही. कुठलाही खनिजाचा साठा कधीही संपणार नाही. हे माझे मत नसून अर्थशास्त्रांतील एक ठाऊक असलेले ज्ञान आहे. तुमच्या धारणेत प्रमुख दोष हा आहे कि सब्स्टिट्यूशन (पर्यायी पदार्थ) आणि डिमांड/सप्लाय इलॅस्टिसिटी ह्या दोन गोष्टी तुम्ही समजत नाही आहात. दुर्दैवाने काही शब्दांत समजावून सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत पण ३०० वर्षे आधी जगाची लोकसंख्या २०२० मध्ये ७ अब्ज असेल असे कोणाला सांगितले असते तर त्या व्यक्तीने म्हटले असते कि "जगांत इतके मेण उपलब्ध नाही त्यामुळे इतक्या मेणबत्त्या निर्माण होऊच शकणार नाही आणि त्यामुळे बहुतेक जग अंधारात जगेल". प्रत्यक्षांत ना भूतो अश्या प्रकारच्या उजेडांत आम्ही जगत आहोत. सध्याची स्थती पाहून त्यावरून भविष्य एक्सट्रापोलेट करणे ह्यासारखी चुकीची गोष्ट नाही. तुम्हाला आवड असेल तर कोबाल्ट धातूंबद्दल हा लेख सुदर आहे आणि सोन्याच्या बद्दल दुसरा लेख: १. https://fee.org/articles/no-were-not-running-out-of-minerals/ २. https://www.bloombergquint.com/gadfly/is-the-world-running-out-of-gold-… > 2. रासायनिक खते आणि कीटकनाशके, यांच्या वापरामुळे, अन्न उत्पादन वाढले पण, जमिनीचा कस कमी होत आ बरोबर आहे. ह्याला चुकीच्या सरकारी पॉलिसी भारतांत जबाबदार आहेत. बहुतेक प्रगत राष्ट्रांत जमिनीचा कस जास्त चांगल्या प्रकारे मॅनेज केला जातोय. > . लोकसंख्या वाढली की प्रदुषण वाढतेच, हे साधे गणित आहे. हो पण त्याचा इथे संबंध काय ? प्रदूषण, प्रदूषणाचे प्रकार आणि आमच्या राहणीमानावर होणारा त्याचा परिणाम बदलत जातो.

In reply to by साहना

भारतात, सोन्याच्या खाणी होत्या ... त्यातील सोने संपले ...आता काही खाणी बंद आहेत .... 2. सरकारने कधीही, शेतकरी वर्गाला, रासायनिक खते आणि कीटकनाशके, यांच्या वापराची जबरदस्ती केली नाही... घरखर्च चालवायला, कमीत कमी जागेत, जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी, ते करणे भाग पडते ... 3. प्रदुषणाचा संबंध येतोच ... आजारपणाचा आणि प्रदुषणाचा संबंध असतोच... 1960-70 मध्ये डोंबिवलीत, शुद्ध हवा होती, आज अफाट लोकसंख्ये मुळे, डोंबिवली येथील हवा प्रदुषित झाली आहे...

In reply to by साहना

कोणतेही मूलद्रव्य सामान्य पणे निर्माण केले जाऊ शकत नाही ! सोने हे पिरियॉडिक टेबलात समावेश असलेला धातू आहे ना ? शोधाशोध करून आजुन पुष्कळ खनिजे शोधली जाऊ शकतील . सूर्यऊर्जा जर सुलभपणे साठवता आली तर इंधनाचा प्रश्न बराच सुटू शकेल ! कदाचित अजूनही पेट्रोल देखील खूप मिळू शकेल पण या केवळ अटकळी भूतकाळातील डेटावर अवलंबून मांडल्या जाऊ शकत नाहीत ! भूतकाळात जे घडले तसे ते त्याच रीतीने घडेल असे म्हणता येत नाही तसे ते घडणार असेही म्हणता येत नाही ! अर्थात वरील उदाहरणे जागतिक पातळीवर लागू असतील कोणता भूप्रदेश इटकर किती अन्य साधनांसाठी अडवला जाऊ शकेल हे त्या त्या देशातच ठरणार आहे! कालांतराने देश हीच संकल्पना मोडीत निघाली तर मानव जातीला काही आशा असेल !

