संडे स्पेशल (दुधापासून केलेले पदार्थ)
काही वेळा घरी दुध उरते अशावेळी तुम्ही काय करता?
१.मी कस्टर्ड करते आणि फ्रिज मध्ये ठेवते आणि जी फळे असतील त्यांच्या फोडी करून ऐनवेळी त्यात घालून देते. त्यावर जेली/जॅम घालून डेकोरेशन करून सर्व्ह करते.
२.कोल्ड कॉफी (खरे तर कॉफी न घालता बोर्नव्हीटा/बुस्ट घालते)
३.मिल्क शेक (बदाम्/खजुर)
४ हलवा (गाजर्/दुधी /बीटरूट)
५.फालुदा
६.कस्टर्ड कॅरॅमल
छोटा डॉन यांच्या विनंती वरून एक रेसिपी...गव्हाची खीर
जर एकटेच असाल तर एक वेळचे पोटभरून जेवण सुद्धा.
२ वाट्या गव्हाचा रवा /दलिया
१/२ वाटी तांदुळ
२/३ लवंगा
२ वाट्या ओले खोबरे(ऐच्छिक)
२ वाट्या चिरलेला गुळ
१/२ वाटी साखर आवडीप्रमाणे
१ टी.स्पून वेलदोडे पावडर
१ टी.स्पून जायफळ पावडर
काजु, बेदाणे
१ टे.स्पून तूप
२ टी.स्पून खसखस भाजून पावडर (ऐच्छिक)
१/२ लिटर दुध
१. रवा व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत.
२.१टे.स्पून तूप गरम करून त्यामध्ये लवंगा घालून रवा आणि तांदूळ परतावा व ४ वाट्या पाणी घालून कुकर मध्ये ३ शिट्या देऊन शिजवावा.
३.जाड बुडाच्या पातेल्यात वरील शिजलेला रवा घोटून, त्यात गुळ ,साखर, खसखस, वेलदोडे पावडर , खोबरे ,दूध घालून शिजवावा.
४.सर्व्ह करताना किंवा खाताना काजु, बेदाणे घालून खावे.
खोबरे आणि खसखस नसले तरी चालते पण त्यामुळे खीर खमंग लागते.
दुध न घालता शिजवले तरी चालते, फ्रिज मध्ये ठेवावे व हवे तेव्हा दुध घालून खावे.
*****************************************************************************
सर्वात सोपी म्हणजे........... कोल्ड कॉफी
१/२ दुध (पिशवीत असेल तर अर्धा तास फ्रिजर मध्ये ठेवावे म्हणजे त्यात थोडा बर्फ साचेल कि जो हाताने फोडता येतो)
४ चमचे बोर्नव्हीटा किंवा बुस्ट किंवा कॉफी चवीनुसार्
८ चमचे साखर
वरील तिन्ही पदार्थ मिक्सर मध्ये ( लिक्विडायजर्)घालून मॅक्झिमम स्पीडवर १/२ मि. नंतर परत१/२ मि असे फिरवणे
शेवटी बबल्स येतात मग थांबणे ५ मिनिटांनी एका ग्लास मधून सर्व्ह करणे.
*****************************************************************************
वरील पैकी कोणती हवी असल्यास जरूर कळवा. मी त्याची रेसिपी देईन.
वाचने
10138
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
वा...
स्वाती
अरे
मला "खीर" आवडेल .....
मस्त!
In reply to मस्त! by विसोबा खेचर
बालूशाही (खास तात्यांसाठी)
In reply to बालूशाही (खास तात्यांसाठी) by राजमुद्रा
ह्म....