नमस्कार मिपाकर्स,
सालाबादप्रमाणे श्रीगणेशोत्सव साजरा झाला आहे, गणपती विसर्जन झालंय आणि मिपा श्रीगणेश लेखमालासुद्धा यशस्वीरित्या सुफळ संपूर्ण झालेली आहे. आता वेध लागलेत मिपाच्या दिवाळी अंकाचे. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मराठी घरांमध्ये फराळ, आकाशकंदील, फटाके यांच्याइतकीच उत्सुकतेने वाट बघितली जाते दिवाळी अंकाची. तितकीच उत्सुकता ऑनलाइन जगात असते मिपाच्या दिवाळी विशेषांकाची.
यंदा मिसळपाव दिवाळी अंकाचं दहावं वर्षं. मिपाच्या दिवाळी अंकाची दखल वृत्तपत्रांमध्येसुद्धा घेतली जाते. हे शक्य होतं ते अर्थातच तुमच्यामुळे. तुमचे दर्जेदार लेख, कथा, कविता, पाककृती, फोटो यांमुळे आपला दिवाळी अंक भरजरी होतो. त्यामुळे याही वर्षी आम्ही आवाहन करत आहोत तुम्हाला. तुमच्या लेखण्या, मोबाइल, कळफलक, कॉम्प्युटर, म्याक सरसावून बसा आणि तुमचे लेख आम्हाला पाठवा.
यंदाच्या दिवाळी अंकासाठी एक विशेष थीम असणार आहे.
अर्थात, विषय दिला, म्हणजे फक्त त्यासंबंधित साहित्य स्वीकारणार असं नाही. विषयाधिष्ठित किंवा आपल्याला सुचलेल्या विषयावर अशा दोन्ही प्रकारच्या लेखनाची आम्ही वाट बघत आहोत.
तर, यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!
वाचूनच मन रोमांचित झालं ना? होणारच! कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. ते मायलेकात असतं, बापलेकीत असतं, भावंडात असतं, मित्रांत असतं, प्रेमी युगुलात असतं, नवरा-बायकोेत असतं, आजी-नातवंडात असतं आणि तरीही ते सेम नसतं.
प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.
लेखाबरोबर प्रकाशचित्रं द्यायची असल्यास ती शक्यतो स्वतः काढलेले फोटो, स्वतः काढलेली चित्रं किंवा जालावर मुक्त उपलब्ध असलेली असावीत, अशी अपेक्षा आहे. प्रकाशचित्रं स्वतंत्रपणे स्टोअर करून लेखात समाविष्ट केली जातील. काही अडचणी असल्यास तुम्ही प्रकाशचित्रं आम्हाला ईमेलने पाठवू शकता. आम्ही ती लेखात समविष्ट करू.
लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.
आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिने पाठवा किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेलने पाठवा. ईमेलने लेखन पाठवताना ईमेलमध्ये लिहून, किंवा MS Word docx फाइल attach करून पाठवू शकता. फाईल attach करताना फोटो (असल्यास) ते वर्ड फाइलमध्ये न देता, स्वतंत्रपणे attach करावेत. कृपया पीडीएफ फाइल स्वरूपात लेखन पाठवू नका. काही प्रश्न, अडचणी, शंका असतील तर आमच्याशी (साहित्य संपादक) संपर्क साधा. दिवाळी अंकासाठी आपलं लिखाण पाठवताना ते आधी कुठेही (म्हणजे छापील स्वरूपात आणि डिजिटल स्वरूपात - अगदी स्वतःच्या फेसबुक भिंतीवरसुद्धा) प्रकाशित झालेलं नाही, याची काळजी घ्या. यंदा अधिक मास असला, तरी १५ ऑक्टोबरला केवळ चाळीस दिवस राहिलेत. तेव्हा, लागा लिहायला! टीप : आलेल्या साहित्यापैकी दिवाळी अंकासाठी निवडलेलं लेखन प्रकाशित करून झाल्यानंतर जे अप्रकाशित लेख आणि इतर साहित्य प्रशासनाकडे असेल, ते सदस्य स्वत: प्रकाशित करू शकतील. तसंच मिपा दिवाळी अंकात आपलं लिखाण प्रकाशित झाल्यानंतर, ते लिखाण लगेचच इतरत्र प्रकाशित करू नये, अशी विनंती.
वाचने
22577
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
विषय भारीच आहे एकदम.
तुमच्या लाडकीवर लेख येवु द्या
In reply to विषय भारीच आहे एकदम. by प्रचेतस
इथं कपाळावर हात मारल्याची
In reply to तुमच्या लाडकीवर लेख येवु द्या by प्रशांत
स्वागत
कारण प्रेम म्हणजे प्रेम
वाह !
वा .लगे रहो बिरुटे सर.
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी कसे का असेनात, पण या
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो असणारच की. शेवटी
In reply to बाकी कसे का असेनात, पण या by गवि
वा सर!!
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो ना..क्या बात!
In reply to वा सर!! by तुषार काळभोर
+१
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
सरांच्या रोमॅन्टीसिजमची नांदी जबरदस्त आहे !शक्य तितक्या लवकर लेख देतो
आम्ही बाद.
हा हा हा..
In reply to आम्ही बाद. by कंजूस
तुम्ही का बाद?
In reply to आम्ही बाद. by कंजूस
विषय छान..
इतर लेखनही चालणार आहेच रे :)
In reply to विषय छान.. by गणेशा
भारी !
झकास...
लो अब गिन लो… ये बूँदें बारिश की…...!!!
In reply to झकास... by टर्मीनेटर
अजून येऊ द्या शेर.. मस्तच
In reply to झकास... by टर्मीनेटर
पूछते थे ना कितना प्यार है
In reply to झकास... by टर्मीनेटर
पूछते थे ना कितना प्यार है हमें तुम से, लो अब गिन लो… ये बूँदें बारिश की…...!!!क्या बात.... क्या बात!प्रेम - शृंगार - रोमान्स... मस्त मस्त
लय भारी ! अंक गाजणार ;-)
प्रेम... रोमान्स ..शृंगार ...
प्रेम आणि शॄंगार यांची व्याप्ती फार मोठी आहे.
In reply to प्रेम... रोमान्स ..शृंगार ... by चौकटराजा
@चौरा आणि चित्रगुप्त काका
In reply to प्रेम आणि शॄंगार यांची व्याप्ती फार मोठी आहे. by चित्रगुप्त
मला अभिप्रेत असलेले प्रेम ...
In reply to प्रेम आणि शॄंगार यांची व्याप्ती फार मोठी आहे. by चित्रगुप्त
मस्त..
In reply to मला अभिप्रेत असलेले प्रेम ... by चौकटराजा
विषय एकदम भारी. मेजवानी असेल.
मिपा दिवाळी अंक
शुभेच्छा !
बिपीन सुरेश सांगळे,
In reply to शुभेच्छा ! by बिपीन सुरेश सांगळे
+१
In reply to बिपीन सुरेश सांगळे, by चौथा कोनाडा
संपादक मंडळ ,
सर मुदत अहे अजुन!
गणपती उत्सव हुकला...
आगामी दिवाळी अंक २०२० च्या
हा अंक केव्हा प्रसिद्ध होणार ?
हेच विचारतोय.