जमतारा (की जामतारा) पॅटर्न : कॅशबॅकच्या नावाखाली लुटीचा नविन प्रकार
(बरेच वर्ष मिसळपावचा सभासद आहे पण लिहिण्याचा योग आज आला. काही शुद्धलेखण्याच्या चुका असतील तर जरून सांगा. मी हे लेखन गूगल इनपुट टूल वापरून केलेलं आहे जे मला खूपच सोपं वाटत. पण नंतर गमभन टंकलिपी वापरुन पाहिली, तीपण सोपी आहे वापरायला, त्यामुळे यानंतरच लेखन तेच वापरुन करेन. )
आजचा (18 सप्टेंबर 2020) माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला अज्ञात क्रमांकावरून फोन आला की तो मुंबईतील फोनपे मुख्य कार्यालयातून कॉल करीत आहे आणि मला काही फोनपे कॅशबॅक मिळाली आहे पण त्यासाठी त्याला माझ्याकडून काही माहिती हवी आहे. भाषा खूप सभ्य होती परंतु इंग्रजी खूपच खराब होती. मी यापूर्वी अशा बनावट कॉलबद्दल ऐकले होते त्यामुळे मला त्या घटनांची आठवण झाली. जेव्हा मी अधिक चौकशी केली आणि त्याला वरिष्ठांकडे कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले तेव्हा त्याने प्रथम टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा मी आग्रह केला तेव्हा त्याने मला कॉल चालू ठेवण्यास सांगितले आणि त्याच्या वरिष्ठांना कॉन्फरेन्समध्ये घेतो असे म्हणाला. थोड्या वेळाने, त्याचे वरिष्ठ (तथाकथित ?? ) ऑनलाइन आले. मी सहज म्हटले की त्याचा नंबर मुंबईबाहेरचा आहे का, मग तो म्हणाला कंपनीच्या धोरणानुसार ही माहिती देऊ शकत नाही. तो कोण आहे हे विचारल्यावर पहिल्या व्यक्तीने त्याच्या मागच्या बाजूला काही वाईट शब्द कुजबुजले आणि शेवटी त्यांनी कॉल कट केला आणि त्यानंतर काही काळ फोन उचलला नाही. बराच वेळ फोन करून पाहिला तर ती मोबाइलमधली बाई बंगाली भाषेत सांगत होती कि हा माणूस बिझी आहे . कॉल उचलल्यावर त्याने खूप वाईट अपशब्द वापरण्यास सुरवात केली कारण त्याची युक्ती अयशस्वी झाली होती. जेव्हा मी त्याला म्हणालो कि पैसे कमावण्यासाठी काम का करत नाही तेव्हा तो म्हणाला की तेच तर करत आहे. त्याने मला प्रतिप्रश्न केला कि तुम्ही तर नाही अडकलात ना या सगळ्यात मग कशाला या चौकश्या करत आहात .
हे कॉलर सामान्यत: जामतारा, बिहार किंवा झारखंड येथून कॉल करतात आणि अमुक-अमुक कंपनीच्या मुख्य कार्यालयातून बोलतोय. मग तुम्हाला सांगतात कि तुम्हाला फोनपे किंवा पेटीएम अकाउंट वर कॅशबॅक आली आहे आणि ते खात्यामध्ये वळते करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कन्फर्म कराव्या लागतील. त्यानंतर ते तुम्हाला ते ऍप ओपन करायला सांगतात ज्यावर एक लिंक आलेली असते जी कि खरं तर या लोकांनीच पेमेंट रिक्वेस्ट म्हणून पाठविलेली असते. तुम्ही ती लिंक ओपन केली कि ते तुम्हाला तुमचा पासवर्ड मागत जो कि तुमचा युपीआय चा पासवर्ड असतो. आणि तो टाकल्यानंतर तुमच्या अकाऊंटवरून पैसे त्यांच्या अकाउंटला जातात. (यासारखे अजून बरेच प्रकार आहेत, हा फक्त नमुनादाखल दिला आहे.)
यूट्यूब.कॉमवर या विषयावर बरेच व्हिडिओ आहेत. मी अशा एका व्हिडिओची लिंक दिली आहे.
https://youtu.be/ynmbCRECZso
आपल्या परिसरात, शहरात किंवा खेड्यात, असे बरेच गरीब नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकही आहेत, जे अशा भुलाव्याला बळी पडतात आणि त्यांच्या खात्यावर यूपीआय व्यवहार करून लुटले जातात. मग त्यांच्याकडे पोलिसांना द्यायलासुद्धा भक्कम पुरावा नसतो. असं सगळं करून हे लोक रोज 10000-20000 मिळवतात. तर कृपया अज्ञात क्रमांकावर कोणताही ओटीपी, पिन, आधार किंवा पॅन तपशील देऊ नका.
मी हे प्रकरण सायबर सेलकडे दाखल करण्याचा विचार करीत आहे. त्याच पुढे काय होत ते पाहूया. अजून कुणाला असा अनुभव आला असल्यास कळवावे आणि त्यावर काय उपाय केला तेसुद्धा सांगावे.
पुढच्यास ठेच ,मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे समस्त वाचकांनी यापासून योग्य तो धडा घ्यावा यासाठी हा सारा लेखनप्रपंच.
आपला नम्र
सॅनफ्लॉवर्स
वर्गीकरण
प्रतिक्रिया
थोडक्यात वाचलात
बरोबर.
धन्यवाद. लेखामुळे इतर लोकही
हा लेख लिहिण्यामागचा उद्देशच तो आहे.
अज्ञात क्रमांकावरून फोन आला?
तस नाही हो...
ह्या विषयावर खूप छान series
हो.
मी या मालिकेचे काही भाग पहिले
फसवणुकीचे प्रकार घडत होते,
चांगला लेख
चांगला लेख
मला पण गेल्या २-३ महिन्यात