हो .... आम्हाला लाज वाटते ....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
5 Feb 2021 - 8:40 am
गाभा: 

1. नेहरू यांना, भारताचे तारणहार म्हणायला.... चीन आणि काश्मीरचा प्रश्र्न व्यवस्थित न हाताळल्या बद्दल, चीनला, आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत, आपल्या जागी नेमल्या बद्दल .... तशी नेहरूंनी, भारताच्या मागे भरपूर शुक्लकाष्ठे लावली आहेत, पण चीनच्या बाबतीत प्रचंड हेळसांड करून ठेवली आहे ...

2. अजान स्पर्धा आणि केम छो वरली, असे पोस्टर लावल्या नंतर, शिवसेनेला, हिंदूंत्ववादी आणि मराठी प्रेमी म्हणायला ...

3. घराणेशाहीची पुजा करत, अपरिपक्व वारसाच्या हाती, सत्ता देणार्या मतदारांची....

4. मुंबई वर हल्ला झाला, तेंव्हा प्रतिहल्ला न करणार्या, नेत्यांची...

5. कायदेशीर कारवाई, प्रलंबित असणार्या उमेदवाराला, मत देणार्या मतदारांची ...

6. दळणवळण रोखणार्या आंदोलकांची ...

7. देशापेक्षा धर्माला, जास्त महत्व देऊन, राजकारण करणार्या आणि अशा नेत्यांच्या मागे धावणार्या, मतदारांची ....

8. सर्व सामान्य माणसाचा विचार न करणार्या, राजकारण करणार्या नेत्यांची...

9. स्वार्थासाठी, सामान्य माणसाला त्रास देणार्या, राजकारणी नेत्यांची ....

10. आपल्याच नेत्याने, प्रतिहल्ला केला आणि पुरावे दिले तरी, विश्र्वास न ठेवणार्या राजकारणी नेत्यांची ....

प्रतिक्रिया

कुणालाही आपल्या लज्जेचे पडून गेले नाही.

आशिष नेहेरा ह्यांचा हा विडिओ पहा :

नेहरा : मला सांगितले होते वर्षाला ८० लाख मिळतील फक्त ३ ट्विट करायचे. काय ट्विट करायचे ते आम्ही सांगू. मी म्हटले नाही. मी माज्या मर्जीचा मलिक. मी मला पाहिजे तेच बोलणार पैसे कितीही द्या. उद्या ५ लाख देतो इथून कपडे न घालता चालत जाऊन दाखवा म्हणून मी जाणार काय ?

पत्रकार (ह्याला कुठलातरी पुरस्कार दिलाच पाहिजे): समजा कुणी १ कोटी रुपये देऊन येथून विवस्त्र चालत जा असे सांगितले तर ?

नेहरा: अहो अजिबात नाही. मी कशाला नागडा जाईन. पैश्यांच्या प्रश्नच उदभवत नाही.

पत्रकार : ५ कोटी ?

नेहरा : अजिबात नाही

पत्रकार : १० कोटी दिले तर जाल का ?

नेहरा : अहो बोलताय तरी काय ? मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मी पैश्यांनी बधणार नाहीच.

पत्रकार : समाजा ५० कोटी दिले तर ?

नेहरा : नाही म्हणजे नाही.

पत्रकार: काय नेहरा साहूब ५० कोटी खूप आहेत, ५० कोटीत नाही जाणार असे कसे म्हणता.

नेहरा : (थोडा विचार करून ) : चड्डी घातली तर चालेल काय ?

थोडक्यांत काय तर लोक आपला वैयक्तिक फायदा पाहतात.

https://www.youtube.com/watch?v=m489zSRnkIk

राजा जयचंद पासून हीच प्रथा पडली आहे ...

साहना's picture

5 Feb 2021 - 11:18 am | साहना

पण हे सगळीकडे असेच आहे. भारतीयच लोक काही ते मूर्ख आहेत असे नाही. माझ्या मते माणसा पेक्षा प्रोसेस महत्वाची. चांगले नियम असले तर वाईट माणूस सुद्धा समाजाच्या भल्यासाठी वागतो. चांगले नियम ह्याचा अर्थ नेहमीच जाचक नियम किंवा कठोर नियम असे होत नाही.

