Skip to main content

शिवसेनेचे हे काय चाललय

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 09/09/2020 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत

वाचने 109686
प्रतिक्रिया 293

प्रतिक्रिया

दोन्ही धाग्यावरील प्रतिसाद आवडले.

BJP सेना युती मुळे मराठी मत शिवसेना मुळे. मारवाडी आणि गुजराती लोकांची मत bjp मुळे युती ला हक्कानी मिळत होती. Bhaiye ,बिहारी लोकांची गरजच लागत नव्हती सत्ता मिळवण्यासाठी. पण bjp बरोबर नसेल तर मुस्लिम ,मराठी आणि मिळाली तर बाकीचे थोडेफार ह्याच मता वर अवलंबून राहवे लागेल . मुंबई मध्ये सत्ता मिळणे आघाडी ला अवघड जाईल पण बाकी भागात राष्ट्रवादी मजबुत आहे

आजचा प्रश्न: विजुभाऊंचा मुद्दा काय आहे ते लक्षात न घेता आणि तेव्हढ्याचपुरते आपले प्रतिसाद मर्यादित न ठेवता लोक भरकटतात का? असो.

Bjp la Kangna प्रकरण महागात पडणार हे नक्की. आघाडी सरकार च हवं इथे असे लोकांना वाटत आहे. Bjp fakt भावनिक प्रश्नात च लोकांना गुंतवून ठेवत आहे ह्याची जाणीव हळू हळू होत आहे.

विजुभाऊ, कट्टर शिवसैनिक असूनही कंगणाच्या घराची तोडफोड मला खटकली. ती जर मुंबईस पाकव्याप्त काश्मीर म्हणंत असेल तर तिला प्रत्युत्तर द्यायचे इतर अनेक मार्ग होते. कोणते ते मला माहित नाही, पण उठांना माहित असणार. असो. या निमित्ताने कंगणास एक फुकट सल्ला देतो. तिला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीरासारखी वाटंत असेल तर तिने लवकरात लवकर सोडलेली बरी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तिचे पूर्ण ट्विट काय आहे, ते पाहू ते रे पैलवाना Sanjay Raut Shiv Sena leader has given me an open threat and asked me not to come back to Mumbai, after Aazadi graffitis in Mumbai streets and now open threats, why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir? https://www.opindia.com/2020/09/tylerstreetart-instagram-mumbai-deface-… म्हणून तिने पी ओ के म्हंटले आहे. "असुरक्षित वाटत असेल तर ह्या देशात राहू नका" असे सल्ले भाजपावाल्यांकडुनही दिले गेले आहेत. तसे बोलणही चुकीचेच होते. असो. मुत्सद्देगिरीचा अभाव सेना नेत्रुत्वाकडे दिसतो. घडली घटना की दे प्रतिक्रिया. उद्धव संयमी व विचार करणारे म्हणून ओळखले जातात. मात्र आजुबाजुचा त्यांचा गोतावळा कसा आहे माहित नाही. त्यात काँग्रसची अवस्था 'सहन होत नाही व सांगताही येत नाही " अशी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, गोष्ट उलगडून सांगितल्याबद्दल आभार! पण मग पाकव्याप्त काश्मीरपेक्षा जम्मू-काश्मीर ही उपमा चपखल ठरली असती (वैम). आ.न., -गा.पै.

कंगणाने कवारणताईन व्हायलाही नकार दिला, हिच्यासाठी हा नियम का लागू नाही ?

In reply to by Gk

महाराष्ट्रात तुम्ही बाहेरच्या राज्यातून आलात आणि ७ दिवसाच्या आत परत जाणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्रात क्वारंटाईन होण्याची गरज नाही असा नियम आहे.

In reply to by सुबोध खरे

Kangana Ranaut tests Covid-19 negative, leaves Himachal home for Mumbai कोव्हिड टेस्ट देखील करुन मुंबईत शिरल्या होत्या.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath

