संक्रांती नंतर दुसऱ्या दिवशी किक्रांत असते.बच्चे कंपनीचा मुरमुरे,बोर,रेवड्या,चॉकलेट लयलुटीसाठी बोरनहाणसाठीचा दिवस असतो.
आगगाडीच्या डब्यात बसल्यासारख एक घर झाल कि दुसर घर अस करत करत ५-६ घरी ह्या सोहळ्याची मौज होते.परीच्या घरी कन्येला घेऊन बोरनहाणसाठी गेले .परीभोवती सगळे बाल गोपाल गोलाकार जमले.काही नवखे तर काही तरबेज होते,एकमेकांना सांगत होते .. “हा असा पटकन पुढे हात करायचा आणि चॉकलेट पकडायचे...हे झाले कि दुसऱ्या घरी...पिशवी आणली का तू?..”
किती ती उत्सुकता !!आठव्या आठव्याने परीच्या डोक्यावर मुरमुरे,बोर,रेवड्या,चॉकलेट या राशी ओतल्या गेल्या.हि चिमुकल्यांची घाई ,आनंद ओसंडून वाहत होता.कार्यक्रम संपला.बच्चेकंपनीने सराईतपणे एकही चॉकलेट मागे ठेवले नाही सर्व मिळवली.पण लक्ष गेले ती बोर ..एकानेही बोर काही उचलली नव्हती.सगळी बोर तशीच पडली होती.आपसूकच बोर उचलली आणि खायला लागली.
मन गेलं लहानपणात..तेव्हा हि अशी मोठ मोठाली बोर नव्हती.मस्त तांबूस रंगाची छोटी छोटी बोर असायची.कधी आंबट कधी गोड तर कधी मिश्र अशी हि बोर असायची.कधी इतकी आंबट बोर असायची की तेव्हा प्रभू श्रीरामाना उष्टे बोर खाऊ घालणारी शबरी मला हुशारच वाटायची.घराच्या आजूबाजूला जर बोराच झाड असेल तर विचारूच नका..आठवडाभर झाडाकडे लक्ष असायचे.रविवारची दुपार या झाडची बोर गोळा करण्यातच जायची.शाळेपाशी बोरकुट मिळायचं.त्याची चव तर जिभेवर अजूनही रेंगाळते.पुढे पुढे काही वर्षांनी जरा मोठाले बोर त्या जाळीदार पिशवीत मिळू लागली.मला बोरापेक्षा त्या जाळीदार पिशविचेच आकर्षण असायचे.ती पिशवी तोंडावर घालून चोर चोर आम्ही खेळायचो.काही वर्षांनी शेफालीच “बंगले के पिछे तेरी बेरी के नीचे...काटा लगा” हे गाण ऐकून बोराच्या झाडाखाली गेलीस तर काटे लागणारच ना ..असे काहीसे माझ्या बालपण आणि टीन एज याच्या मध्यावर असलेल्या माझ्या मनाला वाटायचे.:) मग आले अप्पल बोर..आकाराने फारच मोठे असतात.पण चवीला सगळेच रसाळ आहेत.पोपटी रंगांचे गोड फळ मलाही आवडतात.
बोरीच असे हे झाड काटेदार पण फळ कोणालाही कोणत्याही वयात भुरळ पाडणार.तासान तास प्रवासात कितीदा हि फळ साथ देतात.ह्यांच्या बियापण असंख्य गोळा होतात.एखाद झाड लावायचं मोहही मनाला करतात.
तोंडातल बोर संपल होत.पटापट जमेल तेव्हढी बोर उचलली आणि ओढणीत बांधून घरी आणली.कन्या सिंकदर प्रमाणे जग जिंकल्याच्या आवेशात चॉकलेटन भरलेली पिशवी घेऊन घरभर नाचत होती.बोराची मज्जा मात्र आयांसारखी ह्या पोरांनी अनुभवलीच नव्हती...कदाचित अनुभवणारही नाही.
-भक्ती
वाचने
5086
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे
वा !
हो...
In reply to वा ! by हेमंतकुमार
मस्त
सहमत आहे
In reply to मस्त by सरिता बांदेकर
मजा नाही
In reply to सहमत आहे by मुक्त विहारि
मुक्त विहारीजी,कुमारजी
बोरं म्हटलं की देशी छोटी बोरं
हे आवळे ...एक नंबर ..
In reply to बोरं म्हटलं की देशी छोटी बोरं by गवि
व्वा, बोरांचे आंबटगोड दिवस !
रानमेवा!शब्दानेच शेतात ,
In reply to व्वा, बोरांचे आंबटगोड दिवस ! by चौथा कोनाडा
*खातांना :)