डॉक्टर खरेसाहेबांचा धागा वाचल्यानंतर काही प्रश्न/शंका मनात आल्या व हे प्रश्न प्रासंगिक असल्याने वेगळ्या धाग्यात मांडत आहेत.
करोनाने घातलेला धुमाकुळ पाहता आज ना उद्या ह्याने जवळपास सर्वजणच कधी ना कधी संक्रमित होणारच असे एव्हाना वाटु लागले आहे.
जर करोनाची लक्षणे जाणवली तर पुढे काय करावे हे माहीत करावे हा ह्या धाग्याचा हेतु आहे.
संभाव्य करोना रुग्णाकडे काय काय पर्याय असू शकतात?
माझ्या माहीतीनुसार रुग्ण घरबंद राहुन उपचार करवुन घेऊ शकतो.पण एका ऐकिव माहीतीनुसार सरकारी यंत्रणा तुम्हाला तसे करण्यापासुन परावृत्त करते.
सरकारी सेवेबद्दल आदर आहेच पण एकुणच बाधित रुग्णसंख्येची व्याप्ती पाहता तिथे होणारी हेळसांड/दुर्लक्ष इत्यादीबद्दल बरेच उलटसुलट वाचनात आले आहे.
तिच गोष्ट खाजगी वैद्यकिय सेवेबद्दल. एकाबाजुला डॉक्टरांना करोना योध्दे वगैरे नावाजले गेले आहे तिथेच दुसर्याबाजुला खाजगी रुग्णालयात भरमसाठ बिल उकळण्याच्या,मुद्दामुन चुकीच्या केलेल्या टेस्ट ह्याबद्दलच्याही बातम्या वाचनात आल्या आहेत.
अजुन एका सल्ल्यानुसार कोरोना टेस्ट करण्याची घाई करु नये. कारण वर लिहिण्याप्रमाणे टेस्टच्या विश्वार्साहतेवरच शंका आहे आणि जर रुग्ण पॉझिटीव निघालाच तर पुढची सारी प्रक्रिया ह्या सरकारी यंत्रणेमार्फत केली जाते. त्यामुळे ताप खोकला वगैरे लक्षणे आढळली तर विश्वासातल्या डॉक्टरांकडुन घरीच राहुन उपचार करवत राहावेत.हे कितपत ग्राह्य आहे?
अजुन एका माहीतीनुसार तुम्हाला करोना झालेला असू शकतो पण तुम्ही इम्युन असल्याने तुम्हाला लक्षणे जाणवत नाहीत वा पुढे त्रासही होत नाही.ते जाणुन घेण्यासाठी काय करावे? वर लिहिल्याप्रमाणे टेस्ट विश्वार्साह आहेत काय? आणि जरी टेस्ट विश्वार्साह असली तरी एकदा का तुम्ही पोझिटीव आलात तर तुम्ही पुढच्या प्रक्रियेमधले खेळणे बनुन जाता तर हे सर्व टाळायचे असेल तर काय करावे? व्यक्ती करोनाबाधित आहे पण इम्युन आहे हे माहीती करुन घ्यायच्या काही घरगुती टेस्ट आहेत काय?
पुढील प्रशन थोडा आगाऊ वाटेल पण काही शंका राहु नये ह्या हेतुने विचारत आहेत.
जसे डोकेदुखी झाली तर सहसा कोणीही उठुन डॉक्टरकडे जात नाही तर एक क्रोसिन वा तत्सम पॅरासिटॉमॉल घेतो तसे समजा व्यक्ती करोनाबाधित आहे आणि त्रासही होतो आहे तर जे मेडिकेशन दिले जाते ते एक स्टँडर्ड मेडिकेशन आहे कि व्यक्तिनुसार बदलले जाते?
जर स्टँडर्ड असेल तर व्यक्ति स्वतः औषधे घेऊ शकते का? ह्याबद्दलची अधिकृत माहीती उपलब्ध आहे काय?
व्यक्ति करोनाबाधित आहे व खाजगी वा सरकारी रुग्णालयात भरती झालीये तर पुढील मेडिकल इन्शुरन्स प्रक्रिया कशापध्दतीने हाताळावी? अथवा ह्यासंबंधीत काही मार्गदर्शनपर अनुभवाचे सल्ले मिळाले तर मदत होईल.
एखाद्या विभागातील क्वारंटाईन केंद्रे/करोना उपचार केंद्रे ह्याची माहीती मिळवण्याची काही व्यवस्था आहे काय?
पुढे जसे प्रश्न/उत्तर पडतील त्याप्रमाणे प्रतिसादात लिहित जाईन.
इतरांनीही करोना उपचारसंबंधित सर्व माहीती जमा करण्याच्या हेतुने मदत करावी.
वाचने
10724
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम धागा.
+१
In reply to उत्तम धागा. by शा वि कु
...
जीकेजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद
In reply to ... by Gk
.
In reply to जीकेजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद by कानडाऊ योगेशु
चाचण्या
कुमारजी धन्यवाद.
In reply to चाचण्या by हेमंतकुमार
होय,
In reply to कुमारजी धन्यवाद. by कानडाऊ योगेशु
माझा प्रश्न
माझ्या माहितीनुसार
In reply to माझा प्रश्न by चौकटराजा
...
शा वि कु,
बरोबर.
In reply to शा वि कु, by हेमंतकुमार
काहीही न करता सुद्धा कोविड पासून सुटका ...
मुक्तीचे कारण ....
In reply to काहीही न करता सुद्धा कोविड पासून सुटका ... by चित्रगुप्त
१))>> जर करोनाची लक्षणे
आजुबाजूस विचारा. किंवा कचरा
In reply to १))>> जर करोनाची लक्षणे by कंजूस
आरोग्यकेंद्रात तक्रार ?
In reply to आजुबाजूस विचारा. किंवा कचरा by कानडाऊ योगेशु
"होम क्वारन्टाईन विथ मेडिसिन सप्लाय" पण कोविड वर जर औषधच नाही तर
औषध..
In reply to "होम क्वारन्टाईन विथ मेडिसिन सप्लाय" पण कोविड वर जर औषधच नाही तर by चित्रगुप्त
कंपनीतल्या एका सहकार्याच्या
:D :D काहीही.. !!
In reply to कंपनीतल्या एका सहकार्याच्या by कानडाऊ योगेशु
😇
In reply to कंपनीतल्या एका सहकार्याच्या by कानडाऊ योगेशु
मेरा क्या चुक्या ?
In reply to 😇 by चामुंडराय