(एका क्षणात विदेहत्व !)
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा आमच्या सोत्रीअण्णांचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आम्हाला पण आवरला नाही. ही घ्या शिमग्या निमित्त सर्वांना एक अनमोल भेट ! १. काऊ स्टँप अर्थात चैतन्यचूर्णाचे सेवन ही काही फार भारी गोष्ट नाही. पण पूर्वीच्या लोकांनी चैतन्यचूर्णाचे सेवन या गोष्टीचा उगीच मोठा बाऊ करुन ठेवला आहे. टल्ली होणे, विमान उडणे, किक बसणे, झालंच तर तंबाखू सेवनाने कॅन्सर होतो असल्या जाहिरातीमूळे लोकांच्या मनात काऊ स्टँपच्या सेवना विषयी दहशत निर्माण झाली आहे. वास्तविकात चैत्यन्यचूर्णाचे सेवन आणि कायXचूर्णाचे (Xच्या जागी योग्य शब्द निवडा) सेवन यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत जोरात किक बसणे ही समान भावना उत्पन्न होते आणि दोन्ही च्या सेवनाने मोकळे होणे ही समान दैहिक घटना आहे. इतर मार्गाने केलेल्या उत्सर्गांपेक्षा किक बसल्यावर काऊ स्टँपमूळे सूलभ उत्सर्ग होतो इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग काऊ स्टँप खाण्याची मौज काही और आहे. श्रीखंड पुरीची परमोच्चता चारपाच तासांच्या सुस्त झोपेत आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्यात होणारी घटना आहे. त्यामुळे ( त्याने जरी आपण मरत नसलो तरी मेल्या सारखे पडून रहाण्यातही फार मजा आहे) तसेच काऊ स्टँप च्या सेवनाने काय कमाल परिणाम येतात याची कल्पना कुणीही करु शकणार नाही. २. मुद्दा फक्त असा आहे की काऊ स्टँप सेवना पूर्वीचे आपण इतरांपेक्षा फारसे वेगळे नाही आहोत हा अनुभव यायला हवा. पण स्वत:ला निर्व्यसनी म्हणवून घेणाऱ्या लोकांनी याबाबतीत पण अनंत लफडी करुन ठेवली आहेत. मुळात आपण इतरांपेक्षा वेगळे नाही आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, वेगळेपणा सिध्द करण्यासाठी उगाच विलायती ब्रँड चे चैतन्यचूर्ण घ्यायची काहीच गरज नाही, कंबरेत लाथ मारल्यासारखी किक ही ही स्थिती दोन्हीतही आहेच. किंबहूना काउ स्टँप मधे ती जास्तच आहे. अजून आपण सूपरम्यान किंवा रजनी झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फारतर “मिठून” होता येईल याची जाणीव ठेवायची आहे. म्हणजे आपल्या कडे पॅन्टवर घालायची चड्डी नाही तर 'चट्टेरी पट्टेरी चड्डी आहे' ही जाणीव आपल्याला आहे. जसे याच चड्डीला आपण बर्मुडा म्हणतो म्हणत आपण टेचात वावरतो, किंबहुना आपण चड्डी नव्हे तर थ्री पीस सुट घातला आहे असा माज चाळीत फिरताना आपल्या चेहर्यावर दिसतो. तिच गोष्ट चैतन्य चूर्णाची असायला हवी. पण विलायती ब्रँड खाणे आपल्याला भारी वाटते तर काऊ स्टँपला मात्र आपण नाके मुरडतो. दूर एक पानाचा ठेला आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो रात्री उशीरा बंद झाला तर आपल्याला संपली असं वाटत नाही, कारण आपल्या खिशात आपण एक्स्ट्रा पुड्या ठेउन आहे. आणि खिशातली पुडी जरी संपली तरी