Skip to main content

घडामोडी नोव्हेंबर २०२०

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 30/10/2020 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्‍याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते. आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील . युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्‍या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्‍यापैकी कमी पडतात. असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे. फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्‍या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्‍या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism *घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.

वाचने 88944
प्रतिक्रिया 314

प्रतिक्रिया

In reply to by आनन्दा

UAE मध्ये सर्व मुस्लिम राष्ट्र असल्या मुळे इशनिंदा कायदा तिथे नक्कीच असेल. आणि त्या साठी फाशी ची शिक्षा सुधा असू शकते. Indonesia मध्ये पण इशानिंदा कायदा आहे पण तो फक्त मुस्लिम साठी नाही. सरकारी धर्म असलेल्या हिंदू,बौद्ध,मुस्लिम ह्या सर्व धर्मांना तो लागू आहे. तिथे हिंदू धर्मातील देवता वर टीका केली तरी इशा निंदा खाली केस चालेल. अभिव्यक्ती स्वतंत्र च्या नावाखाली कोणत्याही धर्माच्या श्रद्धा स्थानावर गल्लीच्छ भाषेत टीका टीपणी करणाऱ्या लोकांना फाशी हीच साजा योग्य आहे असेच माझे मत आहे

In reply to by Rajesh188

@ राजेश.. तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतेय का??
अभिव्यक्ती स्वतंत्र च्या नावाखाली कोणत्याही धर्माच्या श्रद्धा स्थानावर गल्लीच्छ भाषेत टीका टीपणी करणाऱ्या लोकांना फाशी हीच साजा योग्य आहे असेच माझे मत आहे
हा कायदा आला तर भारतातले सर्व लेफ्ट, अतिशहाणे मुस्लिम मुल्ला मौलवी, ख्रिश्चन पाद्री आणि सो कॉल्ड बुद्धिजीवी सर्वांना फाशी द्यावी लागेल.. कारण बहुतांश वेळा यांचा निम्मा वेळ हिंदू देवी देवतांवर टीका आणि हिंदू धर्माची निंदा नालस्ती करण्यातच जातो.. फक्त हिंदू लोकं सहिष्णू आहेत म्हणून आजवर हे जिवंत आहेत.. नाहीतर लोकं इथे कार्टून काढले तरी गळा कचाकच कापून टाकायला मागे पुढे बघत नाहीत. हिंदुत्वाबद्दल काही लिहिण्याआधी तुम्ही तुमचे बौद्धिक वय तपासून घ्या हा एक आगंतुक सल्ल्ला.. अगदीच नाही जमले तर 1 वर्ष इतर धर्मीय लोकांचा आतून बाहेरून पूर्ण अभ्यास करा, त्यांचे साहित्य वाचा, सर्वसामान्य लोकांशी गप्पा करा.. आणि मग इथे येऊन आपले ज्ञान पाजळा.. !!

In reply to by बाप्पू

अभिव्यक्ती स्वतंत्र च्या नावाखाली हिंदू देवता ,हिंदू धर्म ह्या वर गल्लिछ भाषेत टीका करणारे डावे,कम्युनिस्ट,नास्तिक ह्यांच्या वर कडक कारवाई झालीच पाहिजे हे माझे मत आहे. पहिला माझा msg पुर्ण वाचत जा.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-govt-spent-rs-713-crore-… वरील बातमी जर का खरी असेल तर ते योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? आणि जर का खोटी असेल तर लोकसत्ता वर भक्त केस करुन माफी मागायला लावनार का?

In reply to by गोंधळी

मोदी सरकार खरेच अतिरेकी खर्च करतेय.. BTW - आपले मौनीबाबा पण काही कमी नव्हते. शेवटच्या तीन वर्षात 2048 कोटी.. https://m.timesofindia.com/india/UPA-govt-spent-about-Rs-2048-crore-on-… आणि आता तुमच्याच भाषेत..- वरील बातमी जर का खरी असेल तर ते योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? आणि जर का खोटी असेल तर टाइम्स ऑफ इंडिया वर चमचे लोकं केस करुन माफी मागायला लावनार का?

