भाजे लेणी
सकाळी उठून दोन्ही मुली ऑफिसला जाण्याच्या आधी डबे तयार केले. शिल्लक राहिलेली भाजी पोळी बांधून घेतली. मोठीला रेल्वे स्टेशनला सोडले. आता दिवसभर विशेष असे काही काम नव्हते. नवऱ्यानेही सुटी घेतली होती.
कुठेतरी फिरायला जायचे मनात होते. गाडी लोणावळ्याच्या दिशेने वळवली. वाटेत वरद विनायकाचे दर्शन घेऊया असे वाटल्याने महडला गाडी थांबवली. अजिबात गर्दी नव्हती. पटकन दर्शन झाले.दहा-पंधरा मिनिट सभामंडपात बसलो. मन अतिशय प्रसन्न झाले.
मंदिराच्या रस्त्यावर दुतर्फ़ा पूजेचे सामान, खेळणी वगैरेची दुकाने लागलेली होती. खाण्यापिण्याच्या स्टॉलवरून कांदाभजीचा वास दरवळत होता. एक प्लेट गरमागरम भजी खाल्ली व पुढे निघालो.
तेथून निघून लोणावळ्याला पोहचलो पण थांबायची इच्छा झाली नाही. पुण्याकडे जाणाऱ्या जुन्या महामार्गाने निघालो. मळवली स्टेशन जवळून उजवीकडे वळण घेतले आणि जवळच असणाऱ्या भाजे लेणीच्या पायथ्याशी पोहचलो. गाडी पार्क केली,चहा घेतला व भाजे लेणीच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. पायऱ्यांचे बांधकाम दगडी असून अतिशय सुस्तीतीत आहे. पायऱ्या सुरु होतात तेथेच तिकीट दर दर्शविणारा फलक आहे.
जसजसे वर चढत जावे तसा आजूबाजूचा सुंदर परिसर नजरेस पडत जातो. डिसेंबरचा महिना असल्याने ऊन जास्त जाणवत नव्हते व वातावरणही ढगाळच असल्याने पायऱ्या चढताना विशेष त्रास जाणवला नाही.
वर पोहचल्यावर तिकीट घेतले व लेणी परिसरात प्रवेश केला . येथे लेणीबद्दलची संक्षिप्त माहिती देणारा फलक आहे.
लेणी बघायला सुरुवात केली. समोरच भव्य चैत्यगृह व त्यातील स्तूप आहे. चैत्यगृहाची पिंपळपाणाच्या आकाराची कमान. चैत्यगृहाचे कलते अष्टकोनी खांब, मधोमध असणारा स्तूप व छतावरील लाकडी तुळा विशेष लक्ष वेधून घेतात.
बाजूला भिक्षूंना राहण्यासाठीअनेक विहार आहेत. चैत्यगृहाला लागून असलेले विहार दुमजली आहेत. विहारांमध्ये बसण्या, झोपण्यासाठी व्यवस्था आढळते.काही विहारांमध्ये कोरीव कामही आढळते.
एका विहारातून दिसणारे विहंगम दृश्य
वरच्या मजल्यावर जाण्यासाठीच्या पायऱ्या
थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे टाके आहेत व त्यापुढे गेल्यावर बौद्ध भिक्षूंच्या स्मरणार्थ कोरलेले स्तूपांचे एक संकुलच आहे.
त्यापुढे लागते ते सूर्यलेणे. व्हरांडा त्यामागे दालन व खोल्या आहेत. दरवाजा बंद असल्याने फक्त व्हरांड्यातच जाता आले. येथे काही पौराणिक प्रसंगांचे कोरीव काम बघावयास मिळते.
बाजूला असणारा लोहगड व विसापूर किल्ल्याचा परिसर डोळ्यांचे पारणे फेडतो. दोन तास आरामात फिरून लेणी परिसर पहिला. परिसराची निगा खूपच चांगली ठेवल्याचे दिसते.
लेणी बघून झाल्यावर बाहेर पायऱ्यांच्या बाजूने असलेल्या कट्ट्यावरच बसून घरून आणलेली भाजी-पोळी खाल्ली व थोडा आराम केला.
प्रवासखर्च वगळता दोघांत मिळून एक चहा व एक कांदा भजी इतक्या अल्प खर्चात आज लग्नाचा बत्तीसावा वाढदिवस साजरा झाला होता आणि एक सुखद अविस्मरणीय आठवण उराशी घेऊन मी परतीचा प्रवास सुरु केला.
याद्या
12942
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवीन लेख
धन्यवाद,
In reply to नवीन लेख by कंजूस
सुरेख! फोटोही सुन्दर आलेत..
सुरेख लिहिलंय.
अर्रर्र .
In reply to सुरेख लिहिलंय. by प्रचेतस
वल्लीशेठ, लेणी आधी रंगीत
In reply to सुरेख लिहिलंय. by प्रचेतस
तपकिरी पिवळा रंग हा फ्लॅशमुळे
In reply to वल्लीशेठ, लेणी आधी रंगीत by मनो
पेगॅसस
अलेक्झांडरच्या स्वारीनंतर
In reply to पेगॅसस by महासंग्राम
अपरिचित माहिती बद्दल धन्यवाद
In reply to अलेक्झांडरच्या स्वारीनंतर by प्रचेतस
सुरेख ! फोटोही सुंदर !
धन्यवाद
सांची, विदगशा.
धन्यवाद. एका नवीन
In reply to सांची, विदगशा. by कंजूस
खुप छान .
सुरेख लिहलय. कमी खर्चात छान
वा छान सहल घडवलीत.
धन्यवाद
In reply to वा छान सहल घडवलीत. by विजुभाऊ
धन्यवाद
छान प्रवासवर्णन आणि माहिती. _
चलो , थोडासा रुमानी हो जाये
धन्यवाद!
In reply to चलो , थोडासा रुमानी हो जाये by वडगावकर
'सुनिता-विलास'कल्पना-विलास आवडला