मित्र आपल्याला उधार देईल याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे, आपल्याला खिशातल्या पुडीची जाणीव होत असली तरी ठेला आणि खिसा या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी ठेल्याची आठवण होतेय अगदी तशीच (संपूर्ण) खिश्याची झाली की ठेला बंद झाला काय किंवा खिशातली पुडी संपली की काय दोन्ही एकच ! (काही समजले नाही ना? मला पण मी काय लिहिले हे अजिबात समजले नाही) ३. नवशिक्यांसाठी म्हणून सांगतो ही एक अत्यंत सोपी साधना आहे. शक्यतो सकाळी किंवा कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे, जमले तर कुठेतरी बुड टेकून, बसा. डावा हात पसरल्या सारखा पुढे करा व हातामध्ये थोडा खळगा तयार करा (त्यामुळे चूर्ण हातातच राहील) आणि त्यावर पुडी मधले चैतन्यचूर्ण घ्या जितके सहज मावेल तेव्हढेच. उजव्या हाताच्या तर्जनीवर थोडा (आपल्या वकूबा प्रमाणे) चूना घेउन तो चूर्णाला हलक्या हाताने मळा. सगळी कडे नीट लागला पाहिजे, चूर्णावर हलकेच थापट्या मारा, एकदा ते चूर्ण उजव्या हातात घ्या आणि डाव्या हातावरचा धुरळा झटकून टाका. आता परत चूर्ण डाव्या हातात घ्या. मग उजव्या हाताची तर्जनी अंगठ्या जवळ नेत, अलगद डाव्या हातावरचे चूर्ण उचला त्या आणि ते अलगद आपल्या दात आणि गालांच्या मधाल्या पोकळीत सरकवा दोन्ही हात झटकून टाका. आणि निवांत बसा. (डावखुऱ्या लोकांनी हाताची अदला बदल केली तरी चालेल) आता शांतपणे स्वत:कडे लक्ष द्या : तत्क्षणी तुमचे सगळे विचार योग्य दिशेने धावायला लागतील (असे तुम्हाला वाटेल)! सकाळची वेळ असेल तर टमरेल घेऊनही धावावे लागेल लोकांना ही सिद्धी प्राप्त करून घ्यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते ! टमरेल जागेवर ठेऊन, दरवाजा बंद करून शांतपणे बसा. तुमच्या लक्षात येईल की देह हलका होत आहे आणि आपल्याला मोकळे मोकळे वाटत आहे . यू आर ऑलमोस्ट डन ! ४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे माप चूकत नाही तोपर्यंत मनात कोणतीही शंका आणू नका. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीर मोकळे झाल्याची जाणीव होईल, म्हणजे देह हलका झालाय आणि ते आपल्याला कळतंय हा अनुभव येईल. याचाच पुढचा भाग म्हणून तुम्ही तर्जनी-नासिका मिलन देखिल या वेळी घडवून आणू शकता. (हे अर्थात ही केवळ एक सुचवणूक आहे) तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मेंदू दीर्घकाल किक बसलेल्या अवस्थेत राहायला लागला की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : की आपण सर्व जाणीवांच्या पलीकडे पोचू लागलो आहे , जगात आपल्याहून भारी कुणीही नाही ! आजूबाजूला चाललेल्या इतरांच्या अविरत बडबडी कडे तुम्ही सहज दुर्लक्ष करू शकाल व त्याच वेळी अत्यंत वेगाने विचार करू शकाल. शत्रुपक्षाच्या बडबडीतले आपल्याला सोयीचे तेवढे निवडू शकाल किंवा वादंग घालताना त्यांच्या तोंडात त्यांनी न बोललेले शब्दही घुसडू शकाल