राऊत वाचळ पणाला शौर्य समजतात. इतरांच्या सौजन्याला त्यांचा कमकुवतपणा समजतात. २७ ऑक्टोबर २०१८ साली राउतांनी अजित दादंवर एक अग्रलेख लिहीला होता त्यात अजित दादांचा उल्लेक इतक्या खालच्या पातळीवर केला होता की बोलवतही नाही. https://www.saamana.com/saamana-editorial-on-ajit-pawar-statement-on-sh… या अग्रलेखातली हिणकस भाषा राऊत वापरतात. कंगनाने तर एकही अपशब्द वापरलेला नाहिय्ये. राउत कोणाच्या संरक्षणार्थ हे बोलत आहेत हे लपून राहीलेले नाहिय्ये. पण राउतांना स्वतःला एक न्याय लावतात आणि इतरांना दुसरा न्याय . ते जे बोलतात ते बिंधास्त असते आणि बाकीचे बोलले की मराठी माणसाची अस्मिता दुखावते. खरे तर कंगना जे काही बोलली ते मुंबईत येवू नये म्हणून शिवसेना धमक्या देत असेल तर हे पी ओ के मधील अतिरेक्यांसारखेच आहे. ती बोलली यात काही गैर आहे असे वाटत नाही. राउतांनी मी तीला लहान मुलाचे कौतूक करताना आपण कधीतरी त्याला ' हरामखोर" असा शब्द वापरतो त्या अर्थाने हरामखोर म्हणालो. अर्थात अजित दादांना गटारातला कीडा , मुतर्‍या तोम्डाचे असे म्हणणार्‍या राउत बहुतेक घरातही मुलाबाळांशी असेच बोलत असतील. पण शिवसेना , संजय राउतांच्य तोंडाळपणामुळे स्वतःचीच नाचक्की करुन घेतेय हे नक्के. शिवसेनेचे हे प्रकरण त्यांच्या सहकारी पक्षांना हे भोवणार आहे

आत्ताच आर टीव्ही वर पाहिले. राउतांच्या भावाने केबल ऑपरेटर्स ना रीपब्लीक चॅनेल दाख्वू नका म्हणून सांगितलय. ही गळचेपीच आहे की. अगदी पी ओ के सारखी

मला एक कळत नाही. कंगना राणाउत काय बोलायचं ते बोलू द्या कि. तिच्या प्रत्येक वक्तव्याला बेफाट प्रत्युत्तर देण्याची शिवसेनेच्या प्रवक्त्याने काय गरज आहे / होती. श्री राऊत यांनी तिला हरामखोर म्हणणे हे अत्यंत अशोभनीय आहे. तर कंगणा राणाउत यानि श्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे हेही चूक आहे. पण एका बॉलिवूड च्या नटीच्या तोंडाला लागू नये एवढे तारतम्य शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये नाही? आणि त्यानंतर मुंबईत ६० हजारच्या आसपास बेकायदा बांधकामे असताना, कंगणा उपस्थित नसताना, उच्च न्यायालयात प्रकरण प्रविष्ट असताना, एवढी घाई करून सुडाने तिच्या कार्यालयाचा बेकायदेशीर भाग घाईघाईने पाडून स्वतःची प्रतिमा मलीन मात्र करून घेतली.

In reply to by सुबोध खरे

एका बेताल मुंगीला चिरडण्यासाठी (तितक्याच बेताल) हत्तीने सगळे बळ वापरले आहे. आणि मुंगीला काही झालं नाहीच. तिला उलट आणखी बळकटी आली.

In reply to by शा वि कु

मुंगी कडे दुर्लक्ष च केले असते तर पुढचे महाभारत घडले नसते. ती पण बोलून बोलून थकली असती आणि आपल्या बोलण्याचा सरकार वर काहीच परिणाम होत नाही हे बघून वारुळात गेली असती. ज्या 7 आयपीएस ऑफिसर नी मीडिया बद्द्ल कोर्टात केस टाकली आहे त्या वर न्याय मुर्तीनी मीडिया कंट्रोल करण्यासाठी काही प्रमाणात राज्य सरकार ला अधिकार देणे गरजेचे आहे अशी टिप्पणी केली आहे आणि ती योग्य च आहे.

In reply to by शा वि कु

"मुंबईवर पहिला आणी शेवटचा हक्क फक्त आणि फक्त आमचा" ही शिवसेनेची भूमिका राहिलेली आहे. वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित करणे असो(मणीरत्नम-बॉम्बे) वा मोठाअवजड उद्योग/कारखाना असो किंवा टाडा लागलेल्या अभिनेत्याला सोड्वणे असो, 'मातोश्री'वर जाउन 'आशीर्वाद' घेतल्याशिवाय ह्या गोष्टीची पूर्तता होत नसे. बाळासाहेब असेपर्यंत हे लोकानी खपवुन घेतले. कारण नरसिंह राव्/वाजपेयी/अडवाणी, आधीच्या पिढीतील नेत्रुत्वाने दुर्लक्ष केले कारण तेव्हा शिवसेनेला जनाधार होता. आधिच्या पिढीतील अभिनेते- देवानंद वगैरे , व अमिताभ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी मातोश्रीवर जाउन 'सदिच्छा' भेट घेत. आता काळ बदलला आहे. 'अरे ला कारे' करणारी ही पिढी आहे.. सर्वच क्षेत्रांमध्ये हा बदल झाला आहे. तेव्हा कंगना माफी मागेल व शिवबंधनाचा धागा बांधून घेइल ह्या भ्रमात असण्याचे कारण नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

जुन्या चित्रपटात दिसणारी सुंदर मुंबई ,सुंदर समुद्र किनारे आणि आत्ताची मुंबई . गर्दी नी ओसंडून वाहणारी,चौपाटी म्हणजे कचरा पेटी,मोकळी जागा , बगीच्छे ह्यांचा दुष्काळ असणारी गटारे,रस्ते ,रेल्वे पटरी ह्या वर सुद्धा अनधिकृत बांधकाम असलेली. मुंबई गुदमरत आहे तिचा जीव कधी जाईल सांगता येणार नाही. तरी मुंबई ची धर्मशाळा झाली पाहिजे सर्वांना भंडारा मिळतो असे विचारधारा असलेली देशातील मंडळी. मुंबई म्हणजे नावडती प्रेयसी झाली आहे रात्री झोपायला जवळ पाहिजे पण तिची कोणतीच जबाबदारी नको जबाबदारी मात्र तिच्या कायदेशीर नवऱ्यानी ची घेतली पाहिजे.

In reply to by Rajesh188

"गटारे,रस्ते ,रेल्वे पटरी ह्या वर सुद्धा अनधिकृत बांधकाम असलेली" ही अवस्था कोणी होउ दिली? राज्याचे राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी मराठीच होते ना? निवडुन आलेलेच होते ना? महापालिकांमध्ये काम करणारे बहुतांशी अभियंते मराठीच ना?मुंबई सोडा, पुणे,नागपूर्,नाशिक्,अनेक जिल्ह्यांची ठिकाणे ही बकाल का दिसतात? आपल्या एस.टी.बसेस ईतर राज्यांच्या तुलनेत मळलेल्या व जुनाट का? msrtc ksrtc

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कर्नाटक शी तुलना नको ते राज्य महारष्ट्र सारखेच प्रगत आहे. मुंबई ,पुणे,नाशिक ची ही अवस्था उत्तर दिशेनी असलेल्या बेशिस्त londhya मुळे झाली आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र मधील कोणती ही शहर उत्तरे च्या कोणत्या ही शहरं ना पेक्षा हजार पट सुंदर आणि स्वच्छ आहेत. कर्नाटक चे फोटो देवू नका ते प्रगत राज्य आहे. बंगलोर,मंगलोर सारखी अती उत्तम शहर त्यांच्या कडे आहेत आणि कर्नाटक सुद्धा महाराष्ट्र सारखे उत्तरेच्या londhya मुळे त्रस्त आहे . तिथे सुद्धा विरोधी आवाज उठात आहे. राज्यांतर्गत migration वर नियंत्रण ठेवले तरच देशातील सर्व शहर वाचतील . नाही तर भयंकर लोकसंख्या असलेला उत्तर भारतीय लोक देशातील सर्वच शहरांची कचरा कुंडी करून टाकतील.

In reply to by Rajesh188

इतरांकडुन चांगले ते घेतलेच पाहिजे. केएसआरसीटीच्या ऐरावत/अंबारी वोल्वो सेवेला उत्तर देणारी सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा कोणती आहे? शिवशाही (टाटा/अशोक लेलँड)? शिवशाहीची सेवा किती बेभरवशाची आहे हे सांगायला नको..ब्रेक फेल, इंधन गळती, चढणावर एसी बंद..... शिवनेरी/अश्वमेध सेवा मुंबई-पुणे मार्गाव्यतिरिक्त बाकी मार्गांवर का विस्तारत नाहीत? आहे काही उत्तर? चांगल्या गोष्टींचे पंख महाराष्ट्रात लगेच कापले जातात.

In reply to by सॅगी

महाराष्ट्र मधील st सेवा ठरवून खिळखिळी केली गेली काही वर्ष पूर्वी उत्तम स्थितीत असलेलं महामंडळ बिकट अवस्थेत गेले . मुंबई मधील बेस्ट बस सेवा देशा समोर एक उत्तम उदाहरण होते त्या बस सेवेची पण ठरवून वाट लावली. महाराष्ट्र मधील अनेक संस्था मोडकळीस आणल्या गेल्या. पण महाराष्ट्र मधील त्या त्या वेळच्या विरोधी पक्षांनी कधीच सरकार ल ह्या विषयावर धारेवर धरले नाही. सभागृह अशा विषयासाठी कधीच बंद पाडले गेले नाही . जसे विरोधी आणि सत्ता धारी मध्ये एकमत झाले आहे. ह्या अशा विषयात विरोधी पक्षांनी रान उठवयचे सोडून एक साध्या केस साठी आणि एका अभिनेत्री साठी महाराष्ट्र हिताची आपल्याला सुद्धा कदर नाही हेच दाखवून दिले आहे.