In reply to by बाप्पू

कदाचित जाहिरातीतल्या खर्चा मध्ये विविध योजनांची केलेली जाहिरात असेल. उदाहरण म्हणजे समजा जन धन मध्ये बँकेत खाती खोला, गॅस सबसिडी give-up करा ह्यांचा खर्च ह्या मध्ये असेल. आणि कोणत्याही सरकार आणि जन ते साठी हे गरजेचं आहे, कारण सरकार ने एखादी योजना आणली आणि त्याची माहिती जनते पर्यंत त्याची माहिती पोहचलीच नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे ह्या सरकार ने फक्त एका परिवाराच्या नवे योजना नाही आणल्या.

In reply to by रात्रीचे चांदणे

हेच म्हणणार होतो. योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिराती आवश्यक असतात.. रोज 2 कोटी म्हणजे तशी काही फार रक्कम नव्हे, काही महत्वाच्या योजनांच्या नुसत्या पेपर ऍड द्यायकय्या झाल्या तरी काही हजारात खर्च येतो आज.. त्यामानाने 2 कोटी म्हणजे कमीच आहेत.

In reply to by आनन्दा

बाप्पूजी खलिल बातमी टाइम्स ऑफ इंडिया मधलीच आहे. त्यात म्हटले आहे की, The average daily advertising spend of the NDA government in print and electronic media over the last three years is a little over double that of the previous UPA government's two terms. https://timesofindia.indiatimes.com/india/during-3-year-tenure-nda-spen… कदाचित जाहिरातीतल्या खर्चा मध्ये विविध योजनांची केलेली जाहिरात असेल. योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिराती आवश्यक असतात.. वरील मुद्द्यांवर आक्षेप नाही आहे. तर याचा उपयोग योजनांची माहीती कमी व स्व-प्रतीमा बनवण्यासाठी जास्त होतो आहे असे दिसत आहे.

In reply to by गोंधळी

हम्म.. गोंधळी जी. तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदीच चुकीचा आहे असं नाही. काही जाहिराती या खरंच डोक्यात जाणाऱ्या आहेत.. पेट्रोल पंपावर एकाच व्यक्तीचा फोटो पाहून पाहून वीट आलाय. हा खर्च नक्कीच अनावश्यक होता आणि आहे... पण कोणे एके काळी श्रीमती सोनिया जी, राहुल जी आणि मनमोहन सिंग या त्रिकुटाने पण असाच धुमाकूळ घातला होता हे ही तितकेच सत्य आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

गॅस सबसीडी स्वेच्छेने सोडण्यासाठी आता जाहीरातीवर खर्च करायची गरज पडणार नाही . गॅस सबसीडी सरकारने बंद केली आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

गॅस सबसीडी स्वेच्छेने सोडण्यासाठी आता जाहीरातीवर खर्च करायची गरज पडणार नाही . गॅस सबसीडी सरकारने बंद केली आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

त्यापेक्षा गॅसची पावती चेक करा , सबसीडीचा तपशील आढळतो का बघा . तसेच बँकेत सबसीडी जमा झाली का ह्याचीही खात्री करून घ्या .

In reply to by आनन्दा

अरेरे ! आनंदी आनंद आहे सगळा. गॅस सबसिडी बघायला बातम्या बघायला लागतात. गॅस पावती , बँक पासबुक बघत नाही का ? किती हा सरकारवर विश्वास ? एखाददिवशी जनतेला झोला घ्यायला लावेल हे सरकार.

In reply to by आग्या१९९०

Order Date Order Ref No Order No No. of Cylinder Status Date Cash Memo No Cash Memo Amount Cash Memo Date Subsidized Cylinder Subsidy Amount Transfer Status Payment Type Bank Name Bank A/c No Bank IFSC 01-11-2020 11:41:20 1200828800094221 385213 1 Delivered 02-11-2020 1299665 597.00 01-11-2020 Yes To be processed REFILL SUB 04-09-2020 01:42:26 1200828800076339 379642 1 Delivered 14-09-2020 1281239 597.00 04-09-2020 Yes To be processed REFILL SUB 19-05-2020 01:00:00 1200828800045528 371170 1 Delivered 22-05-2020 1249175 582.00 21-05-2020 Yes तरी सबसिडी अजून खात्यात जमा झालेली नाही. अर्थात, सरकार इतकं भंपक आहे की कोणत्या वेळी काय निर्णय घेईल सांगता येत नाही. आणि जरा काही विचारलं की विचारणारे डायरेक्ट देशद्रोही !