किंवा त्यांच्या बोलण्यातून कोणताही अनर्थ काढू शकाल अनेक दिवस अशी साधना केल्यावर हळूहळू “आता पर्यंत आपल्याला आपण येडे आहोत असे वाटत होते. वास्तविकात आपण “सर्वज्ञ” आहोत याची तुम्हाला जाणीव होईल ! आणि मग कोणत्याही विषयावर तुम्ही अधिकार वाणी ने बोलू शकाल कोणाशीही कितीही वेळ न थकता वादंग घालू शकाल. हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण मी सर्वज्ञ आहे ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, बाकीचे सगळे अत्यंत मूर्ख आहेत मी सोडून जगात दुसरा कोणी शहाणा नाही ! यालाच काही कुपमंडूक कुत्सित पणे “अहंगंड” असे म्हणतात . खरतर `अहंगंड ' असं काही नाही. ते स्वत:ला हुशार समजणाऱ्या बावळट लोकांचे केवळ एका आर्ग्युमंट आहे , तर मी एकटाचा सर्वज्ञ आहे ही वास्तविकता आहे. ही सार्वभौम सर्वज्ञ पणाची जाणीव तुम्हाला तो पुरेल जोपर्यत चैतन्यचूर्ण तुमच्या गालात आहे आणि “परंतू मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी” असं लोक जरी आपल्या बाबती म्हणायाला लागले तरी ते काना आड करण्याचे कौशल्य तुमच्या अंगी बाणेल ! _________________________________________ हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. गांजा ओढल्यावर ही असाच अनुभव येतो असे अनेक सिध्द लोक म्हणतात. पण त्यामुळे होणारे दुष्परीणामाही तेवढेच भेदक आहेत. अर्थात चैतन्यचूर्णाचे ही काही दुष्परीणाम आहेतच पण तो आजचा विषय नाही. ज्याला संसारात राहूनही सर्वज्ञ व्हायचे आहे त्याला चैतन्यचूर्णाशिवाय पर्याय नाही. काही लोक हाच अनुभव मदयपानातूनही येतो असे सांगतात आणि तो मार्गही प्रचलित आहे . पण याचा एक तोटा आहे ; एकतर ते बरेच महाग पडते कारण त्यात ही बरेच प्रकार आहेत आणि गेल्या दहा हजार वर्षात कुणीही मद्यपी “सर्वज्ञ” सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि प्रखरतेने सर्वज्ञता मांडतो तितकी कोणताही मद्याचार्य मांडू शकला नाही. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला. इथले नवसदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील आणि अनुभवी सदस्य मला अनुमोदन देतील अशी अपेक्षा करतो, (जे मला अनुमोदन देणार नाहीत त्यांचा मार्ग हमखास भरकटला आहे हे त्यांनी व इतरांनी समजून घ्यावे). असल्या फालतू लोकांना मी पुरून उरेनच. कारण या जगात मी एकटाच सर्वज्ञ आहे आणि यावर विवादाची गरज उरत नाही. पैजारबुवा,
वाचने
19137
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
दादा देणारा मी पहिला.
आता सगळं वाचतो. दोन पॅरे
In reply to दादा देणारा मी पहिला. by शाम भागवत
पाय काढून पाठवायला सांगा की..
In reply to आता सगळं वाचतो. दोन पॅरे by शाम भागवत
.
In reply to पाय काढून पाठवायला सांगा की.. by गवि
.
In reply to दादा देणारा मी पहिला. by शाम भागवत
जबरी लिहलंय. 🙏
नको हो..
In reply to दादा देणारा मी पहिला. by शाम भागवत
.
