कोकण special Bike Road ट्रिप च्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात आम्ही सिंद्गुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळच्या एका नैसर्गिक देणगी लाभलेल्या सुंदर खेडेगावात म्हणजेच "वालावल" या खेडेगावात पोहचलो.
पहिल्या दिवसाच्या प्रवास संपवून संध्याकाळी मुक्कामासाठी आम्ही या गावात आलो. हे एक खेडे असल्यामुळे इथे हॉटेल / रिसॉर्ट कमी आहेत. तसेच राहण्यासाठी मोजकेच पर्याय आहेत. त्यापैकी हॉटेल कौस्तुभ आणि या भागातील प्रसिद्ध हॉटेल प्रभूशृष्टी. जर तुम्ही फॅमिली सोबत जात असाल तर हा बेस्ट पर्याय आहे. पण नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या यामुळे आधीच बुकिंग झाले होते. म्हणून आम्ही गावातील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिराच्या भक्त निवास मध्येच मुक्काम केला. आपल्या स्व इच्छेने आपण जे देणगी देऊ तेच खोली च भाडं.
लक्ष्मीनारायण मंदिर - स्थानिकांच्या मते जवळपास ३०० ते ४०० वर्ष जुने हे या गावातील एक भव्य आणि सुंदर मंदिर. संध्याकाळी आम्ही मुक्कामाला असल्यामुळे तिथल्या रात्रीच्या भजनाचा हि आस्वाद घेता आला. सकाळी उठल्यानंतर पहाटे मंदिराजवळ असलेल्या तलावांवर धुक्याची दाट चादर पसरलेली, सोबत पक्ष्यांचा किलबिलाट , नारळ पोफळीच्या बाग, मंदिरात आजणारी देवाची गाणी, कोकणातील सकाळ अनुभवण्याचा एक विलक्षण अनुभव आला.
कर्ली नदी आणि नौकाविहार - सकाळी लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊन वालावल पाहण्यासाठी बाहेर पडलो. गावाच्या बाजारपेठेतून थेट कर्ली नदीच्या किनाऱ्यावर पोहचलो . तिथे महेश कोरगावकर म्हणून काका आहेत ते नौकाविहार साठी घेऊन जातात. पारंपरिक पद्धतीची बांबू च्या साहाय्याने चालवली जाणारी होडी घेऊन नदीत असलेल्या बेटा जवळ ते घेऊन जातात . आत फिरताना नदीचा शांत पाणी , आजूबाजूचं घनदाट जंगल एक अप्रतिम वातारणातून जातांना मन प्रसन्न होऊन जात. हा अनुभव घेण्यासाठी सकाळी लवकर जा .
देवी माउली मंदिर - वालावल गावापासून ४ km अंतरावर असलेल्या चेंदवण या गावात देवी माऊलीच मंदिर आहे. भेटलेल्या माहितीप्रमाणे देवी माउली म्हणजेच लक्ष्मीनारायण यांची बहीण असा समजलं जात.
पाताळेश्वर मंदिर - चेंदवण याच गावात असलेलं दुसरा मोठं मंदिर म्हणजे स्वयंभू पाताळेश्वर मंदिर. दोन्ही मंदिरांना खूपच छान नैसर्गिक देणगी लाभली आहे. नक्कीच तुम्ही थोडा वेळ त्या प्रसन्न वातावरणाच्या आनंद घ्याच.
नेरुळ च कलेश्वर मंदिर - कुडाळ वालावल रोडवर असलेलं नेरूर या गावाचं एक भव्य मंदिर - श्री क्षेत्र कलेश्वर मंदिर . या मंदिराच्या समोरच एक मोठा तलाव आहे त्यामध्ये भरपूर कमळाची फुले पाहायला भेटतात .
वालावल या गावाजवळ असलेली हे काही ठिकाणे जेंव्हा कधी जाल तेंव्हा नक्की भेट द्या. अधिक माहिती साठी आपला संपूर्ण विडिओ नक्की पहा -
वाचने
9794
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
विडिओ पाहिला.
धन्यवाद !!!
In reply to विडिओ पाहिला. by कंजूस
वाह !
धन्यवाद !!!
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त..
धन्यवाद !!!
In reply to मस्त.. by गोंधळी
सुंदर
In reply to मस्त.. by गोंधळी
धन्यवाद !!!
In reply to सुंदर by Bhakti
वाह, क्या बात, सुंदर !
धन्यवाद !!!
In reply to वाह, क्या बात, सुंदर ! by चौथा कोनाडा
वाह, क्या बात, सुंदर !
In reply to वाह, क्या बात, सुंदर ! by चौथा कोनाडा
धन्यवाद !!!
In reply to वाह, क्या बात, सुंदर ! by सुबोध खरे
सुन्दर प्रवासवर्णन - अगदी
धन्यवाद !!!
In reply to सुन्दर प्रवासवर्णन - अगदी by शेखरमोघे
सुरेख प्रवास वर्णन . पुर्वी
धन्यवाद !!!
In reply to सुरेख प्रवास वर्णन . पुर्वी by सिरुसेरि