मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(म्हणू नका रे....)

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर रचना म्हणू नका रे.... भेटून ये तिच्या त्या भावा म्हणू नका रे ही पैज जीव घेणी लावा म्हणू नका रे गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे ही कापते कशाने आहे अशी इमारत? अमुच्या बयेस तुम्ही, गावा म्हणू नका रे ती फुंकणीच होती, फेकून मारलेली, (हातात बायकोच्या, पावा म्हणू नका रे) दोन्ही करात आहे सामर्थ्य बायकोच्या, धारिष्ट्य आज कुठले, दावा म्हणू नका रे हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे --केशवसुमार ( ०६ एप्रिल २००९, चैत्र शुद्ध १२, शके १९३१)

वाचने 4370 वाचनखूण प्रतिक्रिया 21

प्राजु 07/04/2009 - 07:23
तुमची विडंबने वाचून खरंच निखळ करमणूक होते. गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे ही कापते कशाने आहे अशी इमारत? अमुच्या बयेस तुम्ही, गावा म्हणू नका रे =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सँडी 07/04/2009 - 07:37
गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे मस्तच! :) -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

क्रान्ति 07/04/2009 - 07:58
=)) =)) मस्त! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

राघव 07/04/2009 - 09:53
गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे ही कापते कशाने आहे अशी इमारत? अमुच्या बयेस तुम्ही, गावा म्हणू नका रे ती फुंकणीच होती, फेकून मारलेली, (हातात बायकोच्या, पावा म्हणू नका रे) दोन्ही करात आहे सामर्थ्य बायकोच्या, धारिष्ट्य आज कुठले, दावा म्हणू नका रे हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे अरे काय श्वास घ्यायलाही फुरसत देत नाहीत ब्वॉ.. हसुन हसुन धाप लागायची वेळ आलीये इथे. =)) तुमच्या मुळे अशा छान छान रचना वचायला मिळतात. धन्यवाद! राघव

भडकमकर मास्तर 07/04/2009 - 10:07
हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे वावा.. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार 07/04/2009 - 14:52
___/\___ अ प्र ती म ! फाजील परा ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

अनिल हटेला 07/04/2009 - 16:34
आवडले विडंबन !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

३_१४ विक्षिप्त अदिती 07/04/2009 - 16:50
हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे हाहाहा ... सहीच! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

सुधीर कांदळकर 07/04/2009 - 18:19
दावा, मस्तच. खास वैशिष्ट्य म्हणजे शेवटीं घातलेली तारीख. इंग्रजी तसेंच मराठी. झकासच. सुधीर कांदळकर.

आंबोळी 07/04/2009 - 22:41
गुरुवर्य, सा. न. (साष्टांग नमस्कार) लै बेष्ट झालय विडंबन. आंबोळी

मदनबाण 08/04/2009 - 07:23
गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे व्वा. व्वाहव्वा...सही... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

दशानन 08/04/2009 - 07:47
बोल वाह वाह ! का वाजवू एक..... बोल लै भारी.... =))

केशवसुमार 08/04/2009 - 17:01
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार