मागच्या वेळी ५९ आणि आत्ता पब्जी आणि ११८ ऍप बॅन केले.
म्हणजे अख्खा भारत चीन चे ऍप्लिकेशन वापरतो.
असं असेल तर भारतातले पंधरा वीस कोटी आणि पुण्यातले पाच पन्नास लाख जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत, रताळ्यांनो तुम्ही काम काय करता?? का जन्म नुसता हिंजेवाडीला जाऊन वाकड ब्रीज ला ट्रॅफिक जॅम करायला घेतलाय?
म्हणे सॉफ्टवेअर डेव्हलपर : ) ; )
-------------------------------------------------
हा मेसेज सध्या सगळीकडे फिरतो आहे.भाषा जरा हेटाळणीची असल्याने हिंजवडीतल्या कोणातरी चिडलेल्या संगणक अभिनेत्याने त्याला प्रत्युत्तरही दिले आहे.म्हणजे तसा प्रत्युत्तराचा WhatsApp मेसेज फिरतो आहे.खखोदेजा.
"आम्ही काम करणार्या लोकांसाठी कामाचे सॉफ्टवेअर्स बनवतो. रिकामटेकड्या वळूंच्या टाईमपाससाठी नाही."
---------------------------------------------------
प्रत्युत्तराचा संदेश हा समजा प्रातिनिधिक मानला तर तथाकथित रिकामटेकड्यांसाठी अॅप्स किंवा गेम्स बनवणे हे भारतीय अभियंत्यांना मानहानीकारक का वाटत असावे? सदर रिकामटेकड्यांसाठीच्या अॅप्स म्हणजे टिकटॉक किंवा पब्जी गेम असतील तर खालील दोन बातम्या वाचल्या असतीलच.
https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/business/business-new…
रिकामटेकड्यांच्या अॅपसाठी (जिची उलाढाल इन्फोसिसपेक्षाही मोठी आहे)मायक्रोसॉफ्ट आणि वॉलमार्टसारख्या 'दर्जेदार' कंपन्यांची चढाअोढ का लागली असावी?
दुसरी बातमी पब्जीबद्दलची
https://m.timesofindia.com/companies/money-game-the-growing-biz-of-pubg…
एकूणच गेमिंग उद्योगाची उलाढाल हजारो कोटींची असावी.
असाच विचार WhatsApp बद्दलही आहे. WhatsApp म्हणजे इकडचा माल तिकडे, ढकलगाडी, WhatsApp युनिव्हर्सिटी असा विचार करणारेही बरेच लोक आहेत. पण तेच WhatsApp झुकेरबर्गला विकत घ्यावे लागले. झुकेरबर्ग फालतू ,आर्थिक फायदा नसलेली अॅप का विकत घेईल?
ह्या आणि अशाच इतर काही अॅप्स किंवा गेम्स रिकामटेकड्यांचे टाईमपास जरी मानले तरी त्यातून मिळणारा अफाट पैसा पाहूनदेखील अशी अॅप किंवा गेम बनवणं हे भारतातल्या अभियंत्यांना महत्वाचे का वाटत नसावे? आपणही अशी अॅप बनवून अब्जाधीश व्हावेसे का वाटत नसावे?
ही रिकामटेकड्यांच्या अॅप्सची महती.
भारताने याआधी बंदी घातलेल्या अन्य काही चिनी अॅप्समधे कॅम स्कॅनर , शेअरइट , UC ब्राऊजर , इ एस फाईल एक्स्प्लोरर , पॅरलल स्पेस अशी प्रसिद्ध आणि उपयोजनाच्या दृष्टीने दर्जेदार अशी अॅप्स आहेत. यांच्या सक्षम रिप्लेसमेंट प्ले स्टोअरवर असूनही याच अॅप्स इतक्या मोठ्या प्रमाणावर का वापरल्या जायच्या? की दुसरं कारण म्हणजे जाहिरातबाजीत या बंदी घातलेल्या अॅप्स अग्रेसर होत्या असं आहे का? तसं असेल तर चिनी अॅप्सच्या तुलनेत भारतीय अॅप्स जाहिरातीत कुठे कमी पडतायत?