In reply to by साहना

समुद्राच्या पाण्यातून सोने निर्मिती करणारा प्रयोग जगात कुठे झाला आहे का? असेल तर विश्वासू माहिती पुरवणाऱ्या सायन्स मॅगझिन ची लिंक ध्या . आणि कोण कोणती खनिजे माणूस बनवू शकतो आणि तसे प्रयोग झाले आहेत ह्याची पण लिंक ध्या. खनिज तेलाचे साठे कमी न होता वाढत आहेत ह्या तुमच्या वाक्याला काही आधार असेल तर त्याची पण विश्वासू लिंक ध्या. तुम्ही सांगितले म्हणून खरे मानता येणार नाही.

In reply to by Rajesh188

सहनाजी ना माझी नम्र विनंती आहे त्यांनी fusion energy वर सविस्तर लिहावे . ती जवळ जवळ फुकट कशी उपलब्ध होईल ह्या वर चार शब्द सांगावेत. पेट्रोल नी 100 री जवळ गेल्या मुळे जनता त्रस्त आहे . ही fusion energy फुकट मिळणार आहे हे फक्त वाचून सुद्धा आम्ही दिवस काढू . तेरी परत एकदा विनंती आहे त्यांनी ह्या फुकट निर्माण होणाऱ्या आणि लोकांना सुद्धा अतिशय स्वस्तात मिळू शकणाऱ्या ऊर्जा विषयी सांगावा च

In reply to by Rajesh188

अगदी माझ्या मनातले बोललात राजेश राव. साहनाताई उत्तराच्या प्रतीक्षेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

> लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावले असे म्हणता येईल का? आपण कॅफे हायेक वाचता म्हटल्यावर काही गोष्टी तुम्हाला आधीपासूनच ठाऊक असतील. (fee.org आणि reason.com सुद्धा वाचावे). तंत्रज्ञान सुधारते कारण लोकसंख्या जास्त आहे म्हणून. जगाची लोकसंख्या समाज २ अब्ज असती तर आयफोन पासून इंटरनेट पर्यंत बहुतेक शोध २०२० पर्यंत लागलेच नसते. जुलिअन सायमन ह्यांचा मुख्य दावा खालील होता. मानवी वेळ हा एकाच खरा रिसोर्स आहे. इतर सर्व त्याच्यावर अवलंबून आहे. जीवनमानाचा दर्जा हा तंत्रज्ञानाने वाढतो (इथे तंत्रज्ञान ह्या शब्दाचा अर्थ फक्त फोन आणि संगणक नसून, सुई धागा पासून बैलगाडीपर्यंत सर्व काही अंतर्भूत आहे). तंत्रज्ञानाची प्रगती हि मानवी वेळेवर अवलंबून आहे. जितकी लोकसंख्या जास्त तितकी तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने आणि पर्यायाने लोकांचे राहणीमान उंचावत जाते. आपण लिहिलंय याप्रमाणे तंत्रज्ञानाने लोकसंख्या वाढते. पोलिओ लसीने लक्षावधी जीव वाचविले. आधुनिक शेती पद्धतींनी अन्न धान्याचे भाव कमी केले इत्यादी. पण त्याच वेळी तंत्रज्ञानाने लोकसख्या कमी सुद्धा होते. परिवार नियोजन आणि गर्भनिरोधक असल्यामुळे. आता ह्याचा नेट एफ्फेक्त पॉसिटीव्ह आहे कि निगेटिव्ह हे ठाऊक नाही. पण दोन्ही गोष्टीमुळे राहणीमान उंचावते. राहणीमान उंचावले कि लोकांना मुले नकोशी होतात. आणि लोकसंख्येला रेग्युलेट करण्याचे मुख्य साधन हे आहे (सरकारी नियम नाही). १. https://www.cato.org/blog/prosperity-world-population-growth

In reply to by साहना

राहणीमान उंचावले कि वेळेचा उपयोग राहणीमान मेण्टेन करण्यात खर्च होणे, अनेक अपत्यांना तेच उच्च राहणीमान उपलब्ध करुन देण्याची शक्यता न वाटणे इत्यादी कारणमुळे मानसीक कारणांमुळे लोकसंख्या रेग्युलेट होते हे खरं आहे. युरोपमधे अनेक देशांत लोकसंख्या वाध उणे दरात होते आहे यामागे हेच कारण आहे का? कल्पना नाहि. लोकसंख्या वाढीचे तंत्रज्ञान प्रगतीशी डायरेक्ट काहि संबंध नाहि. बहुतांश लोक्स तंत्रज्ञानाचे उपभोक्ते असतात. अधिकांश लोक्स समस्येचा कळत-नकळत भाग असतात. समस्या सोडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार्‍या मेंदुची सरासरी फार कमि असते. त्यामुळे तंत्रज्ञान मानवाला कडेलोटापासुन वाचवण्याची किंवा मानवी जीवन आनंददायी करण्याची गॅरॅण्टी घेऊ शकत नाहि. विनाशातुन आपोआप लोकसंख्या कंट्रोलमधे येते, पण हा मुद्दा सदर चर्चेच्या दृष्टीने औट ऑफ सिलॅबस आहे :) तर मुळ मूद्दा असा, कि लोकसंख्या वाढीचा पृथ्वीवर मानवी वस्ती करण्यायोग्य वातावरण मेण्टेन राखण्याशी डायरेक्ट संबंध आहे हे उघड आहे. मानवी कल्पकतेला काहि मर्यादा नाहि. त्यामुळे मनुष्य प्राणी हजारो करोडची संख्या गाठुन देखील यच्चयावत सोलर सिस्टीमवर घर बांधुन आरामात जगेल, किंवा आहे ते रिसोर्सेस फस्त करुन तडफडुन मरेल, या दोन्ही एक्स्ट्रीम शक्यता आहेत.