नेहरू, गांधी मंडळींना आणि काँग्रेसला ब्रिटिश राजसत्तेचा छुपा पाठिंबा होता. आम्हा लोकांना काबूत ठेवायचे आहे तरी असल्या सोंगांना जवळ केले पाहिजे हे ब्रिटिशाना व्यवस्थित ठाऊक होते. दुर्दैव आहे. काँग्रेस परिवारांत एक तरी माणूस किंवा इटलीहून आलेली सोनिया ताई सुद्धा चतुर असती तर अनेक चांगले बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात होती. शिवाजी महाराज, त्यांचे सुपुत्र संभाजी मग पेशवे मंडळी इत्यादीत आम्ही लोक प्रचंड प्रमाणात सुदैवी ठरलो. ह्यांच्यांत एखादा दुवा सुद्धा निर्बुद्ध आणि चुकीचा असता तर मराठी साम्राज्य कोलमडले असते. आणि शेवटी नेतृत्व नसल्यानेच पेशवाई आणि मराठी साम्राज्य अस्त पावले.

त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी ह्यांच्यात सुद्धा क्षमता होती पण ती वापरली जात नाही आहे त्यामुळे विशेष फरक दिसून येत नाही. त्या बाबतीत भारतीय खरोखरच खूप दुर्दैवी ठरले आहेत आणि पुढील ३० वर्षे आम्हाला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. (अर्थांत मोदी हे काँग्रेस पेक्षा उजवे आहेत हे कुठलंही शेम्बड पोर सुद्धा सांगू शकत, पण ते अस्मान से गिरा खजूर में अटका प्रकार आहे )

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 11:48 am | मुक्त विहारि

आपण खरोखरच दुरगामी विचार करून नेता निवडतो का?

लोकशाही विचारसरणीत किंवा लोकशाही पद्धतीने नेता निवडतांना, मतदार काही निश्र्चित अशी विचारसरणी ठरवतो का?

शिवाय, आपल्या कडे 2 वेगवेगळ्या पद्धतीने नेता निवडला जातो...

राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर ....

राष्ट्रीय पातळीवर नेता निवडतांना, संरक्षण आणि देशाची आर्थिक घडी, इतकाच विचार मी करतो ...

तर, राज्य पातळीवर नेता निवडतांना, मी उद्योगवाढीचा आणि दळणवळणचा विचार करतो ...

Rajesh188's picture

5 Feb 2021 - 6:14 pm | Rajesh188

मोदी हे उत्तम राज्यकर्ते आहेत असे मानू शकेल.
बाकी ज्यांना स्वतःची बुध्दी आहे त्यांना मोदी च्या मर्यादा काय आहेत ते अगदी उत्तम रित्या माहीत आहे.

अमर विश्वास's picture

5 Feb 2021 - 7:25 pm | अमर विश्वास

भाजपा ला २०१९ च्या निवडणुकीत 229,076,879 (बावीस कोटी नव्वद लाख) मते मिळाली ...

भारतात एव्हडी शेंबडी पोरे आहेत हे माहीत नव्हतं

भाजपा ला २०१९ च्या निवडणुकीत 229,076,879 (बावीस कोटी नव्वद लाख) मते मिळाली ...
भारतात एव्हडी शेंबडी पोरे आहेत हे माहीत नव्हतं

एवढ्या लोकांचा शेंबूड गोळा करून सरकारने शेंबूड नसलेल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या. त्यापासून डिंक, केसांचे जेल, ग्रीस आणि अश्या प्रकारचे प्रोडक्ट करून विकावेत.

तेवढाच नॉन शेम्बड्या लोकांना कामधंदा भेटेल. तेवढेच इथले फुटकळ प्रतिसाद कमी होतील..