मुंबई महानगर परिसरात की बेकायदा बांधकाम आहेत हे सर्वांना माहीत आहे. अगदी काटेकोर परीक्षण केले तर पूर्ण मुंबई महानगर परिसर बेकायदा आहे. कोणत्या न्या कोणत्या स्वरूपात प्रतेक बिल्डिंग मध्ये अनधिकृत बांधकाम आहे,फूट पथ वर अनधिकृत अतिक्रमण आहे. सरकार ची हजारो एकर जमीन वर अनधिकृत बांधकाम आहेत. अधिकृत भिंग घेवून शोधावे लागतील. पण बिल्डिंग च्या मुळ स्ट्रक्चर मध्ये बदल करणे धोकादायक आहे ते बिल्डिंग कोसळू शकते. ते मोठे गंभीर आहे. त्या साठी क्रिमिनल कोड च वापर करून जेल ची हवा मिळायला हवी.

गीदड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है ! ... ही शिवसेनेच्या अंताची सुरुवात आहे. आणि शिवसेनेसारखे पक्ष संपलेलेच बरे ! राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांना राजकीय नेते बनावण्याचा आद्य मान शिवसेनेचा आहे .. त्यानंतर बाकीच्यानी त्याची री ओढली कारण तोपर्यत तोच नोर्म झाला होता .. तोच यशाचा राजमार्ग झाला होता.. एक लोकशाही समर्थक म्हणून शिवसेना लवकरात लवकर संपावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ... कसलिही नीतीमत्ता नाही , तत्वे नाहीत , धोरण नाही , केवळ खंडणीखोरी , घराणेशाही आणि राडा ! अर्वाच्य बोलणे आणी शिवराळ भाषा ! कधी मराठी झेंडा, कधी हिन्दुत्व आणि आता मुस्लिम लांगूलचालन ! यांच्यापेक्षा कोन्ग्रेस बरी , नपुसक सौभाग्यापेक्शा ढळढळीत वैधव्य बरे ! ज्याकाळात शिवसेना मुम्बईत फोपावली त्याकाळात मराठी मनामध्ये एक प्रचंड पोकळी होती .. बाळ ठाकरे या चतुर आणि चाणाक्ष मनुष्याने टायमिंग साधले आणी ते गॉडमन झाले ! अर्थात हे सारे काण्ग्रेसच्या आशीर्वादाने आणी क्रुतीशील साह्यानेच घडले .. बाकी मराठी माणासाचे कल्याण .. अस्मिता वगैरे अंधश्रद्धा आहेत ! त्यानी आपले आणि आपल्या घराण्याचे पद्धतशीर कल्याण करुन घेतले .. त्या ओघात काही गुंडानीही आपले उखळ पांढरे करुन घेतले .. मराठी माणसाचे काही भले झाले असेल तर तो साइड इफ्फेक्ट आहे.

In reply to by विटेकर

गीदड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है ! ... ही शिवसेनेच्या अंताची सुरुवात आहे. अगदी ! हे गीदड तर फार माजलेले असुन त्याला मरायची घाई झालेली दिसते हे त्याच्या कृतीतुन स्पष्टच आहे. कंगानेने काडी केली आणि हे गीदड गेले लगेच धावुन. तेल लावलेल्या पैलवानाने जशी विधाने करण्यास सुरुवात केली आहे त्यावरुन हे सरकार जास्त काळ टिकणार नाही हे कळुन येते. हे कमी होते म्हणुन एका न्यूज चॅनल त्यांच्या २ पत्रकारांनाच्या सुटकेसाठी आता National Human Rights Commission (NHRC) कडे गेले आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath

In reply to by मदनबाण

विरोधी पक्षाच्या राज्यसरकार वर दबाव निर्माण करण्यासाठी केंद्रीय एजन्सी चा गैर वापर होत आहे. भारत हे संघ राज्य आहे ह्याचा विसर पडू नये. राज्य मानवी हक्क आयोग सुद्धा असतो त्या साठी केंद्रीय आयोग कडे जाण्याची गरज नाही.

श्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती १४३ कोटी आहे असे त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस दाखल केलेले शपथपत्रात लिहिलेले आहे. प्रबोधनकार पासून ते बाळ ठाकरे, श्री उद्धव ठाकरे ते श्री आदित्य ठाकरे यांचा कोणता असा व्यवसाय आहे ज्यात एवढी संपत्ती निर्माण होऊ शकते?

In reply to by सुबोध खरे

असा व्यवसाय आहे ज्यात एवढी संपत्ती निर्माण होऊ शकते? फोटोग्राफितुन त्यांनी बक्कळ पैसा कमावला असणार बघा ! :))) बाकी इडी मुंबइत आलेली आहेच तर याचाही शोध घेण्यास हरकत नसावी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath

शिवसेना नी हे प्रकरण योग्य पद्धती नी हाताळला की अयोग्य ह्याचे मोजपट्टी काय. राजकारणी लोकांच्या खेळी एवढ्या सरळ पण नसतात की त्या मधून आपल्या सारखी सामान्य लोक काही अर्थ पटकन काढू. पवार सारखे नेतृत्व सत्तेत सहभागी आहे त्यांच्या सल्ला नक्कीच घेतला असेल. अजित दादा,फडणीस एकत्र येवुन काही तासात केंद्र सरकार ला राष्ट्रपती राजवट हटवयला लावली नाही तर राष्ट्रपती राजवट हटलीच नसती. सुशांत च्या आत्म्हत्ये चे राजकारण होणार ह्याची खात्री नक्कीच त्यांना असणार. अजुन सुद्धा मुंबई पोलिस नी काय तपास केला हे गुलदस्त्याच आहे. आता ncb ची दिशा आत्महत्या करायला प्रवृत्त केले हे सिद्ध करणे अशी आहे. म्हणजेच ते प्रकरण संपल्यात च जमा आहे. . कोणाला काय साध्य करायचे ह्याचा अंदाज प्रतेक जन वेगळा लावतोय.

शिवसेना नी हे प्रकरण योग्य पद्धती नी हाताळला की अयोग्य ह्याचे मोजपट्टी काय. राजकारणी लोकांच्या खेळी एवढ्या सरळ पण नसतात की त्या मधून आपल्या सारखी सामान्य लोक काही अर्थ पटकन काढू. पवार सारखे नेतृत्व सत्तेत सहभागी आहे त्यांच्या सल्ला नक्कीच घेतला असेल. अजित दादा,फडणीस एकत्र येवुन काही तासात केंद्र सरकार ला राष्ट्रपती राजवट हटवयला लावली नाही तर राष्ट्रपती राजवट हटलीच नसती. सुशांत च्या आत्म्हत्ये चे राजकारण होणार ह्याची खात्री नक्कीच त्यांना असणार. अजुन सुद्धा मुंबई पोलिस नी काय तपास केला हे गुलदस्त्याच आहे. आता ncb ची दिशा आत्महत्या करायला प्रवृत्त केले हे सिद्ध करणे अशी आहे. म्हणजेच ते प्रकरण संपल्यात च जमा आहे. . कोणाला काय साध्य करायचे ह्याचा अंदाज प्रतेक जन वेगळा लावतोय.

In reply to by Rajesh188

पवारांचे राजकारण कपटाचे असते हे एव्हाना उघड गुपित आहे. ह्यात बी.एम.सी मध्ये सत्ता शिवसेनेची आहे त्यामुळे पवारांनी सल्ला जरी दिला असला असता तरी आता ह्या कृत्याची जबाबदारी शिवसेनेकडे पक्षी उ.ठांकडेच जाते.मला तर वाटते हा सल्ला नक्की पवारांनीच दिला असावा.ह्यानिमित्ताने शिवसेनेला नवीन काही जनाधार तर मिळाला नाहे पण बर्याच जणांची नाराजी ओढवुन घेतलीये.

"पवार सारखे नेतृत्व सत्तेत सहभागी आहे त्यांच्या सल्ला नक्कीच घेतला असेल." ज्येष्ठ म्हणून सल्ला घेतला असेल तर ठीक अन्यथा देशाच्या राजकारणात ममता बॅनर्जी,अखिलेश यादव पवारांपेक्षा उजवे ठरतील रे राजेशा. असो. "अजुन सुद्धा मुंबई पोलिस नी काय तपास केला हे गुलदस्त्याच आहे." हाच तर प्रोब्लेम आहे रे. तपास चोख असायला हवा होता. तो असता तर ही वेळ आली नसती असे आमचे मत.

स्वतःच्या हाथाने पायावर धोन्डा मारून घेतायेत... राउत सूड उगवतोय की काय असेच वाटते आहे. :)

In reply to by बाप्पू

जाम नॉटी बुवा तुम्ही!! आयला काहीतरी घोळ झालेला दिसतोय. हरामखोर म्हणावं तरी प्रोब्लेम. आणि नॉटी म्हणावं तरी प्रोब्लेम.. काय करू आता?

निवृत्त नौदल अधिकार्‍यास मारहाण झालेचे समोर आले आहे ! जर देशासाठी सेवा करणारे वयोवृद्ध या राज्यात सुरक्षित नसतील तर माझ्या सारख्या सामान्य जनतेला हेच गुंड ठार करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत ! राष्ट्रपतींनी या घटनेची त्वरित दखल घेउन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath

In reply to by मदनबाण

राजकीय वैमनस्यातून यूपी आणि बिहार मध्ये खुले आम् दिवसा ढवळ्या राजकीय नेत्यांच्या किती तरी हत्या झाल्या आहेत आणि अजुन सुद्धा होतात तरी त्या दोन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा असा सूर निघत नाही. Maharashtra मधे राजकीय विरोधकांचा हत्या केल्या जात नाहीत त्या महाराष्ट्र ला हे हिंदू भाषिक नेते शहाणपण शिकवत असतात ते नीतिमत्ता मध्ये बसते का.? त्यांना तो नैतिक अधिकार आहे का?