In reply to by अर्धवटराव

> बहुतांश लोक्स तंत्रज्ञानाचे उपभोक्ते असतात. अधिकांश लोक्स समस्येचा कळत-नकळत भाग असतात. समजा लाखांत एक माणूस जिनिअस असतो तर असे जिनिअस जास्त कसे निर्माण होतील ? खूप लाख लोकसंख्या असेल तर. आमच्यासारखी माणसे जिनिअस नसली तरी ह्या प्रक्रियेत भाग घेऊन हातभार लावत असतात. लोकसंख्या जितकी जास्त तितके अधिक एलोन मस्क किंवा आईन्स्टाईन हे निर्विवाद सत्य आहे. > आहे ते रिसोर्सेस फस्त करुन तडफडुन मरेल, या दोन्ही एक्स्ट्रीम शक्यता आहेत. रिसोर्सेस फस्त करणे हे फ्रिज मधील दूध संपवणे ह्या प्रकारचे नाही. हि प्रक्रिया प्रचंड इलॅस्टिक असते. म्हणजे समजा खनिज तेल कमी होत आहे तर हळू हळू अनेक ऑईल रींग्स बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या किमती वर जातील. किमती वर झाल्या कि आपसूक आम्ही लोक कमी वाहने वापरू लागेल. मग डिझेल वर चालणारे पावर प्लांट्स बंद पडून त्या जागी कोळसा वापरला जाईल. तरी सुद्धा खनिज तेल जमिनीतून येणे कमी झाल्यावर किमती आणखीन वाढतील मग हळू हळू बस, ट्रेन्स, विमाने महाग होत जातील. हि सर्व प्रक्रिया अनेक दशके चालेल. ह्या दरम्यान मानवी मेंदू बहुतेक करून खनिज तेलाचे पर्याय शोधेल. हे पर्याय नक्की काय असतील हे सांगणे अशक्य आहे. पण बहुतेक करून पर्याय हे असतीलच. पण हि प्रोसेस अत्यंत हळू असेल. जानेवारी १२ २०३५ मध्ये जगांतील खनिज तेल संपले आणि जानेवारी १३ ला तात्यांनी बुलेट भंगारात विकून सायकल घेतली असे होणार नाही. आणि समज पर्याय नाहीच तर मग एकूण राहणीमानाचा स्तर वेगाने खाली जात राहील. त्यातून एका बाजूने गरिबी, बालमृत्यू, उपासमार इत्यादीने जास्त लोक मरतील, सरासरी आयुर्मर्यादा कमी होत जाईल, लोकसंख्या त्यामुळे कमी होईल आणि जो संसाधांवर ताण पडला असेल तो आपसूक कमी होईल. पण तोपर्यंत सरासरी लोकसंख्या आणि जीवनमान इतके कमी झाले असेल कि पुन्हा प्रजनन दर वाढायला लागेल. ह्या सर्व गोष्टी १०-२० वर्षांत नाही तर कदाचिन्त १००-२०० वर्षांच्या कालावधीत होतील. माझ्या मूळ मुद्याशी आपला काहीही मतभेद असला तरी किमान हि एक गोष्ट मान्य करणे बहुतेकांना शक्य असावे. इतक्या प्रचंड कालावधीत नक्की लोकसंख्या किती असावी, प्रजनन दर नक्की कधी शून्य व्हावा हे निर्धारित करणे कुठल्याही एक्स्पर्ट च्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप ह्यांत चांगल्या पेक्षा वाईट जास्त घडवून आणू शकतो.