अमर विश्वास's picture

5 Feb 2021 - 12:10 pm | अमर विश्वास

Every nation gets the government it deserves.... - Joseph de Maistre

मतदानाची टक्केवारी : ५०%
मुद्यापेक्षा जात / धर्म इत्यादिंना महत्व
पक्षाच्या ध्येय धोरणांपेक्षा व्यक्तीपुजेला महत्व ...
पैसा / दारू / गुंडगिरी मतदान ठरवणार (प्रमाण कमी झाले असले तरी )

अजून काय बोलायचे ... समाज म्हणून आपण लोकशाहीसाठी प्रगल्भ झालेलो नाही ...

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 12:24 pm | मुक्त विहारि

मी मतदान केल्याने काय फरक पडतो?

ते

मी मतदान केले नाही तर, काय परिणाम भोगावे लागतील?

ह्या दोन प्रश्र्नातच, अपरिपक्व लोकशाही ते परिपक्व लोकशाही, असा प्रवास, सामावलेला आहे.....

वरील विचारसरणी, आमच्या बाबा महाराज डोंबोलीकर, यांची आहे...

अमर विश्वास's picture

5 Feb 2021 - 2:41 pm | अमर विश्वास

खर आहे .... स्वतः च्या मताचे महत्व (लोकशाहीत आणि प्रत्यक्ष आयुष्यतही) सर्वाना जेंव्हा उमगेल तो च सुदिन

राघव's picture

5 Feb 2021 - 12:28 pm | राघव

सहमत.

मुळात आपल्याकडे आपली जबाबदारी घेणारा दुसरा असणं लोकांना आवडतं, जो आपलं काम करून देईल.
या विचारशैलीमुळेच व्यक्तीपूजेला आपल्याकडे फार महत्त्व आहे.

बाकी तसंही, प्रत्येकाला समजावणं अवघड आहे. त्यात १०० कोटी लोकांना समजावत बसलो तर पार्टीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळं आयुष्य घालवावं लागेल, असा सूज्ञ विचार प्रत्येक सत्ताधारी पक्ष करत असतो. कसे? :-)

> मतदानाची टक्केवारी : ५०%
जास्त लोकांनी मतदान केले म्हणून निकाल काही चांगला लागेल ह्याची काहीही शाश्वती नाही.

> मुद्यापेक्षा जात / धर्म इत्यादिंना महत्व
कुठल्या जातीचा आणि धर्माचा ह्या पद्धतीने विकास झालेला आहे ? महाराष्ट्रांत मराठे सर्वाधिक शक्तिशाली आहेत, विविध भागांत दलित, अहिर, द्रविड आणखीन कोण पण विशेष आर्थिक किंवा इतर मापदंडावर फरक काहीही नाही.

> पक्षाच्या ध्येय धोरणांपेक्षा व्यक्तीपुजेला महत्व ...
पक्षाला ध्येय धोरणे आहेत तरी कुठे आणि असली तर पक्षांतर बंदी कायद्याने लोकप्रतिनिधीला पक्षश्रेष्टीं सांगतात तिथेच मत घालावे लागते.

> पैसा / दारू / गुंडगिरी मतदान ठरवणार (प्रमाण कमी झाले असले तरी )
प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. त्याचे फायदे सुद्धा दिसून येत आहेत.

> अजून काय बोलायचे ... समाज म्हणून आपण लोकशाहीसाठी प्रगल्भ झालेलो नाही ...

+१ सहमत पण त्याच वेळी इतर काही पर्याय आहे असेही नाही.

अमर विश्वास's picture

5 Feb 2021 - 2:44 pm | अमर विश्वास

लोकशाहीला पर्याय नाही (आणि तो नसावाच)

चौकटराजा's picture

5 Feb 2021 - 9:32 pm | चौकटराजा

लोकशाहीला पर्याय नाही हे अगदी बरोबर पण भान्डवलशाही व लोकशाही यानी हातात हात घालूनच जायला पहिजे असाही काही नियम नाही ! सर्व क्षेत्रात स्पर्धा त्यातला एक स्पर्धक म्हणजे म्हणजेच समाज असे ही असू शकते !

