Skip to main content

साहित्य संपादक मंडळात नवीन सदस्यं

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 12/10/2020 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपाच्या साहित्य संपादक मंडळात चार नवीन सदस्यं नव्याने जोडले आहेत. मिपावरील लेखन आणि नवीन सदस्यांना लेखन संदर्भात मार्गदर्शन करण्याचे काम, त्यांना त्यांच्या लेखनात बदल करायचे असल्यास अश्या प्रकारच्या मदतीसाठी साहित्य संपादक मदत करतील. मिपाच्या साहित्य संपादक मंडळात सामील झालेल्या नवीन चार सदस्यांची नावे खालील प्रमाणे. १) चांदणे संदीप २) ज्ञानोबाचे पैजार ३) पियुषा ४) चिनार मिपाच्या साहित्य संपादक मंडळात सहभागी झालेल्या नवीन संपादकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ! धन्यवाद.

वाचने 17373
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

मंडळींचे हार्दिक अभिनंदन!!

नवीन ✍️ संपादकांना शुभेच्छा आणिक अभिनंदन !

💐


अभिनंदन आणि शुभेच्छा. स्वतःचे व्याप सांभाळून अधिकची जबाबदारी पार पाडणाऱ्यांचे नेहेमी कौतुक वाटते. 👍

सर्व नवीन सा सं मंडळींचे अभिनंदन !

नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन व पुढल्या वाटचालीस शुभेच्छा. -गा.पै.

साहित्य संपादन मंडळातील नवनिर्वाचित सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच त्यांच्या यशस्वी कारकिर्दीच्या हार्दिक शुभेच्छा! - मिपाकर

नवनियुक्त साहित्य संपादकांचे हार्दिक अभिनंदन. या कामासाठी अनेक शुभेच्छा. छायाचित्रणकला स्पर्धा हा उपक्रम तीन वर्षांपासून बंद पडला आहे. तो पुनश्च सुरू केल्यास आनंद होईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

अनुमोदन..

चौघांचे अभिनंदन. चिनार्‍याच्या धाग्यावर दंगा घालता येईल का आता???????

सर्व नव निर्वाचित संपादकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा .

In reply to by rahul ghate

अवांतर : मला वाटतं की नव्या मंडळास निर्वाचित म्हणू नये. कारण की ते निवडून आलेले नसून नेमणूक झालेले आहे. -गा.पै.

आणि हार्दिक शुभेच्छा.... सोसायटीच्या पदाधिकाऱ्यासारखंच आहे हे...... चांगलं काम केलं की कोणीच बोलत नाही पण जरा काही इकडचं तिकडं झालं की येतात सगळे दारात !

साहित्य संपादक मंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या खालील चारही सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! १) चांदणे संदीप २) ज्ञानोबाचे पैजार ३) पियुषा ४) चिनार सदस्यांना उत्तम वाचनाची मेजवानी देता येणे आणि स्वतःची साहित्यविषयक जाणीव वाढवता येणे , हा संपादनाचा महत्त्वाचा पैलू आहे . ही एक अतिशय आनंदाची व त्याचवेळी जबाबदारीची गोष्ट आहे . आपण साहित्य संपादन उत्तम कराल , मार्गदर्शन कराल व एकूणच विचारपूर्वक व्यक्त व्हाल , यात काही शंका नाही . पुढल्या वाटचालीस खूप शुभेच्छा.

१) चांदणे संदीप २) ज्ञानोबाचे पैजार ३) पियुषा ४) चिनार
यांच्या बरोबर सध्याच्या जुन्यांची नावे कळली तर बरे पडेल...

सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन!

🙏


नवीन सदस्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

मनोगतावर लेखाच्या शेवटी "ह्यावरून आठवलं" अशी एक सुचवणी येते. तशी सुचवणी जर संपादक मंडळी करू शकले तर मिपावरील जुने लेख परत वरती येतील. हवतर त्यासाठी एक मंडळ नेमून त्यात जुने जाणते पण नियमीत वाचकांचा समावेश करावा. किंवा संपादक मंडळांची संख्या वाढवावी. राजकारणावरील चर्चां याला अपवाद असू शकतील. 🤣

साहित्य संपादक मंडळात नवीन सदस्यं
ह्यातील सदस्य मधील स्य वर अनुस्वाराची गरज नाही , कृपया तो हटवणार का ? किंव्वा मग हा प्रतिसादच हटवणार ? ;) ख्या ख्या ख्या

In reply to by प्रसाद गोडबोले

कळपात एक नाही चार नवी "मेंढरं" आली अशा अर्थाने लिहिले आहे ते, तेव्हा राहू दे ते तसेच, पैजारबुवा,

सर्व नवनियुक्त साहित्य संपादकांचं अभिनंदन आणि नव्या जवाबदारीस शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

मिपा पुस्तके या सदरात नोव्हेंबर 2018 नंतर कुठली भर पडलेली नाही. तरी नवीन संपादक मंडळ इकडे लक्ष देईल काय ? धन्यवाद