In reply to by साहना

तुम्हाला सरकार म्हणजे काय अपेक्षीत आहे? माणसाचं जगणं रेग्युलेट करणारी संस्था? जोपर्यंत समाजजीवन रेग्युलेशन आधारीत आहे तोपर्यंत सरकार नामक संस्था अस्तीत्वात असेलच. आणि जर ति अस्तित्वात असेल तर सरतेशेवटी समाजाच्या सर्व समस्या सरकार दरबारी दाखल होतीलच. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप अटळ आहे. समाजात होणारे स्तित्यंतरं जास्तीतजास्त सुखकर आणि कमितकमी दु:खकर व्हावेत हि सरकार नामक यंत्रणेची जबाबदारी आहे. हि यंत्रणा ऑर्गेनीक पद्धतीने इव्होल्व झाली आहे. संसदेपासुन ते खाप पंचायतीपर्यंत, आणि राष्ट्रपतींपासुन ते हॅड ऑफ फॅमिली पर्यंत अशी अनेक स्तरीय, अधिकृत-अनधिकृत प्रतलांची हि सांगड आहे. या संस्थेचा हस्तक्षेप टाळणं एकतर शक्य नाहि, किंवा तसा तो टाळलाच तर होणारे परिणाम जास्त क्लेशदायक असतील. तुम्ही ज्या दोन शतकांच्या स्थित्यंतरांचा परिणाम विशद करताय तो देखील सरकारी हस्तक्षेपाशिवाय होणार नाहि. माणसाच्या वैयक्तीक निर्णयांमधे सरकारने लुडबुड करु नये, निसर्गाचे आणि समाजाचे हार्डकोर नियम मानवी जीवन ऑटेमॅटीक रेग्युलेट करत असतात, हे म्हणणं तत्वतः ठीक आहे. पण सरकार नामक रचना माणसाच्या गरजेतुनच निर्माण झाली आहे. तिच्या मर्यादा आणि कार्यक्षमता काय असाव्या हा फार सब्जेक्टीव्ह विषय आहे. माणसाच्या लोकसंख्या नियंत्रण करण्यामागे जे विवेकी-अविवेकी विचार असतील तेच त्याच्या सरकारमधे देखील प्रतिबींबीत होतील.

In reply to by अर्धवटराव

अफाट लोकसंख्ये मुळे, 1960 ते 2020, ह्या फक्त 60 वर्षांत, डोंबोलीची वाट लागली....