मुवि यांनी हे वाक्य संसदर्भ स्पष्ट करावे .
केवळ आंतरराष्ट्रीय संदर्भ वापरावेत. जसे की सुरक्षा परिषदेचा ईतिहास

आनन्दा's picture

5 Feb 2021 - 8:27 pm | आनन्दा

https://www.wilsoncenter.org/publication/not-the-cost-china-india-and-th...

एक पांढरा कागद दिसतोय बघा..
तशाही या गोष्टी टेबलावर येत नसतात, पण यात नेहरूंचा पत्रव्यवहार पूर्ण खुला केला आहे. बघा पटत का?
नाहीतर संघी म्हणायला मोकळे आहेतच तुम्ही!!

कपिलमुनी's picture

5 Feb 2021 - 3:31 pm | कपिलमुनी

test

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 4:09 pm | श्रीगुरुजी

https://m.thewire.in/article/diplomacy/when-nehru-refused-american-bait-...

इथे तर वेगळंच लिहिलंय.

कपिलमुनी's picture

5 Feb 2021 - 4:26 pm | कपिलमुनी

योग्य रेफरन्स हवेत , ते आम्हाल म्हनले व्हते , मंग आमी ते म्हन्लो टाइप नकोत .
रिपब्लिक ओफ चायना त्याचा फाऊंडर आणि पर्मनंट मेंबर असताना आपण कसे घुस्णार होतो ?

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 5:08 pm | श्रीगुरुजी

द हिंदू ने दिलेला संदर्भ योग्य का?

तेव्हा माओने चीन ताब्यात घेतल्याने तत्कालीन पंतप्रधान चॅंंग कै शैकने तैवानमध्ये आश्रय घेतला होता व त्याच्या सरकारला जगाची मान्यता होती. तो तैवानमध्ये असल्याने तैवानला सुरक्षा परीषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व होते. १९५० च्या दशकात तैवानऐवजी भारताला सदस्यत्व देण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव होता. परंतु चीनच्या अंध प्रेमामध्ये बुडून गेलेल्या नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला होता.

आनन्दा's picture

5 Feb 2021 - 8:31 pm | आनन्दा

हिंदू चा तो संदर्भ 1955 चा आहे, त्यावेळेस रशियाने ऑफर दिली अशी चर्चा होती, पण त्याचा भारताने इन्कार केला आहे.

मी वरती एक दुवा दिले आहे, त्यात नेहरूंचे एक पत्र छापले आहे, त्यात ते स्पष्ट म्हणतात की जर चीनला डावलून भारताला घेतले तर रशिया आणि चीन UN मधून बाहेर पडतील म्हणून आम्हाला हे नको आहे..
त्या पत्रव्यवहाराचा अधिकृत source हवा आहे का तुम्हाला? शोधावा लागेल, पण शोधला तर मिलेलाही कदाचित!

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 9:07 pm | श्रीगुरुजी

मी दिलेल्या लिंकमध्येही तेच सांगितलंय.

नेहरूंना स्वत:कडे मोठेपणा घेणे, आंतरराष्ट्रीय प्रतिमा बनविणे, जगासमोर शांतीदूत स्वरूपात वावरणे याचे वेड होते. अर्थातच देशहित त्यापुढे दुय्यम होते. भारताला सुरक्षा परीषदेत कायमस्वरूपी प्रवेश मिळू शकत असताना, त्यांनी ते नाकारून चीनचे नाव पुढे करून मोठेपणा मिळविण्याचा प्रयत्न केला व देशाचे नुकसान केले.

१९५० च्या दशकात आशियातील मलेशिया, सिंगापूर वगैरे काही देशांनी भारताला विनंती केली होती की भारताने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी (जसा आपला भूतानबरोबर करार आहे) व त्या बदल्यात ते देश व्यापारी सवलती देतील. तसे झाले असते तर भारताचा संरक्षक म्हणून दरारा निर्माण झाला असता व व्यापारातही फायदा झाला असता. परंतु आपल्याला जगात युद्धखोर, आक्रमक वगैरे समजले जाईल व आपली शांतीदूत ही प्रतिमा डागाळेल या समजुतीतून नेहरूंनी यात रस दाखविला नव्हता.

