एखाद्या ठिकाणाबद्दल तुम्ही कुठेतरी वाचता, कुणाकडून तरी ऐकता किंवा त्याची एखादी झलक पाहता आणि ते ठिकाण तुमच्या मनाच्या एका कोप-यात कुठेतरी आत जाऊन बसतं. हे ठिकाण ताजमहाल किंवा अजिंठा-वेरूळ सारखं प्रसिद्ध नसतं पण तरीही (की त्यामुळेच?) ते तुम्हाला भावलेलं असतं. भेट द्यायच्या ठिकाणांच्या यादीत त्याचा क्रमांक वरचा नसतो, पण तरीही ते कधीही विस्मरणात जात नाही. लाक्कुंदीच्या बाबतीत असंच झालं. इंटरनेटवर कुठेतरी या ठिकाणाबाबत वाचलं आणि तेव्हाच तिथं जायचं हे पक्कं ठरवून टाकलं.
दर वर्षी पुढे पुढे ढकलत जात शेवटी २०१९ च्या डिसेंबर महिन्यात लाक्कुंदीला जायचा योग आला. या सहलीच्या आधी नोव्हेंबरात भुज, जुनागढ आणि गीर अभयारण्य आणि नंतर जानेवारीत कच्छचे छोटे रण (LRK) अशा सहली झाल्या. आजच्या या करोनाच्या काळात ते दिवस एखाद्या सुखद स्वप्नासारखे वाटतात. (गेले ते दिन गेले...)
सुरुवातीला या सहलीत दांडेली नव्हतं. पण मग असं वाटलं की फक्त लाक्कुंदी पहायला एवढ्या लांब जायचं? मग लाक्कुंदीच्या आजूबाजूच्या जागांचा शोध सुरू झाला. ऐहोळे, पट्टडक्कल, हंपी, विजापूर, गोकाक धबधबा ही सगळी ठिकाणं पाहून झालेली असल्यामुळे शेवटी मग दांडेलीची निवड झाली. बेत असा ठरला-
दिवस १: पुणे ते गडग, लाक्कुंदी स्थलदर्शन दिवस २: लाक्कुंदी स्थलदर्शन दिवस ३: लाक्कुंदी ते दांडेली, दांडेली स्थलदर्शन दिवस ४: दांडेली अभयारण्यास भेट, दांडेली ते पुणे
सहल २१ ते २४ डिसेंबर अशी असल्यामुळे हॉटेलांमधे जागा नव्हत्या. त्यातल्या त्यात गडगला चांगलं हॉटेल मिळालं, पण दांडेलीला कुठल्याच हॉटेलात जागा नव्हती. शेवटी एका कळकट मळकट हॉटेलात उपलब्ध असलेल्या दोन खोल्या गोड मानून घ्याव्या लागल्या.
दिवस पहिला:
आम्ही पहाटे पाच वाजता निघालो. आजकाल पुण्यात दुर्मिळ झालेली सुंदर गुलाबी थंडी पडली होती. पुणे-बेंगलूरू रस्ता हा एकाच वेळी रडवणारा आणि हसवणारा असा आहे. या रस्त्याचा महाराष्ट्रातला भाग जितका भयानक आणि थरकाप उडवणारा आहे, तितकाच कर्नाटकातला भाग सुंदर आणि आनंददायी आहे. भयंकर खड्डे असलेल्या आणि सतरा ठिकाणी काम चालू असलेल्या या रस्त्यावर टोल नामक खंडणी देऊन आम्ही पुढे निघालो.
सातारच्या पुढे कुठेतरी

कोल्हापूर पार केल्यावर गाडी कर्नाटकात शिरली. कोल्हापूर ते बेळगावी रस्त्यावर गाडी चालवणे हा एक प्रसन्न करणारा अनुभव असतो. आत्तापर्यंत झालेल्या मानसिक त्रासाची ही एक भरपाईच असते म्हणाना. रूंद, तीन मार्गिका असलेला रस्ता, दोन्ही बाजूला असलेले प्रशस्त सेवा रस्ते, दुभाजकावर लावलेली आकर्षक झाडे, तुरळक गर्दी यामुळे हा प्रवास संपूच नये असे वाटते.
साधारण एकच्या सुमारास आम्ही गडगला पोचलो. हॉटेलात गेलो, खोल्या ताब्यात घेतल्या आणि जेवण केले. गडगपासून लाक्कुंदी फक्त ११ किमी दूर आहे. थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच लाक्कुंदीला निघालो. लाक्कुंदीला पोचल्यावर आमचा पहिला थांबा होता तिथले वस्तुसंग्रहालय. हे वस्तुसंग्रहालय म्हणजे एक सुखद धक्का होता. लाक्कुंदीसारख्या छोट्या, अपरिचित ठिकाणालाही कर्नाटक सरकार किती महत्व देते याचेच ते द्योतक होते.