सरकारी योजना काय आहेत ह्याची माहिती देणे हे सरकार चे कर्तव्य च आहे. त्या साठी सरकारी तिजोरी मधून पैसे खर्च होणे हयात काहीच गैर नाही. लोकांना माहीत कसे पडणार काय योजना आहेत आणि काय नियमाची तरतुदी करायच्या आहेत. पण राम मदिर आम्हीच कसे बांधणार आहोत. पाकिस्तान ची आम्ही कशी वाट लावली. अंतर राष्ट्रीय स्तरावर आम्ही कसे भारताची बाजू भक्कम करत आहोत. बाकी पक्ष कसे देश विरोधी कारवाया करत आहेत. अशा प्रकारच्या प्रचारावर सरकार खर्च करत असेल तर ते आक्षेप घेण्याच्या लायकीचे आहे.

Chinese state-run channel shows the portrait of Prophet Muhammad, netizens ask if Muslim nations will boycott China आता पाकिस्तान, मलेशिया च्या तोंडातुन किंवा इतर कुठल्या इस्लामी देशाचा कंठ फुटतो का ते पहा ! आपल्या देशातील दाढीदार जिहादी बोकडं काय बोलणार यावर ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Indian Army Doctors Successfully Perform Surgery At 16,000 Feet In Eastern Ladakh Amid Conflict With China

In reply to by मदनबाण

भारत हा हिंदू चा देश झाला पाहिजे असेल तर पाहिजे हिंदू ना सशक्त करा . त्यांना च हिंदुत्व वादी पक्ष आणि हिंदू च कमजोर करत आहेत. ते तर सांगत आहे मी प्रतेक पोस्ट मधून. जमिनी कोणाच्या सरकारी पातळीवर हडपल्या जात आहेत हिंदू च्या. उद्योग पती कोणाचे शोषण करत आहेत हिंदू चे कंत्राटी पद्धतीवर कमी पगारात कोण राबत आहे कोण राबवत आहे हिंदू च. हिंदू सरकारी अधिकारी कोणाची पिळवणूक करत आहेत हिंदू सामान्य जनतेची. हिंदू ना देशोधडीला लावून हिंदू हिताच्या गप्पा मारूच नका.

In reply to by Rajesh188

अर्धपोटी लोकच धर्माच्या नावाने लवकर गोळा करता येतात शिकून अमेरिकेत नोकरी करत बसले किंवा भारतात कलेकटर , सिव्हिल सर्जन , प्रोफेसर होऊन बसले आणि त्यांना संध्याकाळी मोर्चाला या बोलले तर थोडेच येतील

In reply to by Gk

आस काही नाही, शिकलेले लोक सुद्धा धर्माच्या नावाखाली बॉम्बस्फोट करायला माघे पुढे पाहत नाहीत. भटकळ बंधू वगैरे अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

लोक सुद्धा बायकोने लाथ मारल्याचा दोष हिन्दू धर्माला देउन इस्लाम चे गोडवे गातात. सुन्ता करुन घ्यायचं मात्र धैर्य करत नाहीत.

In reply to by Gk

अर्धपोटी लोकच धर्माच्या नावाने लवकर गोळा करता येतात शिकून अमेरिकेत नोकरी करत बसले किंवा भारतात कलेकटर , सिव्हिल सर्जन , प्रोफेसर होऊन बसले आणि त्यांना संध्याकाळी मोर्चाला या बोलले तर थोडेच येतील
म्हणजे संपुर्ण इस्लाम जग जे आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जाळपोळ करत आहेत.. मोर्चात सहभागी आहेत ते सर्व अर्धपोटी किंवा बेकार आहेत असच ना.. ??