अर्धवटराव's picture

5 Feb 2021 - 9:51 pm | अर्धवटराव

५० च्या दशकात भारताला स्वतःचंच संरक्षण करण्याची मारामार असताना दुसर्‍याची जबाबदारी स्विकारणे म्हणजे अतेच झालं :ड

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 10:09 pm | श्रीगुरुजी

तेव्हा सुद्धा भारताची संरक्षण व्यवस्था प्रबळ होती. १९४८ मध्ये भारत युद्ध सुरू ठेवून संयुक्त राष्ट्रसंघात गेला नसता आणि १९६२ च्या युद्धात हवाईदल वापरले असते तर पूर्ण वेगळी परिस्थिती असती. वाघांच्या टोळीचा सेनापती ससा असता व सशांंच्या टोळीचा सेनापती वाघ असता, तर वाघांची टोळी हरते व सशांची टोळी जिंकते.

अर्धवटराव's picture

5 Feb 2021 - 10:58 pm | अर्धवटराव

फाळणीनंतर भारताची मिलट्री पॉवर वाटली गेली. देशाच्या सीमेवर दोन बाजुने आव्हान उभे राहिले. अर्थव्यवस्था स्वतःचंच पोट भरायला पुरेशी डेव्हलप झाली नव्हती. संरक्षण सामुग्री आणि इतर लॉजीस्टीक्सकरता भारत इतरांवर अवलंबुन होता. अशावेळी कोणि कितीही व्यापारी सवलत दिली तरी आपल्य बजेटमधुन इतरांच्या संरक्षणासाठी पैसा राखीव ठेवणे शक्यच नव्हते.
प्रश्न केवळ सेनापती कोण यावर अवलंबुन नाहि. ते समीकरण प्रत्यक्ष युद्धात ठीक आहे. इतरांची जवाबदारी खांद्यावर घ्यायला पहिले आपले पाय मजबूत हवेत आणि पोट भरलेलं हवं. दुसर्‍या देशाशी संरक्षण करार दशकानुदशक चालु शकतो. त्यांच्यावर संकट आलं तर आपलं रक्त आणि रिसोर्सेस सांडावे लागतात. शत्रु राष्ट्र याचा वाईट फायदा घेऊ शकतं.

तुम्ही भारताच्या संरक्षण खात्यात काम करत नसणार असा माझा आपला एक अंदाज आहे.
तुम्ही परिक्षेपूर्वी कधीही तुमचा अभ्यास पूर्ण केला नाही असं सतत तुम्हाला परीक्षेला जाताना वाटत असावे असाही दुसरा एक अंदाज आहे.

अर्धवटराव's picture

6 Feb 2021 - 2:49 am | अर्धवटराव

भारताचं संरक्षण खातं माझ्यासाठी काम करतं, मी त्यांच्यासाठी काम करत नाहि.
परिक्षेपूर्वी अभ्यास खरोखरच पूर्ण केलेली एकही व्यक्ती मी बघितली नाहि.
हौ अबौट यु??

माझी तीच अवस्था असायची म्हणून तर म्हटलं. देश संरक्षणासाठी कधीच पूर्ण अर्थाने सर्वसिद्ध नसतो. काही गोष्टी या असलेल्या तयारीनिशी च करायच्या असतात. नंतर तयारी झाल्यावर करू म्हटलं तर परीक्षा चुकते. पण हे ही खरं की त्या वेळी बाकीचे देश ही आपल्याच परिस्थितीत होते. तेव्हा भारताने हे स्वीकारायला हवं होतं. अश्या ठिकाणी diplomacy कामाला येते. आपण आघाड्यंवर सैन्यतयारी करणे म्हणजे हल्ला होणारच असे नव्हे. जिथे आपण माघार घेतली तिथे अमेरिकेने चंचुप्रवेश केला. आपण ही जबाबदारी घेतली असती तर ती निभावण्याचे निदान मनुष्यबळ तरी आपल्याकडे होते. हा एक प्रकारचा व्यापारी करारच आहे ज्यात आपण सैनिकी शक्ती विकतो आहे असे समजून हे करायला काहीच हरकत नव्हती.

