नुकताच मिपाचा १४वा वर्धापनदिन साजरा झाला. आपल्या लोकप्रिय संस्थळावर अनेक जण लिहीत असतात. या माध्यमाच्या रूपाने आपल्याला व्यक्त होण्यासाठी एक चांगले माध्यम मिळाले, हे निःसंशय. काही लेखक इथे अभ्यासपूर्ण अथवा रंजक लेखनही करत असतात. आपण लिहिलेले ‘कोणीतरी वाचतंय’, म्हणूनच अजून लेखक टिकून आहेत. या दुतर्फी व्यवहारात वाचक हा खरेतर अधिक महत्त्वाचा घटक आहे. इथल्या वाचकांचे दोन प्रकार आहेत- प्रतिसाद देणारे आणि मूक. काही वाचक हे क्वचित का होईना एखादे लेखन करतात, पण काही निष्ठावान वाचक हे कायम निव्वळ वाचक याच भूमिकेत अनेक वर्षे राहिलेले आहेत. मला अशा वाचकांचे नेहमीच कौतुक वाटते. या धाग्याद्वारे मी त्यांना एक आवाहन करतो.
इथे आतापर्यंत अनेकविध विषयांवर लेखन झालेले आहे. प्रत्येक लेखक हा आपापल्या आवड, गती आणि अभ्यास यानुसार विषयाची निवड करतो. प्रत्येक लेखकाचा एक ठराविक वाचक वर्गही तयार होतो. पण या सगळ्यात, निव्वळ वाचकांना अजून काय प्रकारचे वाचायला आवडेल, हा प्रश्न तसा दुर्लक्षित राहतो. तसेच काही विषयांवर नको इतके लेखनही झालेले असू शकते आणि त्यामुळे वाचकांना त्याचा कंटाळा आलेला असतो.
तर वाचकमित्रहो, या धाग्यात तुम्ही प्रतिसादातून तुम्हाला ज्या विषयांवर वाचायला आवडेल असे नवे विषय सुचवत रहा. त्यातून अशी यादी इथे तयार होईल. मग ती पाहून इच्छुक लेखकांना त्यातील त्यांच्या पसंतीचे आणि आवाक्यातले विषय निवडता येतील. याचबरोबर, ज्या विषयांवर आतापर्यंत नको इतके चर्वितचर्वण झालेले आहे, असे विषयही जरूर सांगा. त्यातून नवलेखकांना त्यांचा विषय निवडताना विचार करता येईल.
प्रत्येक लेखक हा देखील एक वाचक असतो. तेव्हा त्यांनीही (इतर लेखकांनी लिहावेत असे) त्यांच्या पसंतीचे वाचनविषय इथे जरूर लिहावेत. संबंधित लेखकांना ते मार्गदर्शक ठरेल. व्यापारातील ‘ग्राहकराजा’ प्रमाणेच वाचक हा लेखनविश्वातला ‘राजा’ आहे असे मी मानतो. म्हणून हे आवाहन.
धन्यवाद !
............................................................................................................................................................
वाचने
11820
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रयत्न चांगला आहे. पण ठराविक
माझी भर माझा टीपी
In reply to प्रयत्न चांगला आहे. पण ठराविक by कंजूस
कंजूस
कथा
+१
In reply to कथा by डीप डाईव्हर
What I miss
+1
In reply to What I miss by गवि
अरेरे, चक्क हजार प्रतिसाद
एक वाचक म्हणुन मला, ग्रामिण
ग्रामीण कथा
In reply to एक वाचक म्हणुन मला, ग्रामिण by गणेशा
जरी आयटीत असलो तरी internet
In reply to ग्रामीण कथा by चौकस२१२
हो बाई , हलकं फुलकं Happy
In reply to एक वाचक म्हणुन मला, ग्रामिण by गणेशा
राजकीय आणि सामाजिक धागे मला
"बारा बलुतेदार ..."
वाचकांचा वकूबच मर्यादित ..
वा! चौकटराजा!
In reply to वाचकांचा वकूबच मर्यादित .. by चौकटराजा
सर्वांना धन्यवाद.
अशुद्ध भाषेतील लेखन
मिपावर अनेक ऊत्तमोत्तम लेख
सर्वांच्या उपयोगाचे चर्चाविषय
वा !
In reply to सर्वांच्या उपयोगाचे चर्चाविषय by उपयोजक
उपयुक्त सल्ले हे चौकात मिळतात
चांगला धागा विषय
वा !
पण लेखक दूरदूर चाललेत
)))))
In reply to पण लेखक दूरदूर चाललेत by कंजूस
श्रिगुरूजींसारखे राजकारणाची
कट्टे,समारंभ,डिनरपार्ट्यांना
वास्तविक अनेक मि.पा.कर आय.टी
मला खालील विषयांवर