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जावी ही मागणी आता सगळ्या जनतेनी केली पाहिजे, कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे त्याची प्रतिष्ठाच आज मातीमोल करण्यात आली आहे. हे लोक आता दंगल घडवुन आणायला देखील मागे-पुढे पाहणार नाहीत अशी भिती सामान्य जनतेला वाटत आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath

In reply to by मदनबाण

केंद्रीय सत्ता मुजोर होवून हुकुमशाही कडे देश जाईल ह्याची शक्यता राज्य घटना लीहताना विचारात घेतली आहे. राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते,किती दिवस जास्तीत जास्त लावली जाते ह्या विषयी नियम आहेत. काँग्रेस नी सुद्धा हे खेळ खेळले आहेत मनमानी पना गृहयुद्ध कडे घेवून जाईल. अर्णव म्हणतो म्हणून आणि कोणी तरी निवृत्त अधिकारी ज्यांनी आता bjp स्वीकारली असेल राष्ट्रपती राजवट लावता येत नाही .सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल आणि मतदार ची सहनभुत bjp हरवून बसेल हे न समजण्या एवढे bjp चे केंद्रीय नेतृत्व मूर्ख नाही.. अर्णव मूर्ख सारखी बडबड करत आहे . फक्त प्रांतीय द्वेष मुळे महाराष्ट्र सरकार विरूद्ध उत्तर भारतून अर्णव ला समर्थन मिळत आहे. तो मोठा शहना आहे म्हणून नाही.

In reply to by Rajesh188

म्हणजे सेने जे केले आणि राउत जे बोलले त्यात काहीच चूकले नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला? सेनेच्या धाकामुळे ( भीतिमुळे ) मराठी चॅनेल्स या बाबत फारशी चर्चा करत नाहियेत.

In reply to by मदनबाण

कारभारी दमाने घ्या ! राष्ट्रपती राजवट कधी लागते याचा अभ्यास करा, महाराष्ट्रातील क्राईम इंडेक्स, इतर राज्यातील क्राईम इंडेक्स यांची तुलना करा, त्याचे व्हिडीओ इथे पोस्ट करा, मग जनतेला ठरवू द्या

In reply to by कपिलमुनी

राष्ट्रपती राजवट न्यायालय च्या पूनारलोकान कक्षात येते आणि मनमानी पद्धती नी लादलेली राष्ट्रपती राजवट न्यायालय रद्द करू शकते. आणि त्याच सरकार ची पूनारस्थपणा करू शकते राष्ट्रपती राजवट विषयी dr Babasaheb Ambedkar बोलले होते अगदी शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपती राजवट लादली जावी . आणि ती लोकशाही वाचवण्या साठी असावी लोकशाही चा गळा घोटण्यासाठी नाही. 1994 मधील बोंबई घातल्या नंतर राष्ट्रपती राजवट लावण्या वर सर्वोच्च न्यायालय नी बंधने घातली आहेत.

In reply to by कपिलमुनी

राष्ट्रपती राजवट कधी लागते याचा अभ्यास करा, महाराष्ट्रातील क्राईम इंडेक्स, इतर राज्यातील क्राईम इंडेक्स यांची तुलना करा, त्याचे व्हिडीओ इथे पोस्ट करा, मग जनतेला ठरवू द्या मुनी राष्ट्रपती लागवट कधी लागते याचा नक्कीच अभ्यास करावयास हवा. महाराष्ट्रातील क्राईम इंडेक्स, इतर राज्यातील क्राईम इंडेक्स यांची तुलना करुन मागिल राष्ट्रपती राजवट लागली नव्हती हे आपणास माहित नाही याचे मात्र नवल वाटले नाही ! महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले नाही म्हणुन ११ दिवस याच राज्यात राष्ट्रपती राजवट लागु होती. घटनात्मक शासनव्यवस्था नीट चालत नसेल तरी राष्ट्रपती राजवट लागू केली जाउ शकते. त्याचे व्हिडीओ इथे पोस्ट करा, मग जनतेला ठरवू द्या नेहमी प्रमाणेच तुमच्या सवयी नुसार दिलेला व्हिडियो न पाहताच तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, कारण मी दिलेल्या पहिल्या व्हिडियो मध्येच माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मुलीने त्यांच्या वडिलांना झालेल्या अमानुष मारहाणी नंतर घाबरलेल्या / भेदरलेल्या अवस्थेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली आहे. माझ्या निरिक्षणा नुसार मी दिलेले एकही व्हिडियो न पाहता तुम्ही नेहमी प्रतिसाद देता आणि वर मलाच कधी व्हिडियो पोष्ट करावेत या बद्धल सुचना करता हे हास्यास्पद आहे. ज्या राज्यात छत्रपतींच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जाते त्याच राज्यात साधुंना पोलिसांच्या समोरच ठार केले जाते, एका स्त्रीवर सुडात्मक पद्धतीने कारवाई करुन तिचे घर / ऑफिस उध्वस्त केले जाते, पत्रकारांना तुरुंगात टाकले जाते आणि ६२ वर्षाच्या माजी नौदल अधिकार्‍यास डोळा लाल होइ पर्यंत अमानुष मारहाण केली जाते त्या राज्यात घटनात्मक शासनव्यवस्था नीट चालते आहे का ? हा प्रश्न नक्कीच विचारला जाउ शकतो आणि म्हणुनच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली जाउ शकते. जाता जाता :- दुसर्‍यांना अभ्यासाचे सल्ले देण्याच्या आधी स्वतःचा काय अभ्यास आहे याचे आत्मपरिक्षण करावे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaishankar, Wang agree: Let’s keep talking, quickly disengage, ease tensions along LAC