भारत स्वतः रशीयावर अवलंबुन होता. जग दोन धृवांभोवती फिरत होते. तिसरा धृव निर्मान होणं तेंव्हा तरी शक्य नव्हतं.
इतर देशांची संरक्षण जबाबदारी घेणं आणि त्या बदल्यात व्यापारी फायदा करुन घेणं यासाठी डीप गव्हर्नन्स लागतं जे सरकार बललं तरी संरक्षण करार आणि व्यापारी फायदे बिनबोभाट कंटिन्यु करु शकतात. भारताचं फंडामेण्टल गवर्नन्स स्ट्रक्चर सुद्धा तयार झालं नव्हतं तेंव्हा. आरमार देखील पुरेसं सिद्ध नव्हतं. व्यापार आणि सरकार यांची योग्य सांगड तयार नव्हती.

असो. जर-तर चा हिशोब दोन्ही बाजुने ताणता येतो.

नेहरू ना काही कळत नाही,इंदिराजी ना काही कळत नाही फक्त ह्याच लोकांना जास्त कळतं.
एवढे जर हे आताचे सत्ता धारी नेते कर्तृत्व वान आहेत तर बनवून दाखवा देशाला सुपर पॉवर आणि नंतर होवून गेलेल्या कर्तृत्व वान नेत्यांची अक्कल काढा .
ह्यांच्या काळात नेपाल पण भारताला दम देत आहे.
पाकिस्तान आणि चीन तर खूप लांबची गोष्ट आहे.
ह्यांच्या फक्त तोंडात च दम आहे कर्तृत्व 0.
पाहिले करा आणि नंतर सांगा.
Pok ताब्यात घेण्याची takat आहे का असेल तर घेवून दाखवा आणि नंतर fokadari करा.
इंदिरा जी दोन तुकडे करून दाखवले पाकिस्तान चे तुम्ही फक्त pok च तुकडा जिंकून दाखवा
साधा दाऊद ह्यांना अजुन सापडत नाही .
आणि बाता फक्त मोठं मोठ्या.

सुक्या's picture

6 Feb 2021 - 2:36 am | सुक्या

रजेशभो . . . आमचा दंडवत स्वीकारावा . . ._/\_

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 6:24 am | मुक्त विहारि

राजेश भाऊ, तुम्ही लिहीत रहा...

तसेही आजकाल खूप मौलिक ज्ञान मिळत नाही ....

करोना समोरून हल्ला करतो, असे सांगणार्या नेत्यांच्या मागे, असेच अगाध ज्ञान मिरवणारी जनता असते ...

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2021 - 9:58 am | श्रीगुरुजी

मिपावर मनोरंजनकर्त्यांची कधीच कमतरता नव्हती. सदस्यांचे मनोरंजन करण्याचे महान कार्य गांभीर्याने अथक करीत असल्याबद्दल दात विचकून धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 10:06 am | मुक्त विहारि

मोगा, यांची उणीव भरून निघत आहे ...

सॅगी's picture

6 Feb 2021 - 12:31 pm | सॅगी

अलीकडचे Gk ना?

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 1:19 pm | मुक्त विहारि

ते काय, नरेंद्र मोदी, ह्या नावाने पण, येऊ शकतात ...

अवतारी बाबा आहेत ... आत्ता पर्यंत, त्यांचे कितीतरी अवतार आले आणि गेले, याची मोजदात करणे शक्य नाही ....

आताशी २०२१ चालू झालंय पुढची साडे तीन वर्षे जशा निवडणुका जवळ येतील तसे या आयडींचे पेव फुटेल आणि नंतर ते परत दीर्घकालीन सुप्तावस्थेत जातील.

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 5:08 pm | मुक्त विहारि

सहमत आहे