९-११-२००१ च्या हल्ल्याचा मुख्य हाय्जॅकर महंमद अट्टा स्थापत्यशात्र शिकलेला होता रे जिक्या. https://en.wikipedia.org/wiki/Mohamed_Atta https://en.wikipedia.org/wiki/Ziad_Jarrah बहुतांशी अपहरणकर्ते सुखवस्तु कुटुंबातले, अमेरिकेत शिक्षण घेतलेले होते असे वाचल्याचे आठवते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई अगं ते लोक उच्च मॅनेजमेन्ट करतात प्रत्यक्ष मोर्चात , दंगलीत सहभागी होत नाही मोर्चातले लोक म्हणजे गोडसे , किंवा मोहरा मधले सुनील शेट्टी. त्यांचे मास्टर माईंड , नसरुद्दीन शहा वेगळेच असतात , ते उच विद्या विभूषित वगैरे असतात

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई साहेब GK म्हणजे गिरीश कुबेर भम्पकच बरळणार त्याच्या कडे काय लक्ष द्यायचे?

माईसाहेब,
गाड्यांचा विक्रमी ख्प कसा?
तुम्हांस एक गंमत सांगतो. त्याचं काये की अमेरिकेची अर्थव्यवस्था गाड्यांच्या खपाच्या निकषावर तोलली जाते. तोच निकष भारतात निर्बुद्धासारखा लागू करणे इतकंच तथाकथित अर्थतत्ज्ञ जाणतात. मेकॉलेछाप शिक्षणांतनं आजून काय पैदा होणार म्हणा! भारतात पाऊस व्यवस्थित पडला की अर्थव्यवस्था बाळसं धरते, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. पण मेकॉलेछाप अर्थतत्ज्ञांना सूर्य कोणी दाखवायचा? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वाहन खरेदी हा प्रकार गरज आणि चैन या दोन्ही प्रकारात मोडतो. तेंव्हा गरज भागवणे आणि/किंवा चैन करण्या इतपत पैसा जनतेच्या हातात आहे, असा इंडिकेटर नाहि का दाखवता दिसत? पर्यायाने तो अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख मापदंड म्हणुन गृहीत धरावा लागेलच ना ?

In reply to by अर्धवटराव

ट्रॅक्टर्स व बाईक्स मापदंड म्हणून गृहीत धरत होतेच. असो. लोकसत्ताचा अग्रलेख अपेक्षेप्रमाणे- " तीच बाब खासगी कंपन्यांची. इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी वस्तूंवर सध्या वारेमाप सवलती दिल्या जात आहेत. पण त्या काही उत्पादन जास्त झाल्याने वा स्पर्धेमुळे नव्हे. तर आहे तो माल न खपल्यामुळे. तथापि याचा अर्थ ‘मागणीत वाढ’ असा कोणी काढल्यास ते अत्यंत अप्रामाणिकपणाचे ठरेल." https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-gst-collections-up-… ह्याचा अर्थ काय? वारेमाप सवलती कोण देतय? ४०,००० रू.चे वॉशिंग मशिन फारतर ३५,००० ला देतील. पण तरी ज्याच्याकडे तेवढे पैसे आहेत व गरज आहे तेच ग्राहक ते घेणार ना? गाड्यांचेही तेच म्हणता येइल. सवलत फार तर ५०००० रुपयांची मिळेल. लेख बरा लिहिलाय पण गाड्या व दुचाकी जोरात् का खपल्या हे सांगायचे हुशारीने टाळले आहे. म्हणजे गामा म्हणतो ते बरोबर आहे. भारतात गाड्यांचा/दुचाकींची विक्री मापदंड धरणे योग्य नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भारताची अर्थव्यवस्था ही राज्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते. राज्यांनी चांगली कामगिरी केली की देशाची प्रगतीच होणार . त्या मुळे फक्त केंद्र सरकार ल भारताच्या अधोगतीला दोषी धरता येणार नाही. जमीन,कामगार,शिक्षण,कायदा सुव्यवस्था हे आणि बाकी बरेच विषय राज्याच्या अधिकारात येतात. पाणी पुरवठा शेतीसाठी,वीज निर्मिती आणि वितरण हे पण राज्याच्या अधिकारात च आहे.

