माझे युट्युबर्स वरील पाककृतींचे विडिओ!!

देवीका's picture
देवीका in पाककृती
8 Jan 2021 - 9:16 am

बर्‍याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, इथे आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अ‍ॅडमिन कृपया मला तसे कळवा.
खरे तर मी काही व्यवसायिक युट्युबर नाही आहे, म्हणजे पुर्णपणे छंद म्हणून काढलेला प्रयत्न होता. तो सुद्धा माझ्या आईसाठी.
गणपतीत तिच्या खुपच मागे लागले की, तु तुझ्या पाककृती टाक म्हणून. कारणही तसेच होते.
आई एकदमच एकाकी झाली होती एका धक्क्याने. तिला पुन्हा कशात तरी गुंतवावे म्हणून माझ्याकडे आणले व आग्रह केला. तिचा पुर्ण नकार होता.
मग म्हटले मी करेन, तु सांगत जा.
पण गणपतीत तीनच विडिओ केले आणि बंद झाला कारभार.

पारंपारिक मोदक कृती अथपासून इतिपर्यंत : मोदकाचे पीठ कसे करावे, उकड कशी करावे, मोदक वळावे कसे वगैरे
१) पारंपारिक मोदक
पारंपारिक नेवरी
२) नेवरी
तळणीचे मोदक
३) मैदा न वापरता तळणीचे मोदक

पुन्हा नवीन वर्षाला सुरुवात करायची ठरले व तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये व तुझा आवाज दे, पण परत तिचा नकार.
आणि आज सहजच मनात आले की, इथे कदाचित प्रोत्साहन मिळु शकते. तिला आज परत आग्रह केला. बघुया काय म्हणतेय ती...
तोवर तिच्या कृतीचे , मी करून दाखवलेले विडिओ देत आहे.
आईने साथ दिली तर, विडिओ टाकायचे ठरलेय... पण बघुया कसा प्रवास पुन्हा सुरु होतोय....
तुम्हाला आवडले तर, नक्कीच तिला सांगून नवीन विडिओ टाकेन...
धन्यवाद.

प्रतिक्रिया

वा! पहिला पारंपारिक मोदक हा व्हिडीओ आत्ताच पाहिला. छान आहे, आवडला 👍
सर्वात आवडलेली गोष्ट (अर्थातच ज्यामुळे व्हिडीओ पूर्ण पाहिला) म्हणजे लाईक, सब्स्क्राइब शेअर करण्याचे आवाहन शेवटी लिखित स्वरुपात (ओझरते) देणे! बरेच हौशी युट्युबर्स असे आवाहन व्हिडीओच्या सुरुवातीलाच करण्याच्या जुनाट आणि बहुसंख्य प्रेक्षकांना इरीटेट करणाऱ्या प्रथेचे पालन करताना दिसतात. असे व्हिडीओज बहुतांश प्रेक्षक स्किप करतात, पूर्ण पहात नाहीत हि गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही. (हि गोष्ट वास्तविक आपल्या व्हिडीओचे Analytics बघून लक्षात येऊ शकते) कंटेंट चांगला असेल तर लोकं लाईक, सब्स्क्राइब, कॉमेंट, शेअर स्वतःहूनच करतात.
तुमचा व्हिडीओ आवडला, त्याला लाईक पण केलाय आणि त्यावर कॉमेंटही दिली आहे. असे आणखीन चांगले चांगले व्हिडीओज पोस्ट करत रहा, मॉनेटाईझ होण्यासाठी थोडा वेळ लागेल पण तुमचा हा छंद तुम्हाला थोडेफार उत्पन्नही मिळवून देऊ शकेल.
शुभेच्छा.

देवीका's picture

9 Jan 2021 - 12:17 pm | देवीका

धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल.

हा एक प्रयत्न आहे. कसं जमतय ते अजून माहित नाही. आईला आवडलं तर करत राहिन. पण अश्या कमेंटमुळे नक्कीच उत्साह वाढतो. खुप बरं वाटते वाचून.

creativity चा therepy सारखा उपयोग करण्याची तुमची कल्पना खूप प्रशंसनीय आहे. आणि बरोबर आहे life में "तडका" असल्याशिवाय जगणे खमंग होत नाही.
पण एक लक्षात घ्या घोड्याला पाणी प्यायची प्यास हवी.

तशी प्यास माझ्यात ठासून भरलीय.
मागच्यावर्षी बना यू ट्यूबर अशी SILC ची जाहीरात पाहीली, बायकोला विचारले ,करु का हा कोर्स.
तूझ्याकडे काय मटेरीयल आहे, असा विरोध झाला.
मी डगमगलो नाही,कोर्स केला.
धडाक्यात 40 व्हिडीओज upload केले.
म्हणजे ठरवलं नव्हतं,
संधी येत गेल्या, मी upload करत गेलो.
मला मित्रमंडळी व मुलींना दाखवायचं होतं@ 59 मी किती tech-savvy आहे. त्यांचा थंडा प्रतिसाद आला. पर्वा नाही, अजून योजना आहेत.

खुपच प्रेरणादायी आहेत तुमचे विचार.
आईला सुद्धा तेच सांगितले. धन्यवाद.