पिन
आम्ही बायकांनी कितीही ठरवलं तरी पिनशिवाय आमच पान हलत नाही.
पिन म्हणाल की डोळ्यासमोर अनेक प्रकार उभे राहतात.सेफ्टी पिन,टिक टोक पिन,डोक्याची पिन,साडी पिन.
घरी किती जरी पिनांचा साठा असला तरी लग्न समारंभाला एक जरी वेळेवर सापडेल तर शपथ!मग मागामाग सुरु होते.आणि जिच्याकडे पर्स उघडल्यावर जास्त साठा असेल आणि जी सर्वाना पिन पुरवते ती सर्वात श्रीमंत बाई असते. .पूर्वीच्या महिलाना किती कदर या पिनेची मंगळसूत्राला नाहीतर डझनभर बांगड्यांना दोन चार पिना पुरवणी म्ह्नणून कायम असायच्या.आता त्या फावल्या वेळात दातांवर अन्याय करण्यासाठी याचा वापर करायच्या तो भाग वेगळाच!
अहोंनी गजरे आणले तर पिनापण आणाव्यात ना !पण नाही.मी आता फुलवाल्यालाच हा साईड उद्योग सुरु करायला सांगणार आहे.गजरा बरोबर पिना घ्याव्याच लागतील.
साडी पिनाची तर कथाच वेगळी...शेकडोंनी यांवर पैसे खर्च करावेत,आणि ऐनवेळी सुंदर नक्षीदार कोंदणात बसवलेल्या मामुली पिनने कुठतरी धडपडून घ्यावे,आणि आख्ख्या पिनेचे ऐनवेळी वाटोळे व्हावे.
साडी फाडणारी एखादी पिन भेटतेच ,स्वर्गात गेली तरी पुढे आयुष्यभर तिला शिव्याशाप खाव्या लागतात...
अशी ही पिन टोचून जरी घेतली तरी महत्व राखणारी ...लेडीज स्पेशल
-भक्ती
(ता.क.इथे पेन हा धागा वाचून मला पिन आठवली अल्पसा प्रयत्न ..धन्यवाद)
वाचने
6014
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
पिन
माझी आवडती पिन
माझ्या मित्राला आम्ही गप्पा मारताना
In reply to माझी आवडती पिन by गामा पैलवान
हीला आम्ही क्लिप म्हणायचो.
In reply to माझी आवडती पिन by गामा पैलवान
उपयोग पिनचा...
अशी ही पिन टोचून जरी घेतली
पिनेच्या पाठोपाठ पिन शोधायला
कामाला निघताना शर्ट घातला
व्वा, रोमॅण्टिक सीन .. !
In reply to कामाला निघताना शर्ट घातला by जगप्रवासी
सर्वांचे प्रतिसाद वाचून पिन
बर नाव घेतलं ...Pinterest
In reply to सर्वांचे प्रतिसाद वाचून पिन by Bhakti
विषय निघालाच तर पुरवणी घेते
टॉक साठी " TOK " ही अक्षरे
In reply to विषय निघालाच तर पुरवणी घेते by Bhakti