मेट्रो चे कांजूर मार्गामध्ये बांधल्या जाणाऱ्या राज्याच्या जागेवर केंद्र सरकार नी अचानक दावा केला आहे.आणि तातडीने काम धांबण्यास सांगितले आहे. हा राज्याच्या अधिकार वर उघड बलात्कार आहे जमीन हा विषय च मुळात राज्याच्या अधिकारात येतो तिथे केंद्राचा काय संबंध.

In reply to by Rajesh188

हे काही कळले नाही. जमीन हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो म्हणजे काय? सगळ्या सरकारी जमिनीवर राज्य सरकारची मालकी असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

लॉकडाऊनमुळे लोकांचा पर्यटन , हॉटेलमध्ये खाणे , थिएटर मध्ये जावून सिनेमा बघणे , मॉलमध्ये खरेदी , लग्न समारंभ , इत्यादी खर्च न झाल्याने पैशाची बरीच बचत झाली . लॉक डाऊन शिथील झाले तरी सार्वजनिक वाहतूक सेवा सर्वांनाच उपलब्ध नसल्याने रिक्षा अथवा टॅक्सीवर खर्च वाढू लागल्याने स्वतःचे वाहन सोयीचे वाटू लागल्याने कार व बाईक्सची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर आली असे म्हणणे घाईचे होईल. सार्वजनीक वाहतूक सेवा सर्वांना खूली झाल्यावर कार व बाईक्सची खरेदी नक्कीच कमी होईल .

In reply to by आग्या१९९०

हम्म पण मग लाखो नोकर्यावर गदा आली, अनेक धंदे बुडाले, बेरोजगारांचे तांडे वगैरे ह्या बातम्या अतिरंजित होत्या असे म्हणायचे का? कारण करोना आल्यापासुन ह्याच बातम्या सतत येत होत्या. साधे उदाहरण घेऊया परत- ५५० मर्सेडिझ गाड्या विकल्या गेल्या महिन्याभरात. ही गाडी घेणारे श्रीमंत व्यावसायिक असणार ? ह्यांचे काही ना काही व्यवसाय असणार? व्यव्साय तेजीत असला तरच हे लोक ४०/५० लाखाच्या गाड्या घेतील ना? पुढच्या २/३ वर्षाचा तरी विचार हे व्यावसायिक करत असतील ना ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कोविडपूरक व्यवसायात बक्कळ पैसा कमावला असेल . मर्सिडीसच काय बोइंगही घेतील हे लोक. सॅनिटायझरपासून मास्कपर्यंत कशातही कितीही नफा कमवला असेल . आमच्या येथील लेडीज टेलरने हजारो मास्क तयार करून ४० ते ७० रुपयांना विकून एरवीच्या मासिक कमाईपेक्षा तिप्पट कमावले

In reply to by आग्या१९९०

खाजगी हॉस्पिटल्स व तेथे काम करणार्या डॉक्टरानी करोना काळात नोटा छापल्या असे अनेकांकडुन कळले.पण तरीही ६ महिन्यात ४० लाख कमाई कितीजण करतील? तुमच्या त्या लेडिज टेलरने कोणती गाडी घेतली? की फ्लॅट घेतला? पार्ले कंपनीने बक्कळ पैसा मिळवला. २०१९ मध्ये, जी एस टी कमी केला नाही तर १०००० माणसे काढावी लागतील असा ईशारा त्यानी सरकारला दिला होता. करोना धावून आला मदतीला ! आणी आता नफा किती झाला हे सांगायला कंपनीने नकार दिला होता. जूनमध्ये https://www.thehindu.com/business/Industry/parle-g-logs-record-sales-du… अर्थात खाजगी कम्पनी आहे ती. सांगायचा मुद्दा- हे कथित अर्थतज्ञ जे काही आकडे फेकत असतात व सरकारला 'ईशारे' देत असतात, लाखो नोकर्या गेल्या वगैरे म्हणत असतात त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सरकार सुद्धा 15 लाख , 5 ट्रीलीयन , 300 पार , 70 साल, 35 साल भीक आकडे कमी फेकलेत का ?