In reply to by मुक्त विहारि

लोकसंख्या वाढले की वाटण्या होऊन शेताचे अप्पेपात्र होते तसेच शहराचेही होते

In reply to by साहना

जगाची लोकसंख्या समाज २ अब्ज असती तर आयफोन पासून इंटरनेट पर्यंत बहुतेक शोध २०२० पर्यंत लागलेच नसते.
हा दावा मी वाचला आहे पण तो तितकासा पटला नाही किंवा पचला नाही. तंत्रज्ञानाची प्रगती होण्यास स्वतंत्र विचार करण्यावर कमीतकमी बंधने असणे हे सगळ्यात महत्वाचे युरोपात रेनेसान्सच्या नंतर अशी बंधने बरीच कमी झाली आणि स्वातंत्र्याचा अनुभव लोकांना घ्यायला मिळाला. त्यानंतर काय झाले हे सगळ्यांनाच माहित आहे. तीच गोष्ट अमेरिकेची. तिथे तर कसलीच बंधने नव्हती. तसेच आयफोनचा शोध हा कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय लागलेला नाही. १८८० च्या सुमारास टेलिफोनचा शोध, त्यापूर्वी तारयंत्राचा शोध, दरम्यान रेडिओचा शोध मग सुरवातीला पोलिस-लष्कराच्या वापरासाठी वायरलेस हॅन्डसेट्स मग सामान्यांसाठी मोबाईल फोन आणि मग आयफोन अशी प्रगती झाली. हे शोध बहुसंख्य अमेरिकेत लागले. सामान्य अमेरिकन लोकांना अजूनही अमेरिका म्हणजेच जग वाटते तेव्हा १००-१५० वर्षांपूर्वीही फार वेगळी परिस्थिती असेल असे मानायचे कारण नाही. तेव्हा मुद्दा हा की हे शोध बर्‍याच अंशी नफा कमवावा या उद्देशाने जरी लागले असले तरी जगात किती लोकसंख्या आहे हा मुद्दा शोध लागताना कसा काय महत्वाचा ठरला असेल हे समजायला मार्ग नाही. आजही हे काही इनोव्हेशन चालू आहे ते पण आताची लोकसंख्या हाच घटक लक्षात घेऊन केले जात असेल ना? म्हणजे समजा जगाची लोकसंख्या ७०० कोटी आहे (किंवा भारताची १३० कोटी आहे) तर इनोव्हेशन करणारा- 'अरे यार जगाची लोकसंख्या ८०० कोटी असती (किंवा भारताची १५० कोटी असती) तर हा शोध मी लावला असता' असे थोडीच म्हणणार आहे? मग तेव्हाही शोध लावणारे असे म्हणाले असतील ही कल्पना करायला मला तरी जड जाते. दुसरे म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे स्वतंत्र विचार करण्यावर कमीतकमी बंधने असणे हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी महत्वाचे असते. आपले मिल्टन फ्रीडमनसाहेब म्हणाले आहेत त्याप्रमाणे 'पाश्चिमात्य जगात स्वातंत्र्याच्या वातावरणात जन्माला आल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य हे मानवी समाजाची नैसर्गिक स्थिती आहे असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. इतिहासात आणि आताही बहुसंख्य लोक स्वातंत्र्य आणि समृध्दीच्या वातावरणात नाही तर दहशत आणि दडपशाहीच्या वातावरणात राहिले आहेत'. समजा आफ्रिकेतल्याप्रमाणे हुकुमशाही/ यादवी याचे वातावरण जगात सर्वत्र असते तरी ६०० नाही ८०० कोटी लोकसंख्या असती तरी इंटरनेटचा शोध लागला असता का? मला तरी हे कठिण वाटते. तिसरे म्हणजे आता ६००-७०० कोटी लोकसंख्या आहे म्हणून इंटरनेट-आयफोनचे शोध लागले असे गृहित धरले तरी मग अशा काही गोष्टी असतील त्यासाठी आताची ६००-७०० कोटी लोकसंख्या कमी आहे आणि कदाचित १००० कोटी लोकसंख्या असती तर ते शोध लागले असते. ते कोणते हे आता आपल्याला सांगता आले नाही तर मग उपयोग काय? कारण हा सगळा खटाटोप predicting the past साठी होणार. असे काही प्रश्न पडले होते.
राहणीमान उंचावले कि लोकांना मुले नकोशी होतात. आणि लोकसंख्येला रेग्युलेट करण्याचे मुख्य साधन हे आहे (सरकारी नियम नाही).
नक्कीच. जिथेतिथे सरकारचा हस्तक्षेप नकोच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

वेगवान संदेशवहन आणि दळणवळण, ह्याचे शोध उत्तरोत्तर होतच राहणार... जिथेतिथे सरकारचा हस्तक्षेप नकोच. भारतीय लोकांची मानसिकता वेगळी आहे ... आपल्या लोकांना फटक्यांचीच भाषा समजते ...

In reply to by साहना

प्रत्यक्षांत "हित" हे नेहमी वैयक्तिक हित असते. अगदी चूक धारणा ! तुमची सर्व विचारधारा आतापर्यंत पाहता व्यक्ती आधिष्ठित आहे असे दिसते . त्या मुळेच चौथे मूल देखील यशस्वी झाले असे तुम्ही म्हणता आहात ! सर्वच रोख वैयक्तिक प्रगती म्हणजेच एकूण राष्ट्राची एकत्रित प्रगती असा मायक्रो अर्थ शास्त्राचा सिद्धांत आपण उचलून धरता आहात. पुस्तके विकत वाचून घेणे , योगासने करणे ई सुबत्तेमुळे घडते असा उल्लेख तर तुम्ही केलेलाच आहे ! पण एक उदाहरण तुम्हाला दिले तर ते पूरेसे आहे ते असे की हेलमेट घालणे हे वैयक्तिक हित आहे ना ? त्याने फक्त माझेच डोके वाचते की मी ज्या पादचार्याच्या अंगावर गाडी घातली त्याचेही डोके वाचते ? तरीही ते सक्तीचे असणारा कायदा भारत देशात आहे ! जगात आहे ! तो कशासाठी ? तर त्याने एकतर काही सामाजिक प्रश्न निर्माण होत असावेत असा समज कायदे करणाऱ्याचा आहे म्हणून ! मानवी समाजात कायदे आहेत ते सर्व व्यक्तीचे सामायिक असे हित जपले जावे म्हणून. ती सर्व नागरिकांच्या हिताची बेरीज नव्हे .नागरिकात जसे पोलीस असतात तसे चोर देखील नागरिकच असतात. एरवी एक उपमुख्यमंत्री दोन वर्षे तुरुंगात खितपत का पडता ? आपण सुस्थितीत आले की सभोवार सुबत्ता आली हा जर तुमचा समज दृढ असेल तर मग आणखी काय बोलणार ?