In reply to by मदनबाण

चार गुंडानी एखाद्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली म्हणून राष्ट्रपती राजवट लावणे समर्थनीय कधीच होणार नाही. कारण असे झाले तर लोकनियुक्त सरकार पाडायला चार गुंड पुरेसे होतील. या ऐवजी अशा गुंडाना अटक करून अशी अजामीनपात्र कलमे लावून चार सहा महिने आत टाकावे कि कोणताही गुंड केवळ आमच्या नेत्याला कोणी काही बोलले म्हणून कायदा हातात घेण्याचे धारिष्ट्य करणार नाही. ( ज्या तर्हेने मारहाण केली आहे त्यावरून ते अधिकारी गंभीर रित्या जखमी झालेले आहेत हे दिसतेच आहे). आपल्याच पक्षाच्या गुंडाना अटक करून असे धारिष्टय हे सरकार दाखवेल का हाच प्रश्न आहे. सुबोध खरे निवृत्त नौदल अधिकारी.

In reply to by सुबोध खरे

मर्चंट नेव्ही अधिकारी आणि भारतीय नौदल अधिकारी यातला फरक समजत असेलच. मग विनाकारण नौदलाला यात आणायची गरज का आहे?

In reply to by मदनबाण

अवांतर : मारहाण झाल्याने डोळा आतून लाल होतो? की बाहेरून काळानिळा पडतो? --------------------------------------------------------- माजी नौदलाधिकारी मदन शर्मा यांचा लाल डोळा : https://images.news18.com/ibnlokmat/uploads/2020/09/shivsena-goons.jpg?impolicy=website&width=496&height=330 --------------------------------------------------------- पारंपरिक ब्लॅक आय : https://i.imgur.com/cE5mhhs.jpeg --------------------------------------------------------- वाचकांनी काय ते ठरवावं. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

फक्त डोळा आतून लाल झालाय बाहेरून मारहाण केल्याची काहीच निशाणी नाही. कुछ तो गडबड हैं?

In reply to by मदनबाण

पत्रकारांना तुरुंगात टाकले जाते ?? त्यांना न्यायालयाने रिमांड दिली आहे. बाकी कसेही लिहिलेत तरी न्यायव्यवस्थेचा आदर करा. त्यांच्या वर ट्रेसपासिंग आणि एसॉल्टचे चार्जेस आहेत. प्रथमदर्शनी पुरावा बघून न्यायालयाने त्यांना तुरुंगात टाकले आहे.

In reply to by मदनबाण

आता हे दोन्ही महाशय कुठे आहेत???. उ.प्र. मधील घडलेल्या घटनांकडे सोयीस्कर दुर्ल्क्ष करतायत???? त्यांच्याबद्दल आपुल की असेल तर तिकडे जाउन राहव ना एकदम सुरक्षीत

गेली किती तरी दशक दाऊद underworld चा डॉन आहे. किती तरी आर्थिक व्यवहारात त्याचे पैसे भारतात गुंतले आहे त. केंद्रात,राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्व पक्षांची सरकारे येवून गेली दाऊद चा 1 केस पण कोण वाकडा करू शकला नाही. त्या मुळे bjp ni किंवा कोणत्याच पक्षांनी नाकाने कांदे solu नयेत

शिवसेना सारखा राजकीय पक्ष ज्यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान जगावला. मराठी माणसाच्या पाठी संघटित ताकत उभी केली. अगदी रिक्षा वाला असू नाही तर ट्रेन मधील भांडण फक्त सेनेचे नाव घेतले की संघटित परप्रांतीय हजार वेळा विचार करायचे मराठी माणसावर हात उचलायला . सेना प्रमुख च्या एका इशाऱ्यावर हजारो लोक जीव देण्यास तयार होती. ती ताकत मोदी मध्ये पण नाही. बाळासाहेब ठाकरे च्या एका इशाऱ्यावर सर्वस्व अर्पण करणारे हजारो होते आणि आज पण आहेत. देशातील एकमेव नेता ज्याला मना पासून लोकांचे प्रेम मिळाले त्या सेने ची किमंत भंगार हिंदी मीडिया.आणि बॉलिवूड मधून बाहेर हाकलले ली सुमार दर्जा ची अभिनेत्री कंगना ठरवणार की मूर्ख चा बादशाह अर्णव ठरवणार.