In reply to by Gk

जिक्या, अरे राजकारणी लोकाना फार मनावर घ्यायचे नसते. पण शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, संपादक, ते अ‍ॅनालिस्ट्स का कोण असतात..त्यानी तर अभ्यास करायचा असतो ना? जर तुमची थियरी चुकली असेल तर सरळ सांगावे. पण ते होत नाही. आताही ह्या अशा खरेदीला "स्पाईक" वगैरे म्हणणे चालु आहे. असो. साधारण २/३ महिन्यापुर्वी युरोपियन देश करोनाच्या विळख्यातून कसे बाहेर आले आहेत ह्यावर लोक्सत्तेत अग्रलेख येत होते. उदा "जर्मनीने कशी वेळीच मात केली, त्यानी केले उपाय, भारताने त्यातून काय शिकण्यासारखे आहे.. ह्यावर लेख पडले, चॅनेलीय चर्चा झाल्या. आता जर्मनीत पुन्हा लॉक्डाउन आला. आता काय म्हणणार? https://www.abc.net.au/news/2020-11-04/germany-coronavirus-lockdown-avo…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कायच्या काय माई आमदार खासदार जनतेकडून पगार घेतात , त्यामुळे त्यांनीही आकडे अभ्यास करूनच सांगायचे असतात

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पण तरीही ६ महिन्यात ४० लाख कमाई कितीजण करतील? इतका काथ्याकुट करण्यापेक्षा मर्सिडीस खरेदी करणारे कोण लोक आहेत हे शोधून काढा , त्यांनी गेल्या सहा महिन्यात काय उद्योग केले आणि किती कमावले हेही विचारा. त्या बाईकडे अगोदरच स्कूटर असल्याने नवीन गाडी घेतली नाही कदाचित पीएम फंडमध्ये झालेला फायदा टाकला असेल .

प्रतेक व्यक्तीची रोजची कमाई किती आहे ह्या वर अर्थव्यवस्था भक्कम आहे की कमजोर हे स्पष्ट होवू शकते. पण ते उत्पादन राज्याचे उत्पादन भगिले राज्याची लोकसंख्या अशा पद्धतींनी काढलेले नसावे तर घराघरात जावून त्याची तपासणी केली असावी. नाहीतर फसवी माहीत मिळते सरकार श्रीमंत आणि जनता गरीब. जगात 3 नंबरची अर्थव्यवस्था आणि प्रतेक तिसरा माणूस हा भुकेला असतो त्याला दोन वेळचे जेवण पण मिळत नाही अशी अवस्था असते.

मनोरंजन क्षेत्राची पैदास अर्णव गोस्वामीला अटक 'अर्णव मनोरंजन गोस्वामी' ह्याला अटक रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत. List of Journalists arrestd under Modi Govt till now KC Wangkhem Om Sharma MA Ganai Ashwani Saini Vishal Anand Neha Dixit Sidhart Varadrajan Prashant Kanojia Pawan Chaudhary ASR Pandian Manish Pandey Subhas Rai Vijay Vineet Zubair Ahmed But Fascism is only when Arnab is arrestd

In reply to by Gk

तुमचा अभ्यास दान्ड्गा दिसतोय... दिलेल्या लिस्ट मधल्या पत्रकारान्वर कारवाई का झाली ते पण सान्गा.... वाट पाहतोय...

In reply to by नीलस्वप्निल

Gk हा आयडी पैगंबरवासी झालेला आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कदाचित कधीच मिळणार नाही.

In reply to by बाप्पू

प्लीज नोट....आयडी पैगंबरवासी झाला आहे...

In reply to by सॅगी

अरेरे. बातमी खरी असेल तर हे खूपच वाईट झाले.. पण काळजी नसावी.. पुनर्जन्म घेऊन GK पुन्हा मिपावर धुमाकूळ घालतील याबाबत मला किंचीतही शंका नाही.. !!

Arnav ला पत्रकार आणि त्याच्या रिपब्लिक चनेल ला न्यूज चॅनेल म्हणतच येणार नाही. फक्त माकडचाळे चालू होते त्याचे आणि त्याच्या सहकार्याचे त्या मुळे अर्णव ला अटक म्हणजे मीडिया च आवाज दाबण्याचा प्रयत्न असे म्हणतच येणार नाही.

