सुंदरा मनामध्ये भरली
सुपरमार्केटमध्ये जायचं म्हणून अगदी निगुतीनं यादी करावी आणि येताना यादीत नसलेले दोनचार जिन्नस तरी अधिक घेऊन घरी यावं तसं माझं शिकवताना होतं. मनातल्या मनात आज काय शिकवायचं याचं कितीही नियोजन केलं तरीही बायोलाॅजीबरोबर कधी फिलाॅसाॅफी, कधी सोशोलाॅजी तर कधी सायकोलाॅजीला हात लावून यावं हे ठरलेलं.
त्या दिवशीही तसंच झालं. बारावी सायन्सवर माझं लेक्चर होतं. Sex determination in different individuals हा टाॅपिक होता. त्याआधीचा बराचसा भाग केवळ माहितीवर आधारित (descriptive) असल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचे थोडेसे कंटाळलेले भाव जाणवत होते. तरीही थोडं पुढे रेटत शिकवणं चालूच ठेवलं...मनुष्यप्राण्यांचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांमध्ये XX प्रकारची गुणसूत्रे (chromosomes) असतात तर पुरुषांमध्ये XY. त्यामुळे स्त्रीबीज हे एकाच प्रकारचे असते तर पुरुषबीज मात्र दोन प्रकारचे. त्यामुळे sex of the child is determined by the male gamete that fertilises the female gamete. पण पक्ष्यांमध्ये मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती. नरपक्ष्यामध्ये ZZ म्हणजे एकाच प्रकारची गुणसूत्रे असतात तर मादीपक्ष्यामध्ये ZWअशी वेगळी. त्यामुळे त्यांच्यात females are resposible for determining sex of their babies... मुलांच्या इंटरेस्टचा खाली आलेला ग्राफ थोडा उंचावण्यासाठी यानंतर म्हटलं की नरपक्ष्याकडे एकाच प्रकारचे बीज असल्यामुळे तेच देण्याशिवाय त्याला गत्यंतर नसते. या कमतरतेवर मात करण्यासाठी म्हणूनच की काय निसर्गाने नरपक्ष्याला मादीपेक्षा काहीतरी 'विशेष गुण' किंवा 'रूप' देऊन आकर्षक बनवलं. उदा. कोकीळ पक्ष्याला मंजुळ आवाज दिला किंवा मोराला लांडोरीपेक्षा अधिक सुंदर बनवलं....so now I think you all can guess... what do I mean to suggest from this... Yes..that might be the reason due to which in humans females are more beautiful than males. ...म्हणून साैंदर्याचं वरदान मनुष्यप्राण्यांमध्ये स्त्रियांना मिळालं. वर्गात लगेच हशा पिकला.
....आणि तेवढ्यात पहिल्याच बाकावरून आवाज आला." Miss, I am an exception for this." माझ्या काळजात एकदम चर्र झालं आणि आपण विषय किती इंटरेस्टिंग करून शिकवतो हा उन्मादही एका क्षणात विरून गेला. त्या मुलीकडे धीर करून नजर वळवली तर दिसायला खूप सुंदर नसली तरी चारचाैघींसारखी होती ती. पण वागण्याबोलण्यात एक बेफिकीरी जाणवायची. टाॅमबाॅयसारखी राहायची म्हणून मुलींसारखं नटण्यामुरडण्यात, साैंदर्यात फारसा रस नसेल असं वाटायचं; पण त्या दिवशी कळलं साैंदर्याबद्दल हा न्यूनगंड होता म्हणून तिने टाॅमबाॅयसारखं राहणं पसंत केलं होतं. एका क्षणात कारण (because) आणि परिणामांचे (so) संदर्भच बदलून गेले. विस्कटलेलं सावरायला तर हवंच होतं, तेही तिला अवघडल्यासारखं, समजूत काढत असल्यासारखं वाटू न देता. त्या क्षणी मी कितीही तिला तिच्या साैंदर्याबद्दल ग्वाही दिली असती तरी नसतं पटलं तिला. मग म्हटलं ," अगं, मी विशेष गुणाबद्दल पण म्हटलंय...आणि पक्ष्यांचंच उदाहरण द्यायचं झालं तर केवळ मोराचं रूप किंवा कोकीळ पक्ष्याचा मंजुळ आवाज म्हणजे मिळालेलं वरदान नव्हे, सुगरण पक्ष्याचं घरटं बघितलंय? इतकं सुंदर घरटं विणण्याची कलादेखील नराला अवगत असते. तेही वरदानच की. If 'you' say that you don't have beauty, then start exploring yourself to find out what you have."
मला खात्री आहे; ज्या दिवशी तिला ते सापडेल, त्याच दिवशी तिला तिच्यातलं साैंदर्यही दिसायला लागेल...आणि आरशात न बघतादेखील तिच्यातलीच सुंदरा तिच्या मनात निश्चित भरेल.
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
If 'you' say that you don't
मस्तच उत्तर
@दिपालीजी
झकास. आवडलं...
+१
छान ! आवडले :)
वा !
जिला आपण एखाद्या
त्या न्यूनगंडावर तिने
चॉईस शेवटी स्त्रिचाच!
समस्त वाचक आणि
पटले नाही
Pauca sed matura
pauca sed matura म्हणजे ? जरा
इंग्रजीमधे लिहितोय माफ करा.