मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पायनॅपल स्वीट करी Pineapple sweet curry

Gk · · पाककृती
Taxonomy upgrade extras
लागणारा वेळ: १ तास लागणारे जिन्नस: 1 अननस बारीक चिरून तिखट , मीठ कांदा कापून फोडणी साठी तेल , मोहरी , जिरे , हिंग , आले किस, सुक्या मिरच्या 4 , कढीपत्ता अर्धी वाटी गूळ क्रमवार पाककृती: अननस बारीक चिरून थोडेसे पाणी , मीठ व भरपूर लाल तिखट घालून कुकरच्या भांड्यात ठेवून कुकर मधून शिजवून घ्यावे P शिजल्यानंतर फोडी एका ताटात गार करून घ्यावे , पाणी बाजूला काढून ठेवावे , फेकू नये , मग मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावे . मग फोडणी करावी - तेल , मोहरी , जिरे , हिंग , कढीपत्ता , मिरच्या , आल्याचा किस व कांदा वापरून त्यात अननस गर घालावा , थोडे शिजवावे , मग उरलेले पाणी व गूळ घालून दाट शिजवावे , गूळ कमीजास्त वापरून चव बदलता येते Pp खोबरे , नारळ दूध वापरले नाही , मी जी युट्युब पाहिली , त्यातही नव्हते , पण 2,3 चमचे ओला नारळ किंवा नारळ दूध वापरले तर चालू शकेल

वाचने 3549 वाचनखूण प्रतिक्रिया 1

तुषार काळभोर Tue, 09/22/2020 - 20:05
अशी कैरीची गोडसर आमटी एकाच्या डब्यात खाल्ली होती. मस्त आंबटगोड होती. कोणीतरी अशी अननस आमटी करून द्यायला हवी.