In reply to by Rajesh188

सेनेची किंमत कमी करण्यासाठी बाकीच्यांना काही करायची गरजच नाही, असा कारभार करून सेना आपली किंमत स्वतःच कमी "करून दाखवत" आहे.

In reply to by Rajesh188

राजेश तुम्ही म्हणताय तो सेनेचा सुवर्णकाळ आणि त्यावेळेस बाळासाहेबांबरोबर इतकं हि लोक चांगले होते ( कुठे नवलकर, जोशी आणि कुठे राऊत ) आता काय झालाय सेनेचं? नुसतं उत्तर भारतीयांवर आग पाखड करून तुम्ही सेनेची मराठी माणसाच्या मनातील गेलेली इज्जत परत अनु शकत नाही .. मराठी माणसाच्या मनातूनच सेना उतरली आहे .. याचा जरा करा गंभीर विचार, राज्य पातळीवर म्हणून मराठी म्हणून सेनाला पाठिंबा देणारा मराठी jar दूर जातोय तर !

प्रतिमा मलिन करणे हे भाजपा 2014 पासून करते आहे>>> २०१४ मधे फडणवीस मुम झाल्यापासुन शिवसेना व भाजपा युती असली तरी ऊठा नेहेमी त्यान्च्या विरुद्ध बोलले आहेत.

निव्रुत्त नौदल अधिकार्याला मारहाण करणे निषेधार्ह आहे. कधी मराठीप्रेमाचे नाटक तर कधी हिंदुत्वाचे, सेनेने मराठी माणसाला फक्त मूर्ख बनवायचे काम केले.सगळीकडून होणार्या हल्ल्यांमुळे शिवसेना नेत्यांचा संयम सुटलेला दिसतो. दंगल सद्रुश परिस्थिती निर्माण करून सामान्य माणसाचा बळी घेऊ नका हीच उद्धव ह्यांना विनंती

पी ओ के म्हणजे पाक व्याप्त काश्मीर म्हणजेच एक आमचीच लाडकी भूमी जी चुकीच्या लोकानी शासित आहे .मी जर कन्गनाच्या जागी असतो तर अशी फोड करून सांगितली असती ज्यायोगे मी मुम्बईला पाकिस्तान म्हटले नसून पाक्व्याप्त काश्मीर म्हणजेच भारतभूमी असे म्हटले आहे .पण कंगना ..... आता सूड्बुद्धीने शिवसेना शासित मनपा ने बान्धकामावर कारवाई केली आहे यात कायदेशीर चूक काही नाही. नैतिक आहे असे म्हणता येईल, सम्बन्धित कायद्यात कोणत्या प्राधान्य क्रमाने बान्धकामे पाडायची अशी काही यादी दिलेली नसावी त्याचा गैरफायदा घेउन हा सूड उगविण्यात आला आहे वा कंगनाच्या चिथावणीला प्रत्यूत्तर देण्यात आले आहे असे म्हणता येईल. चाणक्य साहेबाना सत्ता व कोन्ग्रेस या दोघाचीही आजन्म गरज भासणार आहे सबब त्यानी ३५६ चा फायदा घेऊन केंद्रातून राष्त्रपति राजवट येऊ नये म्हणून ही कारवाई पालिकेच्या कायद्यानुसार झाली आहे राज्यसरकारचा त्यात काही संबन्ध नाही हे स्पष्ट केले आहे ही भीती सेनेलाही पटली आहे सबब आता कंगनाला भिडायचे ते ठाकरी पद्धतीने नाही तर बारामती पॅटर्न वापरून हे धोरण सेनेने स्वीकारले आहे . सबब आता कंगना ड्रग प्रकरण सेनेतर्फे हाताळले जाणार असून त्याचा कन्ट्रोल साहजिकच गृहमन्त्री यान्चेकडे असेल एकीकडे कायदा ( ३५६) खूष दुसरीकडे सेनाही खूष असा तो पॅटर्न असणार आहे.

In reply to by चौकटराजा

नैतर पीओके वर कारवाई झाल्यावर पहिली बार सर्जिकल स्त्राईक मोदीने पाकिस्तान को अंदर घुसकर मारा वगैरे व्हॅटसपवर ऊत आला नसता

In reply to by Gk

आता तुमच्या काळात झालेल्या सर्जीकल स्ट्राईक (झाल्या असतील तर) तुम्ही देशवासीयांना सांगीतल्या नाहीत त्यात भक्तांचा काय दोष? मातोश्रींची परवानगी नव्ह्ती मिळाली का देशवासीयांना सांगायला??