In reply to by Rajesh188

Suspect says paid Rs 15 lakh/month to boost Republic TV TRP https://timesofindia.indiatimes.com/india/suspect-says-paid-rs-15-lakh/… खुप मोठा scam असण्याची शक्यता आहे असे वाटते. गंमत म्हणजे ऊ.प्र. सरकार ने फेक कंम्पलेंट करुन cbi चौकशी लावली आहे आपल्या अंध भक्ताला वाचवन्यासाठी. fake

In reply to by Rajesh188

पूर्णतः नाही पण बऱ्याच अंशी सहमत. पूर्णतः सहमत नाही कारण - अर्णब गोस्वामी ने काही मुद्दे असे हायलाईट केले ज्यांना इतर चॅनेलस नी सेक्युलॅरिज्म किंवा पॉलिटिकली करेक्ट होण्याच्या नादात कधीच भाव दिला नाही. पण तरीही त्याचा एकंदरीत आरडाओरडा, अकांडतांडव पाहून तो कधीही न्यूज रिपोर्टर म्हणून आवडला नाही. तसेच तो नेहमीच BJP ला सॉफ्ट कॉर्नर देत आलाय त्यामुळे त्याचे नक्कीच राजकीय संबंध असणार,. तो पूर्णपणे निष्पक्ष कधीच वाटला नाही. आसो.. तर त्याच्यावर जी केस चालू आहे ती पूर्णपणे वेगळी आहे, आणि जे काही पोलिस करतायेत ते कायद्याप्रमाणे आहे असे वाटते. या सर्वाचा उपयोग BJP वाले आपल्या राजकीय फायद्यासाठी करत आहेत हे वेगळे सांगणे न लागे. मीडिया चा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय वगैरे वगैरे सगळे भंपक आहे..

In reply to by कपिलमुनी

Does having an army officer as father entitles someone any special rights ? मग बाकीच्यांनी सैन्याधिकार्‍यांच्या पोटी जन्म घेतला नाही, ही त्यांची चूक का ? आणि हे काय घरात पण सजावटीच्या टोप्या घालून बसतात का? उगाच खोटी टोपी घालून मुलाखत देण्याचे प्रयोजन काय असू शकते? - स्वतःच्या माजी सैन्याधिकारीपणाचा भावनिक फायदा?

पोलिस कस्ट्डीची मागणी कोर्टाने फेटाळली व न्यायालयीन कोठडी दिली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ही अट़क झाली आहे. आत्महत्येआधि लिहिलेल्या नोटमध्ये अर्नब ह्यांचे नाव आहे. शिवाय ईतर दोघांचीही नावे आहेत. 1. Arnab Goswami: Rs 83 lakh for studio work inside the Bombay Dyeing compound 2. Firoz Shaikh: Rs 4 crore (https://www.linkedin.com/in/ferozshaikh1/?originalSubdomain=in) 3. Neetish Sarda: Rs 55 lakh (https://www.linkedin.com/in/neetish-sarda-99183a10b/?originalSubdomain=…) शेख व सरडा ह्याना अटक झाली का ? श्रीमती नाईक व त्यांची कन्या ह्यांची पत्रकार परिषद पाहिली. ह्या दोघीनी जे काही झाले ते सविस्तर सांगितले पण शेख्/सरडा ह्याना अटक झाली पाहिजे असे त्या म्हणताना दिसत नव्हत्या. राग मुख्यतः अर्नब ह्याच्यावरच दिसतोय. https://www.indiatoday.in/india/story/what-the-arnab-goswami-case-is-al…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तिघांनाही अटक झाले आहे हो! https://ind.news/arnab-goswami-2-others-sent-to-14-day-judicial-custody/ असो, व्हॉटअबाऊटरीची संधी नाकारल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचा निषेध!

कॉम्रेड गोस्वामींचा घरात चे गव्हेराचे पोस्टर दिसते आहे.त्याच्या मुलाला पण "चे" म्हणतात, त्याच त्या दुत्त दुत्त कॉमी गव्हेरा वरून.

