नमस्कार दोस्तांनो,
मिसळपाव साईट्वर माझे फिजिक्स ब्लॉग तुम्ही 'न्यून ते पूर्ण करोनि' वाचत आहात. पण आताची आपलीच शिकण्याची पद्धत ऑडिओ विडिओ झाल्याने मिसुद्धा ब-याच खटपटीने पहिला फिजिक्स ब्लॉग युट्यूब वर पोस्ट केलाय. मी तो Camtesia हे सॉफ्ट वेअर वापरून केलाय. फार काही ग्रफिक नाही कारण मला माफक ग्राफिक येते. शिवाय मुलं ऑलरेडी बराच काळ सध्या मोबाईल-टीवी- लॅपटॉप यांवर घालवत असल्याने माझा विडिओ ब्लॉग अजून त्यांच्या त्रासात भर नको म्हणून कमी/माफक इमेजेस आणि काळी बॅकग्राऊंड ठेवलीय. जेणेकरून बघितलं तरी काळ्यारंगामुळे रेडिएशन चा किमान त्रास व्हावा..असो.. नमनाला घडाभर तेल झाले..
कुणाला आवडो किंवा नावडो प्रत्येकाला शाळेत, कॉलेजात फिजिक्स च्या कन्सेप्ट शिकाव्या लागतात. अंतर distance , वेग speed , विस्थापन displacement.. झालंच तर न्यूटनचे नियम, मोशन्स चे इक्वेशन्स वगैरे.. पण हे सगळं का शिकायचं हे कळत नाही.. मुळात फिजिक्सच का शिकायचं हे कळत नाही.. त्याचाच उहापोह करणारा हा व्हिडीओ.. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विक्रम वेताळाच्या गोष्टीच्या रूपात..
why do we need to study physics? का शिकायचं फिजिक्स?
युट्यूबवर मी कॉमेंट्स ब्लॉक केल्या आहेत कारण तिथे विषयाला संबंध नसलेल्या कॉमेंट्स येण्याची आणि निष्कारण वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त..त्यामुळे युट्यूब विडिओ पाहून तुमच्या कॉमेंट्स मला इथे कळ्वा..जेणेकरून पुढील विडिओ करताना मला त्याचा उपयोग होईल.
कळावे लोभ असावा ही विनंती.
कॅमटेशिया सॉफ्ट्वेअर कसे वापरावे याविषयी माहिती हवी असल्यास जरूर संपर्क करा.
वाचने
12107
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपक्रम स्तुत्य.
धन्यवाद कंजुषजी
In reply to उपक्रम स्तुत्य. by कंजूस
पाहिला विडिओ.
धन्यवाद कंजुषजी. नक्कीच प्रयत्न करतो
In reply to पाहिला विडिओ. by कंजूस
तुम्ही लिहीत जा
लिखाणाशिवाय आमचं पान हलत नाही
In reply to तुम्ही लिहीत जा by Rajesh188
मस्त
धन्यवाद गोंधळीसाहेब
In reply to मस्त by गोंधळी
व्हिडीओ पाहिला, आवडला.
हो..कॉमेंट टाकता येतायत
In reply to व्हिडीओ पाहिला, आवडला. by चौथा कोनाडा
निवांतपणे व्हिडीओ बघतो.