टाईमपासच्या अॅप्स बनवणं हे अपमानास्पद असेल तर निदान कॅम स्कॅनर , शेअरइट , UC ब्राऊजर , इ एस फाईल एक्स्प्लोरर , पॅरलल स्पेस यांच्याइतक्या दर्जेदार, कामाच्या अॅप्स भारतीयांनी या चिनी अॅप्स प्ले स्टोअरवर येण्यापूर्वीच का बनवल्या नाहीत? की इथेही चिन्यांची जाहिरातबाजीच जिंकली?
भारतातले अभियंते जर कामाच्या अॅप्स किंवा सॉफ्टवेअर बनवत असतील तर यातल्या किती अॅप्स किंवा सॉफ्टवेअर्स ही जागतिक स्तरावर नावाजलेली आहेत?
साधारण याच विषयावर https://www.misalpav.com/node/20710 हा धागा आला होता.यालाही ८ वर्षे झाली.इथल्या एका प्रतिसादात "नुकतेच इंजिनीअरींग होउन बाहेर पडलेले रस्त्याच्या कडेला गळ्यात बॅज अडकवून, स्मार्टफोनशी चाळा करत कंपनीच्या बसची वाट बघत आठ-दहा लाख पॅकेज घेणारी मुलं-मुली बघितली की च्यायला (बिचार्यांचा काय दोष, पण) डोक्यात सणक जाते." असा उल्लेख आहे.
८ वर्षांनंतरही पॅकेजचा आकडा वगळता तीच परिस्थिती आजही आहे का? की बदललीय? ही परिस्थिती कधी बदलेल का?
उहापोह व्हावा! _/\_
वर्गीकरण
वाचने
15281
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
उहापोह
माई
In reply to उहापोह by माईसाहेब कुरसूंदीकर
साचे बद्ध काम करण्याची सवय
+१
In reply to साचे बद्ध काम करण्याची सवय by Rajesh188
+१
एकूणात ... +१११
In reply to साचे बद्ध काम करण्याची सवय by Rajesh188
हम
गूगल
In reply to हम by शा वि कु
नवीन भारतीय apps चे स्वागतच
प्रतेक व्यक्ती काही वेळ तरी मोबाईल वर game खेळतो
हे फक्त गेम्स किंवा ऍप्स
IT क्षेत्रात नेमके काय काम
वा! बाप्पू
In reply to IT क्षेत्रात नेमके काय काम by बाप्पू
अतिशय मार्मिक !
In reply to IT क्षेत्रात नेमके काय काम by बाप्पू
मिसळपाव वरच्या सर्वात मार्मिक अन उपयोगी
In reply to IT क्षेत्रात नेमके काय काम by बाप्पू
हम्म
In reply to IT क्षेत्रात नेमके काय काम by बाप्पू
हो माईसाहेब. खरं आहे तुमच...
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे कि
प्रमोदजी,
In reply to आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे कि by प्रमोद देर्देकर
हॉट
In reply to आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे कि by प्रमोद देर्देकर
त्यांनी बनवलेलं सर्च इंजीन
In reply to हॉट by माईसाहेब कुरसूंदीकर
वेब बेस्ड ईमेल
In reply to हॉट by माईसाहेब कुरसूंदीकर
आपल्याकडे सर्वर आहेत का ?
नाही बदलणार
साधा बदाम सात किंवा भेंडीकोट
+१
In reply to साधा बदाम सात किंवा भेंडीकोट by शाम भागवत
शामजी
In reply to साधा बदाम सात किंवा भेंडीकोट by शाम भागवत
_/\_
In reply to शामजी by उपयोजक
लोकल बाजारात
.
जीके साहेब, सगळेच कसे उद्योजक
In reply to . by Gk
तळेगावला चीन
भारत ... किती सम्पन्न वगैरे...
पोर्तुगेज लोकांनी बनवलेला
या निमित्ताने