आपुले मरण पाहिले म्या..
मला काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला व एंजिओप्लास्टी झाली. त्या अनुभवाविषयी लिहिले आहे. चार भागात पैकी हा पहिला .
आपुले मरण. २२ऑगस्ट २०२०.
सुरुवात नक्की कधी आणि कशी झाली,माहित नाही. १६\१७ ऑगस्ट २०२०ची रात्र असावी. छातीत उजव्या बाजूला अगदी वर ,गळ्याचे खाली भरून आल्यासारखे जाणवले. थोडे दाबल्यावर बरे वाटले. नंतर रोज रात्री कमी जास्त प्रमाणात तोच प्रकार. पाठ दंड हात चोळून घेतले की ठीक व्हायचे .दिवसा मात्र काही नाही. ॲसिडिटी होते अधूनमधून. अस्थमा ही आहे.गॅसेसचा त्रास आहे.त्यामूळे किंवा वातविकाराने होत असावे हा समज झाला. शुक्रवारी सकाळी नियमित योगासने, प्राणायाम ,ध्यान केले.शनिवारी गणेश चतुर्थी,आणि नंतर महालक्ष्मीचा सण, त्यासाठी बाजारात जाऊन काही खरेदी व बॅंकांची कामेही केली .संध्याकाळी गणपतीच्या मखराची सजावट ही केली. शुक्रवारी मध्यरात्री नंतर परत तोच त्रास सुरू. सकाळी काही घरगुती उपाय केले, पण फरक नाही .शनिवारी गणपतीची प्रतिष्ठापना होती त्रास सुरूच .काही तरी गडबड असावी असे वाटले. मुंबईच्या डॉक्टर मित्राने लगेच तपासणी करण्याचा सल्ला दिला. डॉ.हेडगेवार रुग्णालयातील डॉ.रंजना देशमुखांना फोन केला, त्या रजेवर होत्या.त्यांनीही लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यास सल्ला दिला. दुपारी तीन पर्यंतच डॉक्टर उपलब्ध होते, म्हणून तिकडे सुचनाही दिल्या. दोन वाजत आले होते. मुलाने (अनुप)लगेच गाडी काढली .बेंगलूरचे साडूंनी फोन वरून डॉ.हेडगेवार रुग्णालयात त्यांचे परिचयातील डॉ.फाटकांशी संपर्क करून ,मी तिकडे येतअसल्याचे कळवले .
रुग्णालयातील कॅज्युअलटी विभागा समोर उतरलो. अनुप गाडी पार्क करायला गेला. स्वतः चालत आत गेलो. काय त्रास होतो ते सांगितले. स्टाफने लगेच बेडवर झोपवले .ईसीजी काढून डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन गेले. मी निर्धास्त होतो. नक्की वाताचा प्रकार असणार हा आशावाद. तेवढ्यात डॉ.फाटक स्वतःईसीजी रिपोर्ट घेऊन आले. "तुमच्या सोबत कोण आहे?केव्हा पासून त्रास होतो? एवढा उशीर का केला?तुम्हाला हार्ट एटैक येऊन गेला आहे. आता इथे राहावे लागेल. सोमवारी एंजिओग्राफी करून मग काय ते ठरवू. "_डॉक्टर.
मलाआणि हार्ट एटैक? धक्काच होता. विश्वास बसत नव्हता. पण काय करणार? आलीया भोगासी असावे सादर. वास्तव स्विकारले. बेडवर पडून राहिलो.
रुग्णालयात दाखल करायची प्रक्रिया करण्यासाठी अनुप गेला. मला काही औषधे देण्यात आली. काही वेळात उलटी झाली. अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अस्थम्याचा एटैक असावा असे वाटले. इनहेलर स्प्रे घेतला. पण फरक नाही. तोंडाने श्वास घ्यायचा, प्राणायाम करायचा प्रयत्न केला .पण उपयोग नाही .त्रास खूप वाढला.स्टाफ ची धावपळ सुरू झाली . ऑक्सीजन सिलिंडर आणले, मास्क लावला. तरीही सारे असह्य होऊ लागले. 'लगेच आयसीयू मधे घ्या'
कुणी तरी ओरडले. तेव्हा अडीच वाजले असावेत. आयसीयूच्या वाटेवर, बेडवरून घाईघाईने घेऊन नेताना आजू बाजूचे लोक पाहात होते. श्वास घेण्याचा प्रयत्न करत होतो. एरवी सहजपणे नकळत ये जा करणारा श्वास, तो घेणे आज मोठे दुष्कर होत होते .जीवाची घालमेल होत होती.एकतीस वर्षापूर्वीची वसंत काकांची(माझे वडिल)शेवटच्या क्षणांतली तगमग आठवली.
मरणाचे दारात उभे आहोत का आपण?
'आपुले मरण पाहिले म्या डोळा'म्हणजे हेच का?
किती श्वास उरले असतील? हे शेवटचेच काही असतील का? प्रत्येकाचे आयुष्यात कधीतरी हा क्षण येणारच. माझ्या आयुष्यात आता आला. त्याला सामोरे जायला हवे. नीलू,अनुप, रुचा,मैत्रू , राहूल पत्नी ,मुलगा,मुलगी,नातू ,जावाई आणि इतर जवळच्या लोकांचे चेहरे समोर आले. एवढाच ऋणानुबंध होता का यांच्याशी या जन्मी? हा विचार डोक्यात आला. काळजी मात्र नव्हती अन भितीही नव्हती.आणि मग एकदम सगळीकडे काळोख ,अंधार.
(क्रमश:)
नीलकंठदेशमुख .
nilkanthvd1@gmail.com
8793838080
याद्या
9184
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
आता कसे आहात?
आता एकदम व्यवस्थित. म्हणून
In reply to आता कसे आहात? by कंजूस
पुढचे भाग लवकर टाका..
आता एकदम व्यवस्थित. म्हणून
In reply to पुढचे भाग लवकर टाका.. by बाप्पू
ओके.. छान.!! काळजी घ्या..
In reply to आता एकदम व्यवस्थित. म्हणून by नीलकंठ देशमुख
माझा साक्षात्कारी हृदयरोग -
त्या विषयी ऐकून होतो आता
In reply to माझा साक्षात्कारी हृदयरोग - by प्रकाश घाटपांडे
छान लेखन आणि अभिनंदन!
धन्यवाद. रोज एक भाग टाकत आहे
In reply to छान लेखन आणि अभिनंदन! by संजय क्षीरसागर
डॉ बंग
खर आहे पण
In reply to डॉ बंग by कंजूस
वास्तववादी अनुभव कथन . काळ
नाही. ह्रदयविकाराचा प्रक्रिया
In reply to वास्तववादी अनुभव कथन . काळ by सिरुसेरि
अभिनंदन
धन्यवाद. हे औरंगाबाद चे डॉ
In reply to अभिनंदन by श्रीरंग_जोशी
चांगला लेख--पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणुनही उपयोगी
धन्यवाद
In reply to चांगला लेख--पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणुनही उपयोगी by राजेंद्र मेहेंदळे
छान !
+१
In reply to छान ! by प्रसाद गोडबोले
धन्यवाद.
In reply to +१ by राघव
धन्यवाद. मी फक्त या लेखाचा
In reply to छान ! by प्रसाद गोडबोले
या लेकमालेचा चवथा शेवटचा भाग
In reply to छान ! by प्रसाद गोडबोले
अनुभव योग्य शब्दात व्यक्त केला आहे
धन्यवाद. आपला अनुभव विलक्षण