In reply to नको हो.. by ज्ञानोबाचे पैजार
हं
*विनम्र संजय क्षीरसागर मोड ऑन*ज्ञानोबाचे पैजार, तुम्ही गाय छाप या कर्करोगकारक वस्तूचा जो उदोउदो केला आहे, तो अत्यंत टुकार आहे. अर्थात, हे काही तुमच्या अध्यात्मिक ज्ञानाचे उदाहरण नव्हे, ते तर तुम्हात शिगोशिग भरले आहे. त्यामुळे मी लिहिलेल्या लेखात नक्की काय चूक आहे हे दाखवण्यासाठी स्वतंत्र लेख लिहिला अशी आशा. तुमच्या सारख्याच एका महान तत्वज्ञाला हेच करण्याची विनंती केली आहे.*विनम्र_मोड_error_404_Press_"गामापैलवान"_to_restart*हे अत्यंत अतुलनीय काम केले ! कोणत्याही विषयात अर्थपूर्ण योगदान देणे सोडून केवळ तेजोभंग करण्याचे काम सातत्याने करता ! माझ्या "रोमान्स विथ म्युसिक" मध्ये पण पहिला प्रतिसाद असाच दिला होता, स्वतः गाणे म्हणले नाही, ना स्वतः कधी अध्यात्माचे लिखाण केले !*स्वगत*- श्या. ये दुनिया हमको विनम्र होनेईच नई देती.*संजय क्षीरसागर मोड ऑफ*बुवा __/\__ __/\__ घ्या.
लै हसलो.... एक नंबर लिहिले
मद्याचार्यांचा आक्षेप
हा हा हा
लेखापेक्षा प्रतिसाद जबरा आहेत
एका क्षणात
ती अंगुलीमुद्रा लेखात दिलेली
बिलकुल असहमत !!!!!
😛 😝 😂
__/\__
विडंबनाचे सर्वमान्य नियम
@ संजय क्षीरसागर : धिस इज इंटरेस्टींग !
In reply to विडंबनाचे सर्वमान्य नियम by संजय क्षीरसागर
वारलो हे वाचून!
In reply to @ संजय क्षीरसागर : धिस इज इंटरेस्टींग ! by ज्ञानोबाचे पैजार
दंडवत स्विकारा...
In reply to @ संजय क्षीरसागर : धिस इज इंटरेस्टींग ! by ज्ञानोबाचे पैजार
प्रेरणा
In reply to @ संजय क्षीरसागर : धिस इज इंटरेस्टींग ! by ज्ञानोबाचे पैजार
@ ज्ञानोबाचे पैजार : आपली साधना आपले
In reply to @ संजय क्षीरसागर : धिस इज इंटरेस्टींग ! by ज्ञानोबाचे पैजार
साधना साधना साधना
In reply to @ ज्ञानोबाचे पैजार : आपली साधना आपले by संजय क्षीरसागर
@ संजय क्षीरसागर
In reply to @ ज्ञानोबाचे पैजार : आपली साधना आपले by संजय क्षीरसागर
@ संजय क्षीरसागर
In reply to @ ज्ञानोबाचे पैजार : आपली साधना आपले by संजय क्षीरसागर
@ ज्ञानोबाचे पैजार : आता माफी मागून काय उपयोग ?
In reply to @ संजय क्षीरसागर by ज्ञानोबाचे पैजार
सर्कस मधला ज्योकर हा कसबी
In reply to विडंबनाचे सर्वमान्य नियम by संजय क्षीरसागर
माईसाहेब तो माईसाहेब...पैजारबुवा सुभानल्ला...
इथे तुम्ही नमुद केलेली साधना
फ्री हीटचा चेंडू कोणीच
In reply to इथे तुम्ही नमुद केलेली साधना by सुबोध खरे
थोडा धीर धरा.
In reply to फ्री हीटचा चेंडू कोणीच by शाम भागवत
कहर आहे हा लेख...त्या वरच्या
:D
समाधान कांही नव्हे तानमाने॥ समाधान ते काऊ -ष्टयांपेचि योगे॥
धन्यवाद चित्रगुप्त काका...
In reply to समाधान कांही नव्हे तानमाने॥ समाधान ते काऊ -ष्टयांपेचि योगे॥ by चित्रगुप्त
विडंबन आणि प्रतिसाद, दोन्ही
लइ भारी !
कहर आहात माउली
मी तर ..
____/l\____ :)
एकदम झक्कास विडंबन. मजा आली.