कहाणी लाक्कुंदीची (Story of Lakkundi) या नावाचे हे वस्तुसंग्रहालय ब-यापैकी मोठे आहे. आजूबाजूच्या परिसरात उत्खननात सापडलेल्या अनेक मूर्त्या तिथे ठेवल्या आहेत. लाक्कुंदी गावातल्या सगळ्या मंदिरांचे स्थान दर्शविणारा एक नकाशाही तिथे आहे. तिथे काही वेळ घालवून आम्ही बाहेर पडलो. वस्तुसंग्रहालयाच्या मागेच ब्रह्म जिनालय आहे. लाक्कुंदीतील ११ मंदिरांपैकी सुमारे ५ मंदिरांचा ताबा आत्ता सरकारकडे आहे - ब्रह्म जिनालय यापैकी एक आहे. हे लाक्कुंदीतील सगळ्यात जुने मंदिर असून सगळ्यात मोठे जैन मंदिर आहे. मंदिर उत्तम स्थितीत आहे. आजूबाजूला राखलेली हिरवळही मन सुखावणारी आहे.

मंदिरात दोन सुंदर मुर्त्या आहेत. त्यापैकी एक ब्रह्मदेवांची असून तिला चार मुखे आहेत (सोबत सावित्री आणि गायत्री आहेत), दुसरी यक्षी पद्मावतीची आहे. दोन्ही मुर्त्या कमालीच्या देखण्या आहेत. ब्रह्मदेवांच्या मुर्तीमुळे या मंदिरास त्याचे नाव मिळाले आहे.

मंदिरात ब-यापैकी गर्दी होती. मला वाटले त्यापेक्षा लाक्कुंदी थोडे अधिक लोकप्रिय दिसत होते. आजकाल हंपी, ऐहोळे, पट्टडक्कल पाहून झाल्यावर लोक इथेही येत असावेत. मंदिरात कुठल्यातरी शाळेची सहल आली होती. भिरभिरणा-या डोळ्यांनी ती लहान मुले इकडेतिकडे पहात होती. बाजूच्याच हिरवळीवर माकडांचाही खेळ रंगला होता. मंदिरासमोरच एक घर होते. मला त्या घरातल्या लोकांचा हेवा वाटला. पण काय माहीत? कदाचित त्यांना ह्या मंदिराचे अजिबात कौतुक नसेल. हे लहानसे खेडे सोडून आपण शहरात जाऊन रहावे असे त्यांना वाटत नसेल कशावरून?
ब्रह्म जिनालय आणि त्याला लागून असलेले एक छोटेसे जैन मंदिर पाहून झाल्यावर आम्ही निघालो नान्नेश्वर मंदिराकडे. (ह्या दोन मंदिरांशेजारीच नागनाथ मंदिर आहे, पण आज त्याची स्थिती दयनीय आहे. मंदिराभोवती अतिक्रमण झाले असून त्याची पडझड झालेली आहे. ह्या मंदिराची सद्यस्थिती https://www.youtube.com/watch?v=XmeJDrC4IqU ह्या व्हिडिओत पाहता येईल.) नान्नेश्वर आणि काशीविश्वेश्वर ही मंदिरे अगदी जवळजवळ (रस्त्याच्या दोन बाजुंना दोन) आहेत. नान्नेश्वर मंदिर भल्यामोठ्या उंच जोत्यावर उभारलेले आहे. मंदिर भापुसच्या ताब्यात असल्यामुळे अर्थातच स्वच्छ, नीटनेटके आणि उत्तम स्थितीत आहे.

घासून गुळगुळीत केलेले अगदी आरशासारखे चमकणारे खांब ही कर्नाटकातल्या मंदिरांची खासियत आहे, इथेही ती दिसते. (ब्रह्म जिनायलातही हे खांब होतेच.) मंदिराच्या मंडपाला लाकडी दरवाजा असला तरी सध्या तो उघडा होता. आम्ही आत शिरलो. मंडपही देखणा होता. आत गाभा-यात एक शिवलिंग दिसत होते, पण सध्या त्याची पूजाअर्चा होत नसावी. नान्नेश्वर मंदिराजवळ आम्ही थोडा वेळ थबकलो. वरून लाक्कुंदीचा बराच मोठा परिसर दृष्टिपथात येत होता. भारतात असणा-या लाखो खेड्यांसारखेच लाक्कुंदी एक चिमुकले झोपाळू खेडे होते. रस्त्यावर स्वच्छंदपणे फिरणारी गुरे, त्यांनी टाकलेल्या शेणामुताचा सगळीकडे पसरलेला दरवळ, इकडून तिकडे जाणारे ट्रॅक्टर, छोटी बसकी घरे, चौकात असणारे पार आणि त्यांवर बसलेले गावकरी. नान्नेश्वर पाहून आम्ही निघालो शेजारच्या काशीविश्वेश्वर मंदिराकडे. काशीविश्वेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरचे देखणे कोरीवकाम. लाक्कुंदीच्या इतर कुठल्याच मंदिरात असे कोरीवकाम नाही. काशीविश्वेश्वर मंदिराच्या बाजूलाच एक खुला रंगमंच आहे. लाक्कुंदीतले सांस्कृतिक कार्यक्रम बहुधा इथेच होत असावेत.

