राम राम मंडळी, मंडळी आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी आपल्यासाठी आपल्या वेळेचं एक मूल्य आहे. कधी तरी वेळ काढून एखादं आवडीचं गाणं ऐकत बसणे, काही वेळासाठी तल्लीन होऊन जाणे. एखाद्या पुस्तकाच्या पानात रमणे, मित्राशी फोनवर गप्पा मारत खदखदत हसणे. निसर्गचित्रात रमणे, एखादा तलाव, नदी, समूद्र त्याच्याकडे पाहात त्या सौंदर्यात, समुद्रगाजेत रमणे. मॉर्निंग वॉकला जातांना येतांना प्राजक्ताची फूले-चाफ्यांची फुले वेचत बसणे. असे आपलं सामान्य मानसाचं आयुष्य एका रेषेत सरळ चाललेलं असतं. पण मोठ्या माणसांचं कसं असेल. मा.पंतप्रधान मोदी यांच्या एका मॉर्निंग वॉकचा व्हीडीयो पाहण्याता आला आणि आनंदाला पारावर उरला नाही. इतका मोठा माणूस, इतका व्याप, पण सकाळच्या प्रसन्न वातावरणात, निसर्ग सौंदर्यात त्या वॉकचा काय अवर्णनीय आनंद असेल. बॅग्राऊंडला मस्त संगीत असावं, आजूबाजूला मोर-लांडोर असावेत, त्यांच्यासोबत केलेल्या वॉकचे मजा काही औरच.

भोर भयो, बिन शोर मन मोर, भयो विभोर, रग-रग है रंगा, नीला भूर श्याम सुहाना मनमोहक, मोर निराला.
सकाळ झालीय, कोणताच आवाज न होता, मनही अगदी मोर झाले आहे. भयो म्हणजे, झालं, होणे. मन विभोर झालं आहे. सावळा कृष्ण सुंदर वाटतो, तसेच मोर हा तितकाच मनमोहक आहे, खरं तर राष्ट्रीय पक्षी मोर आणि त्याचं शरीर-पिसारा फूलवतो ते दृश्य अतिशय सुंदर असे होते. अशा मोरांबरोबर जेव्हा मॉर्निंग वॉक होत असेल तर तेव्हा सर्व समस्या, मनातील विचार दूर होऊन, मनाला प्रसन्नता लाभत असेल. मन उत्साही राहण्यासाठी काही उत्साहवर्धक गोष्टी हव्या असतात. मला मोरोपंताच्या श्लोककेकावलिची आठवण होते. मन गलबलून टाकणारी करुणार्त भावना अत्यंत उत्कटपणे यावे तसा तो आर्त सूर आणि प्रसन्नता त्यात दिसते. व्याकूळता आहेच, श्वास खोल आणि खोलवर जावा तशी ती अनुभूती. आणि हे देवा, तुझ्या उदराने अनेक शरणांगतांचे अपराध पचवले, तसे सर्व सुष्टीचे अपराध पोटात घेऊन एक नवी सकाळ हळुहळु फुलांप्रमाणे उमलत आहे. रग है, पर राग नही, विराग का विश्वास यही, न चाह, न वाह, न आह, गूंजे घर-घर आज भी गान, जिये तो मुरली के साथ जाये तो मुरलीधर के ताज. वेदना आहे, दुखणे आहे, पण कोणताच राग नाही. रागाचा अभाव असलेला तो विराग, तोच विश्वास आहे. कोणतीच आसक्ती नाही. आजही घराघरात कृष्ण-बासरीचे गाणं आहे, जगणे मुरली आहे, आणि मरणेही मुरली आहे, असे हे सुंदर भावकाव्य आणि मनोहर संगीत असलेल्या मॉर्निंग वॉकचा काय आनंद असेल. केवळ सुंदर. माणूस आज सुखासाठी धपडपडतांना दिसतो. विवंचना, अडचणी, दु:ख, अशा गोष्टीतून असा एक वेगळा प्रसंग सुखद आनंद देऊन जातो.
टीप : रचना मा.मोदींच्या ट्वीटरवरुन घेतली आहे. दिवा बत्ती. थाळी-टाळी- जीएस्टी, लॉकडाऊन अनलॉक टेष्ट्स वगैरे विषयांकडे धाग्याला घेऊन जाऊ नये, अशी अपेक्षा.
प्रतिक्रिया
चांगला प्रयत्न डीबी अंकल..
'रचना' नव्हे 'टाहो' बघा.
एकदा मी आणि एक मिपाकर
एकदा मी आणि एक मिपाकर परममित्र असे दोघेच बेडसे लेणी भटकायला गेलो होतो, लेणी पाहून झाल्यावर पवनेच्या बॅकवॉटरला फेरी मारु लागलो. एके ठिकाणी चहा घ्यायला थांबलो, तिथं पाळलेले मोर आणि काही बदके होती. मोर पाळीव असे समजून आमचे मित्र मोराच्या जवळ गेले आणि त्याला काही खुणा करुन दाखवू लागले, मोरही प्रतिसाद देऊ लागला. आमच्या मित्रांचा धीर चेपल्यामुळे ते मोराच्या अधिकच जवळ गेले तितक्यात मोराने क्वॅक्क्क.....असा मोठा आवाज करुन मित्रांच्या अंगावर उडू लागला. मित्रांची पळताभुई थोडी झाली. त्यांचा तो भेदरलेला चेहरा अजूनही स्मरणात आहे.
भोर भयो, बिन शोर
अगदी अगदी....
मोर पाळण्याबाबत काही वन्य जीव
कायदा.
सविस्तर प्रतिसादाबद्दल
मलातर मोर खुप खुप आवडतात..
झक्कास. एकदम सर गुजरातला कसे
मस्ते
आमच्या
मनोगत आवडले हो सर... फक्त ते
डन
चा छान लिहीलेय :)
व्वा, मस्तच !
वा !
छान लिहिले आहे.. आवडले.
मनाच्या अवस्थेचे छान वर्णन.
छ्या काय मज्जा नाय लेखात.
ओला पाचोळा पेटत नव्हता.
आभार...!
भारी लिवलय सर! मा.मोदींवर
हाहाहा
पुलं आणि मोर
रागाचा अभाव असलेला तो विराग,
माझ्या माहितीप्रमाणे मूळ शब्द
राष्ट्रपती भवनात अनेक मोर
सर्वांचे आभार.
सुन्दर
भानुदास
भानुदास