अरेच्चा. म्हणजे कॉमीनिर्दालक गोस्वामी ...? (हिपोक्रसीकी भी सीमा होती है
"When injustice becomes law, rebellion becomes duty"
- अमृता फडणवीस, चुकून अर्बन नक्सल. असो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, लोकशाहीचा चौथा स्थंभ,यांची आठवण झाली ह्याचा आनंद आहेच. गोस्वामीवरचा लोकल सत्तेचा वरदहस्त उडाला त्यामुळे अटक झाली आहे असेच सकृतदर्शनी दिसते. काडीमोड आत्ताच, वर्षामागे झाला आहे पण, त्यामुळे दोषारोप जरा सांभाळून. :)

In reply to by शा वि कु

अवांतर : लोकहो, चे गव्हाऱ्याची मस्तपैकी पिसून काढलीये गिरीश खरे यांनी : https://www.aksharnama.com/client/article_detail/4629 त्यावरून प्रेरणा घेऊन मीदेखील घवाऱ्याची घंटा बडवून घेतली. आ.न., -गा.पै.

In reply to by Rajesh188

काय बोलताय?? खरं की काय??? सध्याच्या मुख्यमंत्र्याला सत्तेत येण्यासाठीही दिल्ली (आणि बारामती) समोर झुकावे लागल्याचे पाहीले आहे महाराष्ट्राने..

In reply to by सॅगी

फक्त दिल्ली नाही.. तर बाईसमोर ते ही इटलीच्या आणि गाढवासमोर ( म्हणजे कोण ते समजले असेलच ) देखील झुकावे लागले.. आणि म्हणे कणखर मुख्यमंत्री.. कणभर तरी कर्तृत्व आहे का यांचं.. बापाच्या जीवावर मजा हाणतायेत. पुढच्या वेळी 50 सीट्स पण निवडून येणार नाहीत.

सामनाचा अग्रलेख https://www.saamana.com/saamana-editorial-on-arnab-goswami-arrest/ लिहिता लिहिता जरा फसलेच राउत साहेब- "आधीच्या सरकारने गोस्वामी ह्याना वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपले." आणी ह्या आधिच्या सरकारात शिवसेना होती ना ?

शिवसेनेचे काहीही होवो परंतू सध्या अर्णव प्रकरणामुळे बिजेपीची तडफड बघायला मजा येत आहे. उशीरा का होईना अच्छे दिन बघायला मिळाले.

In reply to by आग्या१९९०

अजुन पर्यंत राष्ट्रपती राजवट लागु करण्याची मागणी न केल्याबद्दल भक्तांचा निषेध का करु नये?? नवीन विषेश नाम- मराठी भय्ये.

केंद्रात राक्षसी बहुमत जनतेनी दिल्या मुळे भारतीय जनता पार्टी वेडी झाली आहे. त्यांच्या चुका दाखवणाऱ्या समजदार लोकांना सुद्धा देशद्रोही ठरवत तसा प्रचार त्यांचे बटिक न्यूज चॅनेल आक्रमक पने करत आहेत. हिंदू आणि बाकी धर्मात वितुष्ट वाढत जावे असा प्रकार सरकारी पातळीवर वर होत आहे. त्यांचे बटिक न्यूज चॅनेल तोच द्वेषाचा अजेंडा आक्रमक पने रोज चर्चा घडवल्या जात आहेत. लोक आता BJP la वैतागली आहे. अर्णव सारख्या फालतू व्यक्ती वर त्यांच्या वैयक्तिक गुन्हा साठी झालेल्या कारवाई ला पत्रकारितेवर हल्ला आहे असे ठरवून bjp ni देशात उच्छाद मांडला आहे. त्यांचे batik चॅनेल दाखवत आहेत तशी स्थिती देशात नाही . Bjp विरूद्ध लोक आता बोलू लागली आहेत ज्यांनी च त्यांना बहुमत मध्ये निवडून दिले होते. पुढच्या निवडणुकीत bjp चा पूर्ण बीमोड झालेला देशाला बघायला मिळेल हे मात्र नक्की.