काशीविश्वेश्वर मंदिर पाहून घाईघाईने आम्ही निघालो मणिकेश्वर मंदिर आणि त्याशेजारी असलेल्या मुस्कानीबावी अर्थात मुस्कानी विहिरीकडे. सूर्यास्त होत होता आणि आज दिवस मावळायच्या आधी आम्हाला हे शेवटचे मंदिर पाहून घ्यायचे होते. लाक्कुंदीच्या मुख्य रस्त्यापासून एका अरुंद रस्त्याने आत गेलो की हे मंदिर लागते. मणिकेश्वर मंदिराला मी लाक्कुंदीतील सगळ्यात सुंदर मंदिर म्हणेन. हे मंदिर स्वत: सुंदर आहेच, पण त्याची शोभा वृद्धिंगत केली आहे त्यासमोर असलेल्या पाय-या पाय-यांच्या त्या अतीदेखण्या विहिरीने.

सूर्य महोदय आता अगदी दिसेनासे होण्याच्या बेतात आले होते. मंद असा तांबूस प्रकाश सगळीकडे पसरला होता. त्या मंद प्रकाशात हे मनोहर मंदिर अधिकच लोभसवाणे दिसत होते. ह्या मंदिरात आम्ही बराच वेळ रेंगाळलो. शेवटी तिथे देखरेख करणा-या कामगाराने आम्हाला आता निघा असे बोलल्यावर नाईलाजाने आम्हाला तिथून निघावे लागले.
एक टीप: इतिहासात रस असलेल्या आणि हा इतिहास पाहिलेल्या प्रत्येक जुन्या वास्तूविषयी आस्था असलेल्या कुठल्याच व्यक्तीचे मत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात् Archaeological Survey of India या संस्थेविषयी फारसे चांगले नसते. अर्थात् हे नकारात्मक मत निराधार नाही हे सत्य आहेच. भारतातल्या अनेक वास्तुंची होणारी अक्षम्य हेळसांड पाहून कुणाचेही मत असेच होईल. मीही स्वत: असे म्हणतो की भापुसचे काम सुधारण्यास अजून बराच वाव आहे. ते जे काही करतात ते उत्तम असते हे खरे, पण अनेकदा ते काहीच करत नाहीत हेही तितकेच खरे आहे. मणिकेश्वर मंदिर पाहिल्यावर भापुसने इथे काही खास केलेले नाही असेच कुणीही म्हणेल. थोडीशी हिरवळ आणि काही शोभेची झाडे लावण्याइतपतच भापुसचे काम आहे असेच कुणालाही वाटेल. पण भापुसने इथे केवढे प्रचंड काम केले आहे हे खाली दिलेल्या दोन छायाचित्रांवरून स्पष्ट होते. जुनी छायाचित्रे कुणा अज्ञात छायाचित्रकाराने १८८५ साली काढली आहेत (ब्रिटिश लायब्ररीच्या संकेतस्थळावरून साभार), तर आजची छायाचित्रे मी काढली आहेत. दोन्ही छायाचित्रांमधला फरक अक्षरश: थक्क करणारा आहे! मी तर म्हणेन की काहीही काम केलेले नाही असे वाटणे हीच भापुसच्या कामाची खरी पावती आहे! (त्यांचे अजिंठा आणि वेरूळमधील कामही थक्क करणारे आहे. ब्रिटिश लायब्ररीच्या संकेतस्थळावर अजिंठा आणि वेरूळची अनेक जुनी छायाचित्रे उपलब्ध आहेत, गरजुंनी जरूर पहावीत.)

मंदिर पाहून झाल्यावर आम्ही परत गडगला निघालो. वाटेत एका ठिकाणी एका छोट्याश्या टपरीवर मिरची आणि (चक्क अख्ख्या) वांग्याची भजी खाऊन आणि चहा मारून (एकूण बील 50 रुपये!) आम्ही परत हॉटेलवर परतलो.

वाचने
10552
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त भटकंती
खुप सुन्दर
सगळे फोटो मस्त.
मस्तच...
..... ऐहोळे, पट्टडक्कल, हंपी,
छान.
सुंदर फोटो आणि माहितीपूर्ण
अप्रतिम
जुन्या फोटोंबद्दल धन्यवाद.
...गाववाल्यांनी एक हजार वर्षं
In reply to जुन्या फोटोंबद्दल धन्यवाद. by कंजूस
सुरेख लिहिलंय.
बकेट लिस्ट
छान!
आभार!
रेल्वे ....
In reply to आभार! by एक_वात्रट
कमालीचे सुंदर
इतर पर्यटनही केलेलं लिहा.
एखाद्या ठिकाणाबद्दल तुम्ही कुठेतरी वाचता,
व्वा, खुप सुंदर !